Sunday, 16 November 2025

पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई हे वाढदिवसानिमित्त सोमवारी सकाळी 10 ते 05 या वेळेमध्ये दौलतनगर ता.पाटण येथे शुभेच्छा स्विकारणार.

 




दौलतनगर दि.5:-लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख,महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 59 वाढदिवस सोमवार दि.17 नोव्हेंबर,2025 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. ना.शंभूराज देसाई यांचे 59व्या वाढदिवसानिमित्त सकाळी कुटुंबियांच्या वतीने औक्षण झालेनंतर सकाळी 09.00 ते 10.00 पर्यंत ते कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेश मंदीरामध्ये गणेश दर्शन करुन मरळी  येथे ग्रामदैवत निनाईदेवीचे दर्शन झालेनंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थ मरळी यांच्यावतीने सत्कार व अभिष्टचिंतन स्विकारणार आहेत.त्यानंतर कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुतळा, स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांची समाधी व पुर्णाकृती  पुतळयास व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अपर्ण व विनम्र अभिवादन केल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2025-26 चे गळीत हंगामध्ये उत्पादित झालेल्या साखर पोती पूजन कार्यक्रम झाल्यानंतर हिंदुहदयसम्राट शिवसेना प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांचे 13 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने त्यांना विनम्र अभिवादन करुन पुण्यस्मरण दिनानिमित्त गरीब कुटुंबातील महिलांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. दौलतनगर येथील शिवदैालत बँकेच्या शाखेच्या 22 व्या वर्धापनदिन समारंभास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दौलतनगर येथील नविन आयटीआयचे इमारतीमध्ये वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान व सर्व रोग निदान शिबीराचे उद्घाटन करुन त्यांचे निवासस्थानी शिवविजय हॉल येथे आगमन झालेनंतर शिवविजय हॉल या ठिकाणी स.10.00 पासून सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत नामदार शंभूराज देसाई हे वाढदिवसानिमित्त कार्येकर्ते,हितचिंतक व आम जनतेच्यावतीने निवासस्थानी शिवविजय हॉल येथे शुभेच्छा स्विकारणार आहेत. सायं.05 नंतर ना.शंभूराज देसाई हे दौलतनगर,ता.पाटण तसेच कोयना दौलत निवासस्थान,सातारा या ठिकाणी  शुभेच्छा स्विकारण्यासाठी उपलब्ध नाहीत,याची सर्व हितचिंतक,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नोंद घ्यावी असे प्रसिध्दीपत्रकांत नमूद करुन असून वाढदिवसानिमित्त नामदार शंभूराज देसाईंना शुभेच्छा देण्याकरीता येणाऱ्या हितचिंतक, पदाधिकारीव कार्यकर्त्यांनी  पुष्पहार अथवा हारतुरे न आणता तालुक्यातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना शैक्षणिक मदत होण्याच्यादृष्टीने वहया तसेच शालेय वस्तू आणाव्यात,असे आवाहनही शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.

 

 

No comments:

Post a Comment