डोंगरी,दुर्गम पाटण मतदारसंघातील गांवाना रस्ता ही मुलभूत सुविधा मिळवून देणेकरीता
महाराष्ट्र राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे सुरवातीपासूनच आग्रही
राहिले आहेत.गत पंचवार्षिकमध्ये डोंगरी आणि दुर्गम भागातील गांवामध्ये,वाडयावस्त्यांवर
रस्ते करण्याकरीता त्यांनी राज्य शासनामार्फत मोठया प्रमाणात निधी आणून डोंगरी
भागातील रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत.राज्याचे अर्थराज्यमंत्री झालेनंतर
ना.शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील नव्याने करावयाच्या ग्रामीण
रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत आवश्यक
असणारा निधी मंजुर होणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे
पाठपुरावा करत हा निधी मंजूर करुन आणला आहे
सन
२०२०-२१ आर्थिक वर्षात ग्रामीण
भागातील गावांतर्गत मुलभुत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामामध्ये मरळी,ता.पाटण येथे ग्रामसचिवालय इमारत 35 लाख,त्रिपुडी अंतर्गत रस्ता 15 लाख, नेचल (घोलपवस्ती) रस्ता 15 लाख,टेळेवाडी पोहोच रस्ता 10
लाख,वाझोली गावठाण रस्ता 15 लाख, वाडीकोतावडे रस्ता 15 लाख,विरेवाडी अंतर्गत रस्ता
10 लाख,कोंडावळे अंतर्गत रस्ता 20 लाख, डोंगरुबाचीवाडी (मुळगाव) अंतर्गत रस्ता 15
लाख, दिक्षी अंतर्गत रस्ता 10 लाख,आंब्रुळे अंतर्गत रस्ता 15 लाख, मधलीवाडी
(बोंद्री) पाटण मराठीशाळा ते पाण्याची टाकी रस्ता 15 लाख,निगडे पोहोच रस्ता 15 लाख,आंबेघर
तर्फ मरळी अंतर्गत रस्ता 15 लाख,सळवे बोर्गेवाडी रस्ता 10 लाख,पाचुपतेवाडी (गुढे)
अंतर्गत रस्ता 15 लाख, जरेवाडी अंतर्गत रस्ता 10 लाख,पाळशी सावंतवस्ती रस्ता 15 लाख,कसणी पाटीलवस्ती ते
मुरुमवस्ती रस्ता 15 लाख,आडदेव अंतर्गत रस्ता 15 लाख,डिगेवाडी नाडोली अंतर्गत
रस्ता 15 लाख,कोदळ पुनर्वसन अंतर्गत रस्ता 10 लाख,ताईगडेवाडी पुनर्वसन (वरचे
घोटील) रस्ता 20 लाख,काढोली येथे अंतर्गत रस्ता 15 लाख,जंगलवाडी चाफळ पोहोच रस्ता
25 लाख,जांभेकरवाडी मरळोशी पोहोच रस्ता 10 लाख,मत्रेवाडी अंतर्गत रस्ता 15 लाख, धडामवाडी
(केरळ) अंतर्गत रस्ता 15 लाख,कळकेवाडी अंतर्गत रस्ता 15 लाख,वेताळवाडी पोहोच रस्ता
15 लाख, ढोरोशी अंतर्गत रस्ता 15 लाख,गिरेवाडी पोहोच रस्ता 15 लाख,जोतिबाचीवाडी
अंतर्गत रस्ता 15 लाख या विकासकामांचा
समावेश असून या 33 कामांना एकूण 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सार्वजनिक बांधकाम
विभाग,सातारा यांचेकडून निविदा प्रक्रिया करणेची
कार्यवाही सुरु असून पावसाळा संपल्यानंतर तातडीने या रस्त्यांच्या
कामांना सुरुवात करण्याच्या सुचना ना.शंभूराज देसाईंनी सार्वजनिक बांधकाम
विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध
विकास कामांना 05
कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी
ठाकरे यांचे विशेष आभार मानले आहेत.
दरम्यान ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडे सादर
केलेल्या मुलभूत सुविधांचे बदल प्रस्तावांचे कामांनाही मंजूरी मिळाली असून यामध्ये
कोरिवळे येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत 15 लाख,
कातवडी येथील अंतर्गत रस्ता 15 लाख,मान्याचीवाडी मालदन रस्ता 20 लाख तर
कोळेकरवाडी(डेरवण) गावपोहोच रस्ता
30 अशा एकूण 80 लाख रुपयांचे बदल प्रस्तावांनाही मंजूरी मिळाली असून लवकरच
याही कामांना सुरुवात होणार असल्याचे ना.शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment