दौलतनगर दि.28(जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-केवळ १०२
मतदारांची निवडणूक जिंकून विधानसभा जिंकल्याचा आव आणून अर्ध्या हळकुंडाने पिवळे
होणं बरं नव्ह...अहो तुम्ही तर 'शाश्वती' नसणाऱ्या पिक्चरच्या ट्रेलरची भाषा करता.मात्र
आम्ही तसला न चालणारा पिक्चर न दाखवणार नाही तर तुम्हाला
शोले सारखा 'सुपरहिट" पिक्चरच दाखवावाच लागेल असा टोला मंत्री शंभुराज देसाई
यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना लगावला .दरम्यान २०२४ च्या सुपरहिट पिक्चरच्या
तयारी साठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे,असे आवाहन ही मंत्री ना.
शंभूराज देसाई यांनी केले.
नाटोशी,ता. पाटण येथे सन 2020-21
च्या अर्थसंकल्पातून मंजूर झालेल्या नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर विंग वाठार
रस्ता आणि नाटोशी ते कुसरूंड रस्त्याची सुधारणा व टकलेवाडी मातंगवस्ती रस्ता
कॉक्रटीकरण या कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा
जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुग्रा
खोंदू, बशीर खोंदू, बबनराव भिसे,गणेश भिसे,भागोजीशेठ शेळके,नथुराम कुंभार, सरपंच
अविनाश कुंभार,उपसरपंच उदय
देसाई, विष्णुपंत देसाई, रामभाऊ देसाई,विष्णू मोरे,संपतशेठ कोळेकर,विजय शिंदे,विजय
देशमुख,आनंदा मोहिते,सुनील खामकर,मोहन पाटील,मधुकर शिंदे,चेतन देसाई यांचेसह यांची
उपस्थिती होती.
यावेळी ना.शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्राला
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या रूपाने संयमी,दूरदृष्टी चे नेतृत्व लाभले
आहे.म्हणूनच राज्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले मात्र कोविड काळात
एक लाख कोटी रुपयाने राज्याचे आर्थिक उत्पन्न घटून ही
राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या
मार्गदर्शनाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आर्थिक निधी
कधीही कमी पडू दिला नाही.पाटण मतदारसंघात परिवर्तन कशाला म्हणतात हेच अजून कळले
नाही हे तालुक्याचे दुर्दैव आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तालुक्यातील सोसायटींच्या
एकूण १०२ मतांपैकी 58 मतदान
मिळाले म्हणजे परिवर्तन झाले असा डोंगरा पिटनारे विरोधक
आताच अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत.मतदार संघातील केवळ १०२ नव्हे तर तमाम
जनतेने एकदा १५ हजार आणि दुसऱ्यांदा तब्बल १८ हजार मतांनी पराभव करून यांना अस्मान
दाखवले हे विसरून सत्तेच्या माजाची आणि मस्तीची भाषा करीत
आहेत. आम्ही
कधीही सत्तेचा गैरवापर केला नाही आणि करायचाच असता तर निवडणूक काळांत तुम्ही
तुमच्या मतदारांना कुठं पाठवले होते ,कुठल्या हॉटेलात राहत होता,कुठं कुठं फिरत
होता हे काय आपणाला माहीत नव्हते काय?मला मतदारच मिळवायचे
असते तर मला काहीही अवघड गोष्ट नव्हती तिथं जाऊन सुद्धा मला ते मिळवता आले असते
मात्र
आम्ही
कधीही सत्तेची
मस्ती
आणि गुर्मी दाखवली नाही आणि दाखवायचीच असती तर तुमची संपूर्ण कुंडली ही आम्ही
मांडली असती.असे स्पष्ट करून मंत्री देसाई म्हणाले,21
वर्षे सत्ता असताना ही या
मोरणा,कोयना ,मल्हारपेठ भागावर सापत्न भावनेतून पाहिले आणि विकासकामांत
जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले मात्र विकास कामांत कधीही राजकारण आणू नये
उलट ज्यांना
लोकांनी निवडून देऊन आमदार केले आहे त्यांनी कोणताही राजकीय भेदभाव
न करता संपूर्ण तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे ही त्या लोकप्रतिनिधींची
नैतिक जबाबदारी आहे अशी शिकवण आम्हाला लोकनेते बाळासाहेब देसाई
यांनी घालून दिली आहे.म्हणूनच २००४ नंतर आपण आमदार झाल्यानंतर पाटण मतदार संघात
विकासकामांच्या कधीही असमतोल दिसला नाही आणि यापुढे दिसणार ही नाही,असे शेवटी
त्यांनी सांगीतले.कार्यक्रमाचे प्रास्तावित बशीर खोंदू यांनी केले तर आभार
ॲङमारुती देसाई मानले.यावेळी मोरणा विभागातील विविध गावचे सरपंच,उपसरपंच,पदाधिकारी
व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
चौकट: चर्चा तर होणारच..!
जिल्हा निवडणुकीत पराजय
आम्हाला दिसत होता मात्र……
उद्याचा
निकाल काय लागणार आहे महाविकास आघाडी तयार करायची आहे,जिल्हा बँकेच्या एकत्र
निर्णय घ्यायचा आहे असे राष्ट्रवादी पक्षाचे राज्यातील वरिष्ठ नेते सांगत होते
मात्र शेवटच्या
क्षणापर्यंत आम्हाला अंधारात ठेवले आमची तीच काँग्रेसची अवस्था होती.याबाबत मी लवकरच
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे आणि पक्षप्रमुख आदेश
येईल तो मानणारा मी शिवसैनिक आहे
चौकट:माझ्या भोंग्याची
इतकी भीती का वाटते?
माझ्या
पक्षाने मला मंत्री केले दादा मग माझ्या मंत्रिपदाला आणि माझ्या गाडीच्या
भोंग्याला
एवढे का घाबरतात हेच मला कळत नाही. अहो दादा, मी गृहखात्याचा
मंत्री आहे आणि या खात्याचा नियमच आहे भोंगा म्हणचे सायरन वाजला पाहिजे त्यामुळेच
मी जेथे जातो तेथे गल्लीबोळात ही भोंगा वाजतोच.तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो
हा भोंगा केवळ पाटण मतदार संघात वाजत नाही तर संपूर्ण राज्यभर माझा हा भोंगा वाजत
असतो आणि त्याची जास्तच भीती वाटत असेल तर मंत्रिपद भोगलेल्या आपल्या दादांना एकदा
तरी विचारा की कोणत्या खात्याला भोंगा असतो ते ? असा उपरोधक टोला गृहराज्यमंत्री
शंभुराज देसाई यांनी लगावला.
चौकट:आता सुपरहिट 'शोले'
दाखवणार………
मंत्री
शंभुराज देसाई विरोधकांनी 'ट्रेलर' संदर्भात केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार
घेतला.यावेळी ते
म्हणाले,अहो तुम्ही तर ट्रेलर ची भाषा करता मात्र ट्रेलर हा केवळ वातावरण
निर्मितीसाठी
दाखवतात
'ट्रेलर' नंतर सिनेमा चालेल की नाही याची शास्वती नसते
तो प्लॉप ही होतो मात्र आम्ही जो आता २०२४ मधील होणाऱ्या सिनेमाचे केवळ ट्रेलर न
दाखवता तो 'शोले' सारखा 'सुपरहिट' पिक्चर असणार आहे. जो कायमस्वरूपी जनतेच्या
स्मरणात राहील.त्यामुळे ट्रेलरची भाषा आमच्यापुढे करू नका असा टोला ही मंत्री
देसाई यांनी लगावला.