Monday 24 May 2021

तौक्ते वादळामुळे घरांची पडझड झालेल्या नुकसानग्रस्तांना स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टने दिला मदतीचा हात.

 




दौलतनगर दि.24 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- गत आठवड्यात दि. 16 व 17 मे, रोजी तौक्ते वादळाने व अवकाळी पावसाने महाराष्ट्रासह इतर राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या वादळामुळे पाटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांच्या पडझडीसह फळझाडांचे नुकसान झाले होते. वादळाच्या दुसऱ्याच दिवशी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी नुकसानग्रस्त ठिकाणांना भेटी देवून प्रत्यक्ष नुकसानग्रस्तांची पाहणी करुन शासकीय यंत्रणेला दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. हे पंचनामे होईपर्यंत राहत्या घरांची पडझड झालेल्या कुटूंबाना मदतीचा हात म्हणून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखालील स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मायेचा आधार देत नुकसानग्रस्त कुटुंबाला १० हजार रक्कमेचा धनादेश पदाधिकारी कार्यकर्ते यांचे हस्ते देण्यात आला.

                 गत आढवड्यात तौक्ते वादळ व अवकाळी पावसामुळे पाटण तालुक्यातील विविध गावात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शासकीय यंत्रणेसह विविध गावात वाड्यावस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जावून पाहणी केली. वादळामुळे व पावसामुळे पाटण तालुक्यातील सर्व मंडलामध्ये नुकसान झाले आहे.ढेबेवाडी काळगांव विभागामध्ये निगडे,वरची शिबेवाडी (गुढे),चाळकेवाडी,अंबवडे खुर्द,मंद्रूळकोळे, मणदुरे विभागातील केरळ कोयना विभागा तील रासाठी सह अनेक गावामध्ये नुकसानीच्या घटना घडल्या होत्या यातील काही ठिकाणी ना. देसाईंनी प्रत्यक्ष पाहणी केली होती.पावसाळा तोंडावर असल्याने काही कुंटूंबांचे उध्दवस्त निवारे पुन्हा उभे राहण्याचे दृष्टीने नियोजन करा अशा सुचना त्यांनी त्यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. शासकीय मदतीची वाट न पाहता त्यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने निगडे येथील नुकसानग्रस्त महादेव बाळकू तेटमे, वरची शिबेवाडी (गुढे) येथील शांताबाई निवृत्ती शिबे, केरळ येथील लक्ष्मी जनार्दन जामदार या खुप नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना त्यांनी त्यांचे  पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मार्फत प्रत्येकी १० हजार रक्कमेचा धनादेश देत मायेचा आधार दिला.नुकसानग्रस्त कुटुंबांनी ना.शंभूराज देसाईंचे आभार व्यक्त केले आहेत.  

1 comment: