Wednesday, 29 October 2025

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून विद्युत विकास योजनेंतर्गत 04 कोटी 02 लक्ष 66 हजार रुपयांचा निधी मंजूर. वाढीव पोल,थ्री फेज लाईन,रोहित्र व वाहिनी स्थलांतरीत व नवीन रोहित्रे इ.कामे लागणार मार्गी.

 

दौलतनगर दि.29:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विज पुरवठया संदर्भातील नवीन वाढीवपोल,थ्री फेज लाईन, रोहित्र व विद्युत वाहिनी स्थलांतरित तसेच नवीन रोहित्र बसविणे इ. कामांना निधी मंजूर होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी विविध कामांच्या शिफारसी हया सन 2025-26 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये केल्या होत्या.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील नवीन वाढीवपोल,थ्री फेज लाईन, रोहित्र व विद्युत वाहिनी स्थलांतरित तसेच नवीन रोहित्र बसविणे इ. कामांना सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामधून विद्युत विकास योजने अंतर्गत 04 कोटी 02 लक्ष 66 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकां दिली आहे.

           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघात वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी तसेच नवीन वाढीवपोल,थ्री फेज लाईन, रोहित्र व विद्युत वाहिनी स्थलांतरित तसेच नवीन रोहित्र बसविणे ही कामे तात्काळ मार्गी लागण्यासाठी विविध गावांतील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे मागणी केली होती. त्यानुसार सदरच्या कामांना निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे वीज पुरवठा सुरळीत करण्याचे कामांना निधी मंजूर होण्यासाठी सन 2025-26 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये विविध कामांच्या शिफारसी केल्या होत्या. त्यानुसार या कामांना सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामधून सामान्य वि कास व पध्दती सुधारणांसाठी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या.अनुदान अंतर्गत 04 कोटी 02 लक्ष 66 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या मंजूर झालेल्या विकास कामांमध्ये नवीन रोहित्र बसविणे यामध्ये येराड येडोबा मंदिर व साळुंखे यांचे घराजवळ रोहित्र 13.60 लाख, सुपुगडेवाडी 8.40 लाख,तळमावले 7.65 लाख,सडादुसाळे 7.79 लाख,वर्पेवाडी गोकूळ 13.08 लाख,नाडे 6.89 लाख,सातर गावठाण 3.21 लाख,मालोशी आळी 6.27 लाख,तांबवे दोन राहित्र 19.96 लाख,मंद्रुळकोळे खुर्द 4.97 लाख, पाचगणी ता.पाटण खडकाचा वाडा व इनामवाडा येथे रोहित्र 18.12 लाख,जोतिबाचीवाडी 8.48 लाख,म्होप्रे डूबलवस्ती 8.65 लाख  या कामांचा तर वाढीववस्ती  विद्युतीकरणांतर्गत  नवीन वीज पोल च्या कामामध्ये आंब्रग 4.80 लाख,आडदेव 1.95 लाख,आरेवाडी 1.31 लाख,आवसरी 3.18 लाख,आसवलेवाडी 2.54 लाख,काटेवाडी तारळे नळ पाणी पुरवठा योजना वीज कनेक्शन 5.52 लाख,काढणे नानासो पाटील यांचे घराजवळील वीज पोल बदलणे 2.58 लाख,बागलवाडी तुपेवाडी काढणे 3.13 लाख,काळगाव 3.79 लाख,काळोली 1.60 लाख,कुंभारगाव लोंडूक 1.09 लाख,कुंभारगाव 6.04 लाख,कुठरे 2.56 लाख,कुसवडे कोंढावळे 0.57 लाख,केर 1.37 लाख,केरळ 2.64 लाख,कोंढावळे चाफ्याचा खडक 1.25 लाख,कोरिवळे 1.33 लाख,गलमेवाडी 2.56 लाख,गवळीनगर 1.45 लाख,गोषटवाडी 3.18 लाख,चाफळ 7.04 लाख,चाफेर मणेरी 1.11 लाख,जमदाडवाडी कदमनगर मळावस्ती 2.57 लाख,जिमनवाडी जळकेवाडी कुशी 2.11 लाख,टेळेवाडी 2.56 लाख,ठोमसे 2.10 लाख,डावरी गावठाण 2.42 लाख,डोणीचावाडा वांझोळे 0.57 लाख,ढेबेवाडी 1.09 लाख,ढोरोशी 2.65 लाख,तळीये 1.37 लाख,तांबवे 4.41 लाख,तामकणे 2.43 लाख,तारळे 2.64 लाख,तुपेवाडी काढणे स्ट्रीट लाईन 1.09 लाख,त्रिपुडी 0.58 लाख,देवघर गोवारे 0.58 लाख,धामणी 1.09 लाख,धावडे 0.81 लाख,धुमकवाडी मुरुड 1.34 लाख,नाटोशी 1.33 लाख,नाडे 3.66 लाख,नेचल 1.04 लाख,नेरळे 0.85 लाख,पश्चिम सुपने 2.83 लाख,पाचगणी खडकचावाडा इनाम थ्री फेज लाईन 4.33 लाख,पाणेरी 3.79 लाख,पापर्डे खुर्द 1.85 लाख,पापर्डे बुद्रुक 1.44 लाख,बनपूरी 6.40 लाख,बनपेठवाडी 3.18 लाख,बागलवस्ती कुंभारगाव 0.80 लाख,बागलेवाडी सावरघर 2.11 लाख,बिबी 2.64 लाख,भुडकेवाडी खालची 0.82 लाख,भोळेवाडी नाईकबा पाणी पुरवठा योजना 16 तास वीज पुरवठा 21.88 लाख,मणदुरे 3.97 लाख,मरळी 4.17 लाख,महाडीकवाडी नुने 0.82 लाख,माथणेवाडी 3.51 लाख,मान्याचीवाडी कुंभारगाव 1.80 लाख,मारुल तर्फ पाटण 2.64 लाख,मारुलहवेली आंबेडकर चौकातील रोहित्र स्थलांतरीत 3.32 लाख,मालोशी 2.64 लाख,मिरगाव बोपोली 0.54 लाख,मेंढोशी 3.02 लाख,मोडकवाडी जिंती 1.09 लाख,मौजे साकुर्डी 7.35 लाख,येराडवाडी 3.05 लाख,रामिष्टेवाडी 3.13 लाख,रुवले 3.05 लाख,वरची शिबेवाडी गुढे 3.05 लाख,वाघणे 2.49 लाख,वाटोळे 1.65 लाख,वाडीकोतावडे 2.42 लाख,वायचळवाडी कुंभारगाव 1.34 लाख,संभाजीनगर 2.65 लाख,शिंदेवाडी 2.45 लाख,शिद्रुकवाडी काढणे वरची 2.57 लाख,शिद्रुकवाडी कोरिवळे 2.57 लाख,शिरळ थ्री फेज लाईन 2.84 लाख,शिरळ बौध्दवस्ती 1.61 लाख,सुळेवाडी 2.45 लाख,सोनवडे 2.91 लाख,हुंबरवाडी 2.78 लाख, गोकूळ तर्फ हेळवाक येथे जलपर्यटन केंद्र करणेसाठी अडथळा असलेले रोहित्र,उच्चदाब  व लघुदाब  लाईन स्थलांतरित23.07 लक्ष, नदीकाठी असणारी 33 केव्ही लाईन पूरपरिस्थितीमध्ये पाण्याखाली जात असले कारणाने 33 केव्ही  लाईन स्थलांतरीत 9.70 लाख या कामांचा समावेश असून महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीशी निगडीत असलेल्या या कामांना निधी मंजूर झाल्याने वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असून तातडीने ही कामे हाती घेण्यासंदर्भातील आवश्यक असलेली कार्यवाही तातडीने पुर्ण करण्यात येणार असल्याने लवकरात लवकर या विद्युत विकास योजने अंतर्गत मंजूर कामांना सुरुवात होणार असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment