Thursday, 20 November 2025

विकासाच्या मूळपुरुषाचे स्मरण गरजेचे..! स्व. शिवाजीराव (आबासाहेब) देसाई यांचा ८२ वा जयंती सोहळ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन

 

 


 पाटण तालुक्यात  आमच्या प्रयत्नातून विकासाची गंगा सुरू झाली तरी या विकासासाठी प्रेरणा देणारी मूळ शक्ती,मूळ पुरुष खऱ्या अर्थाने लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांची आहे  म्हणून पाटण तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या विकासाच्या मूळ पुरुषाचे आदर्श विचार  डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पाऊल खुणावर आपली वाटचाल केली पाहिजे.अशी अपेक्षा महाराष्ट्राचे पर्यटन ,खनिकर्म,आणि माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांनी केले.


ते पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव (आबासाहेब) देसाई यांच्या ८२ व्या जयंतीचा सोहळ्यात बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, यशराज देसाई,आदित्यराज देसाई, यांच्यासह शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख मा. जयवंतराव शेलार,माजी चेरमन अशोकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन म्हणून स्व. आबासाहेबांनी केलेले कार्य प्रेरणादायी व आदर्शवत आहे. त्यांनी सहकाराबरोबरच शिक्षण क्षेत्रासाठी आणि पाटण तालुक्याच्या विकासासाठी अमूल्य योगदान दिले आहे. पाटणमध्ये साखर कारखान्याची उभारणी ही स्व. आबासाहेबांच्या आणि पाटणवासीयांच्या जीवनातील व तालुक्याच्या इतिहासातील महत्त्वाची घटना आहे. स्व. आबासाहेबांनी घालून दिलेले शेतकरीहिताचे धोरण यापुढेही कायम राबवू, हा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी व्यक्त केला. तसेच आमचे प्रेरणास्थान लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई व स्व. आबासाहेब यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आम्ही पाटण तालुक्यात काम करीत आहोत आणि यापुढेही करत राहू, हे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी स्पष्ट केले.
    मंत्री देसाई पुढे म्हणाले,स्व आबासाहेबांनी  लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली,तालुक्यात विकासाचे वैभव निर्माण करून कारखान्याच्या रूपाने जे रोपटे उभे केले त्याची सर्वस्वी जबाबदारी आबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून तत्कालीन कार्यकर्त्यानी स्वतःच्या खांद्यावर घेतली म्हणूनच आज त्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात होताना दिसत आहे.
 पाटण मतदारसंघाचा आज जो सर्वांगीण विकास पाहवायास मिळत आहे त्या विकासाचे  संस्थापक कोण? त्याची पायाभरणी कोणी केली? या विकासाला उर्जितावस्था येण्यासाठी कुणाचे योगदान? याचे सदैव स्मरण सर्वसामान्य जनतेला असले पाहिजे.असे स्पष्ट करून पाटण मतदारसंघात जो विकास झालेला आहे त्याचे मूळपुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्वर्गीय शिवाजीराव आहेत या दोन महापुरुषांच्या आदर्श विचारांचे सदैव स्मरण ठेवून भविष्यातील वाटचाल करावी आणि या दोन्ही नेत्यांसाठी हीच खरी आदरांजली ठरेल असा विश्वास ही मंत्री शंभूराज देसाई यांनी शेवटी व्यक्त केला.

     प्रारंभी ना. शंभूराज देसाई यांनी स्व. आबासाहेबांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. 

    कार्यक्रमात कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग नलवडे यांनी प्रास्ताविक केले तर बबनराव शिंदे यांनी आभार व्यक्त केले.




No comments:

Post a Comment