Monday, 20 October 2025

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा नामदार शंभूराज देसाई व 11 ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते शुक्रवार दि.24 ऑक्टोंबर रोजी 55 वा गळीतहंगामाचा शुभारंभ- व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे.

 

 

दौलतनगर दि.20:- दौलतनगर, ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२5-6 मधील 55 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम शुक्रवार दि.24 ऑक्टोंबर,२०२5 रोजी दुपारी 03.00 वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार श्री. शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ. स्मितादेवी देसाई, कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे ज्येष्ठ 1 सभासद यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळ,दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

           पत्रकात म्हंटले आहे की, चालु गळीत हंगामाची पुर्वतयारी पुर्ण झाली असून गाळप हंगाम पुर्ण क्षमतेने होण्याच्या दृष्टीने कारखान्यातील सर्व कामकाज पुर्णत्वाकडे गेले आहे. कारखान्याने ऊस तोडणी व वाहतूकीकरीता पुरेसे तोडणी मजुर व वाहनांचे करार पुर्ण केलेले असून कारखान्याकडे करार केलेली सर्व ऊस तोडणी व वाहतूक मजुर यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.यंदाचाही गळीत हंगाम कारखान्याचे सभासद,ऊस उत्पादक शेतकरी यांचे सहकार्यातून यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करीत या गळीत हंगामाचा शुभारंभ हा प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे ज्येष्ठ सभासद श्री.शिवाजी हिंदुराव काळे मालदन, केशव ज्ञानू माटेकर माटेकरवाडी कुंभारगाव, दिनकर विष्णू यादव (पाटील) गारवडे, जालिंदर दादू डोंगरे दिवशी बुद्रुक,सदाशिव रामचंद्र नलवडे नावडी, वसंतराव ज्ञानदेव माने चाफळ, शिवाजी शंकर पानस्कर मंद्रुळहवेली, आनंदराव  दिनकर निकम ऊरुल, आनंदराव एकनाथ शिंदे घोट, शहाजी सिताराम कदम शेडगेवाडी व बाबूराव चंद्रु पडवळ येरफळे या 1 ज्येष्ठ सभासदांचे शुभहस्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक, नामदार शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ.स्मितादेवी शंभूराज देसाई, कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि. 24 ऑक्टोंबर, २०२5 रोजी दुपारी 03.00 वा. संपन्न होणारअसून या गळीत हंगाम शुभारंभा निमित्त कारखान्याच्या संचालिका सौ. दिपाली विश्वास पाटील व त्यांचे पती श्री. विश्वास आत्माराम पाटील यांचे शुभहस्ते सत्यनारायण महापुजा आयोजीत केलेली आहे. तरी या समारंभास कारखान्याचे सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी शेवटीपत्रकात केले आहे.

चौकट:- नामदार शंभूराज देसाई यांचे उपस्थितीमध्ये शुक्रवार दि.24 ऑक्टोंबर रोजी दिवाळी फराळाचे आयोजन.

           प्रतिवर्षा प्रमाणे यंदा दिपावली सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेवतीने दिवाळी फराळ या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि. 24 ऑक्टोंबर 2025 रोजी साय.05 ते 07.30 वा.पर्यंत या वेळेमध्ये महाराष्ट्र दौलत,लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, दौलतनगर, ता.पाटण येथे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमास सातारा जिल्हयातील लोकप्रतिनिधी, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान दिवाळी फराळ कार्यक्रमाचे निमित्ताने अमृत मराठी या मराठी गाण्यांच्या संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment