Wednesday, 15 October 2025

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून रस्त्यांच्या कामांसाठी 6 कोटी 44 लक्ष रुपयांचा निधी. जिल्हा वार्षिक आराखडयातून ग्रामीण व इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती अंतर्गत रस्त्यांची कामे लागणार मार्गी.

 


दौलतनगर दि.15:-पाटण विधानसभा मतदारसंघातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती व 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा समावेश होण्यासाठी शिफारस केली होती. पाटण मतदारसंघातील दळण-वळणाचेदृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ग्रामीण व इतर जिल्हा मार्गांचे दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व इतर जिल्हा मार्गांचे पुनर्बांधणीचे कामांसाठी सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती व 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत 6 कोटी 44 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

             प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण मार्गांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती व 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा समावेश होण्यासाठी  शिफारस केली होती. सतत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण या डोंगरी व दुर्गम भागात दळण वळणाच्यादृष्टीने महत्वाच्या असलेले ग्रामीण व इतर जिल्हा मार्ग रस्ते नादुरुस्त झाल्याने येथील ग्रामस्थांची दळण वळणाची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे महत्त्वाच्या असलेल्या  या रस्त्यांच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी निधी मंजूर होणे गरजेचे होते. त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व इतर जिल्हा मार्ग या रस्त्यांचे कामांसाठी सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती व 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत 6 कोटी 44 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती अंतर्गत नाव गोवारे रस्ता ग्रामा 193 सुधारणा 19 लक्ष, साईकडे जोडरस्ता ग्रामा 324 सुधारणा 20 लक्ष, ढोरोशी  ते वाघळवाडी रस्ता ग्रामा 35 सुधारणा 20 लक्ष, नेचल जोडरस्ता ग्रामा 157 सुधारणा 20 लक्ष, नुने दुटाळवाडी ग्रामा 33 सुधारणा 20 लक्ष, खडकवाडी  फडतरवाडी जंगलवाडी  रस्ता ग्रामा 46 सुधारणा 30 लक्ष, आंबेघर तर्फ मरळी ते हुंबरणे ग्रामा 211 रस्ता सुधारणा 30 लक्ष, नेरळे ते गुंजाळी रस्ता ग्रामा 188 भाग नेरळे ते मान्याचीवाडी  फाटा रस्ता सुधारणा 30 लक्ष, खालची मेंढोशी ते माऊलीनगर वरची मेंढोशी रस्ता ग्रामा 78 सुधारणा 30 लक्ष, नाईकडवडेवाडी ते चिटेघर  रस्ता ग्रामा 83 सुधारणा 30 लक्ष, तांबवे मोळेवाडी आरेवाडी गमेवाडी ते पाठरवाडी ता.कराड रस्ता ग्रामा 147 रस्ता सुधारणा 30 लक्ष, गमेवाडी  डेळेवाडी ता. कराड पोहोच रस्ता ग्रामा 148 खडीकरण, डांबरीकरण 30 लक्ष, पाठरवाडी ते शिद्रुकवाडी  ता.कराड रस्ता सुधारणा ग्रामा 149  30 लक्ष,खळे जोड रस्ता ग्रामा 323 सुधारणा 35 लक्ष, मालदन मान्याचीवाडी रस्ता ग्रामा 298 सुधारणा 40 लक्ष, मालोशी ते पाडेकरवाडी रस्ता ग्रामा 3 सुधारणा 40 लक्ष, महिंद ते सळवे रस्ता ग्रामा 318 भाग महिंद ते सळवे रस्ता सुधारणा 50 या 17 रस्त्यांचे कामांसाठी 05 कोटी 04 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती अंतर्गत त्रिपुडी ते रामा 136 मुळगाव नेरळे मोरगिरी धावडे गुरेघर पाचगणी रस्ता इजिमा 136 भाग मोरगिरी ते पाचगणी रस्ता सुधारणा 50 लक्ष, प्रजिमा 55 आंबळे बांबवडे तोंडोशी निवडे रस्ता इजिमा 131 ची सुधारणा 40 लक्ष, भोसगाव आंबवडे रुवले वाल्मिकी रस्ता इजिमा 137 सुधारणा भाग 8/100 ते 10/00करीता 50 लक्ष या तीन रस्त्यांचे कामांसाठी 01 कोटी 40 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून या मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांची तातडीने निवीदा प्रक्रिया करुन लवकरात लवकर ही कामे मार्गी लावण्यासंदर्भातही संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

चौकट:- तिर्थक्षेत्र विकास निधीतून 60 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

पाटण विधानसभा मतदारसंघातील  प्रसिध्द असलेल्या तिर्थक्षेत्राचे ठिकाणी  आवश्यक असलेली विकास कामे मार्गी लावण्याकरीता  जिल्हा वार्षिक आराखडयातून क वर्ग तिर्थ क्षेत्र विकास योजने अंतर्गत येराड श्री येडोबा मंदिर परिसर सुधारणा, येराडवाडी श्री रुद्रेश्वर मंदिर परिसर सुधारणा, गमेवाडी ता.कराड गोरक्षनाथ मंदिर परिसर सुधारणा व विहे जोतिर्लिंग मंदिर परिसर सुधारणा या कामांसाठी प्रत्येकी 15 लक्ष या प्रमाणे एकूण 60 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

No comments:

Post a Comment