दौलतनगर दि.05 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- पाटण तालुक्यात पाटण, दौलतनगर आणि ढेबेवाडी येथील कोरोना उपचार
केंद्रामध्ये अनुक्रमे 50, 50 व 36 याप्रमाणे 136 ऑक्सीजनचे बेड उपलब्ध आहेत. यामध्ये
वाढ करुन दौलतनगर कोरोना उपचार केंद्रामध्ये 25 व पाटण कोरोना उपचार केंद्रामध्ये 50 याप्रमाणे 215 चे वर ऑक्सीजन बेड वाढविण्यात येणार
आहेत. पाटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची गैरसोय होवू नये याकरीता कोरोना उपचार
केंद्रामध्ये अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यासाठी येत्या आठ दिवसात आवश्यक निधी तातडीने
उपलब्ध करुन देणार असून या सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
दौलतनगर ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संदर्भात
तालुक्यातील तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. याप्रसंगी त्यांनी वरील
प्रमाणे माहिती दिली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार योगेश टोमपे,अतिरिक्त
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,तालुका
वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ.कुराडे,पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,उंब्रजचे सपोनि अजय गोरड,
कोयनानगरचे सपोनि चंद्रकांत माळी, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी आदींची
उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत
वाढ होवू लागली आहे. सातारा जिल्हयात सरासरी प्रतिरोज 2400 ते 2500 चे पुढे कोरोना
बाधित होत आहेत. पाटण तालुक्यात आज तारखेला 674 कोरोना बाधित रुग्ण आहेत त्यातील
124 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 540 कोरोना रुग्णांना गृह विलगीकरण करण्यात आले आहे.
सगळीकडे रुग्णालयामध्ये बेडची क्षमता संपल्या आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना
उपचाराकरीता ऑक्सीजन बेडची कमतरता भासू नये याकरीता दौलतनगर कोरोना उपचार केंद्रामध्ये
25 व पाटण कोरोना उपचार केंद्रामध्ये 50 याप्रमाणे अतिरिक्त ऑक्सीजन बेड वाढविण्यात
येणार आहेत.त्यामुळे पाटण तालुक्यात सुमारे 215 चे वर ऑक्सीजन बेड उपलब्ध होतील. त्याचबरोबर
दौलतनगर व पाटण येथील उपचार केंद्रामध्ये प्रत्येकी दोन दोन ड्युरा ऑक्सीजन सिलेंडर
कार्यान्वीत करण्यात येणार आहेत. दौलतनगर येथील उपचार केंद्रामध्ये सुरक्षिततेच्या
दृष्टीने एक अग्निशामन तसेच 10 अग्निरोधक सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.त्याचबरोबर
पाटण, दौलतनगर आणि ढेबेवाडी येथील उपचार केंद्रामध्ये रुग्णांना सेवा देणारे डॉक्टर,
नर्स व इतर स्टाफ यांच्याकरीता प्रतिरोज लागणारे सॅनिटायझर, मास्क, पी.पी.ई कीट इत्यादी
साहित्य देण्यात येणार आहे. या सर्व अतिरक्त सुविधा येत्या आठ दिवसात तिन्ही उपचार
केंद्रामध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच या तिन्ही उपचार केंद्राकरीता अतिरिक्त
डॉक्टर, नर्सेस व स्टाफ आवश्यक आहे त्याप्रमाणे हा स्टाफ उपलब्ध करुन देण्याच्या सुचना
जिल्हाधिकारी , सातारा यांना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर आवश्यक असणारी सर्व औषधे
ही उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्हा नियोजनमधून आवश्यक निधी आरोग्य विभागास उपलब्ध करुन
दिला आहे त्यातून आवश्यक असणारी सर्व औषधे उपलब्ध करुन देण्याचे आदेशही जिल्हा शल्य
चिकित्सक यांना दिले आहेत त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची कसलीही गैरसोय पाटण तालुक्यात
होणार नाही याचे नियोजन तालुका प्रशासनाने करावे अशाही सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंनी बैठकीत दिल्या आहेत.
चौकट:- पाटण कोरोना उपचार केंद्रात व्हेन्टिलेटरची सोय करणार:- ना.शंभूराज देसाई
आवश्यक असणाऱ्या ऑक्सीजन बेडची सोय आपण
पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी उपचार केंद्रामध्ये करीत आहोत त्यामुळे ऑक्सीजन अभावी कोरोना
रुग्णांची गैरसोय होणार नाही परंतू ज्या रुग्णांना व्हेन्टिलेटरची आवश्यकता आहे त्यांना
सातारा अथवा कराड येथे व्हेन्टिलेटर बेड उपलब्ध होत नाहीत याकरीता पाटण कोरोना उपचार
केंद्रात व्हेन्टिलेटरची सोय करणार असल्याचेही ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले
आहे.
No comments:
Post a Comment