Saturday, 18 October 2025

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून रस्त्यांच्या कामांसाठी 3 कोटी तर अंगणवाडी दुरुस्तीसाठी 24 लक्ष रुपयांचा निधी. जिल्हा वार्षिक आराखडयातून ग्रामीण मार्ग व अंगणवाडी दुरुस्ती अंतर्गत रस्त्यांची कामे लागणार मार्गी.

 

दौलतनगर दि.18:-पाटण विधानसभा मतदारसंघातील इतर जिल्हा मार्ग यांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा तसेच अंगणवाडी दुरुस्तीच्या कामांचा समावेश होण्यासाठी शिफारस केली होती. पाटण मतदारसंघातील दळण-वळणाचेदृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ग्रामीण मार्गांचे व अंगणवाडी दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण मार्गांचे पुनर्बांधणीचे कामांसाठी तसेच अंगणवाडी दुरुस्तीचे कामांना सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत 3 कोटी तर अंगणवाडी इमारतींचे दुरुस्तीचे कामांसाठी 24 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

             प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण मार्गांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा समावेश होण्यासाठी  शिफारस केली होती. सतत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण या डोंगरी व दुर्गम भागात दळण वळणाच्यादृष्टीने महत्वाच्या असलेले ग्रामीण व इतर जिल्हा मार्ग रस्ते नादुरुस्त झाल्याने येथील ग्रामस्थांची दळण वळणाची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे महत्त्वाच्या असलेल्या  या रस्त्यांच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी निधी मंजूर होणे गरजेचे होते. तसेच अंगणवाडी इमारतींचे दुरुस्तीचे कामासाठी निधीची आवश्यकता होती.त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण मार्ग या रस्त्यांचे कामांसाठी सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत 3 कोटी 05 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती अंतर्गत प्रजिमा 58 खळे ते काढणे तुपेवाडी रस्ता ग्रामा 320 खराब लांबीत रस्ता सुधारणा 30 लक्ष, वरचे आडदेव ते कुसरुंड रस्ता ग्रामा 233 भाग कुसरुंड ते खालचे आडदेव खराब लांबी रस्ता सुधारणा 20 लक्ष, वाडीकोतावडे पोहोच रस्ता ग्रामा 228 सुधारणा 20 लक्ष, प्र.57 ते म्हारवंड भारसाखळे रस्ता ग्रामा 58 खराब लांबीत रस्ता सुधारणा 25 लक्ष, प्रजिमा 37 ते ताटेवाडी रस्ता ग्रामा 106 रस्ता सुधारणा 20 लक्ष, घोट आंबेवाडी जुगाईवाडी रस्ता ग्रामा 40 सुधारणा 40 लक्ष, मोगरवाडी  ते कोंजवडे रस्ता ग्रामा 27 सुधारणा 15 लक्ष, कुसरुंड पाटीलवस्ती  रस्ता ग्रामा 229 सुधारणा 15 लक्ष, इजिमा 135 ते धावडे कोरडेवाडी रस्ता ग्रामा 221 सुधारणा 30 लक्ष, दिवशी जुंगठी रस्ता ग्रामा 72 सुधारणा 40 लक्ष, प्रजिमा 58 ते मंद्रुळकोळे खुर्द यादववाडी ग्रामा 293 रस्ता सुधारणा  50 लक्ष या रस्त्यांचे कामांसाठी 03 कोटी 05 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणावाडी इमारतीचे दुरुस्तीचे कामांसाठी  जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत 24 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये डोणीचावाडा 60, ऐनाचीवाडी गोकूळ तर्फ हेळवाक 23, सडानिनाई 277, विरेवाडी 286, तामकणे 220, गिरेवाडी 357, वाटोळे झरे आवाड, झाकडे 3, गुंजाळी 202, मंद्रुळकोळे खुर्द 14, मालदन जाधववाडी 156, जाळगेवाडी 294, गोकूळ तर्फ हेळवाक 24, गोकूळ तर्फ हेळवाक कोयनानगर 25, कोयनानगर 26, कोयनानगर 27, आडूळ सुभाषनगर 270, मान्याचीवाडी 141, साबळेवाडी 150, पाचुपतेवाडी 222, ढेबेवाडी  169, गुढे 118, धावडे व मोरगिरी 38 या अंगणवाडी इमारतींचे दुरुस्तीचे कामांसाठी निधी मंजूर झाला असून या मंजूर झालेल्या कामांची तातडीने निवीदा प्रक्रिया करुन लवकरात लवकर ही कामे मार्गी लावण्यासंदर्भातही संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

 

 

No comments:

Post a Comment