दौलतनगर दि.18:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचेवतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा 82 वा जयंती सोहळा गुरुवार दि. 20 नोव्हेंबर, 2025 रोजी सकाळी 10.00 वा महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे साजरा करण्यात येणार असून हा जयंती सोहळा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री व सातारा जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी दिली आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांच्या जयंती सोहळा कार्यक्रमाला कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद व शेतकरी, हितचिंत, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहनही पत्रकांत करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment