Monday, 27 October 2025

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून 13 कोटी 23 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

 


दौलतनगर दि.27:- पाटण विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,संरक्षक भिंत,आर.सी.सी.गटर,सभामंडप व ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी कामांना निधी मंजूर होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमधून 13 कोटी 22 लाख 93 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे महसूल व वन विभागाने पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकां दिली आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघात विविध गावांतील अंतर्गत रस्ते व पोहोच रस्ते खराब झाले असल्याने तसेच काही ठिकाणी संरक्षक भिंती व आर.सी.सी.गटर,सभामंप व ग्रामपंचायत कार्यालय इमारतींचे कामांना निधी मंजूर होण्यासंदर्भात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे या विकास कामांची मागणी केली होती.  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे शिफारस केल्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमधून 13 कोटी 22 लाख 93 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे महसूल व वन विभागाने पारित केला आहे.यामध्ये बोर्गेवाडी (कुंभारगाव) येथे अंतर्गत रस्ता 100 मी व आर.सी.सी.गटर 12 लाख, धनगरवाडा (काळगाव) अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, बादेवाडी (सुपुगडेवाडी) अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, गुढे बडेकरवस्ती व सातपुतेवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, ऐनाचीवाडी गोकूळ पाऊल वाटा काँक्रीटीकरण 10 लाख, खांडेकरवाडी राममळा शिंदेवाडी (गोषटवाडी) अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण 19.99 लाख, ढाणकल अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, कडववाडी (नाणेगाव) येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, कोचरेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, जाळगेवाडी वरची येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, माथणेवाडी भैरवनाथ मदिर रस्ता सुधारणा 35 लाख, शिंगणवाडी येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, सडाकळकी येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, सडादाढोली येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, सडादुसाळे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, सडानिनाई येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, सुर्याचीवाडी येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, गमेवाडी येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, बाटेवाडी येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, मंद्रुळकोळे खुर्द येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, माईंगडेवाडी जिंती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, काटेवाडी (तारळे) अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, दुसाळे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख, राहुडे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, महाडीकवाडी (नुने) येथे म्हंमादेवी मंदीरा मार्गे नुने गाव पोहोच रस्ता सुधारणा 15 लाख, मुरुड येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख, भोकरवाडी(सावरघर) येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, कुसरुंड शिंदेवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख, वाडीकोतावडे अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, आंब्रुळे वरची आळी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, निसरे येथे कोळीवाडा, चांभारवाडा रस्ता सुधारणा 15 लाख, सुर्यवंशीवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, खालची मेंढोशी चंद्रकांत जाधव यांचे घर ते स्मशानभूमी नदीकडे जाणारा रस्ता सुधारणा 15 लाख, म्हावशी येथे जांभळेवस्ती अंतर्गत खडीकरण व डांबरीकरण 15 लाख, आंबवणे गावांतर्गत रस्ता सुधारणा 14.98 लाख, कुसवडे शेळकेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, खुडुपलेवाडी येथे धनगरवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, निवकणे ते चाफेाली रस्ता सुधारणा 15 लाख, मरड धनगर वस्ती येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, म्हारवंड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, रामेल ते शेळकेवाडी रस्ता सुधारणा 14.99 लाख, भातडेवाडी जिंती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, बांधवाट भैरवनाथ मंदिर संरक्षक भिंत 15 लाख, केंजळवाडी निवडे माणेकश्वर मंदिर रस्ता 15 लाख, केळेवाडी वरची कडवे खुर्द स्मशानभूमी रस्ता सुधारणा 14.99 लाख, डफळवाडी बसस्टॉप ते सवारमळी रस्ता सुधारणा 15 लाख, रेडेवाडी कडवे खुर्द ते केळेवाडी वरची रस्ता सुधारणा 20 लाख, घाणव माऊली बाळकृष्ण महाराज मंदीर पोहोच रस्ता 14.99 लाख, येरफळे गावडेवार्ड स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख, आटोली भाकरमळी वाघजाई मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख, गणेशनगर लोटलेवाडी काळगाव रस्ता सुधारणा 15 लाख, तेटमेवाडी काळगाव उर्वरित रस्ता सुधारणा 19.99 लाख, ढेबेवाडी बाजारतळ सुशोभिकरण 25 लक्ष, कोरडेवाडी धावडे रस्ता सुधारणा 20 लाख, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी इमारत बांधकाम 150 लक्ष, कळंत्रेवाडी कुंभारगाव येथे ओढयावर संरक्षक भिंत 15 लाख, कुंभारगाव मुस्लिम कब्रस्तानला संरक्षक भिंतीसह सुधारणा 20 लक्ष, ताईगडेवाडी तळमावले येथे पुरुष/महिला सुलभ शौचालय 10 लाख, जगदाळवाडी  (कडवे) येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा व संरक्षक भिंत 15 लाख, मणेरी चिंचेचेआवाड आर.सी.सी. गटर 10 लाख, राजवाडा स्मशानभूमी व पाण्याची विहीर येथे संरक्षक भिंत 10 लाख, घाणव येथे पत्र्याचे सभामंडप 12 लाख, आवर्डे येथे लक्ष्मी मंदिरासमोर सभामंडप 13 लाख, आडदेव खुर्द येथे सभामंडप 13 लाख, रोडेवाडी मंद्रुळकोळे येथे सभामंडप 13 लाख, शिद्रुकवाडी वरची खळे येथे संरक्षक भिंत 15 लाख, कारळे डाग्याचीआळी संरक्षक भिंत 15 लाख, आवर्डे बहुउद्देशीय इमारत 20 लाख, तारळे खडकीमाळ येथे पिण्याच्या पाण्याच्याविहिरीला संरक्षक भिंत 15 लाख, चिटेघर केदारनाथ मंदिर सुशोभिकरण 15 लाख, वेखंडवाडी येथे सभास्टेज 5 लाख, वेताळवाडी येथे ग्रामसचिवालय इमारत 15 लाख, माजगाव येथे सभास्टेज 2 लाख, फणसवाडी (वाटोळे) येथे सभामंडप 13 लाख, आंब्रुळे येथे सभास्टेज 4 लक्ष, कोळेकरवाडी उमरकांचन येथे सभामंडप 13 लाख, गमेवाडी चाफळ ग्रामपंचायत कार्यालय इमारत 15 लाख, टोळेवाडी येथे सभामंडप 13 लाख, काहिर संरक्षक भिंत 15 लाख या कामांचा समावेश आहे.सार्वजनिक बांधकाम,जिल्हा परिषद बांधकाम विभाग या कार्यान्वित यंत्रणांचे माध्यमातून ही कामे मार्गी लागणार असल्याने या कामांची तातडीने निविदा प्रक्रिया करण्याच्या सूचनाही यावेळी संबंधित अधिकारी यांना केल्या असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

No comments:

Post a Comment