दौलतनगर
दि.19 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम अशा डोंगर पठारावर मौजे घाणबी व वनकुसवडे ता.
पाटण येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती पुर्ण झाल्या आहेत. परंतू या
पठारावरील नागरिकांना उपचाराकरीता पाटण अथवा इतर ठिकाणी जावे लागत आहे. कोरेानाचा पार्द्रुभाव
मोठया प्रमाणात वाढत चालला आहे त्यामुळे डोंगर पठारावरील ही दोन्ही प्राथमिक आरोग्य
उपकेंद्रे येत्या दोन दिवसात चालू करुन डोंगर पठारावरील नागरिक, महिलांना उपचार देणेचे
नियेाजन करा अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी
जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या.
सातारा शासकीय विश्रामगृह येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण विधानसभा मतदारसंघातील
डोंगर पठारावरील मौजे घाणबी व वनकुसवडे येथील
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरु करुन येथील जनतेला उपचार देणेसंदर्भात बैठक आयोजीत करण्यात
आली होती यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे अधिकाऱ्यांना सुचना केल्या. या बैठकीस जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, गटविकास अधिकारी मिना साळुंखे, तालुका आरोग्य
अधिकारी आर.बी. पाटीलआदींची उपस्थिती होती.
यावेळी बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत पाटण विधानसभा
मतदारसंघातील मौजे घाणबी व वनकुसवडे येथे शासनाने प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मंजुरी
देवून आवश्यक असणाऱ्या उपकेंद्राच्या इमारतीही उभ्या करुन दिल्या आहेत.मग याठिकाणी
डोंगर पठारावरील नागरिक व महिला तसेच बालकांना पाटणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता
का जावे लागत आहे ? असा सवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांना
करीत मला कारणे नको आहेत येत्या देान दिवसात मौजे घाणबी व वनकुसवडे उपकेंद्राकरीता
मंजुर असणारे डॉक्टर, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करुन ही दोन्ही उपकेंद्रे
येत्या दोन दिवसात सुरु करुन या पठारावरील जनतेला आरोग्य सुविधा देण्याचे नियोजन करावे
अशा सुचना केल्या.पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम अशा ठिकाणी घाणबी व वनकुसवडे ही
गावे असून त्या गावाचे परिसरात 15 ते 20 वाड्या वस्त्या आहेत. पाटण या शहरापासून ही
गांवे 25 किलोमीटर डोंगर भागात आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमिवर लॅाकडाऊन असल्याने डोंगर
पठारावरील जनतेला पाटण येथे उपचाराकरीता येता येत नाही. या परिसरात घाणबी तसेच वनुकुसवडे या ठिकाणी प्राथमिक
आरोग्य उपकेंद्र असून ते सध्या बंद आहे. तेथील जनतेला आरोग्यच्या दृष्टीने ते आरोग्य
केंद्र सुरु असणे गरजेचे आहे. घाणबी तसेच वनुकुसवडे आरोग्य
उपकेंद्रास आवश्यक असलेला सर्व आरोग्य अधिकारी,कर्मचारी यांच्या नेमणूका त्याचबरोबर आवश्यक असणारी सर्व औषधे ही दोन दिवसात उपलब्ध
करुन द्या. घाणबी तसेच वनुकुसवडे आरोग्य उपकेंद्रचाचा
ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) प्रत्येक आठवड्यातील तीन दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 05 यावेळेत
चालु ठेवा.सदरचे आरोग्य उपकेंद्रात नियुक्त केलेले डॅ्ाक्टर व इतर कर्मचारी यांना वेळेवर
हजर राहणेबाबत सुचना करा व दोन दिवसात घाणबी तसेच वनुकुसवडे
आरोग्य केंद्र चालू करा अशा सक्त सुचना ना.देसाईंनी केल्या. डोंगर पठारावरील जनतेची कसलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. थोड्याच दिवसात
पावसाळा सुरु होतोय त्यावेळी आरोग्य उपकेंद्रास आवश्यक असणारे अधिकारी, कर्मचारी यांना
उपस्थित ठेवा तसेच आवश्यक असणारी सर्व औषधांचा पुरवठाही करा त्याचबरोबर पावसाळयात येथील
जनतेला सलाईन लावण्याची आवश्यकता भासल्यास त्याचीही सोय दोन्ही उपकेंद्रामध्ये करण्याची
व्यवस्था करा असेही त्यांनी योवळी बोलताना सांगितले. यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी गौडा यांनी दोनच दिवसात ही दोन्ही उपकेंद्रे सुरु करण्याची कार्यवाही पुर्ण
करीत असल्याचे ना.शंभूराज देसाईंना यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment