मतदारसंघातील
जनतेने आमदार म्हणून निवडून देवून माझे आमदारकीला साडेतीन वर्षे पुर्ण झाली. मतदारसंघाचा
आमदार म्हणून मतदारसंघातील विविध भागात आज मतदारसंघातील जनतेच्या डोळयाला दिसतील अशी
विकासकामे सुरु आहेत. आपल्या माध्यमातून सुरु असणारी विविध विकासकामे मतदारसंघातील
जनतेच्या डोळयाला दिसत आहेत पण विरोधकांना ती दिसत नाहीत. विरोधकांकडून डोळेझाक होत
असल्याने विरोधकांना ती दिसणारच नाहीत आणि त्यांना ती दिसावीत अशी अपेक्षाही करणे चुकीचे
असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी करुन मी मंजुर करुन आणलेली विविध विकासकांमे
ही जनतेच्या डोळयांना दिसत आहेत यातच मला समाधान मिळत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
कोयनानगर विभागातील ढोकावळे ता.पाटण येथे जिल्हा
नियोजन समितीच्या माध्यमातून सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात विशेष घटक योजनेतंर्गत मागासवर्गीय
वस्तीकडे जाणा-या रस्त्यावर साकव पुल बांधणे या कामाचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाई
यांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. या साकव पुलाच्या कामांसाठी आमदार
शंभूराज देसाईंनी ३४ लाख ७२ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख
जयवंतराव शेलार,शिवदौलत बॅकेचे संचालक अशोकराव पाटील, माजी पंचायत समिती हरीष भोमकर,
धोंडीराम भोमकर,शैलेंद्र शेलार, नारायण विचारे, नथूराम सावंत, अशोक पाटील तळीयेकर,बबनराव
भिसे, शाखा अभियंता महाजन या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,
गत साडेतीन वर्षात युतीच्या शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन जनतेच्या मुलभूत सुविधा
असणारी प्रलंबीत कामे मार्गी लावणेकरीता मी निधी मंजुर करुन आणत आहे. मी मंजुर करुन
आणलेला निधी आणि त्या निधीतून करावयाची कामे ही मतदारसंघातील जनतेच्या डोळयाला दिसत
आहे मात्र आपले पारंपारिक विरोधक डोळयावर पट्टी बांधून तालुक्यात फिरत असल्याने कुठ
आहेत कांमे कुठ आहेत कांमे म्हणून टिका करीत सुटले आहेत. आपले माध्यमातून मोठया प्रमाणात
सुरु असणारी विविध विकासकामे विरोधकांना दिसत नाहीत असे त्यांचे म्हणणे असल्याने ही
कामे पहायची असतील तर समोरासमोर या असे मी अनेकदा त्यांना आवाहन देखील देत आहे पण माझे
आव्हान ते स्विकारत नाहीत. आपली कांमे मतदारसंघातील जनतेला दिसत आहेत यातच मला समाधान
मिळत असून डोळेझाक करुन टिका करणा-या विरोधकांना ती दिसत नाहीत हे आपले नाही परंतू
विरोधकांचे दुर्दैव म्हणावे लागेल.आपली कामे विरोधकांना दिसावीत अशी त्यांच्याकडून
अपेक्षाही करणे चुकीचे आहे स्वत:च्या हातात अनेक वर्षे आमदारकी असताना विरोधकांना काहीही
करता आले नाही आणि आज एवढी कामे सुरु असताना कामे दिसत नाहीत असे विरोधकांकडून सांगितले
जात असले तरी मतदारसंघातील जनता आता सुज्ञ झाली आहे कोण विकासकामे मंजुर करुन आणतो
आणि कोण केवळ दिशाभूल व थापा मारण्याचे काम करतोय हे मतदारसंघातील जनतेने आता चांगलेच
ओळखले आहे. आजचेच उदाहरण घ्या आज कोयना विभागात तीन गावात अशाच प्रकारे ३५ -३५ लाखांच्या
तीन साकव पुलांचे भूमिपुजन करण्यात आले याची एकूण रक्कम १ कोटी रुपयांच्या वर आहे.
त्यामुळे टिका करणा-या विरोधकांकडे जसे मी लक्ष देत नाही तसे तुम्ही जनतेनेही लक्ष
देवू नये. आपल्यावर मतदारसंघातील मतदारांनी जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पुर्णपणे
पार पाडण्याचे काम मी गत साडेतीन वर्षात केले आणि यापुढेही करीत राहणार.विरोधकांच्या
हातात सध्या काही देण्यासारखे नसल्याने ते आता सैरभैर झाले आहेत. असे सांगून ते म्हणाले,
विधानसभेच्या निवडणूकीत मते मागायला आल्यानंतर मतदारांना जी जी आश्वासने मी दिली होती
त्या आश्वासनांची पुर्तता गेल्या साडेतीन वर्षात करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला
आहे. जी काही प्रलंबीत विकासकामे करावयाची आहेत त्याकरीता आवश्यक असणारा निधी शासनाकडून
मंजुर करुन आणणेकरीता मी कटीबध्द आहे.असे त्यांनी सांगितले. यावेळी जयंवतराव शेलार,
अशोकराव पाटील यांची भाषणे झाली उपस्थितांचे स्वागत व आभार नारायण विचारे यांनी मानले.
चौकट:- ढोकावळे रिसवड रस्ता एवढया वर्षात का होवू शकला नाही?
माजी आमदारांकडे एवढया वर्षे तालुक्याची आमदारकी
होती त्यांना ढोकावळे रिसवड गांवाला जोडणारा रस्ता आमदार आणि सार्वजनीक बांधकाम मंत्री
असताना करता आला नाही.तो मी आमदार झालेनंतर या रस्त्याच्या कामाला कोयना पुर्नवसित
गावठाणांना नागरी सुविधा पुरविणे यातून मंजुर करुन आणला यातील गावाला जोडणारा निम्मा
रस्ता पुर्ण झाला असून उर्वरीत राहिलेल्या रस्त्याच्या कामासाठी ५२ लाख रुपयांचा निधी
मंजुर करुन आणला आहे. मात्र ढोकावळे रिसवड रस्ता एवढया वर्षात का होवू शकला नाही हे
विरोधकांना आपण कधी विचारणार आहोत की नाही? असेही आमदार देसाई यावेळी म्हणाले.
No comments:
Post a Comment