Friday 19 January 2018

आमदार शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाला गती. रविराज देसाई यांचे उदघाटन कार्यक्रमप्रसंगी प्रतिपादन.

राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन मतदारसंघाचे आमदार आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आमदार शंभूराज देसाई हे मतदारसंघातील जनतेच्या मुलभूत सुविधा असणा-या प्रलंबीत कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करुन आणत आहेत. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाला गती प्राप्त झाली असून आज मतदारसंघाच्या कानाकोप-यात आमदार शंभूराज देसाई यांनी मंजुर करुन आणलेल्या विविध विकासकामांचा धडाका सुरु असून याचा प्रत्यय मतदारसंघातील जनतेला येत आहे. जनतेचा विकास हाच आपला ध्यास या भूमिकेतुन आमदार शंभूराज देसाई यांचे काम सुरु आहे. असे प्रतिपादन मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांनी केले.
कवरवाडी ता.पाटण येथे राज्य शासनाच्या गौणखनिज मधून कार्यान्वीत करण्यात आलेल्या मुळगांव ते कवरवाडी या रस्त्याच्या व आमदार शंभूराज देसाई यांच्या स्थानिक विकास निधीमधून उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उदघाटन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्या सौ सुभद्रा शिरवाडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू, माजी पंचायत समिती सदस्य नथूराम कुंभार, कारखाना संचालक बाळासाहेब शेजवळ, सरपंच सौ.वनिता कवर, उपसरंपच लक्ष्मण कवर, सुनिल कवर,रामचंद्र यादव,राजेंद्र कवर,जयवंत कवर,चंद्रकात कवर,किसन कवर, किसन गालवे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता एस बी माने या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना रविराज देसाई म्हणाले, पाटण मतदारसंघातील मतदारांनी आमदार शंभूराज देसाई यांना सन २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतर निवडणूकीपुर्वी मतदारसंघातील जनतेला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्याचे काम आमदार शंभूराज देसाई हे करीत आहेत. गावागावांना जोडणारे रस्ते, साकव पुल उभारुन ग्रामीण भागातील जनतेची दळणवळणाची गैरसोय दुर करणेकरीता राज्य शासनाकडून निधी मंजुर करुन आणण्याकरीता त्यांचा सातत्याचा पाठपुरावा सुरु असतो. विधानसभेच्या अधिवेशनात आपल्या मतदारसंघातील विविध प्रलंबीत प्रश्नांची मांडणी शासन दरबारी करुन या प्रलंबीत प्रश्नांना वाचा फोडून हे प्रश्न कसे मार्गी लागतील याकरीता ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत आज आमदार शंभूराज देसाई हे मतदारसंघाचे आमदार होवून तीन वर्षाचा कालावधी पुर्ण झाला त्यांच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे मतदारसंघात जनतेच्या डोळयाला दिसतील अशी अनेक कामे मतदार संघातील गावा-गावात वाडीवस्तीवर सुरु आहेत. येणा-या दोन वर्षात मतदारसंघातील विविध भागातील गावे व वाडयावस्त्यांमध्ये प्रलंबीत राहिलेली विकासकामे मार्गी लावणेकरीता त्यांनी आराखडा तयार केला आहे. या कामांनाही निधी मंजुर करुन आणण्याकरीता त्यांचा पाठपुरावा सुरु आहे. कवरवाडी गावाने २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत आमदार शंभूराज देसाई यांना भरघोस असे मतदान करुन गावामध्ये असणारी एकीचे दर्शन मतदारसंघातील इतर गांवाना व वाडयावस्त्यांना करुन दिले आहे. आमदार शंभूराज देसाई यांनीही कवरवाडी गांवाने भरघोस केलेल्या मतदानाचे बक्षिस म्हणून त्यांच्या आमदार फंडातून ग्रामस्थांच्या मागणीनुसार सभामंडपाचे पहिले काम कवरवाडी गावाला दिले आहे. कवरवाडी तसेच मुळगांव या गावातील कामांना नेहमीच विकासाच्या बाबतीत झुकते माप दिले आहे. आज या गावांत आमदार शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून ज्याप्रमाणे विविध विकासकामे मार्गी लागून गांव विकासकामांच्या बाबतीत समृध्द झाले आहे त्याप्रमाणेच मतदारसंघातील प्रत्येक विभागातील गांवामध्ये तसेच वाडया वस्त्यांमध्ये आमदार शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा नेता आपणां सर्वाना आमदार शंभूराज देसाई यांच्या रुपाने लाभला असून आमदार शंभूराज देसाईचे हात अजुनही बळकट करण्याकरीता कवरवाडी गावाप्रमाणे मतदारसंघातील इतर गांवानीही एकजुट करुन त्यांच्या पाठीशी ठाम उभे रहावे व आपल्या गावाचा विकास साधून घ्यावा असे आवाहनही रविराज देसाई यांनी शेवठी बोलताना केले. यावेळी चेअरमन अशोकराव पाटील, ॲड.मिलींद पाटील यांची भाषणे झाली. उपस्थितांचे स्वागत चंद्रकात कवर यांनी केले तर किसन कवर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment