Thursday 5 April 2018

महिंद ल पा.तलाव व डेरवण पाझर तलाव गाळमुक्त करणेची कार्यवाही तात्काळ करावी. आमदार शंभूराज देसाईच्या कृष्णा खोरे व सिंचन मंडळाच्या अधिका-यांना सुचना.



          महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत पाटण तालुक्यात ढेबेवाडी विभागामध्ये महिंद लघू पाटबंधारे तलावाचे काम ब-याच वर्षापुर्वी करण्यात आले आहे.तसेच लघू पाटबंधारे विभागाकडून चाफळ विभागामध्ये डेरवण येथे पाझर तलावाचेही काम ब-याच वर्षापुर्वी करण्यात आले असून या तलावांमध्ये मोठया प्रमाणात गाळ साचला असल्याने पाणी साठवण क्षमता कमी होत आहे. दरम्यान राज्य शासनाने गाळमुक्त धरणे या योजनेतंर्गत धरण, तलावातील गाळ काढणे व पाणी साठवण क्षमता वाढविणे ही योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत महिंद ल.पा.व डेरवण पाझर तलावातील गाळ काढून ही तलावे गाळमुक्त करणेची कार्यवाही तात्काळ करावी अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी क़ृष्णा खोरे व सिंचन मंडळाच्या अधिका-यांना बैठकीत केल्या.
          महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत पाटण तालुक्यातील धरण प्रकल्पातील प्रलंबीत प्रश्नांसंदर्भात लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृह, प्रतिक्षालय इमारत तहसिल कार्याल्य पाटण याठिकाणी आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली होती. याप्रसंगी बैठकीस सातारा पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता विजय घोगरे, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, कार्यकारी अभियंता बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी बैठकीत आमदार शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत बांधण्यात आलेल्या ढेबेवाडी विभागातील महिंद लघू पाटबंधारे तलाव तसेच चाफळ विभागातील डेरवण पाझर तलावामध्ये मोठया प्रमाणात गाळ साचला असून साचलेल्या गाळामुळे तलावामध्ये पाणी साठवण क्षमता कमी राहत आहे. उन्हाळयामध्ये या गाळामुळे साचलेले कमी पाणी हे अपुरे पडत असल्याने या दोन्ही तलावातील मोठया प्रमाणात साचलेला गाळ तात्काळ काढून तलांवाची पाणी साठवण क्षमता येत्या दोन महिन्यातच वाढविणे गरजेचे आहे असे सांगून राज्य शासनाने गाळमुक्त धरणे या योजनेतंर्गत धरण, तलावातील गाळ काढणे व पाणी साठवण क्षमता वाढविणे ही योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत धरण, तलावातील गाळ काढणेकरीता जिल्हाधिकारी यांचेमार्फत मेकॅनिक विभागामार्फत आवश्यक असणारी यंत्रणा पुरविण्यात येत असून या यंत्रणेकडून गाळ उकरुन काढणेत येत असून विभागातील ज्या शेतक-यांना हा गाळ आवश्यक आहे त्यांना तो उपलब्ध करुन देणेसंदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे. गतवर्षी आम्ही या दोन्ही तलावातील गाळ हा या दोन्ही विभागातील शेतक-यांनी उचलून न्यावा याकरीता आवश्यक असणारी यंत्रणा पुरविली जाईल असे आवाहन करण्यात आले होते मात्र यास अल्प प्रतिसाद मिळाल्याने या दोन्ही तलावातील गाळ निघाला नाही दोन महिन्यावर पावसाळा येवून ठेपला असून येत्या दोन महिन्यातच महिंद ल.पा.व डेरवण पाझर तलावातील गाळ काढून ही तलावे गाळमुक्त करणेची कार्यवाही करणे आवश्यक आहे याकरीता आता कृष्णा खोरे व सिंचन मंडळ, प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी पुढाकार घेवून गाळमुक्त धरणे या योजनेतंर्गत जिल्हाधिकारी यांचेमार्फत मेकॅनिक विभागामार्फत आवश्यक असणारी यंत्रणा उपलब्ध करुन ही दोन्ही तलाव गाळमुक्त करावीत अशा सुचना त्यांनी यावेळी कृष्णा खोरे व सिंचन मंडळ, प्रांताधिकारी व तहसिलदार यांना दिल्या व या दोन्ही विभागातील शेतक-यांनी ज्यांना त्यांचे शेतीकरीता मातीची आवश्यकता आहे अशा शेतक-यांनी पुढे येवून यंत्रणेमार्फत काढण्यात येणारा गाळ हा आपले शेतीकरीता वापरावा असे आवाहनही त्यांनी या बैठकीत बोलताना केले. सातारा पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता विजय घोगरे, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले यांनी ही कार्यवाही येत्या आठ दिवसातच सुरु करीत असल्याचे आमदार शंभूराज देसाईंना सांगितले.



No comments:

Post a Comment