दौलतनगर दि.29:- पाटण विधानसभा मतदारसंघातील शेतीला पाण्याची सोय होण्यासाठी साठवण हौद,वळण
बंधारा व शेतीसाठी वितरण व्यवस्था इ. कामांना निधी मंजूर होण्यासाठी महाराष्ट्र
राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी विविध कामांच्या शिफारसी हया सन 2025-26 च्या
जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये केल्या होत्या.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील साठवण हौद,वितरण व्यवस्था व वळण बंधारा इ. कामांना सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामधून लघु पाटबंधारे
विभागांतर्गत 01 कोटी 72 लक्ष 82 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकां दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे
म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघात विविध गावांतील कार्यकर्त्यांनी
शेतीसाठी पाण्याची सोय होण्यासाठी साठवण हौद,वळण बंधारा व शेतीसाठी वितरण व्यवस्था
इ. कामांच्या मागण्या हया पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे केल्या होत्या.
त्यानुसार सदरच्या कामांना निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई
यांनी शेतीला पाण्याची सोय होण्यासाठी साठवण हौद,वळण बंधारा व शेतीसाठी वितरण
व्यवस्था इ. कामांना निधी मंजूर होण्यासाठी सन 2025-26 च्या जिल्हा वार्षिक
आराखडयामध्ये विविध कामांच्या शिफारसी केल्या होत्या. त्यानुसार पाटण विधानसभा
मतदारसंघातील साठवण हौद,वितरण व्यवस्था व वळण बंधारा इ. कामांना सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामधून लघु पाटबंधारे
विभागांतर्गत 01 कोटी 72 लक्ष 82 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून मंजूर
झालेल्या कामांमध्ये खोणोली येथे वळण बंधारा व हौद व वितरण व्यवस्था 30.20 लक्ष,
कोरिवळे
येथे ढुंकुर माळ येथे साठवण (वळण) बंधारा 27.71 लक्ष, मोडकवाडी
जिंती (हेळोबा पुलाच्या शेजारी) येथे वळण बंधारा व हौद व वितरण व्यवस्था 37.25 लक्ष,
रामेल
शेळकेवस्ती येथे शेतीसाठी साठवण हौद व वितरण व्यवस्था 42.20 लक्ष व बामणेवाडी भांबे
येथे शेतीसाठी वितरण व्यवस्था 35.46 लक्ष असा 01 कोटी 72 लक्ष 82 हजार रुपयांचा निधी
मंजूर झाला आहे.यामुळे शेतीसाठी पाण्याची सोय होऊन मंजूर झालेल्या गावांमधील शेतकऱ्यांची
शेतीसाठी पाण्याची चांगली सोय होणार असल्याने या गावातील ग्रामस्थांनी ना.शंभूराज देसाई
यांचे आभार मानले असून मंजूर झालेल्या कामांच्या निविदा प्रक्रिया तातडीने करण्याच्या
सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामांना
तात्काळ सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment