Monday 31 May 2021

केंद्रीय मार्ग निधीमधून पाटण मणदुरे जळव तारळे पाल काशिळ राज्य मार्गाच्या रस्त्याला 04 कोटी 92 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडील पाठपुराव्याला यश. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई.

 




 

          दौलतनगर दि.31 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- पाटण विधानसभा मतदार संघातील पाटण मणदुरे जळव तारळे पाल काशिळ रस्ता हा दळण-वळणाचे दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मार्गाची सुधारणा करण्याकरीता गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी राज्याचे मंत्री झाले झाले हा मार्ग रामा 398 नंबरने राज्य मार्ग करुन घेतला व केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांचेकडे पाठपुरावा करुन सन 2020-21 चे आर्थिक वर्षात केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.) मधून 04 कोटी 91 लक्ष 51 हजार रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आहे.

              गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी यासंदर्भात माहिती दिली आहे की, पुणे ते कोल्हापूर व कराड चिपळूण या  दोन राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा पाटण मणदुरे जळव तारळे पाल काशिळ रस्ता पुर्वी प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून ओळखला जात होता.या प्रमुख जिल्हा मार्गावर पाली,ता.कराड येथे श्री खंडोबा, जळव,ता.पाटण येथे श्री.जोतिबा आणि निवकणे,ता.पाटण येथे श्री. जानाईदेवी माता ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिध्द अशी तीर्थक्षेत्र असून सदर तीर्थक्षेत्रांना महाराष्ट्रासह इतर राज्यातून अनेक भक्त-भाविक भेट देत असतात.सदरच्या 38 किलो मिटर लांब असलेल्या या प्रमुख जिल्हा मार्गाला राज्य मार्गाचा दर्जा देणेबाबत प्रस्ताव सादर करुन राज्यशासनाकडे यापुर्वी पाठपुरावा केला. त्यानुसार राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील दि. 25 फेब्रुवारी 2020 रोजीचे शासन निर्णयानुसार पाटण मणदुरे जळव तारळे पाल काशीळ रस्ता प्रजिमा 57 या मार्गाची राज्य मार्ग क्रमांक 398 म्हणून दर्जोन्नती करण्यात आली. तसेच या राज्य मार्गावरुन दैनंदिन होत असलेली दळण-वळण आणि जास्त वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन पाटण मणदुरे जळव तारळे पाल काशीळ रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे होते.दैनंदिन ये-जा करणाऱ्या प्रवाशांची  गैरसोय लक्षात घेता पाटण मणदुरे जळव तारळे पाल काशीळ रस्ता राज्य मार्ग 398 या रस्त्याची सुधारणा करण्याकरीता भरीव निधी मंजूर होणेबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांचेकडे सन 2020-21 चे आर्थिक वर्षात केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.)मधून भरीव निधी मंजूर करावा अशी लेखी पत्राव्दारे विनंती केलेली होती. त्यानुसार पाटण मणदुरे जळव तारळे पाल काशिळ रस्ता यामधील किमी 13/00 ते 32/00 भाग निवकणे ते जळव व मरळोशी ते तारळे चौक मधील राज्य मार्गाची सुधारणा करण्याकरीता सन 2020-21 चे आर्थिक वर्षात केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.) मधून 04 कोटी 91 लक्ष 51 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांनी दि.08 मे 2021 रोजीचे लेखी पत्राव्दारे कळविले असून ना. नितीन गडकरी यांचेकडे पाटण मणदुरे जळव तारळे पाल या राज्य मार्गाचे मजबुती करण्यासाठी  केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.)मधून निधी मंजूर होणेकरीता सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याचे सांगत लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया करण्यात येऊन पावसाळा संपल्यानंतर तातडीने राज्य मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे,अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या असून या रस्त्याच्या कामांस आवश्यक असणारा निधी तातडीने मंजुर करुन दिलेबद्दल मी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानत असल्याचेही त्यांनी शेवटी  म्हंटले आहे. 

Saturday 29 May 2021

उपमुख्यमंत्री यांच्या साताराच्या बैठकीतील सुचनांची गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंकडून तात्काळ अंमलबजावणी जिल्हयातील सर्व पोलीस विभागाची बैठक घेवून उपमुख्यमंत्री यांच्या सुचनांचे तंतोतत पालन करण्याच्या दिले सक्त आदेश.

 


          दौलतनगर दि.30 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-सातारा जिल्ह्यातील वाढत्या कोविड रुग्ण संख्येच्या पार्श्मभूमीवर काल दि.28 मे रोजी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हयातील पोलीस विभागाने करावयाच्या कडक अंमलबजावणी बाबत केलेल्या सुचनानुसार आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तात्काळ अंमलबजावणी करीत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक,अप्पर पोलीस अधिक्षक,सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे समवेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेवून उपमुख्यमंत्री यांच्या सुचनांचे तंतोतत पालन करण्याचे सक्त आदेश दिले.

               व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पोलीस अधिक्षक,अप्पर पोलीस अधिक्षक,सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना सुचना देताना म्हणाले, ग्रामीण तसेच शहरी भागातील कोरोना बाधित रुग्णांना गृह विलगीकरणामध्ये न ठेवता त्यांना तात्काळ संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये दाखल करावे. याबाबत सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील ग्रामदक्षता समितींना सुचना देवून बाधित रुग्ण घरी न राहता संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये दाखल होतील याची अमंलबजावणी झाल्याची खात्री करावी.सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी महसूल,आरोग्य,व संबंधित सर्व अधिकारी यांचेशी समन्वय ठेवून दररोज केलेल्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा. शहरातील काही लसीकरण केंद्रावर काही व्यक्तींच्याकडून त्यांच्या समर्थकांना प्राधान्याने लसीकरण करणेबाबत कर्मचा-यांचेवर दादागिरी, अरेरावी होत असलेबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.अशा प्रकारची दादागिरी, गुंडगिरी करणा-यांचेवर कडक कारवाई करावी.अशा घटना घडू नये म्हणून लसीकरण केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोवस्त नेमावा.लसीकरण केंद्राला पोलीस ठाणे प्रभारी अधिका-यांनी दिवसातून एकदा भेट देवून पाहणी करावी.

               ज्याठिकाणी कंटेटमेंट झोन आहे अशा ठिकाणी दिलेल्या सुचनांची कडक अमंलबजावणी करावी.त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नेमूण विनाकरण फिरणाऱ्या लोकांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करावी. शहरात प्रवेश करणा-या नाक्यांवर बॅरिकेटींग लावून प्रत्येक वाहनांची तपासणी करावी व विना परवाना फिरणा-या वाहनांवर दंडात्मक कारवाईसह आवश्यकता वाटल्यास गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई  करावी, जेणेकरुन लोक विनाकारण फिरणार नाहीत.अशी कारवाई केल्याने त्याचा समाजामध्ये पोलीस कारवाई करतायेत असा संदेश जाईल.सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी  त्यांचे विभागात केलेल्या कारवाईबाबतचा दररोज आढावा घेवून पोलीस यंत्रणा अधिक सतर्क राहील याची  दक्षता घ्यावी. पोलीस अधिक्षक व अप्पर पोलीस अधिक्षक यांनी  जिल्ह्यातील शहरांना /गावांना अचानक भेटी देवून पोलीस विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कारवाईची प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी करावी. मी स्वत: कधीही जिल्ह्यातील कोणत्याही शहरास अथवा गावांस अचानक भेट देवून पोलीस कारवाईची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सुचना देताना सर्व पोलीस विभागास सांगितले.

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या हस्ते दौलतनगर कोवीड केअर सेंटरमधील 10 व्हेंटीलेटर बेडचे लोकार्पण संपन्न.

 

दौलतनगर दि.29 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने पाटण मतदारसंघातील कोरोना रुग्णांना व्हेंटीलेटर बेडची कमतरता पडू नये याकरीता मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी म्हणून दौलतनगर ता.पाटण येथील कोवीड केअर सेंटरमध्ये स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 10 व्हेंटीलेटर बेड बसविले असून कोरोना रुग्णांच्या उपचाराकरीता आज या 10 व्हेंटीलेटर बेड लोकार्पण गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या शुभहस्ते संपन्न झाले.

                     याप्रसंगी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे समवेत जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,जालंदर पाटील,प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार  योगेश टोमपे,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,डॉ.श्रीनिवास बर्गे, कोवीड केअर सेंटरचे नोडल अधिकारी डॉ.सोहेल शिकलगार,समन्वयक अमर कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

                    गतवर्षी पाटण मतदारसंघात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पुढाकार घेत पाटण विधानसभा मतदारसंघातील कोरोना बाधितांना उपचार देणेकरीता जिल्हा नियोजन समिती, त्यांचे स्थानिक विकास निधी मधून पाटण, ढेबेवाडीसह दौलतनगर ता.पाटण येथे स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अद्यावत सोयी-सुविधांसह 50 ऑक्सिजन बेड व 25 नॉन ऑक्सिजन बेडचे कोरोना केअर सेंटर सुरु केले.आज याठिकाणी 50 ऑक्सिजन बेडमध्ये वाढ करुन एकूण 75 ऑक्सिजन बेड कार्यरत असून मतदारसंघातील कोरोना रुग्णांच्यावर उपचार होत आहेत.दुसऱ्या लाटेमध्ये कोरेानाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला असल्याने कोरोना बाधित रुग्णांना व्हेंटीलेटर बेडची आवश्यकता भासू लागल्यानंतर सद्यपरिस्थितीत जिल्ह्यामध्ये कराड असो किंवा सातारा येथे व्हेंटीलेटर बेड उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे व्हेंटीलेटर बेडअभावी कोरोना रुग्ण दगावू नयेत म्हणून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पुढाकार घेतला व या कोवीड केअर सेंटरमध्ये स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अद्यावत सोयी-सुविधांसह 10 व्हेंटीलेटर बेड बसविले. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या शुभहस्ते याचा लोकार्पण झालेनंतर 10 व्हेंटीलेटर बेड आजपासूनच कोरोना रुग्णांना उपचाराकरीता खुले करण्यात आले आहेत.

                     याप्रसंगी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,गेल्या सहा महिन्यात सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.अलीकडच्या काळात कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृत्यूच्या संख्येत झालेली वाढ ही चिंताजनक आहे.सद्यपरिस्थितीत जिल्ह्यामध्ये कराड असो किंवा सातारा येथे व्हेंटीलेटर बेड मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी झाल्या. व्हेंटीलेटर न मिळाल्यामुळे काहींचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले. म्हणून आपण या कोवीड केअर सेटंरमध्ये व्हेंटीलेटर बेड बसविण्याचा निर्णय घेतला. या 10 व्हेंटीलेटर बेडमुळे व योग्य औषधोपचारामुळे कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होणार आहे.

                      दौलतनगर कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणेकरीता एक नोडल अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे 02 वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी,खाजगी सराव करणारे 16 डॉक्टर, 08 नर्स, 03 फार्मासिस्ट,04 वॉर्ड बॉय, ॲम्बूलन्सकरीता स्वतंत्र्य ड्रायव्हर, डेटा ऑपरेटर 01 अशाप्रकारे वैद्यकीय पथक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.सेंटरमध्ये तीन रुममध्ये 75 ऑक्सीजनचे बेड तर मध्यम हॉलमध्ये 10 व्हेंटीलेटर बेड ठेवण्यात आले आहेत. गिझर,100 लिटर शुद्ध पाणी,नवीन टॉयलेट तसेच येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय पथकाकरीता स्वतंत्र्यपणे राहण्याची व्यवस्था,कोरोना रुग्णांची ऑनलाईन नोंदणी करणेकरीता संगणक, प्रींटर, इंटरनेट आदी सुविधा उपलब्ध केल्या असल्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.या केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नाष्ता, जेवण देण्यात येत आहे. 10 व्हेंटीलेटर बेडची यंत्रणा गौरव सर्जीकलचे गौरव परदेशी व चिंगळे सर्जीकलचे रोहित चिंगळे यांनी कार्यान्वीत केली आहे.

Thursday 27 May 2021

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या पुढाकाराने पाटण तालुक्यात ग्रामपंचायतीकडून संस्थात्मक विलगीकरण कक्षाला प्रारंभ. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीची पुर्वतयारी पुर्ण.

 

 

           दौलतनगर दि.27 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-विषाणूच्या संक्रमनामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची साखळी तोडण्याकरीता ग्रामीण भागातील तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी  संस्थात्मक कोरोना विलगीकरण कक्ष उभारावे या शासनाच्या सुचनांनुसार पाटण तालुक्यात तालुक्याचे लोकप्रतिनिधी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या पुढाकाराने अनेक ग्रामपंचायतीकडून संस्थात्मक विलगीकरण कक्षाला प्रारंभ केला आहे.संस्थात्मक विलगीकरण करणेकरीता अनेक ग्रामपंचायतीची तयारी पुर्ण झाली आहे.

               दौलतनगर ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली कोरेाना बाधित रुग्णांची साखळी तुटणेसाठी शासनाच्या नियमानुसार तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी  संस्थात्मक कोरोना विलगीकरण कक्ष सुरु करणेसंदर्भात तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत गृहराज्यमंत्री ना.देसाईंनी शासनाची यासंदर्भातील भूमिका काय आहे हे स्पष्ट केले.या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील,तहसिलदार योगेश टोमपे,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे, पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी,मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोहेल शिकलगार आदींची उपस्थिती  होती.

                बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,कोरोना विषाणूच्या संक्रमनामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणिय आहे.ही साखळी तुटण्याकरीता राज्य शासनाने राज्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतींनी संस्थात्मक कोरोना विलगीकरण कक्ष उभारावे अशा सुचना दिल्या आहेत.आपला पाटण तालुका ग्रामीण भाग आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांचे विलगीकरण करणेसाठी प्रत्येक गांवामध्ये संस्थात्मक कोरोना विलगीकरण कक्ष सुरु करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना काढावेत तसेच ग्रामस्तरीय समितीच्या सहकार्याने सदर विलगीकरण कक्षामध्ये गावात बाधित होणाऱ्या रुग्णांचे विलगीकरण करावे जेणेकरुन बाधित कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव संबधित रुग्णाचे कुटुंबात व गावात होणार नाही. तालुक्यातील ग्रामपंचायतींनी संस्थात्मक कोरोना विलगीकरण कक्ष उभारण्याकरीता उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुक्यातील प्रत्येक मंडलनिहाय वरीष्ठ व कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्या कराव्यात व लवकरात लवकर पाटण तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीकडून संस्थात्मक कोरोना विलगीकरण कक्षाला सुरुवात करावी गटविकास अधिकारी यांनीही त्या त्या विभागाचे ग्रामविस्तार अधिकारी व प्रत्येक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना यासंदर्भात सुचित करावे तसेच ज्या ग्रामपंचायतीं संस्थात्मक कोरोना विलगीकरण कक्ष सुरु करीत आहेत त्या ग्रामपंचायतींनी ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात आपले गांव येत आहे तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत विलगीकरण कक्षातील रुग्णांची तपासणी करुन आवश्यक औषधोपचार करण्याच्या सुचनाही देण्यात याव्यात यामुळे कोरोना बाधितांची साखळी तुटण्यास चांगली मदत होणार आहे. अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.देसाईंनी बैठकीत दिल्या.

                     गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या सुचनेनुसार पाटण उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी यासंदर्भात तात्काळ आदेश जारी केला असून पाटण तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर संस्थात्मक कोरोना विलगीकरण कक्ष उभारण्याकरीता तालुक्यातील 15 विभागामध्ये महसूल मंडलनिहाय वरीष्ठ व कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्या केल्या आहेत प्रत्येक मंडलमध्ये प्रत्येकी 04 प्रमाणे वरीष्ठ व कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्या नेमणुका केल्या आहेत. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या पुढाकाराने अनेक ग्रामपंचायतीकडून संस्थात्मक विलगीकरण कक्षाला प्रारंभ देखील केला असून अनेक ग्रामपंचायतीकडून संस्थात्मक विलगीकरण कक्षाची तयारीही पुर्ण झाली आहे.

Wednesday 26 May 2021

पोलीस वसाहत इमारतीत लहान मुलांकरीता उभारावयाच्या कोवीड केअर सेंटरचा प्रस्ताव तात्काळ मंजुरीला पाठवा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना.

 

 

           दौलतनगर दि.26 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- लहान मुलांमध्ये कोवीड-19 च्या संसर्गाबाबत बेसावध राहून चालणार नाही. राज्यात तिसरी लाट येण्याची वाट न बघता आपण सावधानता म्हणून पाटणच्या नवीन बांधण्यात आलेल्या पोलीस वसाहत इमारतीत लहान मुलांकरीता स्वतंत्र्य असे कोवीड केअर सेंटर सुरु करण्याच्या तयारीला लागूया. हे कोवीड सेंटर सुरु करण्याकरीताचा प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडे मंजुरीला पाठवा मी स्वत: यासंदर्भात जिल्हाधिकारी, सातारा यांना सुचित करतो अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

               पाटणच्या पोलीस वसाहत इमारतीत लहान मुलांकरीता स्वतंत्र्य कोवीड केअर सेंटर सुरु करणे संदर्भात आज दौलतनगर ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. याप्रसंगी त्यांनी वरील प्रमाणे सुचना दिल्या.या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, तहसिलदार योगेश टोमपे, गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी,मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोहेल शिकलगार आदींची उपस्थिती  होती.

                बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वय वर्षे 14 च्या वरील सर्वांना कोरोना उपचार देणेकरीता आपण पाटण तालुक्यात अद्यावत अशी कोरोना उपचार केंद्र सुरु केली आहेत.परंतू वय वर्षे 14 च्या आतील लहान मुलांना या संसर्गापासून वाचविण्याकरीता लहान मुलांकरीता स्वतंत्र्य कोवीड केअर सेंटर तालुक्यात सुरु करणे गरजेचे आहे. त्याकरीता पाटणच्या नवीन बांधण्यात आलेल्या पोलीस वसाहत इमारतीत हे सेंटर सुरु करण्याच्या तयारीला अधिकाऱ्यांनी लागावे.सदरचे सेंटर सुरु करण्याकरीता आवश्यक असणारी सर्व पुर्वतयारी करुन यासंदर्भात काय काय उभारणे आवश्यक आहे त्याचा सविस्तर प्रस्ताव हा जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडे मान्यतेकरीता व निधी उपलब्धतेकरीता सादर करावा.सेंटरमध्ये संभाव्य बालकांवर उपचार करावयाचे म्हंटल्यास पोलीस वसाहतीच्या इमारतीत 14 रुम कार्यान्वीत आहेत त्याठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे, पाण्याची व्यवस्था आहे मात्र कमी प्रमाणात पाणी येते त्यामुळे याठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा होणेकरीता आवश्यक असणाऱ्या उपाययोजना कराव्यात त्याठिकाणी लहान मुलगा व त्याची आई यांची राहण्याची सोय करणे आवश्यक आहे.तसेच या सेंटरकरीता बालरोगतज्ञ यांची नेमणूक करणे, बेड उपलब्ध करुन देणे, औषधोउपचाराकरीता औषधे उपलब्ध करुन देणे तसेच याठिकाणी किती ऑक्सीजन व किती नॉन ऑक्सीजन बेड उपलब्ध करावे लागतील या सर्व बांबीचा सविस्तर प्रस्ताव तयार करावा व तो मान्यतेकरीता व निधी उपलब्धतेकरीता सादर करावा प्रस्ताव सादर होताच मी स्वत: जिल्हाधिकारी, सातारा यांना यासंदर्भात सुचित करतो.

                आपले तालुक्यात कोरोनाची तिसरी लाट आलीच तर आणि बालकांच्या संसर्गाबाबत परिस्थिती निर्माण झाल्यास अचानक आपणांला धावपळ करावी लागू नये या परिस्थितीला तोंड देण्याच्या अनुषंगाने लहान मुलांवरील उपचारांबाबत जागरुक राहून हे सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीस पोलीस वसाहतीची इमारत  व इमारतीचा सर्व परिसर हा फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात यावे असेही ना.शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना सांगितले.


Monday 24 May 2021

तौक्ते वादळामुळे घरांची पडझड झालेल्या नुकसानग्रस्तांना स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टने दिला मदतीचा हात.

 




दौलतनगर दि.24 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- गत आठवड्यात दि. 16 व 17 मे, रोजी तौक्ते वादळाने व अवकाळी पावसाने महाराष्ट्रासह इतर राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या वादळामुळे पाटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांच्या पडझडीसह फळझाडांचे नुकसान झाले होते. वादळाच्या दुसऱ्याच दिवशी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी नुकसानग्रस्त ठिकाणांना भेटी देवून प्रत्यक्ष नुकसानग्रस्तांची पाहणी करुन शासकीय यंत्रणेला दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. हे पंचनामे होईपर्यंत राहत्या घरांची पडझड झालेल्या कुटूंबाना मदतीचा हात म्हणून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखालील स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मायेचा आधार देत नुकसानग्रस्त कुटुंबाला १० हजार रक्कमेचा धनादेश पदाधिकारी कार्यकर्ते यांचे हस्ते देण्यात आला.

                 गत आढवड्यात तौक्ते वादळ व अवकाळी पावसामुळे पाटण तालुक्यातील विविध गावात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शासकीय यंत्रणेसह विविध गावात वाड्यावस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जावून पाहणी केली. वादळामुळे व पावसामुळे पाटण तालुक्यातील सर्व मंडलामध्ये नुकसान झाले आहे.ढेबेवाडी काळगांव विभागामध्ये निगडे,वरची शिबेवाडी (गुढे),चाळकेवाडी,अंबवडे खुर्द,मंद्रूळकोळे, मणदुरे विभागातील केरळ कोयना विभागा तील रासाठी सह अनेक गावामध्ये नुकसानीच्या घटना घडल्या होत्या यातील काही ठिकाणी ना. देसाईंनी प्रत्यक्ष पाहणी केली होती.पावसाळा तोंडावर असल्याने काही कुंटूंबांचे उध्दवस्त निवारे पुन्हा उभे राहण्याचे दृष्टीने नियोजन करा अशा सुचना त्यांनी त्यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. शासकीय मदतीची वाट न पाहता त्यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने निगडे येथील नुकसानग्रस्त महादेव बाळकू तेटमे, वरची शिबेवाडी (गुढे) येथील शांताबाई निवृत्ती शिबे, केरळ येथील लक्ष्मी जनार्दन जामदार या खुप नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना त्यांनी त्यांचे  पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मार्फत प्रत्येकी १० हजार रक्कमेचा धनादेश देत मायेचा आधार दिला.नुकसानग्रस्त कुटुंबांनी ना.शंभूराज देसाईंचे आभार व्यक्त केले आहेत.  

Saturday 22 May 2021

सातारा जिल्हा लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांना सुचना.

 




 दौलतनगर दि.23 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- सातारा जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे.कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याकरीता दि.24 मे च्या मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सातारा यांनी काढले आहेत. सातारा शहरात जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दोन दिवसापुर्वीच सांगून कडक लॉकडाऊन केला आहे. दि.24 पासून आठ दिवसाचे सुरु होणाऱ्या संपुर्ण सातारा जिल्हयातील लॉकडाऊनची कडक अंमलबाजवणी करा अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

         दौलतनगर ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संदर्भात तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. याप्रसंगी त्यांनी वरील प्रमाणे सुचना दिल्या.या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, तहसिलदार योगेश टोमपे,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,उंब्रजचे सपोनि अजय गोरड,कोयनानगरचे सपोनि चंद्रकांत माळी,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी आदींची उपस्थिती  होती.

        या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे.सातारा जिल्हयात सरासरी प्रतिरोज 1800 ते 1900 चे पुढे कोरोना बाधित होत आहेत.पाटण तालुक्यातील परिस्थिती आटोक्यात आहे.तरीही आठ दिवसाच्या कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी,सातारा यांनी काढले आहेत.त्याचे महसूल आणि पोलीस विभागाने कडक अंमलबजावणी करावी जेणेकरुन पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आणखीन कमी होण्यास मदत होईल.पोलीस विभागाने पहिले दोन दिवस अतिशय कडक भूमिका घ्यावी म्हणजे लोक घराबाहेर पडणार नाहीत.विनाकारण बाहेर पडणाऱ्यावर कडक कारवाई करा.तसेच तालुक्यातील ज्या गांवामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे त्या गांवातील ग्रामस्थांच्या महसूल पोलीस विभागाने बैठका घेवून बाधित लोकांना गृह विलगीकरण करावे व घरातच उपचार घ्यावेत अशा सुचना करा. पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांकरीता आवश्यक असणारी सर्व यंत्रणा आपण पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी कोरोना उपचार केंद्रामध्ये उपलब्ध करुन दिली आहे. आवश्यक असणारा औषध साठा तसेच ऑक्सीजनचा साठाही चांगल्या प्रमाणात आहे.परंतू वाढणारी ही कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याकरीता लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असून आठ दिवसाच्या कडक लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली पहावयास मिळेल.कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याकरीता प्रशासन आपले काम करीत आहे परंतू  नागरिकांनी ही अशा कठीण परिस्थितीत घरी थांबून आपल्या कुटुंबाची काळजी घेत या संकटावर मात करावी असे आवाहनही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी  या बैठकीत केले.

चौकट:- पाटण तालुक्यात ऑक्सीजन बेड अभावी कुणाची गैरसोय होत नाही:- ना.शंभूराज देसाई

पाटण तालुक्यात पाटण, दौलतनगर आणि ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये अनुक्रमे 50, 50 व 36 याप्रमाणे 136 ऑक्सीजनचे बेड उपलब्ध आहेत.दौलतनगर 25 व पाटण कोरोना उपचार केंद्रामध्ये  50 याप्रमाणे 75 बेड वाढीवचे तर 11 बेड व्हेन्टिलेटरचे बसविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. त्यामुळे ऑक्सीजन बेड अभावी कुणाची गैरसोय होत नाही ही चांगली बाब आहे.असेही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले.

Thursday 20 May 2021

कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे ६२ व्या पुण्यतिथीनिमित्त गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंकडून विनम्र अभिवादन.

 

दौलतनगर दि.२०:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६२ वी पुण्यतिथी अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.कै.ताईसाहेब यांचे ६२ व्या पुण्यतिथीनिमित्त कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी विनम्र अभिवादन केले.

            कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत साध्या पध्दतीने केवळ पुष्प्हार अर्पण करुन राज्याचे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६२ वी पुण्यतिथी करण्याचा निर्णय ना.देसाईंनी घेतला पुण्यतिथीनिमित्त त्यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींना महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा कार्यक्रम कोरोनाच्या संकटामुळे आम्ही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या शिष्यवृत्तीचे वितरण कोरोनाचे संकट संपल्यानंतर करण्यात येणार असल्याचे यावेळी ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले.

          यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.



 


Wednesday 19 May 2021

घाणबी, वनकुसवडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दोन दिवसात सुरु करा. गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना

 

दौलतनगर दि.19 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम अशा डोंगर पठारावर मौजे घाणबी व वनकुसवडे ता. पाटण येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती पुर्ण झाल्या आहेत. परंतू या पठारावरील नागरिकांना उपचाराकरीता पाटण अथवा इतर ठिकाणी जावे लागत आहे. कोरेानाचा पार्द्रुभाव मोठया प्रमाणात वाढत चालला आहे त्यामुळे डोंगर पठारावरील ही दोन्ही प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे येत्या दोन दिवसात चालू करुन डोंगर पठारावरील नागरिक, महिलांना उपचार देणेचे नियेाजन करा अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या.

                सातारा शासकीय विश्रामगृह येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगर पठारावरील मौजे  घाणबी व वनकुसवडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरु करुन येथील जनतेला उपचार देणेसंदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे अधिकाऱ्यांना सुचना केल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, गटविकास अधिकारी मिना साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी आर.बी. पाटीलआदींची उपस्थिती होती.

                  यावेळी बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत पाटण विधानसभा मतदारसंघातील मौजे घाणबी व वनकुसवडे येथे शासनाने प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मंजुरी देवून आवश्यक असणाऱ्या उपकेंद्राच्या इमारतीही उभ्या करुन दिल्या आहेत.मग याठिकाणी डोंगर पठारावरील नागरिक व महिला तसेच बालकांना पाटणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता का जावे लागत आहे ? असा सवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांना करीत मला कारणे नको आहेत येत्या देान दिवसात मौजे घाणबी व वनकुसवडे उपकेंद्राकरीता मंजुर असणारे डॉक्टर, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करुन ही दोन्ही उपकेंद्रे येत्या दोन दिवसात सुरु करुन या पठारावरील जनतेला आरोग्य सुविधा देण्याचे नियोजन करावे अशा सुचना केल्या.पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम अशा ठिकाणी घाणबी व वनकुसवडे ही गावे असून त्या गावाचे परिसरात 15 ते 20 वाड्या वस्त्या आहेत. पाटण या शहरापासून ही गांवे 25 किलोमीटर डोंगर भागात आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमिवर लॅाकडाऊन असल्याने डोंगर पठारावरील जनतेला पाटण येथे उपचाराकरीता येता येत नाही. या परिसरात घाणबी  तसेच वनुकुसवडे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून ते सध्या बंद आहे. तेथील जनतेला आरोग्यच्या दृष्टीने ते आरोग्य केंद्र सुरु असणे गरजेचे आहे. घाणबी तसेच वनुकुसवडे आरोग्य उपकेंद्रास आवश्यक असलेला सर्व आरोग्य अधिकारी,कर्मचारी यांच्या नेमणूका त्याचबरोबर आवश्यक असणारी सर्व औषधे ही दोन दिवसात उपलब्ध करुन द्या. घाणबी तसेच वनुकुसवडे आरोग्य उपकेंद्रचाचा ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) प्रत्येक आठवड्यातील तीन दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 05 यावेळेत चालु ठेवा.सदरचे आरोग्य उपकेंद्रात नियुक्त केलेले डॅ्ाक्टर व इतर कर्मचारी यांना वेळेवर हजर राहणेबाबत सुचना करा व दोन दिवसात घाणबी तसेच वनुकुसवडे आरोग्य केंद्र चालू करा अशा सक्त सुचना ना.देसाईंनी केल्या. डोंगर पठारावरील जनतेची कसलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. थोड्याच दिवसात पावसाळा सुरु होतोय त्यावेळी आरोग्य उपकेंद्रास आवश्यक असणारे अधिकारी, कर्मचारी यांना उपस्थित ठेवा तसेच आवश्यक असणारी सर्व औषधांचा पुरवठाही करा त्याचबरोबर पावसाळयात येथील जनतेला सलाईन लावण्याची आवश्यकता भासल्यास त्याचीही सोय दोन्ही उपकेंद्रामध्ये करण्याची व्यवस्था करा असेही त्यांनी योवळी बोलताना सांगितले. यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी दोनच दिवसात ही दोन्ही उपकेंद्रे सुरु करण्याची कार्यवाही पुर्ण करीत असल्याचे ना.शंभूराज देसाईंना यावेळी सांगितले.


घाणबी, वनकुसवडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दोन दिवसात सुरु करा. गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना

 

दौलतनगर दि.19 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम अशा डोंगर पठारावर मौजे घाणबी व वनकुसवडे ता. पाटण येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती पुर्ण झाल्या आहेत. परंतू या पठारावरील नागरिकांना उपचाराकरीता पाटण अथवा इतर ठिकाणी जावे लागत आहे. कोरेानाचा पार्द्रुभाव मोठया प्रमाणात वाढत चालला आहे त्यामुळे डोंगर पठारावरील ही दोन्ही प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे येत्या दोन दिवसात चालू करुन डोंगर पठारावरील नागरिक, महिलांना उपचार देणेचे नियेाजन करा अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या.

                सातारा शासकीय विश्रामगृह येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगर पठारावरील मौजे  घाणबी व वनकुसवडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरु करुन येथील जनतेला उपचार देणेसंदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे अधिकाऱ्यांना सुचना केल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, गटविकास अधिकारी मिना साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी आर.बी. पाटीलआदींची उपस्थिती होती.

                  यावेळी बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत पाटण विधानसभा मतदारसंघातील मौजे घाणबी व वनकुसवडे येथे शासनाने प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मंजुरी देवून आवश्यक असणाऱ्या उपकेंद्राच्या इमारतीही उभ्या करुन दिल्या आहेत.मग याठिकाणी डोंगर पठारावरील नागरिक व महिला तसेच बालकांना पाटणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता का जावे लागत आहे ? असा सवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांना करीत मला कारणे नको आहेत येत्या देान दिवसात मौजे घाणबी व वनकुसवडे उपकेंद्राकरीता मंजुर असणारे डॉक्टर, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करुन ही दोन्ही उपकेंद्रे येत्या दोन दिवसात सुरु करुन या पठारावरील जनतेला आरोग्य सुविधा देण्याचे नियोजन करावे अशा सुचना केल्या.पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम अशा ठिकाणी घाणबी व वनकुसवडे ही गावे असून त्या गावाचे परिसरात 15 ते 20 वाड्या वस्त्या आहेत. पाटण या शहरापासून ही गांवे 25 किलोमीटर डोंगर भागात आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमिवर लॅाकडाऊन असल्याने डोंगर पठारावरील जनतेला पाटण येथे उपचाराकरीता येता येत नाही. या परिसरात घाणबी  तसेच वनुकुसवडे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून ते सध्या बंद आहे. तेथील जनतेला आरोग्यच्या दृष्टीने ते आरोग्य केंद्र सुरु असणे गरजेचे आहे. घाणबी तसेच वनुकुसवडे आरोग्य उपकेंद्रास आवश्यक असलेला सर्व आरोग्य अधिकारी,कर्मचारी यांच्या नेमणूका त्याचबरोबर आवश्यक असणारी सर्व औषधे ही दोन दिवसात उपलब्ध करुन द्या. घाणबी तसेच वनुकुसवडे आरोग्य उपकेंद्रचाचा ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) प्रत्येक आठवड्यातील तीन दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 05 यावेळेत चालु ठेवा.सदरचे आरोग्य उपकेंद्रात नियुक्त केलेले डॅ्ाक्टर व इतर कर्मचारी यांना वेळेवर हजर राहणेबाबत सुचना करा व दोन दिवसात घाणबी तसेच वनुकुसवडे आरोग्य केंद्र चालू करा अशा सक्त सुचना ना.देसाईंनी केल्या. डोंगर पठारावरील जनतेची कसलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. थोड्याच दिवसात पावसाळा सुरु होतोय त्यावेळी आरोग्य उपकेंद्रास आवश्यक असणारे अधिकारी, कर्मचारी यांना उपस्थित ठेवा तसेच आवश्यक असणारी सर्व औषधांचा पुरवठाही करा त्याचबरोबर पावसाळयात येथील जनतेला सलाईन लावण्याची आवश्यकता भासल्यास त्याचीही सोय दोन्ही उपकेंद्रामध्ये करण्याची व्यवस्था करा असेही त्यांनी योवळी बोलताना सांगितले. यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी दोनच दिवसात ही दोन्ही उपकेंद्रे सुरु करण्याची कार्यवाही पुर्ण करीत असल्याचे ना.शंभूराज देसाईंना यावेळी सांगितले.


Monday 17 May 2021

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास प्रारंभ. मा.यशराज देसाई यांचे शुभहस्ते वाहतूक कंत्राटदार यांना करारपत्राचे वितरण.

 

 

 

           दौलतनगर दि.17: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली यंदा गळीत हंगामात कारखान्याच्या सर्वच घटकांनी चांगली कामगिरी बजावली असून गळीत हंगामात गाळपाचा टप्पा पुर्ण करण्यासाठी कारखान्याशी निगडीत प्रत्येक घटकाने दिलेल्या योगदानामुळे कारखान्याने चांगले गाळप केले आहे. येणारा गळीत हंगाम लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास सुरुवात करण्यात आली असून आज या शुभमुहुर्तावर वाहतूक कंत्राटदार यांना करारपत्राचे वितरण करत असल्याची माहिती युवा नेते यशराज देसाई यांनी यावेळी  दिली.

             लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 च्या ऊस तोडणी वाहतूक करारास अक्षय तृत्तीयाचे शुभ मुहर्तावर युवा नेते यशराज देसाई यांचे हस्ते ऊस वाहतूक कंत्राटदार यांचेकडे करारपत्र सुपुर्द केली. यावेळी  कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, शेती उपसमिती अध्यक्ष पांडूरंग नलवडे,  कार्यकारी संचालक सुहास देसाई, चिफ अकौंटंट विनायक देसाई, शेती अधिकारी रविंद्र चौगुले, नवनाथ साळुंखे अधिकारी व कर्मचारी तसेच तोडणी  वाहतूक संस्थेचे सदस्य यादवराव तिकुडवे,भाऊसो पाटील उपस्थित होते.

                यावेळी बोलताना युवानेते यशराजदादा देसाईंनी अभ्यासपुर्ण कारखान्यांच्या कामकाजासंदर्भात मांडणी करीत म्हणाले, कारखान्याच्या सन 2021-22 या गळीत हंगामासाठी नोंदविलेल्या संपुर्ण ऊसाचे गाळप पुर्ण करण्याच्या दृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करण्याचे काम  कारखाना व्यवस्थापनाने सुरु केली आहे. तसेच कारखान्यात अनेक अत्यावश्यक असे तांत्रिक  बदल केले आहेत. त्यामुळे संस्थेसहित सभासद शेतकऱ्यांचा वेळ व मेहनत वाचून  मोठा फायदा होणार आहे.  कारखान्याची ओव्हर ऑइलिंगची कामे त्याचबरोबर मशिनरीमधील आवश्यक त्या दुरुस्तीची व सुधारण्याची कामे चालू करण्यात आलेली आहेत. यापुढील काळात ही अनेक तांत्रिक आणि आधुनिक बदल करून त्याचा जास्तीत जास्त फायदा येणाऱ्या गळीत हंगामामध्ये आपल्याला होईल. ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी ठेवलेल्या विश्वासाला पात्र राहून त्यांच्या प्रगतीसाठी कारखाना व्यवस्थापनाकडून नेहमीच प्रामाणिक प्रयत्न सुरु असल्याचे सांगत त्यांनी पुढे म्हंटले आहे की, येणारा गळीत हंगाम लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्याकरीता कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आपल्या राहिलेल्या ऊसाची नोंद करण्याकरीता कारखान्याचे संबंधित शेती गट ऑफीसशी संपर्क साधावा व आपण पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास देऊन गळीत हंगाम यशस्वी करण्यास सहकार्य करावे आवाहनही त्यांनी शेवटी पत्रकांत केले आहे.

Wednesday 12 May 2021

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंकडून पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोवीड सेंटरमध्ये वाढवावयाच्या 50 ऑक्सीजन बेडच्या कामांची व इतर सुविधांचीही पहाणी. वाढीवचा आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करुन देण्याची दिली ग्वाही.

 

 

           दौलतनगर दि.12 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांची ऑक्सीजनचे बेड अभावी गैरसोय होवू नये याकरीता पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोवीड केअर सेंटरमध्ये 50 ऑक्सीजन बेड वाढविण्यास गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आवश्यक निधी मंजुर करुन दिला आहे. लवकरच या कामांस सुरुवात होत असून सध्या या केअर सेंटरमध्ये 50 ऑक्सीजनचे बेड कार्यान्वीत आहेत. वाढवावयाच्या 50 ऑक्सीजन बेडच्या कामांची तसेच येथे कोरोना रुग्णांकरीता असणाऱ्या सुविधांची पहाणी आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना घेवून केली. यावेळी येथील 100 ऑक्सीजन बेडबरोबर इतर आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणेकरीता आवश्यक असणारा वाढीवचा निधी तातडीने उपलब्ध करुन देण्याची ग्वाहीही  गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी यावेळी बोलताना दिली.

          दौलतनगर ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली दौलतनगर ता.पाटण येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उभारवयाच्या 10 व्हेन्टीलेटरच्या बेडच्या सुविधांसंदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती. सदरच्या बैठकीनंतर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोवीड केअर सेंटरमधील वाढीवच्या 50 ऑक्सीजन बेडच्या कामांची पहाणी करण्याकरीता व इतर आरोग्य सुविधांचीही पहाणी करणेकरीता भेट दिली.

             यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार योगेश टोमपे,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ.कुराडे,पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे आदींची उपस्थिती  होती.

                   यावेळी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,पाटण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना उपचाराकरीता ऑक्सीजन बेडची कमतरता भासू नये याकरीता दौलतनगर कोरोना उपचार केंद्रामध्ये 50 ऑक्सीजन बेड कार्यान्वीत आहेत वाढीवचे 25 ऑक्सीजन बेडचे काम पुर्ण झाले आहे तसेच 10 व्हेन्टीलेटरच्या बेडची सुविधा येत्या आठ दिवसात आपण कार्यान्वीत करीत आहोत.तसेच पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोवीड केअर सेंटरमध्ये 50 ऑक्सीजन बेड कार्यान्वीत आहेत वाढीवचे 50 ऑक्सीजन बेड कार्यान्वीत करण्याकरीता आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला आहे.त्याचे काम लवकर सुरु करण्याच्या सुचना दिल्या आहेत. ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये 36 ऑक्सीजन बेड कार्यान्वीत आहेत. पाटण तालुक्यात त्यामुळे एकूण 210 ते 215ऑक्सीजन बेड कार्यान्वीत होणार आहेत तर 10 व्हेन्टीलेटरचे बेड कार्यान्वीत करीत आहोत. दौलतनगर व पाटण येथील उपचार केंद्रामध्ये प्रत्येकी दोन दोन ड्युरा ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात येणार असून दौलतनगरला याचे कामही सुरु करण्यात आले आहेत.या तिन्ही उपचार केंद्राकरीता अतिरिक्त डॉक्टर,नर्सेस व स्टाफ आवश्यक आहे त्याप्रमाणे हा स्टाफ उपलब्ध करुन देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी, सातारा यांना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर आवश्यक असणारी सर्व औषधे ही उपलब्ध करुन देण्याचे आदेशही जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले आहेत त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची कसलीही गैरसोय पाटण तालुक्यात होणार नाही याचे नियोजन तालुका प्रशासनाने करावे अशाही सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना दिल्या. तर पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोवीड केअर सेंटरमधील डॉक्टर, नर्स व इतर स्टाफ यांना येथे रुग्णांना उपचार देताना काही अडचणी नाहीत ना? अशी विचारणा करुन तुम्हीही तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्या अशा सुचना येथील स्टाफला ना.देसाईंनी यावेळी केल्या.