दौलतनगर दि.31 : केरा, मणदुरे विभागातील निवकणे चिटेघर व बिबी या लघु प्रकल्पाच्या दोन्ही
तीरावरील गावांना 100 मीटर उंचीपर्यंत शेतीसाठी उपसा सिंचनाद्वारे पाणी उचलून
देण्याच्या सर्वेक्षण होणार आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर उपसा सिंचन
योजनेचे आराखडे तयार होतील. त्यानंतर त्वरित प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात
येईल. केरा मणदुरे विभागातील केरा नदीवरील उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षण हे
विभागासाठी हरितक्रांतीचे पहिले पाऊल असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन खणीकर्म
व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
केरळ ता.पाटण येथे
झालेल्या केरा - मणदुरे विभागातील उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणाच्या शुभारंभ
प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जयवंतराव शेलार दादासाहेब जाधव, सुरेश
जाधव,बाळासो पाटणकर,सरपंच शंकर पवार,केशव कदम,लक्ष्मण संकपाळ,बापूराव सावंत,विजय
कदम,अरविंद कदम,अभिजित देसाई,गजानन पडयाळ,तानाजी गुजर,जोतिबा बावधाने,राजेंद्र
पाटणकर,सुर्यकांत पाटणकर, भरत साळुंखे, अभिजीत पाटील,वाय.के.जाधव,मधुकर
भिसे,कृष्णत देसाई,महिपती जाधव,रोहित भोळे,शिवराज निकम,आनंदा शिंदे,सखाराम
शिंदे,चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध गावचे सरपंच,सदस्य,संस्थांचे पदाधिकारी
उपस्थित होते.
पाटण तालुक्यातील
पाणी प्राधान्याने तालुक्यात शेतीला मिळायला पाहिजे हा अट्टाहास लोकप्रतिनिधी
म्हणून पहिल्यापासून होता. तारळी प्रकल्पाचे पाणी पहिल्यांदा येथील शेतकऱ्यांना
मिळाले पाहिजे यासाठी प्रकल्पाचे पाणी बाहेर जाता कामा नये म्हणून मी विरोध केला होता.
तारळे भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला प्राधान्याने पाणी दिले सुरुवातीला तारळी
प्रकल्पातून 50 मीटर उंचीपर्यंत शेतकऱ्यांना पाणी दिले त्यानंतर 100 मीटर पर्यंत
शेतकऱ्यांना पाणी देऊन तरळी भाग सुजलाम सुफलाम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
या प्रयत्नातमुळे तारळे विभागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला.
केरा व मणदुरे विभागातील गावांना शेतीला पाणी
मिळण्यासाठी सन 2014 पासून पाणी परिषदेच्या माध्यमातून शासनस्तरावर सातत्याने
प्रयत्नशील होतो. तसेच पाणी परिषदेच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन
यांसदर्भात चर्चा करण्यात आल्या. दरम्यान पाटण तालुक्यातील निवकणे, चिटेघर,बिबी हे
प्रकल्पातून केरा नदीच्या दोन्ही तिरावरील गावांना तारळी प्रकल्पाच्या धर्तीवर 100
मीटर उंचीपर्यंत उपसा सिंचन योजनांव्दारे शेतीला पाणी देण्यासंदर्भात राज्याचे तत्कालीन
उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचेकडे पाटण येथील कार्यक्रमामध्ये विनंती
केली होती. केरा व मणदुरे या भागाला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विविध बैठका घेऊन
शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यानुसार ना.देवेंद्र फडणवीस यांनीही केरा मणदुरे
विभागातील शेतीला तारळी पॅटर्ननुसार 100 मीटर उंचीपर्यंत उपसा सिंचन योजनांव्दारे
शेतीला पाणी देण्याचे मान्य केले होते. विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता
लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला ठराव करुन मान्यता दिली.
त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये आज या उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणचे कामाला
सुरुवात करत आहोत. शासनाच्या खर्चाने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचे
काम शासनाचे असून शासनाच्या मदतीने सर्वेक्षण होऊन या उपसा सिंचन योजनांच्या
कामालाही सुरुवात होईल मात्र त्यानंतर कोणीतरी येईल आणि भूलथापा मारून जाईल त्यामुळे
अशा भूलथापांना आपण बळी पडू नका असेही त्यांनी सांगितले. ज्या लोकांना पोत्याने
मते दिली त्यांना या विभागासाठी काही करता आले नाही अशी टीकाही पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई यांनी केली. या कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री
ना. एकनाथ शिंदे ना.अजितदादा पवार यांचेही सहकार्य लाभल्याचे सांगत ते पुढे
म्हणाले की, मणदुरे विभागाला या प्रकल्पामुळे पाणी मिळेल. मी काम करणारा माणूस
असून कितीही आणि कसलेही संकट आले तरी मागे हटणारा नाही असा विश्वास त्यांनी दिला.
तसेच केरा - मणदुरे विभागातील उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणाचे काम लवकरात लवकर
पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे केरा
मणदुरे भागाचा कायापालट होणार आहे. पीक पद्धतीही बदल होणार आहे तसेच रोजगारासाठी
होणारे स्थलांतरही थांबणार आहे. त्यामुळे सर्वेक्षण करणाऱ्या अधिकारी
कर्मचाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री नामदार शंभूराज
देसाई यांनी शुभारंभ प्रसंगी शेवटी केले.

No comments:
Post a Comment