Monday, 22 January 2018

यशराज देसाईंनी अभियांत्रिकीच्या शिक्षणातून बांधकामाशी संबधित केलेल्या वैज्ञानिक संशोधनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता.



पाटणच्या देसाई घराण्यातील यशराज शंभूराज देसाई यांनी पुणे येथील सिंहगड अभियांत्रिकी कॉलेजमध्ये विशेष प्राविण्यासह अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. अभियांत्रिकीच्या पदवीचे शिक्षण पुर्ण होताना त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी बांधकाम क्षेत्रात इमारतींचे असो वा इतर कोणतेही बांधकाम करताना बांधकामाच्या मजबुतीसाठी काँक्रीटमध्ये वापरण्यात येणा-या केमिकलएैवजी ऊस गाळपापासून तयार करण्यात येणा-या मोलॉसिस (मळी) वर विशिष्ट प्रक्रिया करुन त्याचा वापर केल्यास बांधकामामध्ये येणा-या खर्चामध्ये पाचपटीने कमी खर्च येणार असून बांधकामाची ताकत ४४ टक्कयाने वाढून सदरचे बांधकाम मजबूत होणार असलेबाबतचे वैज्ञानिक संशोधन केले असून बांधकामाशी संबधित अभियांत्रिकी क्षेत्रात यशराज देसाईंच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी केलेल्या या वैज्ञानिक संशोधनाची तपासणी आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय पातळीवर या वैज्ञानिक संशोधनाला विज्ञान अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानामधील आंतरराष्ट्रीय जर्नल (इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायन्टीफिक रिसर्च इन सायन्स, इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी) कडून मान्यता दिली आहे.यशराज देसाईंच्या या संशोधनामुळे पाटण या डोंगरी आणि दुर्गम तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून देसाई घराण्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
सातारा जिल्हयाच्या राजकारणात पाटणच्या देसाई घराण्याचे नाव अभिमानाने घेतले जाते. याच घराण्यात जन्माला आलेले पाटण तालुक्याचे भाग्यविधाते, महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे महाराष्ट्राचे विविध खात्यांचे कर्तबगार मंत्री राहिलेले पोलादी नेतृत्व लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी मंत्री म्हणून राज्याला दिशा देण्याचे काम केले त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांनी तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून तालुक्यासह जिल्हयातील सहकारी चळवळीला चालना दिली. त्यांच्यानंतर अत्यंत अल्प वयात साखर कारखान्याची जबाबदारी अंगावर पडलेले आणि आता पाटण तालुक्याचे विद्यमान आमदार असणारे आमदार शंभूराज देसाई यांना आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. या तिन्ही नेत्यांनी आपल्या अभ्यासू कतृत्वाने आपल्या तालुक्याचे नांव राज्यपातळीवर नेण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. या यशामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पणतू आणि उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई यांनी राजकारणाच्या पलिकडे जावून अभियांत्रिकी क्षेत्रात पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण करताना प्रत्येक वर्षी विशेष प्राविण्य मिळवून पाटण तालुक्याला नावलौकीक मिळवून दिला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत त्यांनी विशेष प्राविण्यासह बी.ई सिव्हील पदवी संपादन करताना त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी बांधकाम क्षेत्रात केलेले वैज्ञानिक संशोधन हे आतापर्यंत कोणीही केले नव्हते असे संशोधन त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी करुन दाखविले असून त्यांच्या वैज्ञानिक संशोधनाची दखल विज्ञान अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानामधील आंतरराष्ट्रीय जर्नल (इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायन्टीफिक रिसर्च इन सायन्स, इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी) कडून घेण्यात आली असून या वैज्ञानिक संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर तपासणी करुन या संशोधनाला विज्ञान अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानामधील आंतरराष्ट्रीय जर्नल (इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायन्टीफिक रिसर्च इन सायन्स, इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी) कडून मान्यता देण्यात आली असल्याचे प्रमाणपत्रही यशराज देसाईंना देण्यात आले आहे.
यशराज देसाई आणि सिंहगड अभियांत्रिकी कॉलेजमधील त्यांच्या सहका-यांनी केलेल्या वैज्ञानिक संशोधनामध्ये बांधकाम क्षेत्रात इमारतींचे असो वा इतर कोणतेही बांधकाम असो सदरचे बांधकाम करताना बांधकामाच्या मजबुतीसाठी काँक्रीटमध्ये वापरण्यात येणा-या केमिकलएैवजी ऊस गाळपापासून तयार करण्यात येणा-या मोलॉसिस (मळी) वर विशिष्ट प्रक्रिया करुन त्याचा वापर केल्यास बांधकामामध्ये येणा-या खर्चामध्ये पाचपटीने कमी खर्च येणार असून बांधकामाची ताकत ४४ टक्कयाने वाढून सदरचे बांधकाम मजबूत होण्याच्या दृष्टीने कौतुकास्पद असे वैज्ञानिक संशोधन केले आहे. अशाप्रकारचे संशोधन करुन इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायन्टीफिक रिसर्च इन सायन्स, इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी यांचेकडे तपासणीकामी पाठविणारे आणि त्यांस मान्यता मिळालेले यशराज देसाई हे आणि त्यांचे सहकारी हे पहिले यशस्वी इंजिनिअर असून ही बाब पाटण तालुक्याची मान उंचावणारी बाब आहे.या यशाबद्दल यशराज देसाई यांचे सर्वस्तरावरुन कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.या यशाबद्दल त्यांच्या आजी श्रीमती विजयादेवी देसाई, वडील आमदार शंभूराज देसाई, आई सौ.स्मितादेवी देसाई, रविराज देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी यशराज देसाईंचे अभिनंदन केले आहे.


अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्याकरीता प्राधान्य . आमदार शंभूराज देसाईंची वृत्तपत्र प्रतिनिधींशी बोलताना ग्वाही


कोयना धरण प्रकल्पातील पुनर्वसित झालेल्या प्रकल्पग्रस्त गांवातील अनेक प्रश्न आजही मोठया प्रमाणात प्रलंबीत आहेत. या प्रकल्पग्रस्तांना शासनाने ठरवून दिलेल्या १८ नागरी सुविधा आजही अनेक गांवामध्ये पोहचल्या नाहीत गत तीन वर्षात तालुक्याचा आमदार म्हणून या प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नासांठी तसेच १८ नागरी सुविधामधील कामे मिळवून देणकरीता शासनदरबारी प्रश्न मांडून ते सोडवूण घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला असून आजही माझा प्रयत्न सुरु आहे येणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबीत असणारे प्रश्न सोडवूण घेणेकरीता तसेच शासनाने ठरवून दिलेल्या १८ नागरी सुविधामधील कामांना शासनाकडून प्राधान्याने निधी उपलब्ध करुन आणणेकरीता माझे प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींशी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, कोयना धरण प्रकल्पातील पुनर्वसित झालेल्या प्रकल्पग्रस्त गांवातील अनेक प्रश्न तसेच शासनाने ठरवून दिलेल्या १८ नागरी सुविधामधील कामे आजही मोठया प्रमाणात प्रलंबीत आहेत. कोयना प्रकल्पाबरोबर आता या विभागातील प्रकल्पग्रस्तांना या विभागात साकारण्यात येणा-या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये बाधित व्हावे लागत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे.कोयना प्रकल्पग्रस्त व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पबाधित जनतेचे प्रश्न शासनदरबारी मांडून ते तात्काळ सोडवूण घेणे ही गरज ओळखून मी या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सातत्याने शासनदरबारी आग्रही भूमिका मांडून कोयना प्रकल्पगस्तांचे आणि बाधितांचे प्रश्न, त्यांच्या कैफियती शासनाच्या निदर्शनास आणून देणेकरीता सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यातील अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यातही मला यश प्राप्त झाले आहे. गत तीन वर्षात या तालुक्याचा आमदार म्हणून काम करताना मी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसीत गावठाणांतील २९ ठिकाणच्या कामांसाठी ४ कोटी १० लाख १० हजार रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे, तर येत्या आर्थिक वर्षात उर्वरीत राहिलेल्या कामांसाठी आवश्यक असणारा एकूण ४ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजुर करावा याकरीता माझा शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. राज्याला प्रकाशमान करणारा प्रकल्प कोयना प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून उभा राहिला आहे याची जाणिव जशी प्रकल्पग्रस्तांना आणि आम्हाला आहे तीच जाणिव शासनाने ठेवणे गरजेचे आहे. यापुर्वीच्या आघाडी शासनाने कोयना प्रकल्पग्रस्तांच्या तोडांला पाने पुसण्या व्यतिरिक्त काहीही केले नाही. उलट युतीचे शासन सत्तेवर आल्यावर या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांना शासन दरबारी वाचा फुटली या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अनेक वर्षापासूनचे शिल्ल्क आहेत टप्प्या टप्प्याने राज्य  शासनाने कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसित गावठाणांतील प्रश्नांची सोडवूणक करावी. याकरीता मी तालुक्याचा आमदार म्हणून शासनाकडे प्रयत्न करीत आहे. यूती शासनातील एक घटक म्हणून सत्ताधारी पक्षातील आमदार म्हणून काम करताना माझे तालुक्यातील प्रकल्ग्रस्तांच्या प्रश्नांची शासनाने सोडवूणक करण्याकरीता या प्रकल्प ग्रस्तांपैकी एक कार्यकर्ता म्हणूनच शासनाशी संघर्षाची भूमिका ठेवूनच मी आतापर्यंत काम केले आहे आणि यापुढेही मी कार्यकर्ता म्हणूनच शासनाकडे हे प्रलंबीत प्रश्न सोडविण्याकरीता आग्रही राहणार आहे.

असे सांगून ते म्हणाले,सन २००४ ते २००९ या कालावधीत मी पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेल्यानंतर कोयना प्रकल्पग्रस्तांचा तसेच तालुक्यातील भूकंपग्रस्त असणा-या भूकंपग्रस्तांचा सर्वांत महत्वाचा असणारा भूकंपाच्या दाखल्यांचा गंभीर प्रश्न शासनाकडून सोडवूण घेण्याकरीता शासनदरबारी याच्यावर आवाज उठविला. सलग पाच वर्षे या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधूनही तत्कालीन आघाडी शासनाने सन १९९५ साली बंद करण्यात आलेले भूकंपाचे दाखले सुरु केले नाहीत त्यानंतरही पाच वर्षाच्या कालावधीत मी आमदार नसतानाही मात्र याचा पाठपुरावा करणे सोडले नाही आणि परत २०१४ साली परत आमदार झालेनंतर युतीच्या शासनाकडे हा प्रश्न सातत्याने मांडून दि.१८ डिसेंबर, २०१५ रोजी शासनाकडून यासंदर्भातील निर्णय करुन घेण्यात तसेच पहिल्या टर्ममध्ये पुनर्वसित गावठाणांमध्ये डांबरी रस्ते करण्यास मान्यता नव्हती तोही निर्णय शासनाकडून करुन घेतला. या विभागात साकारण्यात येणा-या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या जनतेवर लादण्यात आलेल्या जाचक अटी कमी करण्याकरीता व्याघ्र प्रकल्पाच्या सल्लागार समितीचा सदस्य म्हणून मी शासनाकडे या समितीच्या माध्यमातून व्याघ्र प्रकल्पातील जाचक अटी कमी करणेकरीता आग्रही राहून या जाचक अटी रद्द करण्याचे शासनाकडून मान्य करुन घेतले. कोयना प्रकल्पग्रस्तांचे आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे उर्वरीत राहिलेले प्रश्न येणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडून ते सोडवूण घेणेकरीता तसेच शासनाने ठरवून दिलेल्या १८ नागरी सुविधामधील कामांना शासनाकडून प्राधान्याने निधी उपलब्ध करुन आणणेकरीता माझे प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी शेवठी बोलताना स्पष्ट केले.   

Sunday, 21 January 2018

माजी आमदारपुत्र, आधी म्हावशीच्या बाळसिध्देश्वर योजनेचे पहा. तारळयात उभे राहून मरळीची सुरु असलेली योजना दिसणार नाही. आमदार शंभूराज देसाईंचा सत्यजितसिंह पाटणकरांना टोला.


कार्यक्रम पाटण अर्बन बँकेच्या वर्धापनदिनाचा आणि या कार्यक्रमात माजी आमदार पुत्र वक्तव्य करतायत मरळी सोनवडे योजनेचे.अहो महाशय कुठे काय बोलायचे हे तर ठरवून जात जावा आणि तारळयात उभे राहून मरळी सोनवडे योजनेचे माप काढण्याअगोदर मरळीत येवून ही योजना सुरु आहे की नाही त्याची खात्री करुन घ्यायची आणि मग बोलायचे.मरळी सोनवडे योजनेचे सांगण्याअगोदर माजी आमदार पुत्र महाशय तुमच्या म्हावशी गावातील बाळसिध्देश्वर योजनेचे अगोदर पहा. योजनेचे लाईट बील थकीत असल्यामुळेच तुम्हाला स्वत:ला गावात पाण्याची योजना असूनही खाजगी मोटारी बसवाव्या लागल्या आहेत. म्हावशी गावात तुमच्यासह २२ ठिकाणी खाजगी मोटारी सुरु आहेत त्या खाजगी मोटारी बसवण्याची वेळ तुमच्यावर आणि येथील शेतक-यांवर का आली ? बाळसिध्देश्वर व्यवस्थित चालत नाही म्हणूनच ना. तारळयात मरळी सोनवडेच्या गप्पा मारुन मरळीची सुरु असलेली योजना तुम्हाला दिसणार नाही त्यासाठी मरळीत येवून पहा म्हणजे समजेल असा टोला आमदार शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकरांना कार्यक्रमातून लगाविला आहे.
त्रिपुडी ता.पाटण येथे अर्थसंकल्पातून मंजुर झालेल्या त्रिपुडी ते चेापडी या रस्त्याचे भूमिपुजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या रस्त्याच्या कामाकरीता ७६.०० लाख रुपयांचा निधी आमदार शंभूराज देसाईंनी मंजुर करुन आणला आहे.यावेळी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड मिलींद पाटील, कारखान्याचे संचालक बबनराव भिसे, बाळासाहेब शेजवळ, संचालिका सौ.दिपाली पाटील, पंचायत समिती सदस्या सौ.सुभद्रा शिरवाडकर, नगरसेवक गणीभाई चाफेरकर, जयवंत घाडगे, किसन कवर, हणमंत पाटील, शंकर देसाई, सुहास देसाई, सुर्यकांत पाटील, भरत देसाई (पैलवान),विठ्ल पाटील, राहूल देसाई, विलास गायकवाड, शामराव देसाई, बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंत खाडे, शाखा अभियंता राजाराम खंडागळे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, माजी आमदार पुत्रांनी तारळयाच्या कार्यक्रमात मरळी सोनवडे योजनेचे संदर्भात वक्तव्य केल्याचे वाचनात आले. माझे त्यांना सांगणे आहे तारळयात उभे राहून तुम्हाला मरळीची योजना दिसणार नाही. त्यासाठी मरळीत येवून त्याची पहाणी करा. मरळी सोनवडे योजना सुस्थितीत सुरु आहे. तुमच्या गावातील बाळसिध्देश्वर योजनेसारखे आमच्या योजनेचे लाईटबिल थकले नाही. किवां बाळसिध्देश्वर योजना चालविण्यास देणे आहे अशी निवीदा पेपरला देण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही. स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुस-याचे बघायचे वाकून असे करण्यापेक्षा माजी आमदार पुत्रांनी मरळी सोनवडे योजनेसंदर्भात वक्तव्य करताना ही योजना सुरु आहे की बंद आहे याची खात्री करुन घेणे गरजेचे होते. मरळी सोनवडे योजनेस बॅक ऑफ महाराष्ट्रचा कर्जपुरवठा असला तरी १०० टक्के योजना कर्जमुक्त करण्याचा धोरणात्मक निर्णय योजनेच्या सभासदांनी एकमुखाने घेतला आहे त्यासाठी कारखान्यातून रक्कम भरायची वेळ आमच्यावर येणार नाही. ती योजना व्यवस्थित चालू ठेवण्यास मी सक्षम आहे त्याकरीता तुमच्या सल्याची गरज नाही. मरळी सोनवडेचे माप काढण्याअगोदर स्वत:च्या गावातील बाळसिध्देश्वर योजनेकडे जरा पहा. यातील एक स्टेज सुरवातीपासून बंद आहे. ज्या स्टेज चालू आहेत त्यातही एक किलामीटरपर्यंतचे पाट बंद आहेत. या कारणास्तवच तुम्हाला आणि येथील शेतक-यांना एकूण २२ खाजगी मोटारी बसवाव्या लागल्या आहेत. बाळसिध्देश्वर कशी सुरु आहे हे यावरुनच स्पष्ट होत असून या २२ खाजगी मोटारी बसविण्याची तुमच्यावर आणि येथील शेतक-यांवर वेळ का आली याचे उत्तर पहिल्यांदा दयावे बाळसिध्देश्वर योजना सुस्थितीत सुरु असेल तर ही योजना चालविण्याकरीता देणे आहे अशी निविदा चार वर्षापुर्वी पेपरला प्रसिध्द करण्याची गरज काय होती याचा आपण अभ्यास करावा असे सांगून ते म्हणाले, तारळे विभागातील ज्या योजनांच्या कळा तुमच्या पिताश्रींनी राज्यातील विविध मान्यवरांना आणून दाबल्या त्या योजनांना निधी आणण्याचे काम मलाच करावे लागले आहे याची जरा माहिती करुन घ्या. येथील शेतक-यांना १०० मीटर पर्यंत पाणी देणेस हा संसदपटु कटीबध्द आहे ते मी देणारच त्याची काळजी तुम्ही करु नका. परंतू तुमच्या पिताश्रींनी जी मुखसंमती धरणातील पाणी बाहेरच्या तालुक्यांना दिली होती त्यासंदर्भात काहीतरी तोंड उघडा ना? तारळे विभागातील जनतेला माहिती आहे तुमच्या पिताश्रींना जे जमले नाही ते हा संसदपटुच करु शकतो म्हणूनच १०० मीटरच्या वरील जमिन क्षेत्राला पाणी देण्यास याच संसदपटुने तत्वत: मान्यता शासनाकडून मिळवून आणली आहे. ते तुमच्यासारख्यांचे काम नाही  असा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना लगाविला आहे. उपस्थितांचे स्वागत विष्णू पाटील यांनी केले तर हणमंत पाटील यांनी आभार मानले.



Friday, 19 January 2018

लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सह.पतसंस्था व सातारा रहिवाशी मित्रमंडळाच्या लोकनेते दिनदर्शिकेचे आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते प्रकाशन.

पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सन २००५ मध्ये सातारा या जिल्हयाच्या ठिकाणी रहिवाशी असणा-या पाटण तालुकावासियांच्या करीता आमदार शंभूराज देसाई यांचे धाकटे बंधू रविराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था, व त्यापुर्वी पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली.प्रतिवर्षाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणा-या लोकनेते या दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते सातारा याठिकाणी करण्यात आले.

सन १९९३ मध्ये सातारा या जिल्हयाच्या ठिकाणी रहिवाशी असणा-या पाटण तालुकावासियांना एकत्रित करुन पाटण तालुकावासिय एका छताखाली रहावेत या उदात्त हेतूने पाटण तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळ स्थापन करण्यात आले. त्यानंतर २००५ मध्ये याच तालुकावासियांकरीता तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने सातारा याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. आमदार शंभूराज देसाईंचे धाकटे बंधू मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली ही पतसंस्था व रहिवाशी मित्रमंडळ कार्यरत आहे. या दोन्ही संस्थाना आमदार शंभूराज देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन असून या दोन्ही संस्था जिल्हयाच्या ठिकाणी येथील पाटण तालुकावासियांकरीता विविध उपक्रम राबवित असून एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होत आहेत. या दोन्ही संस्थांच्या वतीने प्रतिवर्षी लोकनेते यांचे नावाने प्रत्येक वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते. सन २०१८ च्या संस्थेने प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन या दोन्ही संस्थेचे मार्गदर्शक आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते सातारा याठिकाणी करण्यात आले. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्थेचे व रहिवाशी मित्रमंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांच्यासह ॲड.मिलींद पवार, अविनाश मोरे, अनिल निकम, संभाजी देसाई, नरेंद्र शेलार, रघूनाथ मगर, विश्वास जाधव, अनिल खराडे, चंद्रकांत निकम, देवानंद संकपाळ, तुकाराम मोळावडे, शंकर मोरे, विलास पानस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आमदार शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाला गती. रविराज देसाई यांचे उदघाटन कार्यक्रमप्रसंगी प्रतिपादन.

राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन मतदारसंघाचे आमदार आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आमदार शंभूराज देसाई हे मतदारसंघातील जनतेच्या मुलभूत सुविधा असणा-या प्रलंबीत कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करुन आणत आहेत. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाला गती प्राप्त झाली असून आज मतदारसंघाच्या कानाकोप-यात आमदार शंभूराज देसाई यांनी मंजुर करुन आणलेल्या विविध विकासकामांचा धडाका सुरु असून याचा प्रत्यय मतदारसंघातील जनतेला येत आहे. जनतेचा विकास हाच आपला ध्यास या भूमिकेतुन आमदार शंभूराज देसाई यांचे काम सुरु आहे. असे प्रतिपादन मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांनी केले.
कवरवाडी ता.पाटण येथे राज्य शासनाच्या गौणखनिज मधून कार्यान्वीत करण्यात आलेल्या मुळगांव ते कवरवाडी या रस्त्याच्या व आमदार शंभूराज देसाई यांच्या स्थानिक विकास निधीमधून उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उदघाटन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्या सौ सुभद्रा शिरवाडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू, माजी पंचायत समिती सदस्य नथूराम कुंभार, कारखाना संचालक बाळासाहेब शेजवळ, सरपंच सौ.वनिता कवर, उपसरंपच लक्ष्मण कवर, सुनिल कवर,रामचंद्र यादव,राजेंद्र कवर,जयवंत कवर,चंद्रकात कवर,किसन कवर, किसन गालवे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता एस बी माने या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना रविराज देसाई म्हणाले, पाटण मतदारसंघातील मतदारांनी आमदार शंभूराज देसाई यांना सन २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतर निवडणूकीपुर्वी मतदारसंघातील जनतेला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्याचे काम आमदार शंभूराज देसाई हे करीत आहेत. गावागावांना जोडणारे रस्ते, साकव पुल उभारुन ग्रामीण भागातील जनतेची दळणवळणाची गैरसोय दुर करणेकरीता राज्य शासनाकडून निधी मंजुर करुन आणण्याकरीता त्यांचा सातत्याचा पाठपुरावा सुरु असतो. विधानसभेच्या अधिवेशनात आपल्या मतदारसंघातील विविध प्रलंबीत प्रश्नांची मांडणी शासन दरबारी करुन या प्रलंबीत प्रश्नांना वाचा फोडून हे प्रश्न कसे मार्गी लागतील याकरीता ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत आज आमदार शंभूराज देसाई हे मतदारसंघाचे आमदार होवून तीन वर्षाचा कालावधी पुर्ण झाला त्यांच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे मतदारसंघात जनतेच्या डोळयाला दिसतील अशी अनेक कामे मतदार संघातील गावा-गावात वाडीवस्तीवर सुरु आहेत. येणा-या दोन वर्षात मतदारसंघातील विविध भागातील गावे व वाडयावस्त्यांमध्ये प्रलंबीत राहिलेली विकासकामे मार्गी लावणेकरीता त्यांनी आराखडा तयार केला आहे. या कामांनाही निधी मंजुर करुन आणण्याकरीता त्यांचा पाठपुरावा सुरु आहे. कवरवाडी गावाने २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत आमदार शंभूराज देसाई यांना भरघोस असे मतदान करुन गावामध्ये असणारी एकीचे दर्शन मतदारसंघातील इतर गांवाना व वाडयावस्त्यांना करुन दिले आहे. आमदार शंभूराज देसाई यांनीही कवरवाडी गांवाने भरघोस केलेल्या मतदानाचे बक्षिस म्हणून त्यांच्या आमदार फंडातून ग्रामस्थांच्या मागणीनुसार सभामंडपाचे पहिले काम कवरवाडी गावाला दिले आहे. कवरवाडी तसेच मुळगांव या गावातील कामांना नेहमीच विकासाच्या बाबतीत झुकते माप दिले आहे. आज या गावांत आमदार शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून ज्याप्रमाणे विविध विकासकामे मार्गी लागून गांव विकासकामांच्या बाबतीत समृध्द झाले आहे त्याप्रमाणेच मतदारसंघातील प्रत्येक विभागातील गांवामध्ये तसेच वाडया वस्त्यांमध्ये आमदार शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा नेता आपणां सर्वाना आमदार शंभूराज देसाई यांच्या रुपाने लाभला असून आमदार शंभूराज देसाईचे हात अजुनही बळकट करण्याकरीता कवरवाडी गावाप्रमाणे मतदारसंघातील इतर गांवानीही एकजुट करुन त्यांच्या पाठीशी ठाम उभे रहावे व आपल्या गावाचा विकास साधून घ्यावा असे आवाहनही रविराज देसाई यांनी शेवठी बोलताना केले. यावेळी चेअरमन अशोकराव पाटील, ॲड.मिलींद पाटील यांची भाषणे झाली. उपस्थितांचे स्वागत चंद्रकात कवर यांनी केले तर किसन कवर यांनी आभार मानले.

Wednesday, 17 January 2018

चिरेंबदी वाडयात बसून पत्रके काढण्यापेक्षा जनतेसमोर येवून बोला, जनताच तुम्हाला उत्तर देईल. आमदार शंभूराज देसाईंचा सत्यजितसिंह पाटणकरांना कार्यक्रमातून टोला.


तालुक्यात यंदाच्या वर्षी शासनाच्या विविध योजनांमधून मंजुर झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपुजनाच्या निमित्ताने मी भागा- भागात जात असताना त्या त्या भागात माजी आमदारांनी कोणकोणती कामे न केल्यामुळे मला ही कामे मार्गी लावावी लागत आहेत याचा आढावा जनतेकडूनच घेताना माजी आमदारांची निष्क्रीयता दिसून येत असल्याने त्याचा उहापोह या कार्यक्रमामधून मी करीत असताना याला चिरेबंदी वाडयात बसून माजी आमदार आणि त्यांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर हे पत्रके काढून माझेवर आरोप करीत आहेत. मी त्यांना अनेकदा आवाहन दिली आहेत की विरोधक म्हणून तुम्हाला काय बोलायचे असल्यास जनतेच्या समोर येवून बोला पण नाही. जनतेत येवून माझेवर काही बोलण्यासारखे त्यांचेकडे काहीच नसल्याने चिरेंबदी वाडयात बसायचे आणि पत्रके प्रसिध्द करायची एवढाच उद्योग या पितापुत्राकडे शिल्लक राहिला आहे. सत्यजितसिंह पाटणकरांना माझी धमक आणि माझे कतृत्व पहायचे असेल तर त्यांनी त्यांच्या चिरेबंदी वाडयातून बाहेर पडून जनतेसमोर बोलावे तालुक्यातील जनताच त्यांना शंभूराज देसाईमध्ये किती धमक आणि कतृत्व आहे याचे उत्तर देईल असा टोला आमदार शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकरांना कार्यक्रमातून लगाविला आहे.
आंब्रळे ढोपरेवाडी ता.पाटण येथे कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून मंजुर झालेल्या आंब्रुळे ते ढोपरेवाडी या रस्त्याचे भूमिपुजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड मिलींद पाटील,सरपंच दिलीप पाटील,उपसरपंच सौ.निलम राजेंद्र भाकरे,सदस्य काशिनाथ भाकरे, रामचंद्र पुजारी,सौ.ज्योती ढापरे,सौ.जया टोपले,सौ.सुनिता पुजारी,प्रकाश टोपले,राजाराम पाटील,दादासो भाकरे, बाळासाहेब भाकरे,ज्ञानदेव चव्हाण,प्रकाश चव्हाण,रमेश चव्हाण,जोतिराम ढोपरे,शामराव ढोपरे,संपत ढोपरे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र खंडागळे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, मी जे काही बोलतो ते जनतेसमोर येवून त्यांच्या समोर उभा राहून बोलतो माजी आमदार आणि त्यांच्या सुपुत्रांप्रमाणे चिरेबंदी वाडयात बसून मी कोणतेही वक्तव्य करीत नाही. मी केलेल्या प्रत्येक वक्तव्याला ठोस असा आधार आहे. विरोधकांच्या विरोधातील कोणतेही वक्तव्य मी विनाआधार बोलत नाही हा त्यांच्यामधील आणि माझेमधील मोठा फरक आहे.पाटणकर पितापुत्रांच्या पत्रकार परिषदा असतात का? चिरेबंदी वाडयात बसून ते पत्रके काढत बसतात हा संशोधनाचा विषय आहे.पाटणकर पितापुत्रांना माझे जाहीरपणे आवाहन आहे की त्यांनी माझेवर आरोप करताना किंवा मी केलेल्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी चिरेबंदी वाडयात न बसता जनतेच्या समोर येवून बोलावे. परंतू या दोघांनाही जनतेच्या समोर येण्यास आणि त्यांना काही देण्यास काहीच नसल्याने ते जनतेसमोर कसे येणार हातात देण्यासारखे असताना माजी आमदारांनी तालुक्यातील जनतेला काही दिले नाही आणि आता हातात काही नसताना ते जनतेला काय देवू शकणार आहेत.त्यामुळेच वाडयात बसून पत्रके काढण्याची वेळ तालुक्यातील जनतेने त्यांच्यावर आणली आहे. रोज रोज तेच ते उगळत बसायचा उद्योग या पाटणकर पितापुत्रांनी सुरु केला आहे.चांगला चाललेला कारखाना अडचणीत कसा येईल आणि तो कसा आणता येईल हाच पारंपारिक उद्योग यांचा सुरु आहे. कारखान्याच्या सभासद, शेतक-यांच्या भक्कम विश्वासामुळे आम्ही कारखाना चांगला चालवित आहे हे या पितापुत्रांना पहावत नसल्याने उठसुट कारखान्यावर बोलत बसायचे. सभासदांच्या मालकीच्या कारखान्याची माफे काढण्यापेक्षा पाटणकर पितापुत्रांनी जाहीर केलेल्या कोयना शुगर या कारखान्याची वीट कधी उभी राहणार याचा पहिल्यांदा विचार करावा.देसाई कारखान्याच्या सभासंदानी तुम्हाला अनेकदा नाकारले आहे.या कारखान्यात आपली डाळ आता शिजत नाही हे लक्षात आल्यानंतरच तुम्ही कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना घालण्याची दुकाने थाटुन बसला आहात हे तालुक्यातील शेतक-यांच्या चांगलेच लक्षात आले आहे. पाटणकर पितापुत्रांनी देसाई कारखान्याची तुलना करताना ती देसाई कारखान्याच्या बरोबर गाळप क्षमतेच्या कारखान्यांबरोबर करावी. तुम्ही ती करुच शकत नाही कारण देसाई कारखान्यांने या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादकांना ज्याप्रमाणे वेळेत त्यांची ऊसबिले दिली आहेत व देत आहे त्याप्रमाणे तुमच्या सांगण्यावरुन तालुक्यातील ज्या ज्या शेतक-यांनी त्यांचा ऊस बाहेर घातला आहे त्यांचे ऊसाची बिले त्या शेतक-यांना वेळेत मिळाली का ती बिले वेळेत कधी मिळणार हे पाटणकरांनी पहिल्यांदा सांगावे असा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना लगाविला. उपस्थितांचे स्वागत चंद्रकांत भाकरे यांनी केले तर रविंद्र भाकरे यांनी आभार मानले.


Monday, 15 January 2018

माजी बांधकाम मंत्रीमहोदय, खड्डे भरायला ८० लाख रुपये येत नाहीत. आमदार शंभूराज देसाईंचा टोला.


आज पाटण तालुक्यात जाईल त्या गांवामध्ये नव्याने रस्ते, साकव पुलांची कामे सुरु आहेत. चाफळ विभागाचेच उदाहरण घ्या ना. या विभागाला जोडला जाणारा चरेगांव चाफळ रस्ता गतवर्षी पुर्ण झाला, आता गमेवाडी ते महाबळवाडी पर्यंतचा रस्त्याचे आपण भूमिपुजन केले. इकडे पाडळोशी पर्यंतचा रस्ता पुर्ण झाला तर जाळगेवाडी रस्त्याचे काम सुरु आहे तरीही तालुक्यातील माजी बांधकाममंत्री म्हणतायत की मी त्यांनी केलेल्या कामांचे खड्डे भरण्याचे काम करतोय, आता झालेली रस्त्यांची कामे माजी बांधकाममंत्री यांनी कधी केली? हे या भागातील लोकांनीच सांगावे. मला त्यांना एकच सांगायचे आहे माजी बांधकाममंत्री महोदय, सुरु असलेली कामे नवीन आहेत खड्डे भरायला ८०-८० लाख रुपये येत नाहीत आपण पाच वर्षे राज्याचे बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री होतात असा टोला आमदार शंभूराज देसाई यांनी लगाविला.
गमेवाडी ता.पाटण येथे अर्थसंकल्पातून मंजुर झालेल्या गमेवाडी ते महाबळवाडी या रस्त्याचे भूमिपुजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या रस्त्याच्या कामाकरीता ८० लाख रुपयांचा निधी आमदार शंभूराज देसाईंनी मंजुर करुन आणला आहे.यावेळी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड मिलींद पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन राजाराम पाटील,जिल्हा परिषद माजी सदस्य दत्तात्रय वेल्हाळ, डी.वाय पाटील, माजी संचालक बी.आर.पाटील,प्रकाश नेवगे,विजयसिंह पाटील, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष व शंभूराज युवा संघटना अध्यक्ष भरत साळुंखे,उपाध्यक्ष अभिजीत पाटील,शिवदौलत बँक संचालक चंद्रकांत पाटील,संरपच सौ.अरुणा जाधव,उपसरपंच संजय साळुंखे,सदस्य सचिन चंदुगडे,रवींद्र विभूते, चतुरा जाधव, रेखा साळुंखे,जयतूल मुल्ला,रघूनाथ जाधव,पांडूरंग साळुंखे,विजय साळुंखे तानाजी पवार,बांधकाम विभागाचे शाखा अभियंता चव्हाण या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, काही दिवसापुर्वी माजी आमदार यांच्या वाढदिवसानिमित्ताने या विभागात चाफळ येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला या कार्यक्रमात माजी बांधकाममंत्री यांनी त्यांनी केलेल्या रस्त्यांचे खड्डे भरण्याचे काम मी करीत असल्याचा आरोप माझेवर केला होता. मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या हे निर्दशनास आणून दयायचे आहे की, माजी बांधकाम मंत्री महोदय,आपण राज्याचे बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री राहिला आहात. खड्डे भरायला ८०-८० लाख रुपयांचा निधी कधी येत नाही आणि कधी आलाही नाही. आज गमेवाडी ते महाबळवाडी या रस्त्याच्या कामांस ८० लाख रुपयांचा निधी काम नव्याने करण्याकरीता आला आहे. आमदार होवून मला तीन वर्षे झाली या तीन वर्षात चाफळ विभागामध्ये मी ७ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजुर करुन आणला आणि या विभागातील प्रत्येक गांवामध्ये या निधीची कामे सुरु आहेत हे मी गावानिहाय तुम्हाला सांगू शकतो तुमच्याकडे असे काही सांगण्यासारखे आहे काय? असेल ते जरुर सांगावे पण माझे आव्हान अनेकदा आपणांस देवून आपण ते स्विकारत नाही. येणा-या दोन वर्षात या विभागात प्रलंबीत राहिलेली कोणती विकासकामे करायची याचा आराखडा माझेकडे तयार आहे.आपणांकडे असे काही आहे काय? विरोधासाठी विरोध म्हणून केवळ जनतेची दिशाभूल करायची आणि आपली पोळी कशी भाजेल याकडे लक्ष दयायचे याकरीताच माझेवर आरोप करण्याचा खटाटोप आपला चालु आहे हे मतदारसंघातील जनतेच्या आता चांगलेच लक्षात आले आहे. मतदारसंघाच्या प्रत्येक विभागात तुम्हाला करता आली नाहीत अशी रस्त्यांची कामे या तीन वर्षात पुर्ण झाली आहेत तर काही ठिकाणी सुरु आहेत. साकव पुलांचे सांगायचे म्हंटले तर सन २०१५-१६ व २०१६-१७ या केवळ दोन आर्थिक वर्षात शासनाच्या विशेष घटक योजनेतंर्गत ४९ ठिकाणी तर सर्वसाधारण योजनेतंर्गत ११ ठिकाणी असे एकूण ६० ठिकाणी साकव पुलांची कामे माझे प्रयत्नामुळे मार्गी लागली आहेत. त्या त्या गांवामध्ये आपण गेलात तर त्या गांवातील लोकच आपल्याला सांगतील की हे रस्त्याचे आणि साकव पुलाचे काम कुणी केले आहे. आपणाकडे जनतेला सांगण्यासारखा कोणताच विकासाचा मुद्दा नाही निदान मतदारसंघात सुरु असलेल्या कामांची माहिती घेवून तरी माजी आमदारसाहेब आपण वक्तव्य करावित असा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना लगाविला. उपस्थितांचे स्वागत चंद्रकांत पाटील यांनी करुन आभार मानले.