कार्यक्रम पाटण
अर्बन बँकेच्या वर्धापनदिनाचा आणि या कार्यक्रमात माजी आमदार पुत्र वक्तव्य करतायत
मरळी सोनवडे योजनेचे.अहो महाशय कुठे
काय बोलायचे हे तर ठरवून जात जावा आणि तारळयात उभे राहून मरळी सोनवडे योजनेचे माप काढण्याअगोदर
मरळीत येवून ही योजना सुरु आहे की नाही त्याची खात्री करुन घ्यायची आणि मग बोलायचे.मरळी सोनवडे योजनेचे सांगण्याअगोदर माजी आमदार पुत्र महाशय तुमच्या म्हावशी
गावातील बाळसिध्देश्वर योजनेचे अगोदर पहा. योजनेचे लाईट बील थकीत
असल्यामुळेच तुम्हाला स्वत:ला गावात पाण्याची योजना असूनही खाजगी
मोटारी बसवाव्या लागल्या आहेत. म्हावशी गावात तुमच्यासह २२ ठिकाणी
खाजगी मोटारी सुरु आहेत त्या खाजगी मोटारी बसवण्याची वेळ तुमच्यावर आणि येथील शेतक-यांवर का आली ? बाळसिध्देश्वर व्यवस्थित चालत नाही म्हणूनच
ना. तारळयात मरळी सोनवडेच्या गप्पा मारुन मरळीची सुरु असलेली
योजना तुम्हाला दिसणार नाही त्यासाठी मरळीत येवून पहा म्हणजे समजेल असा टोला आमदार
शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकरांना कार्यक्रमातून लगाविला आहे.
त्रिपुडी ता.पाटण येथे अर्थसंकल्पातून मंजुर झालेल्या त्रिपुडी
ते चेापडी या रस्त्याचे भूमिपुजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या रस्त्याच्या कामाकरीता ७६.०० लाख रुपयांचा निधी आमदार
शंभूराज देसाईंनी मंजुर करुन आणला आहे.यावेळी कार्यक्रमास मोरणा
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवदौलत बँकेचे चेअरमन
ॲड मिलींद पाटील, कारखान्याचे संचालक बबनराव भिसे, बाळासाहेब शेजवळ, संचालिका सौ.दिपाली
पाटील, पंचायत समिती सदस्या सौ.सुभद्रा
शिरवाडकर, नगरसेवक गणीभाई चाफेरकर, जयवंत
घाडगे, किसन कवर, हणमंत पाटील, शंकर देसाई, सुहास देसाई, सुर्यकांत
पाटील, भरत देसाई (पैलवान),विठ्ल पाटील, राहूल देसाई, विलास
गायकवाड, शामराव देसाई, बांधकाम विभागाचे
उपअभियंता वसंत खाडे, शाखा अभियंता राजाराम खंडागळे या प्रमुख
मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना
आमदार शंभूराज देसाई म्हणाले, माजी आमदार
पुत्रांनी तारळयाच्या कार्यक्रमात मरळी सोनवडे योजनेचे संदर्भात वक्तव्य केल्याचे वाचनात
आले. माझे त्यांना सांगणे आहे तारळयात उभे राहून तुम्हाला मरळीची
योजना दिसणार नाही. त्यासाठी मरळीत येवून त्याची पहाणी करा.
मरळी सोनवडे योजना सुस्थितीत सुरु आहे. तुमच्या
गावातील बाळसिध्देश्वर योजनेसारखे आमच्या योजनेचे लाईटबिल थकले नाही. किवां बाळसिध्देश्वर योजना चालविण्यास देणे आहे अशी निवीदा पेपरला देण्याची
वेळ आमच्यावर आलेली नाही. स्वत:चे ठेवायचे
झाकून आणि दुस-याचे बघायचे वाकून असे करण्यापेक्षा माजी आमदार
पुत्रांनी मरळी सोनवडे योजनेसंदर्भात वक्तव्य करताना ही योजना सुरु आहे की बंद आहे
याची खात्री करुन घेणे गरजेचे होते. मरळी सोनवडे योजनेस बॅक ऑफ
महाराष्ट्रचा कर्जपुरवठा असला तरी १०० टक्के योजना कर्जमुक्त करण्याचा धोरणात्मक निर्णय
योजनेच्या सभासदांनी एकमुखाने घेतला आहे त्यासाठी कारखान्यातून रक्कम भरायची वेळ आमच्यावर
येणार नाही. ती योजना व्यवस्थित चालू ठेवण्यास मी सक्षम आहे त्याकरीता
तुमच्या सल्याची गरज नाही. मरळी सोनवडेचे माप काढण्याअगोदर स्वत:च्या गावातील बाळसिध्देश्वर योजनेकडे जरा पहा. यातील
एक स्टेज सुरवातीपासून बंद आहे. ज्या स्टेज चालू आहेत त्यातही
एक किलामीटरपर्यंतचे पाट बंद आहेत. या कारणास्तवच तुम्हाला आणि
येथील शेतक-यांना एकूण २२ खाजगी मोटारी बसवाव्या लागल्या आहेत.
बाळसिध्देश्वर कशी सुरु आहे हे यावरुनच स्पष्ट होत असून या २२ खाजगी
मोटारी बसविण्याची तुमच्यावर आणि येथील शेतक-यांवर वेळ का आली
याचे उत्तर पहिल्यांदा दयावे बाळसिध्देश्वर योजना सुस्थितीत सुरु असेल तर ही योजना
चालविण्याकरीता देणे आहे अशी निविदा चार वर्षापुर्वी पेपरला प्रसिध्द करण्याची गरज
काय होती याचा आपण अभ्यास करावा असे सांगून ते म्हणाले, तारळे
विभागातील ज्या योजनांच्या कळा तुमच्या पिताश्रींनी राज्यातील विविध मान्यवरांना आणून
दाबल्या त्या योजनांना निधी आणण्याचे काम मलाच करावे लागले आहे याची जरा माहिती करुन
घ्या. येथील शेतक-यांना १०० मीटर पर्यंत
पाणी देणेस हा संसदपटु कटीबध्द आहे ते मी देणारच त्याची काळजी तुम्ही करु नका.
परंतू तुमच्या पिताश्रींनी जी मुखसंमती धरणातील पाणी बाहेरच्या तालुक्यांना
दिली होती त्यासंदर्भात काहीतरी तोंड उघडा ना? तारळे विभागातील
जनतेला माहिती आहे तुमच्या पिताश्रींना जे जमले नाही ते हा संसदपटुच करु शकतो म्हणूनच
१०० मीटरच्या वरील जमिन क्षेत्राला पाणी देण्यास याच संसदपटुने तत्वत: मान्यता शासनाकडून मिळवून आणली आहे. ते तुमच्यासारख्यांचे
काम नाही असा टोलाही
आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना लगाविला आहे. उपस्थितांचे
स्वागत विष्णू पाटील यांनी केले तर हणमंत पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment