दौलतनगर दि.१5:-लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख,महाराष्ट्र
राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्हा
पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 59 वाढदिवस सोमवार दि.17 नोव्हेंबर,2025 रोजी
दौलतनगर ता.पाटण येथे विविध उपक्रमांनी साजरा होणार
असल्याची माहिती पालकमंत्री नामदार
शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समिती यांचेकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली
असून वाढदिवसानिमित्त नामदार शंभूराज देसाईंना शुभेच्छा देण्याकरीता येणाऱ्या
हितचिंतक, पदाधिकारीव कार्यकर्त्यांनी पुष्पहार अथवा हारतुरे न आणता तालुक्यातील गरीब
कुटुंबातील मुलामुलींना शैक्षणिक मदत होण्याच्यादृष्टीने वहया तसेच शालेय वस्तू
आणाव्यात, पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेसाठी सर्व रोग निदान व रक्तदान
शिबिराचे ही आयोजन करण्यात आले आहे. या सर्व रोग निदान शिबिराचा जास्तीत
जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही
वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.
पत्रकांत म्हंटले आहे की, नामदार
शंभूराज देसाई यांचा 59वा वाढदिवस सोमवार दि.17
नोव्हेंबर,2025 रोजी दौलतनगर ता.पाटण
येथे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असून या दिवशी दिवसभर विविध
कार्यक्रमांचे आयोजन कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर येथे करण्यात आला आहे.ना.शंभूराज देसाई यांचे 59व्या वाढदिवसानिमित्त सकाळी कुटुंबियांच्या वतीने औक्षण झालेनंतर सकाळी 09.00 ते 10.00 पर्यंत
ते कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेश मंदीरामध्ये गणेश दर्शन करुन मरळी येथे ग्रामदैवत निनाईदेवीचे दर्शन झालेनंतर
ग्रामपंचायत व ग्रामस्थ मरळी यांच्यावतीने सत्कार व अभिष्टचिंतन स्विकारणार आहेत.त्यानंतर
कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुतळा,
स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांची समाधी व पुर्णाकृती पुतळयास व
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अपर्ण व विनम्र
अभिवादन केल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2025-26
चे गळीत हंगामध्ये उत्पादित झालेल्या साखर पोती पूजन कार्यक्रम झाल्यानंतर हिंदुहदयसम्राट
शिवसेना प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांचे 13 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने त्यांना विनम्र अभिवादन करुन पुण्यस्मरण
दिनानिमित्त गरीब कुटुंबातील महिलांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येणार
आहे. दौलतनगर येथील शिवदैालत बँकेच्या शाखेच्या 22व्या वर्धापनदिन समारंभास
उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दौलतनगर येथील नविन आयटीआयचे
इमारतीमध्ये वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व रोग निदान शिबीराचे उद्घाटन
करुन त्यांचे निवासस्थानी शिवविजय हॉल येथे आगमन झालेनंतर स.10.00 पासून
दुपारी 04.00 वाजेपर्यंत नामदार शंभूराज देसाई हे वाढदिवसानिमित्त कार्येकर्ते,हितचिंतक
व आम जनतेच्यावतीने निवासस्थानी शिवविजय हॉल येथे शुभेच्छा स्विकारणार आहेत. दरम्यान
मंत्री ना. शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून दौलतनगर ता.पाटण येथे
सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या सर्व रोग निदान शिबिराचा जास्तीत
जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नियोजन समितीने केले आहे. दरम्यान नामदार
शंभूराज देसाई हे या दिवशी दुपारी 4.00 वाजेपर्यंच शुभेच्छा स्विकारण्यासाठी
दौलतनगर ता.पाटण येथे उपस्थित राहणार आहेत, याची
हितचिंतकांनी नोंद घ्यावी तसेच शुभेच्छा देण्यासाठी हार-तुरे,पुष्पगुच्छ
व पुष्पहार न आणता शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे पेन,वहया इ.शालेय साहित्य आणावे असे आवाहनही पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिवस
नियोजन समितीच्यावतीने पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
चौकट: शालेय साहित्य भेट देत जास्तीत जास्त
वहीतूला करण्याचे वाढदिवस नियोजन समितीचे आवाहन.
पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून हार,पुष्पहार व पुष्पगुच्छ न आणता
शालेय साहित्य भेट स्वरुपात आणावे.तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व संस्थांचे
पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंत यांनी
जास्तीत जास्त संख्येने वहितूला करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला असून
या वहयांचा उपयोग हा शालेय
विद्यार्थ्यांना होणार असल्याने भेट स्वरुपामध्ये जास्तीत जास्त वहीतूला करण्याचे
आवाहन पालकमंत्री ना.शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने आवाहन करण्यात
आले आहे.

No comments:
Post a Comment