Monday 31 May 2021

केंद्रीय मार्ग निधीमधून पाटण मणदुरे जळव तारळे पाल काशिळ राज्य मार्गाच्या रस्त्याला 04 कोटी 92 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडील पाठपुराव्याला यश. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई.

 




 

          दौलतनगर दि.31 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- पाटण विधानसभा मतदार संघातील पाटण मणदुरे जळव तारळे पाल काशिळ रस्ता हा दळण-वळणाचे दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मार्गाची सुधारणा करण्याकरीता गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी राज्याचे मंत्री झाले झाले हा मार्ग रामा 398 नंबरने राज्य मार्ग करुन घेतला व केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांचेकडे पाठपुरावा करुन सन 2020-21 चे आर्थिक वर्षात केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.) मधून 04 कोटी 91 लक्ष 51 हजार रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आहे.

              गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी यासंदर्भात माहिती दिली आहे की, पुणे ते कोल्हापूर व कराड चिपळूण या  दोन राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा पाटण मणदुरे जळव तारळे पाल काशिळ रस्ता पुर्वी प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून ओळखला जात होता.या प्रमुख जिल्हा मार्गावर पाली,ता.कराड येथे श्री खंडोबा, जळव,ता.पाटण येथे श्री.जोतिबा आणि निवकणे,ता.पाटण येथे श्री. जानाईदेवी माता ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिध्द अशी तीर्थक्षेत्र असून सदर तीर्थक्षेत्रांना महाराष्ट्रासह इतर राज्यातून अनेक भक्त-भाविक भेट देत असतात.सदरच्या 38 किलो मिटर लांब असलेल्या या प्रमुख जिल्हा मार्गाला राज्य मार्गाचा दर्जा देणेबाबत प्रस्ताव सादर करुन राज्यशासनाकडे यापुर्वी पाठपुरावा केला. त्यानुसार राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील दि. 25 फेब्रुवारी 2020 रोजीचे शासन निर्णयानुसार पाटण मणदुरे जळव तारळे पाल काशीळ रस्ता प्रजिमा 57 या मार्गाची राज्य मार्ग क्रमांक 398 म्हणून दर्जोन्नती करण्यात आली. तसेच या राज्य मार्गावरुन दैनंदिन होत असलेली दळण-वळण आणि जास्त वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन पाटण मणदुरे जळव तारळे पाल काशीळ रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे होते.दैनंदिन ये-जा करणाऱ्या प्रवाशांची  गैरसोय लक्षात घेता पाटण मणदुरे जळव तारळे पाल काशीळ रस्ता राज्य मार्ग 398 या रस्त्याची सुधारणा करण्याकरीता भरीव निधी मंजूर होणेबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांचेकडे सन 2020-21 चे आर्थिक वर्षात केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.)मधून भरीव निधी मंजूर करावा अशी लेखी पत्राव्दारे विनंती केलेली होती. त्यानुसार पाटण मणदुरे जळव तारळे पाल काशिळ रस्ता यामधील किमी 13/00 ते 32/00 भाग निवकणे ते जळव व मरळोशी ते तारळे चौक मधील राज्य मार्गाची सुधारणा करण्याकरीता सन 2020-21 चे आर्थिक वर्षात केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.) मधून 04 कोटी 91 लक्ष 51 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांनी दि.08 मे 2021 रोजीचे लेखी पत्राव्दारे कळविले असून ना. नितीन गडकरी यांचेकडे पाटण मणदुरे जळव तारळे पाल या राज्य मार्गाचे मजबुती करण्यासाठी  केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.)मधून निधी मंजूर होणेकरीता सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याचे सांगत लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया करण्यात येऊन पावसाळा संपल्यानंतर तातडीने राज्य मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे,अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या असून या रस्त्याच्या कामांस आवश्यक असणारा निधी तातडीने मंजुर करुन दिलेबद्दल मी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानत असल्याचेही त्यांनी शेवटी  म्हंटले आहे. 

No comments:

Post a Comment