Friday 19 January 2018

लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सह.पतसंस्था व सातारा रहिवाशी मित्रमंडळाच्या लोकनेते दिनदर्शिकेचे आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते प्रकाशन.

पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सन २००५ मध्ये सातारा या जिल्हयाच्या ठिकाणी रहिवाशी असणा-या पाटण तालुकावासियांच्या करीता आमदार शंभूराज देसाई यांचे धाकटे बंधू रविराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था, व त्यापुर्वी पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली.प्रतिवर्षाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणा-या लोकनेते या दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते सातारा याठिकाणी करण्यात आले.

सन १९९३ मध्ये सातारा या जिल्हयाच्या ठिकाणी रहिवाशी असणा-या पाटण तालुकावासियांना एकत्रित करुन पाटण तालुकावासिय एका छताखाली रहावेत या उदात्त हेतूने पाटण तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळ स्थापन करण्यात आले. त्यानंतर २००५ मध्ये याच तालुकावासियांकरीता तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने सातारा याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. आमदार शंभूराज देसाईंचे धाकटे बंधू मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली ही पतसंस्था व रहिवाशी मित्रमंडळ कार्यरत आहे. या दोन्ही संस्थाना आमदार शंभूराज देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन असून या दोन्ही संस्था जिल्हयाच्या ठिकाणी येथील पाटण तालुकावासियांकरीता विविध उपक्रम राबवित असून एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होत आहेत. या दोन्ही संस्थांच्या वतीने प्रतिवर्षी लोकनेते यांचे नावाने प्रत्येक वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते. सन २०१८ च्या संस्थेने प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन या दोन्ही संस्थेचे मार्गदर्शक आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते सातारा याठिकाणी करण्यात आले. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्थेचे व रहिवाशी मित्रमंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांच्यासह ॲड.मिलींद पवार, अविनाश मोरे, अनिल निकम, संभाजी देसाई, नरेंद्र शेलार, रघूनाथ मगर, विश्वास जाधव, अनिल खराडे, चंद्रकांत निकम, देवानंद संकपाळ, तुकाराम मोळावडे, शंकर मोरे, विलास पानस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

No comments:

Post a Comment