Wednesday 11 April 2018

कोयना पर्यटन आराखडयाच्या माध्यमातून कोयनानगला होणार पर्यटन विकास. कोयना पर्यटनाचा आराखडा तयार करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.


   महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण व येथील निसर्गसौंदर्य लाभलेल्या कोयनानगर ता.पाटण येथील व कोयनानगरच्या १० किलोमीटर परिसरातील प्रमुख पर्यटन ठिकाणांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करणेकरीता पर्यटन विकास आराखडयास आवश्यक असणारा निधी उपलब्ध होणेकरीता सत्वर संबधित यंत्रणेने हा आराखडा तयार करुन प्रातांधिकारी यांचेमार्फत जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडे सादर करावा अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी अधिका-यांना देवून सदरचा आराखडा हा जिल्हाधिकारी यांचेमार्फत राज्याच्या पर्यटन विभागाकडे मान्यतेकरीता जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोयना पर्यटन विकास आराखडा तयार करुन आराखडयातील कामांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन द्यावा. अशी मागणी आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे केली होती.तसेच तालिका अध्यक्ष म्हणूनही त्यांनी पर्यटनमंत्री यांना अध्यक्ष स्थानावरुन सदरच्या कोयना पर्यटन आराखडयाचे प्रस्ताव मागवून घेवून निधी दयावा असे सुचित करण्यात आले होते. आमदार शंभूराज देसाईंचे मागणीवरुन व तालिका अध्यक्ष म्हणून दिलेल्या निर्देशानुसार पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांनी कोयना पर्यटन विकास आराखडा तात्काळ तयार करुन शासनाला सादर करावा अशा लेखी सुचना जिल्हाधिकारी,सातारा यांना दिल्या आहेत. हा आराखडा तयार करुन तो पर्यटन विभागाकडे सादर करणेकरीता आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोयनानगर येथील कोयना धरण व्यवस्थपनाच्या चेमरी याठिकाणी संबधित अधिकारी यांची बैठक झाली या बैठकीत आमदार शंभूराज देसाई यांनी वरीलप्रमाणे माहिती देवून अधिका-यांना सुचना केल्या.यावेळी बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,वन्यजीवचे सहाययक वनरंक्षक सुरेश सांळूखे,नायब तहसिलदार राजेश जाधव, सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंत खाडे,शाखा अभियंता विश्वास नाईक,मधूकर सुर्वे यां अधिका-यांसह शिवसेना उपजिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,अशोकराव पाटील, माजी पंचायत समिती  हरीष भोमकर, शैलेंद्र शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.
    याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई म्हणाले, कोयना पर्यटन आराखडयाच्या माध्यमातून कोयनानगरला पर्यटन विकास होणेकरीता अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी राज्याचे पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे मी मागणी केली होती माझे मागणीवरुन हा आराखडा सादर करण्याच्या लेखी सुचना जिल्हाधिकारी सातारा यांना केल्या आहेत दि.०६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांचेसोबत सदरचा आराखडा तयार करणेसंदर्भात चर्चाही झाली आहे त्यानुसार संबधित यंत्रणांनी हा आराखडा तयार करुन तो  प्रातांधिकारी यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावयाचा असून जिल्हाधिकारी हा आराखडा राज्याच्या पर्यटन विभागाकडे सादर करणार आहेत. सदरचा आराखडा प्राप्त होताच राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून आवश्यक असणारा निधी देण्याचे राज्याचे पर्यटन मंत्री यांनी मला आश्वासित केले आहे असे सांगून आमदार शंभूराज देसाई यांनी आराखडयात समाविष्ठ करावयाच्या कामांचा सविस्तर आढावा घेवून यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची सुधारणा करावयाची आहे यासंदर्भात त्यांनी अधिका-यांना सुचना केल्या. आराखडयात एकूण १५ विविध कामांना निधी मिळणेकरीता मागणी करण्यात आली असून संबधित यंत्रणा यांनी कोणकोणती कांमे करावयाची यांचे अंदाजपत्रक तयार करुन करावयाची कामे याचा तपशिल याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात यावा असे त्यांनी यावेळी सुचित केले. त्यानुसार संबधित सर्व शासकीय यंत्रणांनी येत्या दोन महिन्यात पर्यटन विकासाकरीता मागणी करण्यात आलेल्या कामांचे सविस्तर प्रस्ताव व अंदाजपत्रके तयार करुन ती प्रातांधिकारी यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करणेकरीताचा कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन संबधित अधिका-यांनी आमदार शंभूराज देसाईंना यावेळी दिल्या.
चौकट:- मुख्यमंत्रयांचा निर्णय माझे तीन वर्षाच्या प्रयत्नांचे फलित. आमदार शंभूराज देसाई.
     मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे आदेशावरुनच राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी स्वत: मला सोबत घेवून धरणाच्या सुरक्षिततेच्या मर्यादीत बोटींग स्पॉटची हवाई तसेच प्रत्यक्ष जागेवर जावून पहाणी केली आहे.मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झालेल्या बैठकीत कोयना पर्यटन विकास आराखडयातील कामांना निधी देणे व कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये पर्यटकांना बोटींग करणेकरीता धरणाच्या सुरक्षिततेच्या मर्यादीत बोटींग स्पॉट जलाशयाशेजारी विकसित करणे हे मुख्यमंत्री यांनी घेतलेले निर्णय हे माझे तीन वर्षाच्या प्रयत्नांचे फलित असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment