दौलतनगर दि.17: लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे
गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली यंदा गळीत हंगामात कारखान्याच्या
सर्वच घटकांनी चांगली कामगिरी बजावली असून गळीत हंगामात गाळपाचा टप्पा पुर्ण करण्यासाठी
कारखान्याशी निगडीत प्रत्येक घटकाने दिलेल्या योगदानामुळे कारखान्याने चांगले गाळप
केले आहे. येणारा गळीत हंगाम लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन नियोजन
करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर कारखान्याच्या ऊस
तोडणी वाहतूक करारास सुरुवात करण्यात आली असून आज या शुभमुहुर्तावर वाहतूक कंत्राटदार
यांना करारपत्राचे वितरण करत असल्याची माहिती युवा नेते यशराज देसाई यांनी यावेळी दिली.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 च्या ऊस तोडणी
वाहतूक करारास अक्षय तृत्तीयाचे शुभ मुहर्तावर युवा नेते यशराज देसाई यांचे हस्ते ऊस
वाहतूक कंत्राटदार यांचेकडे करारपत्र सुपुर्द केली. यावेळी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, शेती उपसमिती
अध्यक्ष पांडूरंग नलवडे, कार्यकारी संचालक
सुहास देसाई, चिफ अकौंटंट विनायक देसाई, शेती अधिकारी रविंद्र चौगुले, नवनाथ साळुंखे
अधिकारी व कर्मचारी तसेच तोडणी वाहतूक संस्थेचे
सदस्य यादवराव तिकुडवे,भाऊसो पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना
युवानेते यशराजदादा देसाईंनी अभ्यासपुर्ण कारखान्यांच्या कामकाजासंदर्भात मांडणी करीत
म्हणाले, कारखान्याच्या सन 2021-22 या गळीत हंगामासाठी नोंदविलेल्या संपुर्ण ऊसाचे
गाळप पुर्ण करण्याच्या दृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करण्याचे काम कारखाना व्यवस्थापनाने सुरु केली आहे. तसेच कारखान्यात अनेक अत्यावश्यक असे तांत्रिक बदल केले आहेत. त्यामुळे संस्थेसहित सभासद शेतकऱ्यांचा वेळ व मेहनत
वाचून मोठा फायदा होणार आहे. कारखान्याची ओव्हर ऑइलिंगची कामे
त्याचबरोबर मशिनरीमधील आवश्यक त्या दुरुस्तीची व सुधारण्याची कामे चालू करण्यात आलेली
आहेत. यापुढील काळात ही अनेक तांत्रिक आणि आधुनिक बदल करून त्याचा
जास्तीत जास्त फायदा येणाऱ्या गळीत हंगामामध्ये
आपल्याला होईल. ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी ठेवलेल्या विश्वासाला पात्र राहून
त्यांच्या प्रगतीसाठी कारखाना व्यवस्थापनाकडून नेहमीच प्रामाणिक प्रयत्न सुरु
असल्याचे सांगत त्यांनी पुढे म्हंटले आहे की, येणारा
गळीत हंगाम लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन नियोजन करत आहे. त्याचाच
एक भाग म्हणून अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास सुरुवात
करण्यात आली आहे. तसेच येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्याकरीता कारखाना कार्यक्षेत्रातील
ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आपल्या राहिलेल्या ऊसाची नोंद करण्याकरीता कारखान्याचे
संबंधित शेती गट ऑफीसशी संपर्क साधावा व आपण पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास
देऊन गळीत हंगाम यशस्वी करण्यास सहकार्य करावे आवाहनही त्यांनी शेवटी पत्रकांत केले
आहे.
No comments:
Post a Comment