आज पाटण
तालुक्यात जाईल त्या गांवामध्ये नव्याने रस्ते, साकव पुलांची कामे सुरु आहेत. चाफळ विभागाचेच उदाहरण घ्या ना. या विभागाला
जोडला जाणारा चरेगांव चाफळ रस्ता गतवर्षी पुर्ण झाला, आता
गमेवाडी ते महाबळवाडी पर्यंतचा रस्त्याचे आपण भूमिपुजन केले. इकडे पाडळोशी
पर्यंतचा रस्ता पुर्ण झाला तर जाळगेवाडी रस्त्याचे काम सुरु आहे तरीही तालुक्यातील
माजी बांधकाममंत्री म्हणतायत की मी त्यांनी केलेल्या कामांचे खड्डे भरण्याचे काम
करतोय, आता झालेली रस्त्यांची कामे माजी बांधकाममंत्री यांनी
कधी केली? हे या भागातील लोकांनीच सांगावे. मला त्यांना एकच
सांगायचे आहे माजी बांधकाममंत्री महोदय, सुरु असलेली कामे
नवीन आहेत खड्डे भरायला ८०-८० लाख रुपये येत नाहीत आपण पाच वर्षे राज्याचे बांधकाम
विभागाचे कॅबिनेट मंत्री होतात असा टोला आमदार शंभूराज देसाई यांनी लगाविला.
गमेवाडी
ता.पाटण येथे अर्थसंकल्पातून मंजुर झालेल्या गमेवाडी ते महाबळवाडी या रस्त्याचे
भूमिपुजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या रस्त्याच्या कामाकरीता ८० लाख
रुपयांचा निधी आमदार शंभूराज देसाईंनी मंजुर करुन आणला आहे.यावेळी कार्यक्रमास
मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड मिलींद पाटील, कारखान्याचे
व्हा. चेअरमन राजाराम पाटील,जिल्हा परिषद माजी सदस्य
दत्तात्रय वेल्हाळ, डी.वाय पाटील, माजी
संचालक बी.आर.पाटील,प्रकाश नेवगे,विजयसिंह
पाटील, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष व शंभूराज
युवा संघटना अध्यक्ष भरत साळुंखे,उपाध्यक्ष अभिजीत पाटील,शिवदौलत बँक संचालक चंद्रकांत पाटील,संरपच सौ.अरुणा
जाधव,उपसरपंच संजय साळुंखे,सदस्य सचिन चंदुगडे,रवींद्र विभूते, चतुरा जाधव, रेखा
साळुंखे,जयतूल मुल्ला,रघूनाथ जाधव,पांडूरंग साळुंखे,विजय साळुंखे तानाजी पवार,बांधकाम विभागाचे शाखा अभियंता चव्हाण या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
होती.
याप्रसंगी
बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, काही दिवसापुर्वी माजी आमदार यांच्या वाढदिवसानिमित्ताने या विभागात चाफळ
येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला या
कार्यक्रमात माजी बांधकाममंत्री यांनी त्यांनी केलेल्या रस्त्यांचे खड्डे भरण्याचे
काम मी करीत असल्याचा आरोप माझेवर केला होता. मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने
त्यांच्या हे निर्दशनास आणून दयायचे आहे की, माजी बांधकाम
मंत्री महोदय,आपण राज्याचे बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री
राहिला आहात. खड्डे भरायला ८०-८० लाख रुपयांचा निधी कधी येत नाही आणि कधी आलाही
नाही. आज गमेवाडी ते महाबळवाडी या रस्त्याच्या कामांस ८० लाख रुपयांचा निधी काम
नव्याने करण्याकरीता आला आहे. आमदार होवून मला तीन वर्षे झाली या तीन वर्षात चाफळ
विभागामध्ये मी ७ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजुर करुन आणला आणि या
विभागातील प्रत्येक गांवामध्ये या निधीची कामे सुरु आहेत हे मी गावानिहाय तुम्हाला
सांगू शकतो तुमच्याकडे असे काही सांगण्यासारखे आहे काय? असेल
ते जरुर सांगावे पण माझे आव्हान अनेकदा आपणांस देवून आपण ते स्विकारत नाही.
येणा-या दोन वर्षात या विभागात प्रलंबीत राहिलेली कोणती विकासकामे करायची याचा
आराखडा माझेकडे तयार आहे.आपणांकडे असे काही आहे काय? विरोधासाठी
विरोध म्हणून केवळ जनतेची दिशाभूल करायची आणि आपली पोळी कशी भाजेल याकडे लक्ष
दयायचे याकरीताच माझेवर आरोप करण्याचा खटाटोप आपला चालु आहे हे मतदारसंघातील
जनतेच्या आता चांगलेच लक्षात आले आहे. मतदारसंघाच्या प्रत्येक विभागात तुम्हाला
करता आली नाहीत अशी रस्त्यांची कामे या तीन वर्षात पुर्ण झाली आहेत तर काही ठिकाणी
सुरु आहेत. साकव पुलांचे सांगायचे म्हंटले तर सन २०१५-१६ व २०१६-१७ या केवळ दोन
आर्थिक वर्षात शासनाच्या विशेष घटक योजनेतंर्गत ४९ ठिकाणी तर सर्वसाधारण
योजनेतंर्गत ११ ठिकाणी असे एकूण ६० ठिकाणी साकव पुलांची कामे माझे प्रयत्नामुळे
मार्गी लागली आहेत. त्या त्या गांवामध्ये आपण गेलात तर त्या गांवातील लोकच
आपल्याला सांगतील की हे रस्त्याचे आणि साकव पुलाचे काम कुणी केले आहे. आपणाकडे
जनतेला सांगण्यासारखा कोणताच विकासाचा मुद्दा नाही निदान मतदारसंघात सुरु असलेल्या
कामांची माहिती घेवून तरी माजी आमदारसाहेब आपण वक्तव्य करावित असा टोलाही आमदार
शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना लगाविला. उपस्थितांचे स्वागत चंद्रकांत पाटील
यांनी करुन आभार मानले.
No comments:
Post a Comment