दौलतनगर दि.03(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-वर्षभरात साजऱ्या
होणाऱ्या विविध सणापैकी दिवाळी हा एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण.हा सण साजरा
करण्यासाठी बाहेरगावी असलेली मंडळी आपल्या गावी परत येऊन कुटुंबासोबत एकत्रितपणे
हा सण साजरा करतात. कोरोना संसर्गाचा धोका कमी झाला असला तरी यंदाची दिवाळी
प्रत्येकाने आनंदात पण साधेपणाने साजरी करा, आरोग्याची काळजी घ्यावी व
प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री
नामदार शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनता व सातारा
जिल्हावासियांना केले आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोना
पूर्णपणे गेलेला नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. कुठेही गर्दी होणार नाही
याबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून
दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे प्रत्येकाने पालन करावे. यंदाची दिवाळी साजरी
करताना आरोग्याची काळजी घ्यावी.
दिवाळी हा सण दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव
म्हणून साजरा केला जातो. या उत्सवात दरवर्षी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते.
यावर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करतांना फटाके फोडणे टाळावे.फटाक्यांच्या
धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम श्वसनावर होतो.त्यामुळे श्वसनाचे आजार बळावण्याची
शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करतांना
दिव्यांची आरास करून हा उत्सव साजरा करावा,असे आवाहनही शेवटी गृहराज्यमंत्री
नामदार शंभूराज देसाई केले असून त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनता व
सातारा जिल्हावासियांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment