Friday, 31 October 2025

केरा मणदुरे विभागातील उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षण हे हरितक्रांतीचे पडलेले पहिले पाऊल - पालकमंत्री शंभूराज देसाई.

दौलतनगर दि.31 : केरा, मणदुरे विभागातील निवकणे चिटेघर व बिबी या लघु प्रकल्पाच्या दोन्ही तीरावरील गावांना 100 मीटर उंचीपर्यंत शेतीसाठी उपसा सिंचनाद्वारे पाणी उचलून देण्याच्या सर्वेक्षण होणार आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर उपसा सिंचन योजनेचे आराखडे तयार होतील. त्यानंतर त्वरित प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल. केरा मणदुरे विभागातील केरा नदीवरील उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षण हे विभागासाठी हरितक्रांतीचे पहिले पाऊल असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन खणीकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

           केरळ ता.पाटण येथे झालेल्या केरा - मणदुरे विभागातील उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जयवंतराव शेलार दादासाहेब जाधव, सुरेश जाधव,बाळासो पाटणकर,सरपंच शंकर पवार,केशव कदम,लक्ष्मण संकपाळ,बापूराव सावंत,विजय कदम,अरविंद कदम,अभिजित देसाई,गजानन पडयाळ,तानाजी गुजर,जोतिबा बावधाने,राजेंद्र पाटणकर,सुर्यकांत पाटणकर, भरत साळुंखे, अभिजीत पाटील,वाय.के.जाधव,मधुकर भिसे,कृष्णत देसाई,महिपती जाधव,रोहित भोळे,शिवराज निकम,आनंदा शिंदे,सखाराम शिंदे,चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध गावचे सरपंच,सदस्य,संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

                पाटण तालुक्यातील पाणी प्राधान्याने तालुक्यात शेतीला मिळायला पाहिजे हा अट्टाहास लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यापासून होता. तारळी प्रकल्पाचे पाणी पहिल्यांदा येथील शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे यासाठी प्रकल्पाचे पाणी बाहेर जाता कामा नये म्हणून मी विरोध केला होता. तारळे भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला प्राधान्याने पाणी दिले सुरुवातीला तारळी प्रकल्पातून 50 मीटर उंचीपर्यंत शेतकऱ्यांना पाणी दिले त्यानंतर 100 मीटर पर्यंत शेतकऱ्यांना पाणी देऊन तरळी भाग सुजलाम सुफलाम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या प्रयत्नातमुळे तारळे विभागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला.

             केरा व मणदुरे विभागातील गावांना शेतीला पाणी मिळण्यासाठी सन 2014 पासून पाणी परिषदेच्या माध्यमातून शासनस्तरावर सातत्याने प्रयत्नशील होतो. तसेच पाणी परिषदेच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन यांसदर्भात चर्चा करण्यात आल्या. दरम्यान पाटण तालुक्यातील निवकणे, चिटेघर,बिबी हे प्रकल्पातून केरा नदीच्या दोन्ही तिरावरील गावांना तारळी प्रकल्पाच्या धर्तीवर 100 मीटर उंचीपर्यंत उपसा सिंचन योजनांव्दारे शेतीला पाणी देण्यासंदर्भात राज्याचे  तत्कालीन उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचेकडे पाटण येथील कार्यक्रमामध्ये विनंती केली होती. केरा व मणदुरे या भागाला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विविध बैठका घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यानुसार ना.देवेंद्र फडणवीस यांनीही केरा मणदुरे विभागातील शेतीला तारळी पॅटर्ननुसार 100 मीटर उंचीपर्यंत उपसा सिंचन योजनांव्दारे शेतीला पाणी देण्याचे मान्य केले होते. विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला ठराव करुन मान्यता दिली. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये आज या उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणचे कामाला सुरुवात करत आहोत. शासनाच्या खर्चाने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम शासनाचे असून शासनाच्या मदतीने सर्वेक्षण होऊन या उपसा सिंचन योजनांच्या कामालाही सुरुवात होईल मात्र त्यानंतर कोणीतरी येईल आणि भूलथापा मारून जाईल त्यामुळे अशा भूलथापांना आपण बळी पडू नका असेही त्यांनी सांगितले. ज्या लोकांना पोत्याने मते दिली त्यांना या विभागासाठी काही करता आले नाही अशी टीकाही पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केली. या कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे ना.अजितदादा पवार यांचेही सहकार्य लाभल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, मणदुरे विभागाला या प्रकल्पामुळे पाणी मिळेल. मी काम करणारा माणूस असून कितीही आणि कसलेही संकट आले तरी मागे हटणारा नाही असा विश्वास त्यांनी दिला. तसेच केरा - मणदुरे विभागातील उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे केरा मणदुरे भागाचा कायापालट होणार आहे. पीक पद्धतीही बदल होणार आहे तसेच रोजगारासाठी होणारे स्थलांतरही थांबणार आहे. त्यामुळे सर्वेक्षण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी शुभारंभ प्रसंगी शेवटी केले.

 

Wednesday, 29 October 2025

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून विद्युत विकास योजनेंतर्गत 04 कोटी 02 लक्ष 66 हजार रुपयांचा निधी मंजूर. वाढीव पोल,थ्री फेज लाईन,रोहित्र व वाहिनी स्थलांतरीत व नवीन रोहित्रे इ.कामे लागणार मार्गी.

 

दौलतनगर दि.29:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विज पुरवठया संदर्भातील नवीन वाढीवपोल,थ्री फेज लाईन, रोहित्र व विद्युत वाहिनी स्थलांतरित तसेच नवीन रोहित्र बसविणे इ. कामांना निधी मंजूर होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी विविध कामांच्या शिफारसी हया सन 2025-26 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये केल्या होत्या.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील नवीन वाढीवपोल,थ्री फेज लाईन, रोहित्र व विद्युत वाहिनी स्थलांतरित तसेच नवीन रोहित्र बसविणे इ. कामांना सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामधून विद्युत विकास योजने अंतर्गत 04 कोटी 02 लक्ष 66 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकां दिली आहे.

           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघात वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी तसेच नवीन वाढीवपोल,थ्री फेज लाईन, रोहित्र व विद्युत वाहिनी स्थलांतरित तसेच नवीन रोहित्र बसविणे ही कामे तात्काळ मार्गी लागण्यासाठी विविध गावांतील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे मागणी केली होती. त्यानुसार सदरच्या कामांना निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे वीज पुरवठा सुरळीत करण्याचे कामांना निधी मंजूर होण्यासाठी सन 2025-26 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये विविध कामांच्या शिफारसी केल्या होत्या. त्यानुसार या कामांना सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामधून सामान्य वि कास व पध्दती सुधारणांसाठी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या.अनुदान अंतर्गत 04 कोटी 02 लक्ष 66 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या मंजूर झालेल्या विकास कामांमध्ये नवीन रोहित्र बसविणे यामध्ये येराड येडोबा मंदिर व साळुंखे यांचे घराजवळ रोहित्र 13.60 लाख, सुपुगडेवाडी 8.40 लाख,तळमावले 7.65 लाख,सडादुसाळे 7.79 लाख,वर्पेवाडी गोकूळ 13.08 लाख,नाडे 6.89 लाख,सातर गावठाण 3.21 लाख,मालोशी आळी 6.27 लाख,तांबवे दोन राहित्र 19.96 लाख,मंद्रुळकोळे खुर्द 4.97 लाख, पाचगणी ता.पाटण खडकाचा वाडा व इनामवाडा येथे रोहित्र 18.12 लाख,जोतिबाचीवाडी 8.48 लाख,म्होप्रे डूबलवस्ती 8.65 लाख  या कामांचा तर वाढीववस्ती  विद्युतीकरणांतर्गत  नवीन वीज पोल च्या कामामध्ये आंब्रग 4.80 लाख,आडदेव 1.95 लाख,आरेवाडी 1.31 लाख,आवसरी 3.18 लाख,आसवलेवाडी 2.54 लाख,काटेवाडी तारळे नळ पाणी पुरवठा योजना वीज कनेक्शन 5.52 लाख,काढणे नानासो पाटील यांचे घराजवळील वीज पोल बदलणे 2.58 लाख,बागलवाडी तुपेवाडी काढणे 3.13 लाख,काळगाव 3.79 लाख,काळोली 1.60 लाख,कुंभारगाव लोंडूक 1.09 लाख,कुंभारगाव 6.04 लाख,कुठरे 2.56 लाख,कुसवडे कोंढावळे 0.57 लाख,केर 1.37 लाख,केरळ 2.64 लाख,कोंढावळे चाफ्याचा खडक 1.25 लाख,कोरिवळे 1.33 लाख,गलमेवाडी 2.56 लाख,गवळीनगर 1.45 लाख,गोषटवाडी 3.18 लाख,चाफळ 7.04 लाख,चाफेर मणेरी 1.11 लाख,जमदाडवाडी कदमनगर मळावस्ती 2.57 लाख,जिमनवाडी जळकेवाडी कुशी 2.11 लाख,टेळेवाडी 2.56 लाख,ठोमसे 2.10 लाख,डावरी गावठाण 2.42 लाख,डोणीचावाडा वांझोळे 0.57 लाख,ढेबेवाडी 1.09 लाख,ढोरोशी 2.65 लाख,तळीये 1.37 लाख,तांबवे 4.41 लाख,तामकणे 2.43 लाख,तारळे 2.64 लाख,तुपेवाडी काढणे स्ट्रीट लाईन 1.09 लाख,त्रिपुडी 0.58 लाख,देवघर गोवारे 0.58 लाख,धामणी 1.09 लाख,धावडे 0.81 लाख,धुमकवाडी मुरुड 1.34 लाख,नाटोशी 1.33 लाख,नाडे 3.66 लाख,नेचल 1.04 लाख,नेरळे 0.85 लाख,पश्चिम सुपने 2.83 लाख,पाचगणी खडकचावाडा इनाम थ्री फेज लाईन 4.33 लाख,पाणेरी 3.79 लाख,पापर्डे खुर्द 1.85 लाख,पापर्डे बुद्रुक 1.44 लाख,बनपूरी 6.40 लाख,बनपेठवाडी 3.18 लाख,बागलवस्ती कुंभारगाव 0.80 लाख,बागलेवाडी सावरघर 2.11 लाख,बिबी 2.64 लाख,भुडकेवाडी खालची 0.82 लाख,भोळेवाडी नाईकबा पाणी पुरवठा योजना 16 तास वीज पुरवठा 21.88 लाख,मणदुरे 3.97 लाख,मरळी 4.17 लाख,महाडीकवाडी नुने 0.82 लाख,माथणेवाडी 3.51 लाख,मान्याचीवाडी कुंभारगाव 1.80 लाख,मारुल तर्फ पाटण 2.64 लाख,मारुलहवेली आंबेडकर चौकातील रोहित्र स्थलांतरीत 3.32 लाख,मालोशी 2.64 लाख,मिरगाव बोपोली 0.54 लाख,मेंढोशी 3.02 लाख,मोडकवाडी जिंती 1.09 लाख,मौजे साकुर्डी 7.35 लाख,येराडवाडी 3.05 लाख,रामिष्टेवाडी 3.13 लाख,रुवले 3.05 लाख,वरची शिबेवाडी गुढे 3.05 लाख,वाघणे 2.49 लाख,वाटोळे 1.65 लाख,वाडीकोतावडे 2.42 लाख,वायचळवाडी कुंभारगाव 1.34 लाख,संभाजीनगर 2.65 लाख,शिंदेवाडी 2.45 लाख,शिद्रुकवाडी काढणे वरची 2.57 लाख,शिद्रुकवाडी कोरिवळे 2.57 लाख,शिरळ थ्री फेज लाईन 2.84 लाख,शिरळ बौध्दवस्ती 1.61 लाख,सुळेवाडी 2.45 लाख,सोनवडे 2.91 लाख,हुंबरवाडी 2.78 लाख, गोकूळ तर्फ हेळवाक येथे जलपर्यटन केंद्र करणेसाठी अडथळा असलेले रोहित्र,उच्चदाब  व लघुदाब  लाईन स्थलांतरित23.07 लक्ष, नदीकाठी असणारी 33 केव्ही लाईन पूरपरिस्थितीमध्ये पाण्याखाली जात असले कारणाने 33 केव्ही  लाईन स्थलांतरीत 9.70 लाख या कामांचा समावेश असून महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीशी निगडीत असलेल्या या कामांना निधी मंजूर झाल्याने वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असून तातडीने ही कामे हाती घेण्यासंदर्भातील आवश्यक असलेली कार्यवाही तातडीने पुर्ण करण्यात येणार असल्याने लवकरात लवकर या विद्युत विकास योजने अंतर्गत मंजूर कामांना सुरुवात होणार असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत नमूद केले आहे.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून लघु पाटबंधारे विभागांतर्गत 01 कोटी 72 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. लघु पाटबंधारे विभागांतर्गत शेतीसाठी साठवण हौद,वितरण व्यवस्था व वळण बंधारा इ.कामे लागणार मार्गी.


 

दौलतनगर दि.29:- पाटण विधानसभा मतदारसंघातील शेतीला पाण्याची सोय होण्यासाठी साठवण हौद,वळण बंधारा व शेतीसाठी वितरण व्यवस्था इ. कामांना निधी मंजूर होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी विविध कामांच्या शिफारसी हया सन 2025-26 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये केल्या होत्या.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील साठवण हौद,वितरण व्यवस्था व वळण बंधारा इ. कामांना सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामधून लघु पाटबंधारे विभागांतर्गत 01 कोटी 72 लक्ष 82 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकां दिली आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघात विविध गावांतील कार्यकर्त्यांनी शेतीसाठी पाण्याची सोय होण्यासाठी साठवण हौद,वळण बंधारा व शेतीसाठी वितरण व्यवस्था इ. कामांच्या मागण्या हया पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे केल्या होत्या. त्यानुसार सदरच्या कामांना निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शेतीला पाण्याची सोय होण्यासाठी साठवण हौद,वळण बंधारा व शेतीसाठी वितरण व्यवस्था इ. कामांना निधी मंजूर होण्यासाठी सन 2025-26 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये विविध कामांच्या शिफारसी केल्या होत्या. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील साठवण हौद,वितरण व्यवस्था व वळण बंधारा इ. कामांना सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामधून लघु पाटबंधारे विभागांतर्गत 01 कोटी 72 लक्ष 82 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून मंजूर झालेल्या कामांमध्ये खोणोली येथे वळण बंधारा व हौद व वितरण व्यवस्था 30.20 लक्ष, कोरिवळे येथे ढुंकुर माळ येथे साठवण (वळण) बंधारा 27.71 लक्ष, मोडकवाडी जिंती (हेळोबा पुलाच्या शेजारी) येथे वळण बंधारा व हौद व वितरण व्यवस्था 37.25 लक्ष, रामेल शेळकेवस्ती येथे शेतीसाठी साठवण हौद व वितरण व्यवस्था 42.20 लक्ष व बामणेवाडी भांबे येथे शेतीसाठी वितरण व्यवस्था 35.46 लक्ष असा 01 कोटी 72 लक्ष 82 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.यामुळे शेतीसाठी पाण्याची सोय होऊन मंजूर झालेल्या गावांमधील शेतकऱ्यांची शेतीसाठी पाण्याची चांगली सोय होणार असल्याने या गावातील ग्रामस्थांनी ना.शंभूराज देसाई यांचे आभार मानले असून मंजूर झालेल्या कामांच्या निविदा प्रक्रिया तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामांना तात्काळ सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

Monday, 27 October 2025

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून 13 कोटी 23 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

 


दौलतनगर दि.27:- पाटण विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,संरक्षक भिंत,आर.सी.सी.गटर,सभामंडप व ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी कामांना निधी मंजूर होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमधून 13 कोटी 22 लाख 93 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे महसूल व वन विभागाने पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकां दिली आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघात विविध गावांतील अंतर्गत रस्ते व पोहोच रस्ते खराब झाले असल्याने तसेच काही ठिकाणी संरक्षक भिंती व आर.सी.सी.गटर,सभामंप व ग्रामपंचायत कार्यालय इमारतींचे कामांना निधी मंजूर होण्यासंदर्भात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे या विकास कामांची मागणी केली होती.  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे शिफारस केल्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमधून 13 कोटी 22 लाख 93 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे महसूल व वन विभागाने पारित केला आहे.यामध्ये बोर्गेवाडी (कुंभारगाव) येथे अंतर्गत रस्ता 100 मी व आर.सी.सी.गटर 12 लाख, धनगरवाडा (काळगाव) अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, बादेवाडी (सुपुगडेवाडी) अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, गुढे बडेकरवस्ती व सातपुतेवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, ऐनाचीवाडी गोकूळ पाऊल वाटा काँक्रीटीकरण 10 लाख, खांडेकरवाडी राममळा शिंदेवाडी (गोषटवाडी) अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण 19.99 लाख, ढाणकल अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, कडववाडी (नाणेगाव) येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, कोचरेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, जाळगेवाडी वरची येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, माथणेवाडी भैरवनाथ मदिर रस्ता सुधारणा 35 लाख, शिंगणवाडी येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, सडाकळकी येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, सडादाढोली येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, सडादुसाळे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, सडानिनाई येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, सुर्याचीवाडी येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, गमेवाडी येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, बाटेवाडी येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, मंद्रुळकोळे खुर्द येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, माईंगडेवाडी जिंती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, काटेवाडी (तारळे) अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, दुसाळे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख, राहुडे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, महाडीकवाडी (नुने) येथे म्हंमादेवी मंदीरा मार्गे नुने गाव पोहोच रस्ता सुधारणा 15 लाख, मुरुड येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख, भोकरवाडी(सावरघर) येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, कुसरुंड शिंदेवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख, वाडीकोतावडे अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, आंब्रुळे वरची आळी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, निसरे येथे कोळीवाडा, चांभारवाडा रस्ता सुधारणा 15 लाख, सुर्यवंशीवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, खालची मेंढोशी चंद्रकांत जाधव यांचे घर ते स्मशानभूमी नदीकडे जाणारा रस्ता सुधारणा 15 लाख, म्हावशी येथे जांभळेवस्ती अंतर्गत खडीकरण व डांबरीकरण 15 लाख, आंबवणे गावांतर्गत रस्ता सुधारणा 14.98 लाख, कुसवडे शेळकेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, खुडुपलेवाडी येथे धनगरवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, निवकणे ते चाफेाली रस्ता सुधारणा 15 लाख, मरड धनगर वस्ती येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, म्हारवंड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, रामेल ते शेळकेवाडी रस्ता सुधारणा 14.99 लाख, भातडेवाडी जिंती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, बांधवाट भैरवनाथ मंदिर संरक्षक भिंत 15 लाख, केंजळवाडी निवडे माणेकश्वर मंदिर रस्ता 15 लाख, केळेवाडी वरची कडवे खुर्द स्मशानभूमी रस्ता सुधारणा 14.99 लाख, डफळवाडी बसस्टॉप ते सवारमळी रस्ता सुधारणा 15 लाख, रेडेवाडी कडवे खुर्द ते केळेवाडी वरची रस्ता सुधारणा 20 लाख, घाणव माऊली बाळकृष्ण महाराज मंदीर पोहोच रस्ता 14.99 लाख, येरफळे गावडेवार्ड स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख, आटोली भाकरमळी वाघजाई मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख, गणेशनगर लोटलेवाडी काळगाव रस्ता सुधारणा 15 लाख, तेटमेवाडी काळगाव उर्वरित रस्ता सुधारणा 19.99 लाख, ढेबेवाडी बाजारतळ सुशोभिकरण 25 लक्ष, कोरडेवाडी धावडे रस्ता सुधारणा 20 लाख, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी इमारत बांधकाम 150 लक्ष, कळंत्रेवाडी कुंभारगाव येथे ओढयावर संरक्षक भिंत 15 लाख, कुंभारगाव मुस्लिम कब्रस्तानला संरक्षक भिंतीसह सुधारणा 20 लक्ष, ताईगडेवाडी तळमावले येथे पुरुष/महिला सुलभ शौचालय 10 लाख, जगदाळवाडी  (कडवे) येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा व संरक्षक भिंत 15 लाख, मणेरी चिंचेचेआवाड आर.सी.सी. गटर 10 लाख, राजवाडा स्मशानभूमी व पाण्याची विहीर येथे संरक्षक भिंत 10 लाख, घाणव येथे पत्र्याचे सभामंडप 12 लाख, आवर्डे येथे लक्ष्मी मंदिरासमोर सभामंडप 13 लाख, आडदेव खुर्द येथे सभामंडप 13 लाख, रोडेवाडी मंद्रुळकोळे येथे सभामंडप 13 लाख, शिद्रुकवाडी वरची खळे येथे संरक्षक भिंत 15 लाख, कारळे डाग्याचीआळी संरक्षक भिंत 15 लाख, आवर्डे बहुउद्देशीय इमारत 20 लाख, तारळे खडकीमाळ येथे पिण्याच्या पाण्याच्याविहिरीला संरक्षक भिंत 15 लाख, चिटेघर केदारनाथ मंदिर सुशोभिकरण 15 लाख, वेखंडवाडी येथे सभास्टेज 5 लाख, वेताळवाडी येथे ग्रामसचिवालय इमारत 15 लाख, माजगाव येथे सभास्टेज 2 लाख, फणसवाडी (वाटोळे) येथे सभामंडप 13 लाख, आंब्रुळे येथे सभास्टेज 4 लक्ष, कोळेकरवाडी उमरकांचन येथे सभामंडप 13 लाख, गमेवाडी चाफळ ग्रामपंचायत कार्यालय इमारत 15 लाख, टोळेवाडी येथे सभामंडप 13 लाख, काहिर संरक्षक भिंत 15 लाख या कामांचा समावेश आहे.सार्वजनिक बांधकाम,जिल्हा परिषद बांधकाम विभाग या कार्यान्वित यंत्रणांचे माध्यमातून ही कामे मार्गी लागणार असल्याने या कामांची तातडीने निविदा प्रक्रिया करण्याच्या सूचनाही यावेळी संबंधित अधिकारी यांना केल्या असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

Friday, 24 October 2025

लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याला गळीतास येणाऱ्या ऊसाला प्र.मे.टन 3000/- रुपये पहिली उचल.

 

दौलतनगर दि.24:-गत दोन वर्षामध्ये कारखान्याचे विस्तारवाढ वेळेत पूर्ण झाल्याने गतवर्षीचा गळीत हंगाम आपल्या कारखान्याने कमी कालावधीत पूर्ण केला. तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील अन्यत्र होणाऱ्या ऊसाचे प्रमाणही कमी करुन संचालक मंडळ व कारखाना व्यवस्थापनाने चांगले आर्थिक नियोजन  करावे. तसेच शासनाकडून देण्यात आलेल्या भाग भांडवलामुळे कारखान्याचे विस्तारवाढीचे काम पूर्ण झाले असून यापुढील काळातही लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याला राज्य शासनाकडून मदत लागल्यास राज्य शासनाकडून कायम सहकार्य राहिल,असे आश्वासन ना.शंभूराज देसाई यांनी दिले.

           ते दौलतनगर, ता. पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या 2 व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई,चि.जयराज देसाई,अशोकराव पाटील,व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,सोमनाथ खामकर,प्रशांत पाटील, शशिकांत निकम,सर्जेराव जाधव,सुनिल पानस्कर,बळीराम साळुंखे,विजय सरगडे,शंकरराव पाटील,भागोजी शेळके, बबनराव शिंदे, लक्ष्मण बोर्गे,जयवंतराव शेलार, ॲङडी.पी.जाधव, अभिजित पाटील, चेअरमन संजय देशमुख,प्रकाशराव जाधव,जालंदर पाटील,विजय जंबुरे,माणिक पवार,कार्यकारी संचालक सुहास देसाई यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते,अधिकारी,कर्मचारी यांची उपस्थिती होती. या वेळी 1 ज्येष्ठ ऊस उत्पादक सभासद यांच्या हस्ते ऊसाची मोळी गव्हाणीमध्ये टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. गळीत हंगाम शुभारंभा निमित्त कारखान्याच्या संचालिका सौ. दिपाली विश्वास पाटील व त्यांचे पती श्री. विश्वास आत्माराम पाटील यांचे शुभहस्ते सत्यनारायण महापुजा संपन्न झाली.

        याप्रसंगी ते पुढे म्हणाले की, यंदाच्या वर्षी माहे मे महिन्यापासून अवकाळी पाऊस पडत असून मोठया प्रमाणांत पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाल्याने महाराष्ट्र शासनाने 32 हजार कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहिर करत शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत केली.ज्या प्रमाणे शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्याप्रमाणे सहकारी साखर कारखान्यांची तिच परिस्थिती आहे.त्यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळाने जबाबदारी स्विकारुन अन्यत्र जाणाऱ्या ऊसाला आळा घालण्याचे काम करावे.दरम्यान राज्यामध्ये 1250 मे.टन गाळप क्षमतेचे अनेक कारखाने लिलावात गेले,विक्रीला निघाले परंतु लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई यांचे आदर्श विचारांचा वारसा जोपासात आजही आपला कारखाना हा चांगले आर्थिक नियोजनामुळे सक्षमपणे सुरु असून भविष्यातही चांगल्या पध्दतीने सुरु राहिल.शासनाने मंजूर केलेल्या भागभांडवलामध्ये कारखान्याची चांगल्या पध्दतीने क्षमतवाढ करुन यशस्वी गळीत हंगाम केला.तारळे भागामध्ये शासन खर्चाने 50 मीटर व 100 मीटर हेडवरुन शेतीला पाणी  दिल्यामुळे बागायत क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे. तर मोरणा गुरेघर बंदिस्त पाईप लाईनमधून डाव्या व उजव्या तिरावरुन शेतीला पाणी  देण्यासाठीचे काम प्रगतीपथावर असून नाटोशी उपसा सिंचन योजनेतून कारखाना परिसरामध्ये जादा ऊसाचे क्षेत्र लागवडीखाली येणार असल्याने कारखान्याचे जादा गाळप होण्यास मदत होणार असून यंदाच्या वर्षी प्र.मे.टन तीन हजार रुपये पहिली उचल आणि एफ.आर.पी.प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याने जास्तीत जास्त ऊस कारखान्यास गळीतास येण्यासाठी सर्वांनी  सहकार्य करुन हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी  सर्वांनी प्रयत्नशील रहावे,असे शेवटी आवाहन केले.

            याप्रसंगी बोलताना चेअरमन मा.यशराज देसाई म्हणाले की, पहिल्यांदाच पावसाच्या वातावरणामध्ये आपण गळीत हंगामाची सुरुवात करत आहोत.माहे मे पासून अवकाळी पाऊस मोठया प्रमाणांत पडत असल्याने ऊसाच्या पीकाचे मोठे नुकसान झाले असून ऊसाची उपलब्धता लक्षात घेता हा गळीत हंगाम आपण सुरु करत असताना कितीही आर्थिक ताण आला तरी  कारखान्यास गळीतास येणाऱ्या ऊसाला प्र.मे.टन 3000 रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच ऊस विकास विभागामार्फत ऊस बियाणे,खते वाटप करण्याचे नियोजन केले आहे. ऊस तोडणी यंत्रणा हजर होत असून भागवाईज ऊस तोडणी मजूर टोळयांचे नियोजन केले आहे. पूर्ण ऊस तोडणी मजूर यंत्रणा आल्यानंतर पूर्ण क्षमतेने कारखाना सुरु करण्याचा मानस असून आपला कारखाना हा लहान असला तरी  जिल्हयातील इतर मोठया कारखान्यांच्या तुलनेमध्ये दर देण्याचा निर्णय घेतला असून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद,शेतकरी यांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास देऊन गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.

चौकट:- ऊसाला प्र.मे.टन 3000 रुपये पहिली उचल दिल्याने सभासद शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.

           लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई यांनी आर्थिक शिस्त लावत काटकसरीचे धोरण अवलंबल्याने अल्पावधीमध्ये कारखान्याची विस्तारवाढीचे काम पूर्ण करुन कारखाना गाळप क्षमता 1250 वरुन 2500 मे.टन करत गत गळीत हंगाम यशस्वी पार पडला. तर आज कारखान्याचे 52 व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी सन 2025-26 च्या गळीत हंगामामध्ये कारखान्यास गळीतास येणाऱ्या ऊसाला प्र.मे.टन 3000 रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Monday, 20 October 2025

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा नामदार शंभूराज देसाई व 11 ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते शुक्रवार दि.24 ऑक्टोंबर रोजी 55 वा गळीतहंगामाचा शुभारंभ- व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे.

 

 

दौलतनगर दि.20:- दौलतनगर, ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२5-6 मधील 55 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम शुक्रवार दि.24 ऑक्टोंबर,२०२5 रोजी दुपारी 03.00 वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार श्री. शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ. स्मितादेवी देसाई, कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे ज्येष्ठ 1 सभासद यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळ,दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

           पत्रकात म्हंटले आहे की, चालु गळीत हंगामाची पुर्वतयारी पुर्ण झाली असून गाळप हंगाम पुर्ण क्षमतेने होण्याच्या दृष्टीने कारखान्यातील सर्व कामकाज पुर्णत्वाकडे गेले आहे. कारखान्याने ऊस तोडणी व वाहतूकीकरीता पुरेसे तोडणी मजुर व वाहनांचे करार पुर्ण केलेले असून कारखान्याकडे करार केलेली सर्व ऊस तोडणी व वाहतूक मजुर यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.यंदाचाही गळीत हंगाम कारखान्याचे सभासद,ऊस उत्पादक शेतकरी यांचे सहकार्यातून यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करीत या गळीत हंगामाचा शुभारंभ हा प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे ज्येष्ठ सभासद श्री.शिवाजी हिंदुराव काळे मालदन, केशव ज्ञानू माटेकर माटेकरवाडी कुंभारगाव, दिनकर विष्णू यादव (पाटील) गारवडे, जालिंदर दादू डोंगरे दिवशी बुद्रुक,सदाशिव रामचंद्र नलवडे नावडी, वसंतराव ज्ञानदेव माने चाफळ, शिवाजी शंकर पानस्कर मंद्रुळहवेली, आनंदराव  दिनकर निकम ऊरुल, आनंदराव एकनाथ शिंदे घोट, शहाजी सिताराम कदम शेडगेवाडी व बाबूराव चंद्रु पडवळ येरफळे या 1 ज्येष्ठ सभासदांचे शुभहस्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक, नामदार शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ.स्मितादेवी शंभूराज देसाई, कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि. 24 ऑक्टोंबर, २०२5 रोजी दुपारी 03.00 वा. संपन्न होणारअसून या गळीत हंगाम शुभारंभा निमित्त कारखान्याच्या संचालिका सौ. दिपाली विश्वास पाटील व त्यांचे पती श्री. विश्वास आत्माराम पाटील यांचे शुभहस्ते सत्यनारायण महापुजा आयोजीत केलेली आहे. तरी या समारंभास कारखान्याचे सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी शेवटीपत्रकात केले आहे.

चौकट:- नामदार शंभूराज देसाई यांचे उपस्थितीमध्ये शुक्रवार दि.24 ऑक्टोंबर रोजी दिवाळी फराळाचे आयोजन.

           प्रतिवर्षा प्रमाणे यंदा दिपावली सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेवतीने दिवाळी फराळ या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि. 24 ऑक्टोंबर 2025 रोजी साय.05 ते 07.30 वा.पर्यंत या वेळेमध्ये महाराष्ट्र दौलत,लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, दौलतनगर, ता.पाटण येथे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमास सातारा जिल्हयातील लोकप्रतिनिधी, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान दिवाळी फराळ कार्यक्रमाचे निमित्ताने अमृत मराठी या मराठी गाण्यांच्या संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.


Saturday, 18 October 2025

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून रस्त्यांच्या कामांसाठी 3 कोटी तर अंगणवाडी दुरुस्तीसाठी 24 लक्ष रुपयांचा निधी. जिल्हा वार्षिक आराखडयातून ग्रामीण मार्ग व अंगणवाडी दुरुस्ती अंतर्गत रस्त्यांची कामे लागणार मार्गी.

 

दौलतनगर दि.18:-पाटण विधानसभा मतदारसंघातील इतर जिल्हा मार्ग यांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा तसेच अंगणवाडी दुरुस्तीच्या कामांचा समावेश होण्यासाठी शिफारस केली होती. पाटण मतदारसंघातील दळण-वळणाचेदृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ग्रामीण मार्गांचे व अंगणवाडी दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण मार्गांचे पुनर्बांधणीचे कामांसाठी तसेच अंगणवाडी दुरुस्तीचे कामांना सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत 3 कोटी तर अंगणवाडी इमारतींचे दुरुस्तीचे कामांसाठी 24 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

             प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण मार्गांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा समावेश होण्यासाठी  शिफारस केली होती. सतत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण या डोंगरी व दुर्गम भागात दळण वळणाच्यादृष्टीने महत्वाच्या असलेले ग्रामीण व इतर जिल्हा मार्ग रस्ते नादुरुस्त झाल्याने येथील ग्रामस्थांची दळण वळणाची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे महत्त्वाच्या असलेल्या  या रस्त्यांच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी निधी मंजूर होणे गरजेचे होते. तसेच अंगणवाडी इमारतींचे दुरुस्तीचे कामासाठी निधीची आवश्यकता होती.त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण मार्ग या रस्त्यांचे कामांसाठी सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत 3 कोटी 05 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती अंतर्गत प्रजिमा 58 खळे ते काढणे तुपेवाडी रस्ता ग्रामा 320 खराब लांबीत रस्ता सुधारणा 30 लक्ष, वरचे आडदेव ते कुसरुंड रस्ता ग्रामा 233 भाग कुसरुंड ते खालचे आडदेव खराब लांबी रस्ता सुधारणा 20 लक्ष, वाडीकोतावडे पोहोच रस्ता ग्रामा 228 सुधारणा 20 लक्ष, प्र.57 ते म्हारवंड भारसाखळे रस्ता ग्रामा 58 खराब लांबीत रस्ता सुधारणा 25 लक्ष, प्रजिमा 37 ते ताटेवाडी रस्ता ग्रामा 106 रस्ता सुधारणा 20 लक्ष, घोट आंबेवाडी जुगाईवाडी रस्ता ग्रामा 40 सुधारणा 40 लक्ष, मोगरवाडी  ते कोंजवडे रस्ता ग्रामा 27 सुधारणा 15 लक्ष, कुसरुंड पाटीलवस्ती  रस्ता ग्रामा 229 सुधारणा 15 लक्ष, इजिमा 135 ते धावडे कोरडेवाडी रस्ता ग्रामा 221 सुधारणा 30 लक्ष, दिवशी जुंगठी रस्ता ग्रामा 72 सुधारणा 40 लक्ष, प्रजिमा 58 ते मंद्रुळकोळे खुर्द यादववाडी ग्रामा 293 रस्ता सुधारणा  50 लक्ष या रस्त्यांचे कामांसाठी 03 कोटी 05 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणावाडी इमारतीचे दुरुस्तीचे कामांसाठी  जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत 24 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये डोणीचावाडा 60, ऐनाचीवाडी गोकूळ तर्फ हेळवाक 23, सडानिनाई 277, विरेवाडी 286, तामकणे 220, गिरेवाडी 357, वाटोळे झरे आवाड, झाकडे 3, गुंजाळी 202, मंद्रुळकोळे खुर्द 14, मालदन जाधववाडी 156, जाळगेवाडी 294, गोकूळ तर्फ हेळवाक 24, गोकूळ तर्फ हेळवाक कोयनानगर 25, कोयनानगर 26, कोयनानगर 27, आडूळ सुभाषनगर 270, मान्याचीवाडी 141, साबळेवाडी 150, पाचुपतेवाडी 222, ढेबेवाडी  169, गुढे 118, धावडे व मोरगिरी 38 या अंगणवाडी इमारतींचे दुरुस्तीचे कामांसाठी निधी मंजूर झाला असून या मंजूर झालेल्या कामांची तातडीने निवीदा प्रक्रिया करुन लवकरात लवकर ही कामे मार्गी लावण्यासंदर्भातही संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

 

 

Thursday, 16 October 2025

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून ग्रामपंचायत कार्यालय,स्मशानभूमी व अंतर्गत रस्त्यांसाठी भरघोस निधी मंजूर. जिल्हा वार्षिक आराखडयातून 10 कोटी 22 लक्ष 50 हजार रुपयांची कामे लागणार मार्गी.

 


दौलतनगर दि.15:- पाटण विधानसभा मतदारसंघातील नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारती, जनसुविधा योजनेतून स्मशानभूमी शेड, निवारा शेड व स्मशानभूमी सुधारणा तसेच गावा-गावातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन 2025-26 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये ग्रामपंचायत कार्यालय,स्मशानभूमी व अंतर्गत रस्त्यांची कामे प्रस्तावित केली होती.त्यानुसार या कामांचा सन 2025-26 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये समावेश होऊन पाटण विधानसभा मतदारसंघातील  ग्रामपंचायत कार्यालय इमारती, स्मशानभूमी शेड,निवारा शेड व स्मशानभूमी सुधारणा तसेच  गावांतर्गत रस्त्यांच्या कामांना जनसुविधा योजने अंतर्गत 10 कोटी 22 लक्ष 50 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यातआली आहे.

            प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत, स्मशानभूमी शेड,स्मशानभूमी निवारा शेड व स्मशानभूमींची सुधारणा अशी विविध विकास कामे मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे निवेदनाव्दारे मागणी केली होती. त्यानुसार या विकास कामांना जिल्हा वार्षिक आराखडयातून निधी मंजूर होण्यासाठी  प्रस्तावित केल्यानंतर या कामांचा जनसुविधा योजने अंतर्गत समावेश करण्यात येऊन या कामांना 10 कोटी 22 लक्ष 50 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा योजने अंतर्गत प्रत्येकी 15 लाख या प्रमाणे 14  नविन ग्रामपंचायत कार्यालय इमारतींचे कामांना 02 कोटी 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये चव्हाणवाडी (धामणी),धामणी,घोटील,शेंडेवाडी,चोपडी,मराठवाडी (मेंढ), जरेवाडी, बहुले, कुसवडे, जमदाडवाडी, गुढे, टोळेवाडी व सोनाईचीवाडी व चव्हाणवाडी (नाणेगाव) या ग्रामपंचायत कार्यालय इमारतींचे कामांचा समावेश आहे.तर जनुसविधा योजने अंतर्गत मंजूर स्मशानभूमी शेड,निवारा शेड व स्मशानभूमी सुधारणा करण्याचे मंजूर कामांमध्ये आडदेव वरचे स्मशानभूमी निवारा शेड 3.90 लक्ष, कुंभारगाव स्मशानभूमी  निवारा शेड 3.90 लक्ष, चोपडी स्मशानभूमी  निवारा शेड 3.90 लक्ष, मान्याचीवाडी कुंभारगाव मातंगवस्ती स्मशानभूमी निवारा शेड 3.90 लक्ष, मोरेवाडी पेठशिवापूर येथे स्मशानभूमी निवारा शेड 3.90 लक्ष, सुतारवाडी  मालदन स्मशानभूमी निवारा शेड 3.90 लक्ष, आडूळ पेठ स्मशानभूमी निवारा शेड 4 लक्ष, जमदाडवाडी स्मशानभूमी निवारा शेड 4 लक्ष, तामिणे निवारा शेड 4 लक्ष, त्रिपुडी  स्मशानभूमी निवारा शेड 4 लक्ष, धनगरवाडा मरड निवारा शेड 4 लक्ष, बिबी येथे स्मशानभूमी निवारा शेड 4 लक्ष, येरफळे येथे निवारा शेड 4 लक्ष, लोटलेवाडी काळगाव निवारा शेड 4 लक्ष, वाटोळे स्मशानभूमी निवारा शेड 4 लक्ष, सावरघर स्मशानभूमी निवारा शेड 4 लक्ष, अंबवडे खुर्द येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, आंबवणे शेळकेवस्ती स्मशानभूमी शेड  3.90 लक्ष, काठी येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, काठीटेक येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, काढणे बौध्दवस्ती स्मशानभूमी दुरुस्ती 3.90 लक्ष, कारळे पोकळयाचीवाडी येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, कुंभारवस्ती नाटोशी स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, केळोली  वरची येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, केळोली खालची येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, कोदळ पुनर्वसन स्मशानभूमी  शेड 3.90 लक्ष, कोळणे येथे स्मशानभूमी  शेड  3.90 लक्ष, कोळेकरवाडी डेरवण येथे स्मशानभूमी  शेड 3.90 लक्ष, खालची केर येथे स्मशानभूमी 3.90 लक्ष, गोषटवाडी सुतारवस्ती स्मशानभमी शेड 3.90 लक्ष, चोरगेवाडी काळगाव स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, जंगमवाडी धजगाव येथे स्मशानभूमी  शेड 3.90 लक्ष, जंगलवाडी तारळे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, जाधववाडी चाफळ स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, झाकडे गावठाण स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, ढेबेवाडी लिंगायत समाज स्मशानभूमी निवारा शेड 3.90 लक्ष, तारळे देटकेवस्ती स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, दुटाळवाडी नुने स्मशानभूमी शेड दुरुस्ती 3.90 लक्ष, नाईकबावस्ती शिंदेवाडी स्मशानभमी शेड 3.90 लक्ष, नाडे येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, नेरळे स्मशानभूमी  शेड 3.90 लक्ष, पळयाचावाडा दास्तान स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, पाचगणी पुनर्वसन शिंदेवाडी स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, पाणेरी गावठाण येथे स्मशानभूमी  शेड 3.90 लक्ष, बादेवाडी धामणी स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, बोर्गेवाडी डेरवण येथे स्मशानभूमी  शेड 3.90 लक्ष, मंद्रुळकोळे बौध्दवस्ती स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, मकाईचीवाडी बिबी स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, मणदुरे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, मरड येथे स्मशानभूमी शेड  3.90 लक्ष, महाबळवाडी दाढोली येथे स्मशानभूमी  शेड 3.90 लक्ष, रेडेवाडी कडवे खुर्द धनगरवस्ती स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, वाघणे स्मशानभूमी  शेड 3.90 लक्ष, शिद्रुकवाडी खळे खालची येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, शिवंदेश्वर स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, सणबूर बौध्दवस्ती स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, सणबूर विठ्ठलवाडी स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, सळवे मान्याचीवाडी स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, सांगवड स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, सुर्यवंशीवाडी येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, हुंबरणे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, आचरेवाडी स्मशानभूमी शेड व संरक्षक भिंत 10 लक्ष, कुसवडे येथे स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, गव्हाणवाडी स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, गोषटवाडी राममळा स्मशानभूमी शेड 4 लक्ष, घाणव येथे स्मशान भूमी शेड 4 लक्ष, घोटील स्मशानभूमी शेड 4 लक्ष, चाफळ स्मशानभूमी शेड 4 लक्ष, जुंगटी मळेवाडा येथे  स्मशानभूमी शेड 4 लक्ष, टोळेवाडी स्मशानभूमी शेड 4 लक्ष, डावरी वरची बौध्दवस्ती स्मशानभूमी  सुधारणा 4 लक्ष, तामिणे स्मशानभूमी शेड 4लक्ष, दिवशी खुर्द स्मशानभूमी शेड 4 लक्ष, नवसरवाडी स्मशानभूमी  सुधारणा 4 लक्ष, निनाईवाडी कसणी स्मशानभूमी शेड 4 लक्ष, पाणेरी वाल्मिकी  धनगरवाडा स्मशानभूमी 4 लक्ष, बनपूरी येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, बनपूरी शिंगमोडेवाडी येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, बांबवडे स्मशानभूमी  सुधारणा 4 लक्ष, भिकाडी स्मशानभूमी शेड 4 लक्ष, मणदुरे मागासवर्गीय वसती स्मशानभूमी शेड 4 लक्ष, मल्हारपेठ पानस्करवाडी स्मशानभूमी शेड 4 लक्ष, मसुगडेवाडी दाढोली येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, माटेकरवाडी नं.1 स्मशानभूमी शेड 4 लक्ष, मोरगिरी स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, वन स्मशानभूमी शेड 4 लक्ष, वरेकरवाडी नाटोशी स्मशानभूमी शेड 4 लक्ष, शिंगणवाडी स्मशानभूमी  शेड 4 लक्ष, शेडगेवाडी विहे स्मशानभूमी निवारा शेड 4 लक्ष, शेळकेवस्ती कुसवडे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, सातेवाडी  कुंभारवस्ती  नाटोशी स्मशानभूमी शेड 4 लक्ष, सुतारवस्ती नाटोशी स्मशानभूमी शेड 4 लक्ष, सोनवडे बौध्दवस्ती स्मशानभूमी संरक्षक भिंत 4 लक्ष, हुंबरवाडी स्मशानभूमी शेड 4 लक्ष, हेळवाक स्मशानभूमी शेड 4 लक्ष या कामांचा समावेश असून संभाजीनगर वेखंडवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, जांभूळबन गावडेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, भिकाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 20लक्ष, गोरेवाडी मुरुड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, सुतारवस्ती गोषटवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लक्ष, शिद्रुकवाडी काढणे वरची अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, मळयाचीवाडी काळगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, हुंबरवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, बहुले अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, हावळेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, नारळवाडी मल्हारपेठ वासुदेव पवार यांचे शेडपर्यंत रस्ता सुधारणा 10 लक्ष, सोनाईचीवाडी दिपक यांचे घर ते बाजीराव काळे यांचे घर रस्ता सुधारणा 15 लक्ष, तळीये सुतारवाडा  रस्ता सुधारणा 15 लक्ष, नाव अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, मारुल तर्फ पाटण शेळकेवस्ती रस्ता सुधारणा 15 लक्ष, चोरगेवाडी काळगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, घोटील अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, काठीटेक अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, सुंदरनगर डांगीष्टेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, लोरेवाडी मुरुड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, जिती अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, वाटोळे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, भालेकरवाडी डावरी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, नवजा अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण 10 लक्ष, बोपोली अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लक्ष, दवंडेवस्ती किसरुळे येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 5 लक्ष ही कामे मंजूर झाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने ही कामे हाती घेण्यात येणार असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.