दौलतनगर दि.27 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-विषाणूच्या संक्रमनामुळे बाधित होणाऱ्या
रुग्णांची साखळी तोडण्याकरीता ग्रामीण भागातील तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी संस्थात्मक कोरोना विलगीकरण कक्ष उभारावे या शासनाच्या
सुचनांनुसार पाटण तालुक्यात तालुक्याचे लोकप्रतिनिधी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंच्या पुढाकाराने अनेक ग्रामपंचायतीकडून संस्थात्मक विलगीकरण कक्षाला प्रारंभ
केला आहे.संस्थात्मक विलगीकरण करणेकरीता अनेक ग्रामपंचायतीची तयारी पुर्ण झाली आहे.
दौलतनगर
ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली कोरेाना बाधित रुग्णांची
साखळी तुटणेसाठी शासनाच्या नियमानुसार तालुक्यातील
प्रत्येक ग्रामपंचायतींनी संस्थात्मक कोरोना
विलगीकरण कक्ष सुरु करणेसंदर्भात तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक
पार पडली. या बैठकीत गृहराज्यमंत्री ना.देसाईंनी शासनाची यासंदर्भातील भूमिका काय आहे
हे स्पष्ट केले.या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,अतिरिक्त उपविभागीय पोलीस
अधिकारी डॉ.रणजित पाटील,तहसिलदार योगेश टोमपे,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,
पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी
अभिषेक परदेशी,मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोहेल शिकलगार
आदींची उपस्थिती होती.
बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई म्हणाले,कोरोना विषाणूच्या संक्रमनामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची
संख्या लक्षणिय आहे.ही साखळी तुटण्याकरीता राज्य शासनाने राज्यातील प्रत्येक तालुक्यातील
ग्रामपंचायतींनी संस्थात्मक कोरोना विलगीकरण
कक्ष उभारावे अशा सुचना दिल्या आहेत.आपला पाटण तालुका ग्रामीण भाग आहे. तालुक्यातील
कोरोना बाधितांचे विलगीकरण करणेसाठी प्रत्येक गांवामध्ये संस्थात्मक कोरोना विलगीकरण कक्ष सुरु करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी
तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना काढावेत तसेच ग्रामस्तरीय समितीच्या सहकार्याने
सदर विलगीकरण कक्षामध्ये गावात बाधित होणाऱ्या रुग्णांचे विलगीकरण करावे जेणेकरुन बाधित
कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव संबधित रुग्णाचे कुटुंबात व गावात होणार नाही. तालुक्यातील
ग्रामपंचायतींनी संस्थात्मक कोरोना विलगीकरण
कक्ष उभारण्याकरीता उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुक्यातील प्रत्येक मंडलनिहाय
वरीष्ठ व कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्या कराव्यात व लवकरात लवकर पाटण
तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीकडून संस्थात्मक
कोरोना विलगीकरण कक्षाला सुरुवात करावी गटविकास अधिकारी यांनीही त्या त्या विभागाचे
ग्रामविस्तार अधिकारी व प्रत्येक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना यासंदर्भात सुचित
करावे तसेच ज्या ग्रामपंचायतीं संस्थात्मक
कोरोना विलगीकरण कक्ष सुरु करीत आहेत त्या ग्रामपंचायतींनी ज्या प्राथमिक आरोग्य
केंद्राच्या कार्यक्षेत्रात आपले गांव येत आहे तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय
अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत विलगीकरण कक्षातील रुग्णांची तपासणी करुन आवश्यक औषधोपचार
करण्याच्या सुचनाही देण्यात याव्यात यामुळे
कोरोना बाधितांची साखळी तुटण्यास चांगली मदत होणार आहे. अशा सुचना गृहराज्यमंत्री
ना.देसाईंनी बैठकीत दिल्या.
गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंच्या सुचनेनुसार पाटण उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी यासंदर्भात
तात्काळ आदेश जारी केला असून पाटण तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर
संस्थात्मक कोरोना विलगीकरण कक्ष उभारण्याकरीता
तालुक्यातील 15 विभागामध्ये महसूल मंडलनिहाय वरीष्ठ व कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी
यांच्या नियुक्त्या केल्या आहेत प्रत्येक मंडलमध्ये प्रत्येकी 04 प्रमाणे वरीष्ठ व
कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्या नेमणुका केल्या आहेत. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंच्या पुढाकाराने अनेक ग्रामपंचायतीकडून
संस्थात्मक विलगीकरण कक्षाला प्रारंभ देखील केला असून अनेक ग्रामपंचायतीकडून संस्थात्मक
विलगीकरण कक्षाची तयारीही पुर्ण झाली आहे.
No comments:
Post a Comment