मनरेगा योजनेतंर्गत सातारा जिल्हयात सर्वाधिक पाटण
तालुक्यात मार्च २०१८ अखेर तालुक्यातील ५० गांवामध्ये स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते तसेच
ग्रामीण भागात शेताकडे जाणारे शिवारातील पाणंद रस्त्यांची कांमे पुर्ण करण्याचे उदिष्ट
आपण ठरविले होते या ५० पैकी ११ कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली असून पावसाळयापुर्वी
एकूण ३७ कामे ही पुर्णत्वाकडे जाणार आहेत.एक दोन कामांमध्ये अडचणी असून तेथील समस्या
या प्रातांधिकारी व तहसिलदार यांनी सामोपचाराने मिटवाव्यात व त्यानुसार ५० गावातील
या कामांचे उदीष्ट पुर्ण करण्याकरीता या योजनेमध्ये सहभागी असणा-या सर्व यंत्रणांनी
पुढाकार घ्यावा अशा सुचना आमदार शंभूराज देसाई यांनी अधिकारी यांना करुन या योजनेमध्ये
कामे करायच्या गावांमधील वाडीवस्तीमधील सर्व ग्रामस्थांनी गटतट पक्ष न पहाता सहभागी
होवून त्यांनी आपल्या गावाचा विकास साधून घेणेकरीता गांवामध्ये एकी निर्माण करावी असे
आवाहन त्यांनी केले आहे.
मनरेगा योजनेतंर्गत पाटण तालुक्यात प्रामुख्याने
स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते तसेच ग्रामीण भागात शेताकडे जाणारे शिवारातील पाणंद रस्त्यांची
कांमे पुर्णत्वाकडे नेणेकरीता आमदार शंभूराज देसाई व रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी
संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जानेवारीच्या पहिल्या आठवडयामध्ये बैठक आयोजीत
करण्यात आली होती.या बैठकीत पाटण तालुक्यातील ५० गावांमध्ये मनरेगा योजनेतंर्गत स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते व पाणंद रस्त्यांची
कांमे पुर्णत्वाकडे नेण्याचे उदिष्ट ठरविण्यात आले होते. त्या कामांचा आढावा आमदार
शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, पाटण येथे घेण्यात आला यावेळी
बैठकीस पाटणचे तहसिलदार रामहरी भोसले, लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटणचे
गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, सार्वजनीक बांधकाम उपविभाग, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग,
पाणी पुरवठा उपविभागाचे अभियंता, सर्व शाखा अभियंता, विविध गावचे सरपंच, उपसरंपच, ग्रामपंचायत
सदस्य,ग्रामविस्तार अधिकारी,ग्रामसेवक, महसूल विभागाचे मंडलाधिकारी, तलाठी यांची प्रमुख
उपस्थिती होती.
आढावा बैठकीमध्ये सदर कामांची माहिती घेतल्यानंतर
आमदार शंभूराज देसाई म्हणाले, पाटण या डोंगरी तालुक्यातील स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते
तसेच ग्रामीण भागात शेताकडे जाणारे शिवारातील पाणंद रस्त्यांची कांमे मोठया प्रमाणात
प्रलंबीत होती ही कामे प्रामुख्याने करणे गरजेचे असल्याचे ओळखून मनरेगा योजनेतंर्गत
की कामे करण्यात यावी याकरीता आपण सर्वजण प्रयत्न करीत आहोत. तालुक्यातील ५० गांवामध्ये
स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते तसेच ग्रामीण भागात शेताकडे जाणारे शिवारातील पाणंद रस्त्यांची
कांमे पुर्ण करण्याचे उदिष्ट आपण ठरविले होते त्यानुसार आजच्या आढाव्यामध्ये एकूण ३७
कामे ही पावसाळयापुर्वी पुर्ण होतील अशी आशा आहे. मनरेगा योजनेतंर्गत महसूल आणि ग्रामविस्तार
अधिकारी तसेच ग्रामसेवकांचा पुढाकार महत्वाचा आहे. स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते असो
वा शेताकडे जाणारे शिवारातील पाणंद रस्त्यांचे कांम असो याचा उपयोग गावातील वाडीवस्तीतील
सर्व ग्रामस्थांनाच होत असतो त्यामुळे ग्रामस्थांनी या योजनेत सहभाग घेणे गरजेचे आहे.
दरम्यान मागील बैठकीत काही सरंपच मंडळीनी पाण्ंद रस्त्याच्या कामांमध्ये अडथळे आणण्याचा
प्रयत्न होतो अशा सुचना केल्या होत्या त्यामध्ये महसूल विभागाने पुढाकार घेवून अशा
समस्या सोडवाव्यात असे सांगून सर्वांच्या सहभागामुळे ग्रामीण आणि डोंगरी तालुक्यातील
ही कामे येत्या पावसाळयापुर्वी मार्गी लावावीत अशाही सुचना त्यांनी यावेळी बोलताना
अधिका-यांना केल्या. प्रांरभी आमदार शंभूराज देसाई यांचे वहया देवून स्वागत करण्यात
आले.
No comments:
Post a Comment