दौलतनगर दि.08(जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-संगीताचे सुमधुर स्वर.....गायक गायिकांच्या कर्णमधुर आवाजामुळे सजलेली
मैफिल...मनाचा ठाव घेणारे वादन... रंगीबेरंगी दिव्यांची झगमगाट...आणि संगीतमय
तालावरचा 'दिवाळी फराळ !'तो ही स्वतः राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई व जिल्ह्यातील
सर्व शासकीय अधिकारी,पोलीस अधिकारी आणि पदाधिकारी,सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्या
समवेत दिवाळी फराळ....!असा अनोखा मिलाफ दौलतनगर, ता. पाटण येथे रविवारी सायंकाळी
अनुभवायला मिळाला.दरम्यान दस्तुरखुद्द राज्याचे गृहराज्यमंत्रीच आपल्या शेजारी
बसवून अत्यंत आदराने दिवाळी फराळ खाण्यासाठी आग्रह करीत असल्याने उपस्थित पोलीस
अधिकारी ही अक्षरशः भारावून गेले.
खाऊ दिवाळी, लेवू
दिवाळी आणि सजवू दिवाळी या उद्देशातून महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री ना.शंभुराज
देसाई हे प्रतिवर्षी आपल्या दौलतनगर येथील निवास्थानी दिवाळी फराळचे अनोखे असे
आयोजन करतात. गतवर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. मात्र
यावर्षी राज्यातील कोरोना परिस्थिती निवळल्यामुळे पुन्हा त्यांच्या
दौलतनगर ता.पाटण येथील निवासस्थानी दिवाळी फराळ आणि 'मेघ मल्हार' वाद्यवृंद हा
मराठी गाण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिवाळी हा सर्वच सणातील सर्वात मोठा आणि
महत्वपूर्ण सण समजला जातो.राजकारणात बहुतांशी लोकप्रतिनिधी 'दिवाळी' हा
सण आपल्या कुटुंबासमवेत कधी जिल्हा बाहेर तर कधी राज्य आणि देशाच्या बाहेर ही
साजरा करतात.मात्र पाटणचे शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे गृह(ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य
उत्पादन शुल्क,कौशल्य विकास आणि पणन राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी गेल्या सहा
वर्षापासून आपल्या पाटण विधानसभा मतदार संघातील शासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते
यांच्यासमवेत दिवाळी फराळ या नावाने 'दिवाळी' हा सण साजरा करणेचा अनोखा उपक्रम
हाती घेतला आहे.
रविवारी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत
त्यांच्या दौलतनगर (ता.पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना
कार्यस्थळी 'दिवाळी फराळ' या अनोख्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या
कार्यक्रमात मंत्री शंभुराज देसाई यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबातील मंत्री देसाई
यांचे चिरंजीव यशराज देसाई,बंधू रविराज देसाई,चि.जयराज देसाई यांच्यासाहित
शासनाच्या विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी,जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस
अधिकारी,पत्रकार आणि तालुक्याच्या विविध भागातून आलेले पदाधिकारी,कार्यकर्ते
यांच्या उपस्थितीमुळे 'लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि सामान्य जनता' यांचा अनोखा संगम
या दिवाळीच्या फराळ कार्यक्रमातून पाहवयास मिळाला. यावेळी मंत्री
देसाई स्वतः सर्वांची आस्थेवाईक पणे विचारपूस करून प्रत्येक टेबल जवळ जाऊन फराळ
मिळाला की नाही ,'बरेच दिवस दिसला नाही','कसे चालले आहे',अशी हक्काने विचारपूस
करताना कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी ही भारावून जाताना दिसत होते.दरम्यान तब्बल
दोन तास सुरु असलेल्या या मैफिलीत आणखी रंग भरला तो मुंबई येथील
'मेघ मल्हार' वाद्यवृंद या मराठी
गाण्यांचा कार्यक्रमाने.या कार्यक्रमात अनेक मराठी गीतांबरोबर हिंदी बहारदार
गीतांनी ही मैफिल अधिकच रंगदार झाली.त्यामुळे संगीताच्या ठेक्यावर फराळाचा आनंद
द्विगुणित झाला.
चौकट: गृहमंत्री असावा तर असा..!
एरव्ही नेहमीच
मंत्र्यांची सुरक्षा आणि बंदोबस्त या कामासाठी गृहराज्य मंत्र्यांच्या सेवेसाठी
असणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना या कार्यक्रमात दस्तुरखुद्द
गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई हे स्वतः पोलीस
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची 'प्रोटोकॉल' चा विचार न करता आपुलकीने चौकशी करून
आपल्या शेजारी बसवून दिवाळी फराळाचा आग्रह करताना दिसत होते.दरम्यान राज्याच्या
मंत्रिमंडळात इतर वेळी कडक आणि
दरारा असणाऱ्या गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी स्वतः पोलिसांनाच शेजारी
बसवून दिवाळी फराळ आग्रहाने खाऊ घातल्याने कर्तव्यात कडक आणि दरारा असलेला मंत्री
प्रत्यक्षात मात्र एक साधाच आणि प्रेमळ मंत्री असल्याने 'गृहमंत्री
असावा तर असा' अशी चर्चा उपस्थित पोलीस दलात सुरू होती.
प्रतिवर्षाप्रमाणे
या ही वर्षी आयोजित केलेल्या 'दिवाळी फराळ सायंकाळ'या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील
पदाधिकारी,वरिष्ठ शासकीय
अधिकारी,पोलीस अधिकारी,पाटण मतदार संघातील शासकीय निमशासकीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते
आणि हितचिंतक यांनी माझ्या विनंतीला मान देऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि
'दिवाळी फराळ'कार्यक्रमाची शोभा वाढविली याबद्दल सर्वांचा मी मनःपूर्वक आभार
व्यक्त करीत असल्याचे मत व्यक्त करून मंत्री देसाई म्हणाले,वर्षभर लोकप्रतिनिधी
प्रशासन आणि कार्यकर्ते यांच्या मध्ये केवळ विकासकामे यांच्या माध्यमातून संपर्क
असतो मात्र लोकप्रतिनिधी, शासकीय वरिष्ठ अधिकारी,सामान्य नागरिक यांच्यामध्ये
कोणत्याही ताण तणावाशिवाय, कामाशिवाय एक मंगलमय बैठक...
आस्थेवाईक पणे आणि आदराने विचारांची देवाण घेवाण घडण्यासाठी.....एक अनोखा
संगम.....या उद्देशाने दिवाळी फराळाची कल्पना पुढे आली आणि गेल्या सहा वर्षापासून
हा उपक्रम यशस्वीपणे सुरु आहे आणि यापुढे ही असाच सुरु राहावा,अशी अपेक्षा व्यक्त
करून मंत्री ना.देसाई यांनी शेवटी राज्याच्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या
वतीने त्यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment