Tuesday, 11 November 2025

ना.शंभूराज देसाई यांना वाढदिवसानिमित्त शालेय वस्तू,वहया भेट स्वरुपात देण्याचे आवाहन.

                                              

 

   दौलतनगर दि.11:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षणसमुहाचे प्रमुख,पाटण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचा वाढदिवस प्रतिवर्षी पाटण विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांव्दारे मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. ना.शंभूराज देसाई यांचा 59 वा वाढदिवस हा सोमवार दि.17 नोव्हेंबर,2025 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे साधेपणाने साजरा करण्याचे नियोजित असून कोणत्याही प्रकारचा जाहिर कार्यक्रम आयोजित केला नसून ना.शंभूराज देसाई यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंतक यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, हारतुरे न आणता पाटण विधानसभा मतदार संघातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी हातभार लावणेकरीता वहया व शालेय वस्तू भेट स्वरुपात द्याव्यात, असे आवाहन नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने करण्यात आले असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

No comments:

Post a Comment