दौलतनगर दि.30 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-सातारा जिल्ह्यातील वाढत्या कोविड रुग्ण संख्येच्या पार्श्मभूमीवर काल दि.28 मे रोजी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हयातील पोलीस विभागाने करावयाच्या कडक अंमलबजावणी बाबत केलेल्या सुचनानुसार आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तात्काळ अंमलबजावणी करीत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक,अप्पर पोलीस अधिक्षक,सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे समवेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेवून उपमुख्यमंत्री यांच्या सुचनांचे तंतोतत पालन करण्याचे सक्त आदेश दिले.
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे
झालेल्या बैठकीत गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पोलीस अधिक्षक,अप्पर पोलीस अधिक्षक,सर्व
उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना सुचना देताना
म्हणाले, ग्रामीण तसेच शहरी भागातील कोरोना बाधित रुग्णांना गृह विलगीकरणामध्ये न ठेवता
त्यांना तात्काळ संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये दाखल करावे. याबाबत सर्व पोलीस ठाण्याच्या
प्रभारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील ग्रामदक्षता समितींना सुचना देवून बाधित रुग्ण
घरी न राहता संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये दाखल होतील याची अमंलबजावणी झाल्याची खात्री
करावी.सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी महसूल,आरोग्य,व संबंधित सर्व अधिकारी यांचेशी
समन्वय ठेवून दररोज केलेल्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा. शहरातील काही लसीकरण केंद्रावर
काही व्यक्तींच्याकडून त्यांच्या समर्थकांना प्राधान्याने लसीकरण करणेबाबत कर्मचा-यांचेवर
दादागिरी, अरेरावी होत असलेबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.अशा प्रकारची दादागिरी,
गुंडगिरी करणा-यांचेवर कडक कारवाई करावी.अशा घटना घडू नये म्हणून लसीकरण केंद्रावर
पुरेसा पोलीस बंदोवस्त नेमावा.लसीकरण केंद्राला पोलीस ठाणे प्रभारी अधिका-यांनी दिवसातून
एकदा भेट देवून पाहणी करावी.
ज्याठिकाणी कंटेटमेंट
झोन आहे अशा ठिकाणी दिलेल्या सुचनांची कडक अमंलबजावणी करावी.त्या ठिकाणी पुरेसा पोलीस
बंदोबस्त नेमूण विनाकरण फिरणाऱ्या लोकांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करावी. शहरात
प्रवेश करणा-या नाक्यांवर बॅरिकेटींग लावून प्रत्येक वाहनांची तपासणी करावी व विना
परवाना फिरणा-या वाहनांवर दंडात्मक कारवाईसह आवश्यकता वाटल्यास गुन्हा दाखल करुन कायदेशीर
कारवाई करावी, जेणेकरुन लोक विनाकारण फिरणार
नाहीत.अशी कारवाई केल्याने त्याचा समाजामध्ये पोलीस कारवाई करतायेत असा संदेश जाईल.सर्व
उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी त्यांचे विभागात
केलेल्या कारवाईबाबतचा दररोज आढावा घेवून पोलीस यंत्रणा अधिक सतर्क राहील याची दक्षता घ्यावी. पोलीस अधिक्षक व अप्पर पोलीस अधिक्षक
यांनी जिल्ह्यातील शहरांना /गावांना अचानक
भेटी देवून पोलीस विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कारवाईची प्रत्यक्ष जागेवर जावून
पाहणी करावी. मी स्वत: कधीही जिल्ह्यातील कोणत्याही शहरास अथवा गावांस अचानक भेट देवून
पोलीस कारवाईची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सुचना देताना सर्व
पोलीस विभागास सांगितले.
No comments:
Post a Comment