Thursday, 12 April 2018

शासनाचे २५१५ योजनेअंतर्गत पाटण मतदारसंघातील विविध विकासकामांना ०२ कोटी ३५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर. दि. ३१ मार्च, २०१८ रोजी शासन निर्णय पारित.

        
       पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते, बहुउद्देशीय सभागृह, सभामंडप,ग्रामपंचायत कार्यालय व नळ पाणी पुरवठा योजना इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०१७-१८  या आर्थिक वर्षामध्ये शासनाचे २५१५ योजने अंतर्गत ०२ कोटी ३५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
          प्रसिध्दीपत्रकांत त्यांनी पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,बहुउद्देशीय सभागृह,सभामंडप,ग्रामपंचायत कार्यालय व नळ पाणी पुरवठा योजना इत्यादी विविध विकासकामांकरीता सन २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये शासनाचे २५१५ योजनेअंतर्गत निधी मंजूर होणेबाबत शासनाचे ग्रामविकास विभागाकडे व ग्रामीण विकास मंत्री यांचेकडे दि.१८.०८.२०१७ रोजी मागणी केलेली होती. त्यानुसार सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभुत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत अनुदान वितरणाबाबत ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडील दि. ३१ मार्च, २०१८ रोजीचे शासन निर्णयानुसार २५१५ योजनेअंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,बहुउद्देशीय सभागृह,सभामंडप, ग्रामपंचायत कार्यालय व नळ पाणी पुरवठा योजना इत्यादी एकूण २२ विविध विकास कामांकरीता ०२ कोटी ३५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सन २०१७-१८ च्या २५१५ योजनेअंतर्गत मंजूर झालेली विकासकामामध्ये जळव खिंड ते जांभेकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे  १० लक्ष, वाझोली रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे १० लक्ष, भैरवदरा कुंभारगाव ते यादववस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १० लक्ष, चोरगेवाडी कुंभारगाव ते पोतेकरवाडी कुंभारगाव रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे १० लाख,गलमेवाडी मधील आळी अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे १० लक्ष, मारुलहवेली अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे २० लक्ष, गुंजाळी अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे १० लक्ष, मरळी येथील अंतर्गत रस्ते खडीकरण,डांबरीकरण करणे २० लक्ष, बहुले अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे १० लक्ष, तारळे येथील नाभिक समाजाकरीता बहुउद्देशीय सभागृह बांधणे १० लक्ष, बेलदरे ता. कराड येथील अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १० लक्ष, मानेगाव ता.पाटण येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणे १० लक्ष, नाईकबावस्ती शिंदेवाडी येथे पिण्याच्या पाण्याची योजना करणे. १० लक्ष,सुतारवस्ती कुसरुंड येथे पिण्याच्या पाण्याची योजना करणे. १० लक्ष,पिटेवाडी मणदुरे येथे पिण्याच्या पाण्याची योजना करणे. १० लक्ष, भातडेवाडी जिंती येथे पिण्याच्या पाण्याची योजना करणे १० लक्ष,सुपुगडेवाडी येथे पिण्याच्या पाण्याची योजना करणे १० लक्ष,तोंडोशी ता. पाटण येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे १० लक्ष,तोंडोशी ता. पाटण येथे रामघळ रस्ता डांबरीकरण व स्मशानभूमी रस्ता सुधारणा १५.०० लक्ष, गमेवाडी ता. कराड अंतर्गत रस्ता गटर व काँक्रीटीकरण करणे १० लक्ष, गमेवाडी ता. कराड सभामंडप बांधणे ०५.०० लाख व गमेवाडी ता. कराड स्मशानभूमी संरक्षक भिंत व सुशोभिकरण करणे ०५.०० लाख या विकासकामांचा समावेश असून या कामांना एकूण २ कोटी ३५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून सन २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये २५१५ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या विकास कामांची सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग यांचेकडून निविदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने या विविध विकास कामांना सुरुवात होणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.



जनतेला डोळयाला दिसतील अशी विकासकामे मतदारसंघात सुरु.:- आमदार शंभूराज देसाई.


     मतदारसंघातील जनतेने आमदार म्हणून निवडून देवून माझे आमदारकीला साडेतीन वर्षे पुर्ण झाली. मतदारसंघाचा आमदार म्हणून मतदारसंघातील विविध भागात आज मतदारसंघातील जनतेच्या डोळयाला दिसतील अशी विकासकामे सुरु आहेत. आपल्या माध्यमातून सुरु असणारी विविध विकासकामे मतदारसंघातील जनतेच्या डोळयाला दिसत आहेत पण विरोधकांना ती दिसत नाहीत. विरोधकांकडून डोळेझाक होत असल्याने विरोधकांना ती दिसणारच नाहीत आणि त्यांना ती दिसावीत अशी अपेक्षाही करणे चुकीचे असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी करुन मी मंजुर करुन आणलेली विविध विकासकांमे ही जनतेच्या डोळयांना दिसत आहेत यातच मला समाधान मिळत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
      कोयनानगर विभागातील ढोकावळे ता.पाटण येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात विशेष घटक योजनेतंर्गत मागासवर्गीय वस्तीकडे जाणा-या रस्त्यावर साकव पुल बांधणे या कामाचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. या साकव पुलाच्या कामांसाठी आमदार शंभूराज देसाईंनी ३४ लाख ७२ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बॅकेचे संचालक अशोकराव पाटील, माजी पंचायत समिती हरीष भोमकर, धोंडीराम भोमकर,शैलेंद्र शेलार, नारायण विचारे, नथूराम सावंत, अशोक पाटील तळीयेकर,बबनराव भिसे, शाखा अभियंता महाजन या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
    याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, गत साडेतीन वर्षात युतीच्या शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन जनतेच्या मुलभूत सुविधा असणारी प्रलंबीत कामे मार्गी लावणेकरीता मी निधी मंजुर करुन आणत आहे. मी मंजुर करुन आणलेला निधी आणि त्या निधीतून करावयाची कामे ही मतदारसंघातील जनतेच्या डोळयाला दिसत आहे मात्र आपले पारंपारिक विरोधक डोळयावर पट्टी बांधून तालुक्यात फिरत असल्याने कुठ आहेत कांमे कुठ आहेत कांमे म्हणून टिका करीत सुटले आहेत. आपले माध्यमातून मोठया प्रमाणात सुरु असणारी विविध विकासकामे विरोधकांना दिसत नाहीत असे त्यांचे म्हणणे असल्याने ही कामे पहायची असतील तर समोरासमोर या असे मी अनेकदा त्यांना आवाहन देखील देत आहे पण माझे आव्हान ते स्विकारत नाहीत. आपली कांमे मतदारसंघातील जनतेला दिसत आहेत यातच मला समाधान मिळत असून डोळेझाक करुन टिका करणा-या विरोधकांना ती दिसत नाहीत हे आपले नाही परंतू विरोधकांचे दुर्दैव म्हणावे लागेल.आपली कामे विरोधकांना दिसावीत अशी त्यांच्याकडून अपेक्षाही करणे चुकीचे आहे स्वत:च्या हातात अनेक वर्षे आमदारकी असताना विरोधकांना काहीही करता आले नाही आणि आज एवढी कामे सुरु असताना कामे दिसत नाहीत असे विरोधकांकडून सांगितले जात असले तरी मतदारसंघातील जनता आता सुज्ञ झाली आहे कोण विकासकामे मंजुर करुन आणतो आणि कोण केवळ दिशाभूल व थापा मारण्याचे काम करतोय हे मतदारसंघातील जनतेने आता चांगलेच ओळखले आहे. आजचेच उदाहरण घ्या आज कोयना विभागात तीन गावात अशाच प्रकारे ३५ -३५ लाखांच्या तीन साकव पुलांचे भूमिपुजन करण्यात आले याची एकूण रक्कम १ कोटी रुपयांच्या वर आहे. त्यामुळे टिका करणा-या विरोधकांकडे जसे मी लक्ष देत नाही तसे तुम्ही जनतेनेही लक्ष देवू नये. आपल्यावर मतदारसंघातील मतदारांनी जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पुर्णपणे पार पाडण्याचे काम मी गत साडेतीन वर्षात केले आणि यापुढेही करीत राहणार.विरोधकांच्या हातात सध्या काही देण्यासारखे नसल्याने ते आता सैरभैर झाले आहेत. असे सांगून ते म्हणाले, विधानसभेच्या निवडणूकीत मते मागायला आल्यानंतर मतदारांना जी जी आश्वासने मी दिली होती त्या आश्वासनांची पुर्तता गेल्या साडेतीन वर्षात करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. जी काही प्रलंबीत विकासकामे करावयाची आहेत त्याकरीता आवश्यक असणारा निधी शासनाकडून मंजुर करुन आणणेकरीता मी कटीबध्द आहे.असे त्यांनी सांगितले. यावेळी जयंवतराव शेलार, अशोकराव पाटील यांची भाषणे झाली उपस्थितांचे स्वागत व आभार नारायण विचारे यांनी मानले.
चौकट:- ढोकावळे रिसवड रस्ता एवढया वर्षात का होवू शकला नाही?
       माजी आमदारांकडे एवढया वर्षे तालुक्याची आमदारकी होती त्यांना ढोकावळे रिसवड गांवाला जोडणारा रस्ता आमदार आणि सार्वजनीक बांधकाम मंत्री असताना करता आला नाही.तो मी आमदार झालेनंतर या रस्त्याच्या कामाला कोयना पुर्नवसित गावठाणांना नागरी सुविधा पुरविणे यातून मंजुर करुन आणला यातील गावाला जोडणारा निम्मा रस्ता पुर्ण झाला असून उर्वरीत राहिलेल्या रस्त्याच्या कामासाठी ५२ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. मात्र ढोकावळे रिसवड रस्ता एवढया वर्षात का होवू शकला नाही हे विरोधकांना आपण कधी विचारणार आहोत की नाही? असेही आमदार देसाई यावेळी म्हणाले.


मनरेगा योजनेतंर्गत पाटण तालुक्यात पावसाळयापुर्वी ५० पैकी ३७ कामे पुर्ण होणार. प्रत्यक्षात निम्म्याहुन अधिक कामांना सुरुवात. आमदार शंभूराज देसाई


मनरेगा योजनेतंर्गत सातारा जिल्हयात सर्वाधिक पाटण तालुक्यात मार्च २०१८ अखेर तालुक्यातील ५० गांवामध्ये स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते तसेच ग्रामीण भागात शेताकडे जाणारे शिवारातील पाणंद रस्त्यांची कांमे पुर्ण करण्याचे उदिष्ट आपण ठरविले होते या ५० पैकी ११ कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली असून पावसाळयापुर्वी एकूण ३७ कामे ही पुर्णत्वाकडे जाणार आहेत.एक दोन कामांमध्ये अडचणी असून तेथील समस्या या प्रातांधिकारी व तहसिलदार यांनी सामोपचाराने मिटवाव्यात व त्यानुसार ५० गावातील या कामांचे उदीष्ट पुर्ण करण्याकरीता या योजनेमध्ये सहभागी असणा-या सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा अशा सुचना आमदार शंभूराज देसाई यांनी अधिकारी यांना करुन या योजनेमध्ये कामे करायच्या गावांमधील वाडीवस्तीमधील सर्व ग्रामस्थांनी गटतट पक्ष न पहाता सहभागी होवून त्यांनी आपल्या गावाचा विकास साधून घेणेकरीता गांवामध्ये एकी निर्माण करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
मनरेगा योजनेतंर्गत पाटण तालुक्यात प्रामुख्याने स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते तसेच ग्रामीण भागात शेताकडे जाणारे शिवारातील पाणंद रस्त्यांची कांमे पुर्णत्वाकडे नेणेकरीता आमदार शंभूराज देसाई व रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जानेवारीच्या पहिल्या आठवडयामध्ये बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीत पाटण तालुक्यातील ५० गावांमध्ये मनरेगा योजनेतंर्गत  स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते व पाणंद रस्त्यांची कांमे पुर्णत्वाकडे नेण्याचे उदिष्ट ठरविण्यात आले होते. त्या कामांचा आढावा आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, पाटण येथे घेण्यात आला यावेळी बैठकीस पाटणचे तहसिलदार रामहरी भोसले, लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटणचे गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, सार्वजनीक बांधकाम उपविभाग, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, पाणी पुरवठा उपविभागाचे अभियंता, सर्व शाखा अभियंता, विविध गावचे सरपंच, उपसरंपच, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविस्तार अधिकारी,ग्रामसेवक, महसूल विभागाचे मंडलाधिकारी, तलाठी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आढावा बैठकीमध्ये सदर कामांची माहिती घेतल्यानंतर आमदार शंभूराज देसाई म्हणाले, पाटण या डोंगरी तालुक्यातील स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते तसेच ग्रामीण भागात शेताकडे जाणारे शिवारातील पाणंद रस्त्यांची कांमे मोठया प्रमाणात प्रलंबीत होती ही कामे प्रामुख्याने करणे गरजेचे असल्याचे ओळखून मनरेगा योजनेतंर्गत की कामे करण्यात यावी याकरीता आपण सर्वजण प्रयत्न करीत आहोत. तालुक्यातील ५० गांवामध्ये स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते तसेच ग्रामीण भागात शेताकडे जाणारे शिवारातील पाणंद रस्त्यांची कांमे पुर्ण करण्याचे उदिष्ट आपण ठरविले होते त्यानुसार आजच्या आढाव्यामध्ये एकूण ३७ कामे ही पावसाळयापुर्वी पुर्ण होतील अशी आशा आहे. मनरेगा योजनेतंर्गत महसूल आणि ग्रामविस्तार अधिकारी तसेच ग्रामसेवकांचा पुढाकार महत्वाचा आहे. स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते असो वा शेताकडे जाणारे शिवारातील पाणंद रस्त्यांचे कांम असो याचा उपयोग गावातील वाडीवस्तीतील सर्व ग्रामस्थांनाच होत असतो त्यामुळे ग्रामस्थांनी या योजनेत सहभाग घेणे गरजेचे आहे. दरम्यान मागील बैठकीत काही सरंपच मंडळीनी पाण्ंद रस्त्याच्या कामांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न होतो अशा सुचना केल्या होत्या त्यामध्ये महसूल विभागाने पुढाकार घेवून अशा समस्या सोडवाव्यात असे सांगून सर्वांच्या सहभागामुळे ग्रामीण आणि डोंगरी तालुक्यातील ही कामे येत्या पावसाळयापुर्वी मार्गी लावावीत अशाही सुचना त्यांनी यावेळी बोलताना अधिका-यांना केल्या. प्रांरभी आमदार शंभूराज देसाई यांचे वहया देवून स्वागत करण्यात आले.


Wednesday, 11 April 2018

जलयुक्त शिवार योजनेतंर्गत ओढेनाले जोड प्रकल्प हाती घ्यावा. आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवारची बैठक संपन्न.


   जलयुक्त शिवार योजनेतंर्गत डोंगरपठारावरील टंचाईग्रस्त गांवाच्या निवडी करुन या गांवामध्ये तसेच वाडयावस्त्यांमध्ये या योजनेतून करावयाच्या कामांची प्रत्यक्ष पहाणी करुन या कामांचे प्रस्ताव हे मंजुरीकरीता लवकर लवकर सादर करावेत तसेच याच योजनेतंर्गत डोंगर पठारावरुन पावसाळयामध्ये मोठया प्रमाणात वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्याकरीता ओढे नाले जोडणे हा प्रकल्प संबधित यंत्रणानी प्रत्यक्ष स्थळपहाणी करुन हाती घ्यावा अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी जलयुक्त शिवार योजनेशी संबधित असणा-या तालुकास्तरीय अधिका-यांना दिल्या.
    आमदार अध्यक्ष असलेल्या जलयुक्त शिवार योजना समितीची आढावा बैठक आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालय पाटण याठिकाणी आयोजीत केली होती. यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी वरीलप्रमाणे सुचना केल्या. या समितीमध्ये विशेष आमंत्रित असणारे विधानपरिषद आमदार नरेंद्र पाटील तसेच पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर, तहसिलदार रामहरी भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी पाटील, पाटण वनसंरक्षक विलास काळे, पाणी पुरवठा उपअभियंता आर व्ही पाटील यांच्यासह या योजनेतंर्गत काम करणारे सर्व अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
    याप्रसंगी सुरवातीस अध्यक्ष आमदार शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघात सन २०१६-१७, २०१७-१८ या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार योजनेतंर्गत कृषी,लघू पाटबंधारे विभाग,पाणी पुरवठा विभाग, वनविभाग या विभागामार्फत करण्यात आलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच सन २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार योजनेतंर्गत समाविष्ठ करावयाच्या डोंगरपठारावरील गांवाचा, वाडयावस्त्यांच्या निवडी करण्यात आल्या. सन २०१८-१९ करीता जलयुक्त शिवार योजनेतंर्गत वनकुसवडे, बामणेवाडी (भांबे),पाठवडे, चव्हाणवाडी (नानेगांव),धसगांव- जंगमवाडी, शिद्रुकवाडी कोरीवळे, माईगंडेवाडी जिंती, आंब्रुकरवाडी भोसगांव, गायमुखवाडी बांबवडे, धडामवाडी केरळ, कडवे बु//, कडवे खुर्द, जळव,तामिणे, मस्करवाडी काळगांव, राहूडे  या सोळा गांवाचा व वाडयावस्त्यांच्या निवडी करण्यात आल्या असून सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात या गांवामध्ये व वाडयावस्त्यांमध्ये जलयुक्तमधून कामे करण्यात येणार आहेत. दरम्यान सन २०१६-१७, २०१७-१८ या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार योजनेतंर्गत कृषी,लघू पाटबंधारे विभाग,पाणी पुरवठा विभाग, वनविभागाने कोणकोणती कामे केली या कामांच्या माध्यमातून किती प्रमाणात पाण्याची निर्माण होणारी टंचाई दुर झाली तसेच या कामांच्या माध्यमातून किती टीसीएम ने पाण्याच्या क्षमतेत वाढ झाली याचा सविसतर आढावा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, गतवर्षी डोंगरपठारवरील गावांमध्ये तसेच वाडयावस्त्यांमध्ये पावसाळयाचे डोंगरपठारावरुन वाहून जाणारे पाणी अडविणेकरीता जलयुक्त शिवार योजनेतंर्गत कामे हाती घेण्यात यावीत याकरीता माझा सातत्याने शासनाकडे आग्रह होता त्यानुसार गतवर्षी आपण पाटण तालुक्यातील डोंगरपठारावरील एकूण १९ गांवे व वाडयावस्त्यांमध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे केली या कामांमुळे डोंगरपठारावरील पावसाचे वाहून जाणारे पाणी डोंगरपठारावरच साठवून ठेवण्यास आपल्याला यश मिळाले यामुळे आज या उन्हाळयात डोंगरपठारावरील केवळ देान ते तीनच गांवाना पाण्याचा टँकर दयावा लागणार आहे. अशाप्रकारे आपल्े तालुक्यातील डोंगरपठारावरुन पावसाळयात ओढे नाले याच्यातून मुख्य नदयांना वाहून जाणारे पाणी आडवून ठेवणेकरीता ओढे नाले जोड प्रकल्प या योजनेच्या माध्यमातून हाती घ्यावा याकरीता संबधित यंत्रणांनी अशा ठिकाणांची प्रत्यक्ष जावून पहाणी करावी व याठिकाणी आडवे पाट सिमेंट बंधारे बांधणे अशा प्रकारची कामे करावित जेणेकरुन पावसाळयातील पाणी या ओढेनाले जोडप्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला अडवून ठेवता येईल अशाही सुचना त्यांनी यावेळी बोलताना अधिका-यांना दिल्या.
चौकट:- बैठकीकरीता उपस्थितांचीच चर्चा जास्त
  जलयुक्त शिवार योजना समितीच्या अध्यक्षपदी तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार शंभूराज देसाई हे असून ते स्वत: त्यांच्यासोबत या समितीकरीता विशेष आमंत्रित म्हणून राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य आमदार नरेंद्र पाटील आणि या बैठकीला मलाही बोलवा असे सांगणारे पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर हे तिघे तहसिल कार्यालयात एकत्र आल्याने या बैठकीकरीता उपस्थित असणा-या या मान्यवरांचीच चर्चा जास्त पहावयास मिळाली.


कोयना पर्यटन आराखडयाच्या माध्यमातून कोयनानगला होणार पर्यटन विकास. कोयना पर्यटनाचा आराखडा तयार करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.


   महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण व येथील निसर्गसौंदर्य लाभलेल्या कोयनानगर ता.पाटण येथील व कोयनानगरच्या १० किलोमीटर परिसरातील प्रमुख पर्यटन ठिकाणांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करणेकरीता पर्यटन विकास आराखडयास आवश्यक असणारा निधी उपलब्ध होणेकरीता सत्वर संबधित यंत्रणेने हा आराखडा तयार करुन प्रातांधिकारी यांचेमार्फत जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडे सादर करावा अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी अधिका-यांना देवून सदरचा आराखडा हा जिल्हाधिकारी यांचेमार्फत राज्याच्या पर्यटन विभागाकडे मान्यतेकरीता जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोयना पर्यटन विकास आराखडा तयार करुन आराखडयातील कामांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन द्यावा. अशी मागणी आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे केली होती.तसेच तालिका अध्यक्ष म्हणूनही त्यांनी पर्यटनमंत्री यांना अध्यक्ष स्थानावरुन सदरच्या कोयना पर्यटन आराखडयाचे प्रस्ताव मागवून घेवून निधी दयावा असे सुचित करण्यात आले होते. आमदार शंभूराज देसाईंचे मागणीवरुन व तालिका अध्यक्ष म्हणून दिलेल्या निर्देशानुसार पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांनी कोयना पर्यटन विकास आराखडा तात्काळ तयार करुन शासनाला सादर करावा अशा लेखी सुचना जिल्हाधिकारी,सातारा यांना दिल्या आहेत. हा आराखडा तयार करुन तो पर्यटन विभागाकडे सादर करणेकरीता आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोयनानगर येथील कोयना धरण व्यवस्थपनाच्या चेमरी याठिकाणी संबधित अधिकारी यांची बैठक झाली या बैठकीत आमदार शंभूराज देसाई यांनी वरीलप्रमाणे माहिती देवून अधिका-यांना सुचना केल्या.यावेळी बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,वन्यजीवचे सहाययक वनरंक्षक सुरेश सांळूखे,नायब तहसिलदार राजेश जाधव, सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंत खाडे,शाखा अभियंता विश्वास नाईक,मधूकर सुर्वे यां अधिका-यांसह शिवसेना उपजिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,अशोकराव पाटील, माजी पंचायत समिती  हरीष भोमकर, शैलेंद्र शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.
    याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई म्हणाले, कोयना पर्यटन आराखडयाच्या माध्यमातून कोयनानगरला पर्यटन विकास होणेकरीता अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी राज्याचे पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे मी मागणी केली होती माझे मागणीवरुन हा आराखडा सादर करण्याच्या लेखी सुचना जिल्हाधिकारी सातारा यांना केल्या आहेत दि.०६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांचेसोबत सदरचा आराखडा तयार करणेसंदर्भात चर्चाही झाली आहे त्यानुसार संबधित यंत्रणांनी हा आराखडा तयार करुन तो  प्रातांधिकारी यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावयाचा असून जिल्हाधिकारी हा आराखडा राज्याच्या पर्यटन विभागाकडे सादर करणार आहेत. सदरचा आराखडा प्राप्त होताच राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून आवश्यक असणारा निधी देण्याचे राज्याचे पर्यटन मंत्री यांनी मला आश्वासित केले आहे असे सांगून आमदार शंभूराज देसाई यांनी आराखडयात समाविष्ठ करावयाच्या कामांचा सविस्तर आढावा घेवून यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची सुधारणा करावयाची आहे यासंदर्भात त्यांनी अधिका-यांना सुचना केल्या. आराखडयात एकूण १५ विविध कामांना निधी मिळणेकरीता मागणी करण्यात आली असून संबधित यंत्रणा यांनी कोणकोणती कांमे करावयाची यांचे अंदाजपत्रक तयार करुन करावयाची कामे याचा तपशिल याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात यावा असे त्यांनी यावेळी सुचित केले. त्यानुसार संबधित सर्व शासकीय यंत्रणांनी येत्या दोन महिन्यात पर्यटन विकासाकरीता मागणी करण्यात आलेल्या कामांचे सविस्तर प्रस्ताव व अंदाजपत्रके तयार करुन ती प्रातांधिकारी यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करणेकरीताचा कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन संबधित अधिका-यांनी आमदार शंभूराज देसाईंना यावेळी दिल्या.
चौकट:- मुख्यमंत्रयांचा निर्णय माझे तीन वर्षाच्या प्रयत्नांचे फलित. आमदार शंभूराज देसाई.
     मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे आदेशावरुनच राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी स्वत: मला सोबत घेवून धरणाच्या सुरक्षिततेच्या मर्यादीत बोटींग स्पॉटची हवाई तसेच प्रत्यक्ष जागेवर जावून पहाणी केली आहे.मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झालेल्या बैठकीत कोयना पर्यटन विकास आराखडयातील कामांना निधी देणे व कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये पर्यटकांना बोटींग करणेकरीता धरणाच्या सुरक्षिततेच्या मर्यादीत बोटींग स्पॉट जलाशयाशेजारी विकसित करणे हे मुख्यमंत्री यांनी घेतलेले निर्णय हे माझे तीन वर्षाच्या प्रयत्नांचे फलित असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.

Friday, 6 April 2018

मळे, कोळणे व पाथरपुंज गावांनी पुनर्वसनाकरीता लवकरात लवकर जागा पसंत करावी. आमदार शंभूराज देसाईंचे या तीन गांवातील बाधितांना पुनर्वसनाकरीताच्या बैठकीत आवाहन.



     नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्यावतीने मी अंतिम आठवडा प्रस्तावाची विधानसभा सभागृहात सुरुवात करताना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमधील मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गांवाचे शासनाने तात्काळ पुनर्वसन करावे अशी मागणी मी शासनाकडे केली होती शासनानेही या गावातील बाधित प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन तात्काळ करण्याचे आश्वासन दिले आहे. या तिन्ही गांवातील बाधित प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे पाटण तालुक्यातच पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे.वन विभागानेही या प्रकल्पग्रस्तांना पाटण तालुक्यातील उपलब्ध वनजमिनी पुनर्वसनाकरीता दाखविल्या आहेत त्यानुसार प्रकल्पग्रस्तांनी लवकरात लवकर पुनर्वसनाच्या जागा पंसत कराव्यात असे आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
      सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमधील मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गांवाचे पुनर्वसन तात्काळ करणेसंदर्भात आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृह,प्रतिक्षालय इमारत तहसिल कार्यालय,पाटण याठिकाणी बैठक आयोजीत करण्यात आली होती.याप्रसंगी बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले. बैठकीस सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक श्रीमती विनिता व्यास, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, सहाययक वनसरंक्षक कोयना सुरेश साळुंखे,सहाययक वनसरंक्षक चांदोली राजकुमार विधाते,गटविकास अधिकारी संजीव गायकवाड,माजी पंचायत समिती सदस्य हरीश भोमकर, संजय पवार व प्रकल्पग्रस्त यांची प्रमुख उपस्थिती होती.
      यावेळी बैठकीत आमदार शंभूराज देसाई यांनी प्रथमत: मळे, कोळणे व पाथरपुंज येथील व्याघ्र प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांकडून पुनर्वसनासंदर्भात सविस्तर अशी माहिती घेवून वन्यजीव विभागाकडून या तिन्ही गांवाच्या पुनर्वसना संदर्भात कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत याविषयी उपसंचालक श्रीमती विनिता व्यास, सहाययक वनसरंक्षक चांदोली राजकुमार विधाते यांचेकडून माहिती घेतली.यावेळी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,नुकतेच महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले या अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या वतीने अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात आला याची सुरुवात सत्ताधारी पक्षाच्या वतीने करताना मी पाटण तालुक्यातील मळे,कोळणे व पाथरपुंज ही तीन गांवे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये बाधित असून त्यांचे पुनर्वसन तात्काळ करणे गरजेचे असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली यावर शासनाने या तीन गांवाचे तात्काळ पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरु असून लवकरच या गावाचे पुनर्वसन योग्य ठिकाणी करण्यात येईल असे मला आश्वासन दिले आहे.या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयीन स्तरावर बैठकही घेण्यात येणार आहे.त्याचा प्राथमिक आराखडा तयार करुन पुर्नवसनाकरीता आवश्यक असणा-या जागेसंदर्भात निर्णय घेणेकरीता सविस्तर प्रस्ताव शासनाकडे लवकरात लवकर सादर होणे गरजेचे आहे.वन्यजीव व वनविभागाकडून या गावाच्या पुनर्वसनाकरीता पुढाकार घेतला असून प्रकल्पग्रस्तांनीही लवकरात लवकर पाटण तालुक्यात वन विभागाने दाखविलेल्या वनविभागाच्या पुनर्वसनाच्या जागा पसंत कराव्यात मळे येथील प्रकल्पग्रस्तांनी बहूले याठिकाणी पाथरपुंज येथील प्रकल्पग्रस्तांनी मारुलहवेली, सोनाईचीवाडी, मल्हारपेठ या विभागातील तर कोळणे येथील प्रकल्पग्रस्तांनी कराड तालुक्यातील हेळगांव व खराडे येथील जागांना पंसती दिली असल्याचे प्रकल्पग्रस्तांकडून सांगण्यात येत आहे. यातील काही ठिकाणी संबधित जागा दाखविलेल्या गांवानी या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरीता अद्यापही सहमती दर्शविली नाही त्यामुळे वनविभागाने पाटण तालुक्यात इतर ठिकाणी कुठे वनविभागाच्या जागा शिल्लक आहेत त्या जागा या गावातील प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर दाखविण्यात याव्यात व या तिन्ही गावातील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाकरीता तसेच कसण्याकरीता त्या त्या ठिकाणी किती जागा उपलब्ध करुन देता येतील याचा सविस्तर आराखडा तयार करावा. जेणेकरुन लवकरात लवकर या तिन्ही गांवाचे पुनर्वसन करता येईल. आराखडा तयार करताना किती प्रकल्पग्रस्तांना जागा उपलब्ध होत आहेत व किती प्रकल्पग्रस्त शिल्लक रहात आहेत हे वनविभागाच्या आणि वन्यजीव विभागाच्या लक्षात येईल वन्यजीव आणि वनविभागानेही यामध्ये पुढाकार घेवून तात्काळ पुनर्वसनाचे कामासंदर्भात कार्यवाही करावी अशाही सुचना आमदार शंभूराज देसाई यांनी वरील अधिका-यांना केल्या.
चौकट:- पुनर्वसनाचे काम होईपर्यंत या प्रकल्पग्रस्तांना गावात रस्ता व पाणी दयावे.
     सह्याद्री व्याघ्र प्रकल्पबाधित मळे, कोळणे व पाथरपुंज या तीन गावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे काम लवकर पुर्ण होणेच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरु असून जोपर्यंत या गावांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत या गांवाना नादुरुस्त झालेल्या मुलभूत सुविधा असणारे रस्ते व पिण्याच्या पाण्याची योजना या वन्यजीव विभागाकडून करण्यात याव्यात अशा सुचनाही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना अधिका-यांना केल्या.

Thursday, 5 April 2018

महिंद ल पा.तलाव व डेरवण पाझर तलाव गाळमुक्त करणेची कार्यवाही तात्काळ करावी. आमदार शंभूराज देसाईच्या कृष्णा खोरे व सिंचन मंडळाच्या अधिका-यांना सुचना.



          महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत पाटण तालुक्यात ढेबेवाडी विभागामध्ये महिंद लघू पाटबंधारे तलावाचे काम ब-याच वर्षापुर्वी करण्यात आले आहे.तसेच लघू पाटबंधारे विभागाकडून चाफळ विभागामध्ये डेरवण येथे पाझर तलावाचेही काम ब-याच वर्षापुर्वी करण्यात आले असून या तलावांमध्ये मोठया प्रमाणात गाळ साचला असल्याने पाणी साठवण क्षमता कमी होत आहे. दरम्यान राज्य शासनाने गाळमुक्त धरणे या योजनेतंर्गत धरण, तलावातील गाळ काढणे व पाणी साठवण क्षमता वाढविणे ही योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत महिंद ल.पा.व डेरवण पाझर तलावातील गाळ काढून ही तलावे गाळमुक्त करणेची कार्यवाही तात्काळ करावी अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी क़ृष्णा खोरे व सिंचन मंडळाच्या अधिका-यांना बैठकीत केल्या.
          महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत पाटण तालुक्यातील धरण प्रकल्पातील प्रलंबीत प्रश्नांसंदर्भात लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृह, प्रतिक्षालय इमारत तहसिल कार्याल्य पाटण याठिकाणी आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली होती. याप्रसंगी बैठकीस सातारा पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता विजय घोगरे, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, कार्यकारी अभियंता बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी बैठकीत आमदार शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत बांधण्यात आलेल्या ढेबेवाडी विभागातील महिंद लघू पाटबंधारे तलाव तसेच चाफळ विभागातील डेरवण पाझर तलावामध्ये मोठया प्रमाणात गाळ साचला असून साचलेल्या गाळामुळे तलावामध्ये पाणी साठवण क्षमता कमी राहत आहे. उन्हाळयामध्ये या गाळामुळे साचलेले कमी पाणी हे अपुरे पडत असल्याने या दोन्ही तलावातील मोठया प्रमाणात साचलेला गाळ तात्काळ काढून तलांवाची पाणी साठवण क्षमता येत्या दोन महिन्यातच वाढविणे गरजेचे आहे असे सांगून राज्य शासनाने गाळमुक्त धरणे या योजनेतंर्गत धरण, तलावातील गाळ काढणे व पाणी साठवण क्षमता वाढविणे ही योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत धरण, तलावातील गाळ काढणेकरीता जिल्हाधिकारी यांचेमार्फत मेकॅनिक विभागामार्फत आवश्यक असणारी यंत्रणा पुरविण्यात येत असून या यंत्रणेकडून गाळ उकरुन काढणेत येत असून विभागातील ज्या शेतक-यांना हा गाळ आवश्यक आहे त्यांना तो उपलब्ध करुन देणेसंदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे. गतवर्षी आम्ही या दोन्ही तलावातील गाळ हा या दोन्ही विभागातील शेतक-यांनी उचलून न्यावा याकरीता आवश्यक असणारी यंत्रणा पुरविली जाईल असे आवाहन करण्यात आले होते मात्र यास अल्प प्रतिसाद मिळाल्याने या दोन्ही तलावातील गाळ निघाला नाही दोन महिन्यावर पावसाळा येवून ठेपला असून येत्या दोन महिन्यातच महिंद ल.पा.व डेरवण पाझर तलावातील गाळ काढून ही तलावे गाळमुक्त करणेची कार्यवाही करणे आवश्यक आहे याकरीता आता कृष्णा खोरे व सिंचन मंडळ, प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी पुढाकार घेवून गाळमुक्त धरणे या योजनेतंर्गत जिल्हाधिकारी यांचेमार्फत मेकॅनिक विभागामार्फत आवश्यक असणारी यंत्रणा उपलब्ध करुन ही दोन्ही तलाव गाळमुक्त करावीत अशा सुचना त्यांनी यावेळी कृष्णा खोरे व सिंचन मंडळ, प्रांताधिकारी व तहसिलदार यांना दिल्या व या दोन्ही विभागातील शेतक-यांनी ज्यांना त्यांचे शेतीकरीता मातीची आवश्यकता आहे अशा शेतक-यांनी पुढे येवून यंत्रणेमार्फत काढण्यात येणारा गाळ हा आपले शेतीकरीता वापरावा असे आवाहनही त्यांनी या बैठकीत बोलताना केले. सातारा पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता विजय घोगरे, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले यांनी ही कार्यवाही येत्या आठ दिवसातच सुरु करीत असल्याचे आमदार शंभूराज देसाईंना सांगितले.