दौलतनगर दि.19:-
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी 15 वर्षापूर्वी
तालुक्यातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आपल्या माध्यमातून
मिळावे या साठी आपल्या वाढदिवसाच्यानिमित्ताने संकल्प केला होता. प्रतिवर्षी
वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय वहयांचे मोठया प्रमाणांत संकलन होत
होते.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही त्यांचे वाढदिवसानिमित्त भेटस्वरुपात शालेय साहित्य
देण्यासंदर्भात वाढदिवस नियोजन समितीने पाटण विधानसभा मतदारसंघातील
हितचिंतक,पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आवाहन केले होते. त्यानुसार सोमवार दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजीचे वाढदिवसानिमित्त पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाला 76 हजार शालेय वहया भेट स्वरुपात मिळून उच्चांकी वहयांचे
संकलन झाले असून वाढदिवस नियेाजन समितीचे आवाहनाला सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंतक यांनी
चांगला प्रतिसाद दिला.
पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून हार,पुष्पहार व पुष्पगुच्छ न आणता
शालेय साहित्य भेट स्वरुपात आणावे.तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व संस्थांचे
पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंत यांनी
जास्तीत जास्त संख्येने वहितूला करण्याचा संकल्प करत या वहयांचा उपयोग
हा शालेय विद्यार्थ्यांना होणार असल्याने
भेट स्वरुपामध्ये जास्तीत जास्त वहीतूला करण्याचे आवाहन पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे सोमवार दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजीचे वाढदिवसानिमित्त भेटस्वरुपात मोठया प्रमाणांत शालेय साहित्य
देण्यात आले.यामध्ये मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी, कोयना परिसर साखर कामगार
संघटना,शिवदौलत सहकारी बँक लि. मल्हारपेठ,लेट महंमद खोंदू ट्रस्ट
पेठशिवापूर,बाळासाहेब देसाई फौंडेशन,शंभूराज युवा संघटना मरळी,शिवशंभू दूध उत्पादक
व प्रक्रिया संघ,कृषी उत्पन्न बाजार समिती पाटण,ग्रामपंचायत व ग्रामस्थ मल्हारपेठ,नाडे
या संस्थाचे वतीने तर अधिकराव नलवडे नावडी,दिपक गव्हाणे,ऋतूराज पाटील,अमित
गव्हाणे,स्वप्निल बादल,अमोल पाटील सांगवड,अमोल यादव, राजू कोळेकर, मनोज
मोहिते,नाना साबळे,राजेंद्र कायगुडे व सातारा मित्र मंडळ,मुजम्मिल खोंदू, रणजित
सुर्वे,राहूल कदम,स्वप्निल मोरे, संदिप कोळेकर, नामदेव नाझरे,गंगाराम यादव,युवराज
चव्हाण,रोहित मोरे,गौरव पवार,प्रशांत मोरे,राजू चव्हाण,महेश पाटील बनपूरी,संजय
देसाई, किसन गालवे, सुधीर नायकवडी, सुनिल शिंदे शैलेश सपकाळ,दादासो पाटील संतोष
देसाई, संदिप पाटील महाकाल एंटरप्राजेस, रणजित पाटील मंद्रुळकोळे, कोर्टील सातारा,
वासूदेव माने रहिमतपूर, प्रशांत पवार कोकीसरे यांचेकडून वहितूला करण्यात आल्या.
तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंतक यांनीही
वैयक्तिक भेटस्वरुपात शालेय वहया देण्यात आल्या.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई
वाढदिवस नियोजन समितीने केलेल्या आवाहनाला मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते
व हितचिंतक यांनी मोठा प्रतिसाद दिल्याने वाढदिवसानिमित्त तब्बल 76 हजार वहया भेटस्वरुपात देण्यात आल्या असून या सर्व
वहया या पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागामधील सर्व शाळांमध्ये
विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पदाधिकारी
व कार्यकर्ते यांच्या मार्फत वितरित करणार असल्याने शालेय विद्यार्थ्यांना याचा
चांगला फायदा होणार असून ना.शंभूराज देसाई यांनी सुरु केलेल्या या नाविण्यपूर्ण
संकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

No comments:
Post a Comment