पाटणच्या
देसाई घराण्यातील यशराज शंभूराज देसाई यांनी पुणे येथील सिंहगड अभियांत्रिकी
कॉलेजमध्ये विशेष प्राविण्यासह अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे.
अभियांत्रिकीच्या पदवीचे शिक्षण पुर्ण होताना त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी
बांधकाम क्षेत्रात इमारतींचे असो वा इतर कोणतेही बांधकाम करताना बांधकामाच्या
मजबुतीसाठी काँक्रीटमध्ये वापरण्यात येणा-या केमिकलएैवजी ऊस गाळपापासून तयार
करण्यात येणा-या मोलॉसिस (मळी) वर विशिष्ट प्रक्रिया करुन त्याचा वापर केल्यास
बांधकामामध्ये येणा-या खर्चामध्ये पाचपटीने कमी खर्च येणार असून बांधकामाची ताकत
४४ टक्कयाने वाढून सदरचे बांधकाम मजबूत होणार असलेबाबतचे वैज्ञानिक संशोधन केले
असून बांधकामाशी संबधित अभियांत्रिकी क्षेत्रात यशराज देसाईंच्या प्रमुख
मार्गदर्शनाखाली त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी केलेल्या या वैज्ञानिक संशोधनाची
तपासणी आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय पातळीवर या
वैज्ञानिक संशोधनाला विज्ञान अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानामधील आंतरराष्ट्रीय
जर्नल (इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायन्टीफिक रिसर्च इन सायन्स, इंजिनिअरींग ॲन्ड
टेक्नॉलॉजी) कडून मान्यता दिली आहे.यशराज देसाईंच्या या संशोधनामुळे पाटण या
डोंगरी आणि दुर्गम तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून देसाई
घराण्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
सातारा
जिल्हयाच्या राजकारणात पाटणच्या देसाई घराण्याचे नाव अभिमानाने घेतले जाते. याच
घराण्यात जन्माला आलेले पाटण तालुक्याचे भाग्यविधाते, महाराष्ट्र राज्याच्या
जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे महाराष्ट्राचे विविध खात्यांचे कर्तबगार मंत्री
राहिलेले पोलादी नेतृत्व लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी मंत्री म्हणून राज्याला
दिशा देण्याचे काम केले त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव स्व.शिवाजीराव देसाई
(आबासाहेब) यांनी तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून तालुक्यासह
जिल्हयातील सहकारी चळवळीला चालना दिली. त्यांच्यानंतर अत्यंत अल्प वयात साखर
कारखान्याची जबाबदारी अंगावर पडलेले आणि आता पाटण तालुक्याचे विद्यमान आमदार
असणारे आमदार शंभूराज देसाई यांना आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये महाराष्ट्र
विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. या तिन्ही
नेत्यांनी आपल्या अभ्यासू कतृत्वाने आपल्या तालुक्याचे नांव राज्यपातळीवर नेण्याचा
प्रयत्न यशस्वी केला आहे. या यशामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पणतू आणि
उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई यांनी
राजकारणाच्या पलिकडे जावून अभियांत्रिकी क्षेत्रात पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण
करताना प्रत्येक वर्षी विशेष प्राविण्य मिळवून पाटण तालुक्याला नावलौकीक मिळवून
दिला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत त्यांनी विशेष प्राविण्यासह
बी.ई सिव्हील पदवी संपादन करताना त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी बांधकाम
क्षेत्रात केलेले वैज्ञानिक संशोधन हे आतापर्यंत कोणीही केले नव्हते असे संशोधन
त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी करुन दाखविले असून त्यांच्या वैज्ञानिक संशोधनाची
दखल विज्ञान अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानामधील आंतरराष्ट्रीय जर्नल (इंटरनॅशनल
जर्नल ऑफ सायन्टीफिक रिसर्च इन सायन्स, इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी) कडून घेण्यात
आली असून या वैज्ञानिक संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर तपासणी करुन या संशोधनाला विज्ञान
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानामधील आंतरराष्ट्रीय जर्नल (इंटरनॅशनल जर्नल ऑफ
सायन्टीफिक रिसर्च इन सायन्स, इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी) कडून मान्यता देण्यात
आली असल्याचे प्रमाणपत्रही यशराज देसाईंना देण्यात आले आहे.
यशराज
देसाई आणि सिंहगड अभियांत्रिकी कॉलेजमधील त्यांच्या सहका-यांनी केलेल्या वैज्ञानिक
संशोधनामध्ये बांधकाम क्षेत्रात इमारतींचे असो वा इतर कोणतेही बांधकाम असो सदरचे
बांधकाम करताना बांधकामाच्या मजबुतीसाठी काँक्रीटमध्ये वापरण्यात येणा-या
केमिकलएैवजी ऊस गाळपापासून तयार करण्यात येणा-या मोलॉसिस (मळी) वर विशिष्ट
प्रक्रिया करुन त्याचा वापर केल्यास बांधकामामध्ये येणा-या खर्चामध्ये पाचपटीने
कमी खर्च येणार असून बांधकामाची ताकत ४४ टक्कयाने वाढून सदरचे बांधकाम मजबूत
होण्याच्या दृष्टीने कौतुकास्पद असे वैज्ञानिक संशोधन केले आहे. अशाप्रकारचे
संशोधन करुन इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायन्टीफिक रिसर्च इन सायन्स, इंजिनिअरींग ॲन्ड
टेक्नॉलॉजी यांचेकडे तपासणीकामी पाठविणारे आणि त्यांस मान्यता मिळालेले यशराज
देसाई हे आणि त्यांचे सहकारी हे पहिले यशस्वी इंजिनिअर असून ही बाब पाटण
तालुक्याची मान उंचावणारी बाब आहे.या यशाबद्दल यशराज देसाई यांचे सर्वस्तरावरुन
कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.या यशाबद्दल त्यांच्या आजी
श्रीमती विजयादेवी देसाई, वडील आमदार शंभूराज देसाई, आई सौ.स्मितादेवी देसाई,
रविराज देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध
संस्थांचे पदाधिकारी यांनी यशराज देसाईंचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment