तालुक्यात यंदाच्या वर्षी शासनाच्या विविध योजनांमधून
मंजुर झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपुजनाच्या निमित्ताने मी भागा- भागात जात
असताना त्या त्या भागात माजी आमदारांनी कोणकोणती कामे न केल्यामुळे मला ही कामे
मार्गी लावावी लागत आहेत याचा आढावा जनतेकडूनच घेताना माजी आमदारांची निष्क्रीयता
दिसून येत असल्याने त्याचा उहापोह या कार्यक्रमामधून मी करीत असताना याला चिरेबंदी
वाडयात बसून माजी आमदार आणि त्यांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर हे पत्रके काढून
माझेवर आरोप करीत आहेत. मी त्यांना अनेकदा आवाहन दिली आहेत की विरोधक म्हणून
तुम्हाला काय बोलायचे असल्यास जनतेच्या समोर येवून बोला पण नाही. जनतेत येवून
माझेवर काही बोलण्यासारखे त्यांचेकडे काहीच नसल्याने चिरेंबदी वाडयात बसायचे आणि
पत्रके प्रसिध्द करायची एवढाच उद्योग या पितापुत्राकडे शिल्लक राहिला आहे.
सत्यजितसिंह पाटणकरांना माझी धमक आणि माझे कतृत्व पहायचे असेल तर त्यांनी
त्यांच्या चिरेबंदी वाडयातून बाहेर पडून जनतेसमोर बोलावे तालुक्यातील जनताच
त्यांना शंभूराज देसाईमध्ये किती धमक आणि कतृत्व आहे याचे उत्तर देईल असा टोला
आमदार शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकरांना कार्यक्रमातून लगाविला आहे.
आंब्रळे ढोपरेवाडी ता.पाटण येथे कोयना भूकंप पुनर्वसन
निधीतून मंजुर झालेल्या आंब्रुळे ते ढोपरेवाडी या रस्त्याचे भूमिपुजन
कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष
रविराज देसाई, शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड मिलींद पाटील,सरपंच दिलीप पाटील,उपसरपंच
सौ.निलम राजेंद्र भाकरे,सदस्य काशिनाथ भाकरे, रामचंद्र पुजारी,सौ.ज्योती
ढापरे,सौ.जया टोपले,सौ.सुनिता पुजारी,प्रकाश टोपले,राजाराम पाटील,दादासो भाकरे,
बाळासाहेब भाकरे,ज्ञानदेव चव्हाण,प्रकाश चव्हाण,रमेश चव्हाण,जोतिराम ढोपरे,शामराव
ढोपरे,संपत ढोपरे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र खंडागळे या प्रमुख
मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, मी
जे काही बोलतो ते जनतेसमोर येवून त्यांच्या समोर उभा राहून बोलतो माजी आमदार आणि
त्यांच्या सुपुत्रांप्रमाणे चिरेबंदी वाडयात बसून मी कोणतेही वक्तव्य करीत नाही.
मी केलेल्या प्रत्येक वक्तव्याला ठोस असा आधार आहे. विरोधकांच्या विरोधातील
कोणतेही वक्तव्य मी विनाआधार बोलत नाही हा त्यांच्यामधील आणि माझेमधील मोठा फरक
आहे.पाटणकर पितापुत्रांच्या पत्रकार परिषदा असतात का? चिरेबंदी वाडयात बसून ते
पत्रके काढत बसतात हा संशोधनाचा विषय आहे.पाटणकर पितापुत्रांना माझे जाहीरपणे
आवाहन आहे की त्यांनी माझेवर आरोप करताना किंवा मी केलेल्या वक्तव्यावर बोलताना
त्यांनी चिरेबंदी वाडयात न बसता जनतेच्या समोर येवून बोलावे. परंतू या दोघांनाही
जनतेच्या समोर येण्यास आणि त्यांना काही देण्यास काहीच नसल्याने ते जनतेसमोर कसे
येणार हातात देण्यासारखे असताना माजी आमदारांनी तालुक्यातील जनतेला काही दिले नाही
आणि आता हातात काही नसताना ते जनतेला काय देवू शकणार आहेत.त्यामुळेच वाडयात बसून
पत्रके काढण्याची वेळ तालुक्यातील जनतेने त्यांच्यावर आणली आहे. रोज रोज तेच ते
उगळत बसायचा उद्योग या पाटणकर पितापुत्रांनी सुरु केला आहे.चांगला चाललेला कारखाना
अडचणीत कसा येईल आणि तो कसा आणता येईल हाच पारंपारिक उद्योग यांचा सुरु आहे.
कारखान्याच्या सभासद, शेतक-यांच्या भक्कम विश्वासामुळे आम्ही कारखाना चांगला
चालवित आहे हे या पितापुत्रांना पहावत नसल्याने उठसुट कारखान्यावर बोलत बसायचे.
सभासदांच्या मालकीच्या कारखान्याची माफे काढण्यापेक्षा पाटणकर पितापुत्रांनी जाहीर
केलेल्या कोयना शुगर या कारखान्याची वीट कधी उभी राहणार याचा पहिल्यांदा विचार
करावा.देसाई कारखान्याच्या सभासंदानी तुम्हाला अनेकदा नाकारले आहे.या कारखान्यात
आपली डाळ आता शिजत नाही हे लक्षात आल्यानंतरच तुम्ही कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस
बाहेरच्या कारखान्यांना घालण्याची दुकाने थाटुन बसला आहात हे तालुक्यातील शेतक-यांच्या
चांगलेच लक्षात आले आहे. पाटणकर पितापुत्रांनी देसाई कारखान्याची तुलना करताना ती
देसाई कारखान्याच्या बरोबर गाळप क्षमतेच्या कारखान्यांबरोबर करावी. तुम्ही ती करुच
शकत नाही कारण देसाई कारखान्यांने या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या ऊस
उत्पादकांना ज्याप्रमाणे वेळेत त्यांची ऊसबिले दिली आहेत व देत आहे त्याप्रमाणे
तुमच्या सांगण्यावरुन तालुक्यातील ज्या ज्या शेतक-यांनी त्यांचा ऊस बाहेर घातला
आहे त्यांचे ऊसाची बिले त्या शेतक-यांना वेळेत मिळाली का ती बिले वेळेत कधी मिळणार
हे पाटणकरांनी पहिल्यांदा सांगावे असा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी
बोलताना लगाविला. उपस्थितांचे स्वागत चंद्रकांत भाकरे यांनी केले तर रविंद्र भाकरे
यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment