नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी
पक्षाच्यावतीने मी अंतिम आठवडा प्रस्तावाची विधानसभा सभागृहात सुरुवात करताना सह्याद्री
व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमधील मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गांवाचे शासनाने
तात्काळ पुनर्वसन करावे अशी मागणी मी शासनाकडे केली होती शासनानेही या गावातील बाधित
प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन तात्काळ करण्याचे आश्वासन दिले आहे. या तिन्ही गांवातील
बाधित प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे पाटण तालुक्यातच पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे.वन
विभागानेही या प्रकल्पग्रस्तांना पाटण तालुक्यातील उपलब्ध वनजमिनी पुनर्वसनाकरीता दाखविल्या
आहेत त्यानुसार प्रकल्पग्रस्तांनी लवकरात लवकर पुनर्वसनाच्या जागा पंसत कराव्यात असे
आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमधील
मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गांवाचे पुनर्वसन तात्काळ करणेसंदर्भात आमदार शंभूराज
देसाई यांचे अध्यक्षतेखाली लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृह,प्रतिक्षालय इमारत तहसिल
कार्यालय,पाटण याठिकाणी बैठक आयोजीत करण्यात आली होती.याप्रसंगी बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे
आवाहन केले. बैठकीस सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक श्रीमती विनिता व्यास,
प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, सहाययक वनसरंक्षक कोयना सुरेश
साळुंखे,सहाययक वनसरंक्षक चांदोली राजकुमार विधाते,गटविकास अधिकारी संजीव गायकवाड,माजी
पंचायत समिती सदस्य हरीश भोमकर, संजय पवार व प्रकल्पग्रस्त यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बैठकीत आमदार शंभूराज देसाई यांनी प्रथमत:
मळे, कोळणे व पाथरपुंज येथील व्याघ्र प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांकडून पुनर्वसनासंदर्भात
सविस्तर अशी माहिती घेवून वन्यजीव विभागाकडून या तिन्ही गांवाच्या पुनर्वसना संदर्भात
कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत याविषयी उपसंचालक श्रीमती विनिता व्यास, सहाययक वनसरंक्षक
चांदोली राजकुमार विधाते यांचेकडून माहिती घेतली.यावेळी बोलताना आमदार शंभूराज देसाई
म्हणाले,नुकतेच महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले या अधिवेशनात
सत्ताधारी पक्षाच्या वतीने अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात आला याची सुरुवात सत्ताधारी
पक्षाच्या वतीने करताना मी पाटण तालुक्यातील मळे,कोळणे व पाथरपुंज ही तीन गांवे सह्याद्री
व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये बाधित असून त्यांचे पुनर्वसन तात्काळ करणे गरजेचे
असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली यावर शासनाने या तीन गांवाचे तात्काळ पुनर्वसन
करण्याच्या हालचाली सुरु असून लवकरच या गावाचे पुनर्वसन योग्य ठिकाणी करण्यात येईल
असे मला आश्वासन दिले आहे.या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयीन स्तरावर बैठकही घेण्यात
येणार आहे.त्याचा प्राथमिक आराखडा तयार करुन पुर्नवसनाकरीता आवश्यक असणा-या जागेसंदर्भात
निर्णय घेणेकरीता सविस्तर प्रस्ताव शासनाकडे लवकरात लवकर सादर होणे गरजेचे आहे.वन्यजीव
व वनविभागाकडून या गावाच्या पुनर्वसनाकरीता पुढाकार घेतला असून प्रकल्पग्रस्तांनीही
लवकरात लवकर पाटण तालुक्यात वन विभागाने दाखविलेल्या वनविभागाच्या पुनर्वसनाच्या जागा
पसंत कराव्यात मळे येथील प्रकल्पग्रस्तांनी बहूले याठिकाणी पाथरपुंज येथील प्रकल्पग्रस्तांनी
मारुलहवेली, सोनाईचीवाडी, मल्हारपेठ या विभागातील तर कोळणे येथील प्रकल्पग्रस्तांनी
कराड तालुक्यातील हेळगांव व खराडे येथील जागांना पंसती दिली असल्याचे प्रकल्पग्रस्तांकडून
सांगण्यात येत आहे. यातील काही ठिकाणी संबधित जागा दाखविलेल्या गांवानी या प्रकल्पग्रस्तांच्या
पुनर्वसनाकरीता अद्यापही सहमती दर्शविली नाही त्यामुळे वनविभागाने पाटण तालुक्यात इतर
ठिकाणी कुठे वनविभागाच्या जागा शिल्लक आहेत त्या जागा या गावातील प्रकल्पग्रस्तांना
लवकरात लवकर दाखविण्यात याव्यात व या तिन्ही गावातील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाकरीता
तसेच कसण्याकरीता त्या त्या ठिकाणी किती जागा उपलब्ध करुन देता येतील याचा सविस्तर
आराखडा तयार करावा. जेणेकरुन लवकरात लवकर या तिन्ही गांवाचे पुनर्वसन करता येईल. आराखडा
तयार करताना किती प्रकल्पग्रस्तांना जागा उपलब्ध होत आहेत व किती प्रकल्पग्रस्त शिल्लक
रहात आहेत हे वनविभागाच्या आणि वन्यजीव विभागाच्या लक्षात येईल वन्यजीव आणि वनविभागानेही
यामध्ये पुढाकार घेवून तात्काळ पुनर्वसनाचे कामासंदर्भात कार्यवाही करावी अशाही सुचना
आमदार शंभूराज देसाई यांनी वरील अधिका-यांना केल्या.
चौकट:- पुनर्वसनाचे काम होईपर्यंत
या प्रकल्पग्रस्तांना गावात रस्ता व पाणी दयावे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पबाधित मळे, कोळणे व
पाथरपुंज या तीन गावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे काम लवकर पुर्ण होणेच्या दृष्टीने
शासनाचे प्रयत्न सुरु असून जोपर्यंत या गावांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत या गांवाना
नादुरुस्त झालेल्या मुलभूत सुविधा असणारे रस्ते व पिण्याच्या पाण्याची योजना या वन्यजीव
विभागाकडून करण्यात याव्यात अशा सुचनाही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना अधिका-यांना
केल्या.
No comments:
Post a Comment