पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध
गावांतील अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते, बहुउद्देशीय सभागृह, सभामंडप,ग्रामपंचायत
कार्यालय व नळ पाणी पुरवठा योजना इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये शासनाचे २५१५ योजने
अंतर्गत ०२ कोटी ३५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शंभूराज
देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत त्यांनी पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा
मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,बहुउद्देशीय
सभागृह,सभामंडप,ग्रामपंचायत कार्यालय व नळ पाणी पुरवठा योजना इत्यादी विविध
विकासकामांकरीता सन २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये शासनाचे २५१५ योजनेअंतर्गत निधी
मंजूर होणेबाबत शासनाचे ग्रामविकास विभागाकडे व ग्रामीण विकास मंत्री यांचेकडे
दि.१८.०८.२०१७ रोजी मागणी केलेली होती. त्यानुसार सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी
लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभुत सुविधा पुरविणे या
योजनेअंतर्गत अनुदान वितरणाबाबत ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडील दि. ३१
मार्च, २०१८ रोजीचे शासन निर्णयानुसार २५१५ योजनेअंतर्गत पाटण विधानसभा
मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,बहुउद्देशीय सभागृह,सभामंडप,
ग्रामपंचायत कार्यालय व नळ पाणी पुरवठा योजना इत्यादी एकूण २२ विविध विकास
कामांकरीता ०२ कोटी ३५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सन २०१७-१८ च्या २५१५
योजनेअंतर्गत मंजूर झालेली विकासकामामध्ये जळव खिंड
ते जांभेकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे
१० लक्ष, वाझोली रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे १० लक्ष, भैरवदरा कुंभारगाव
ते यादववस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १० लक्ष, चोरगेवाडी कुंभारगाव ते
पोतेकरवाडी कुंभारगाव रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे १० लाख,गलमेवाडी मधील आळी
अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे १० लक्ष, मारुलहवेली अंतर्गत रस्ता
खडीकरण, डांबरीकरण करणे २० लक्ष, गुंजाळी अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे
१० लक्ष, मरळी येथील अंतर्गत रस्ते खडीकरण,डांबरीकरण करणे २० लक्ष, बहुले अंतर्गत
रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे १० लक्ष, तारळे येथील नाभिक समाजाकरीता बहुउद्देशीय
सभागृह बांधणे १० लक्ष, बेलदरे ता. कराड येथील अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण
करणे १० लक्ष, मानेगाव ता.पाटण येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणे १० लक्ष,
नाईकबावस्ती शिंदेवाडी येथे पिण्याच्या पाण्याची योजना करणे. १० लक्ष,सुतारवस्ती
कुसरुंड येथे पिण्याच्या पाण्याची योजना करणे. १० लक्ष,पिटेवाडी मणदुरे येथे
पिण्याच्या पाण्याची योजना करणे. १० लक्ष, भातडेवाडी जिंती येथे पिण्याच्या
पाण्याची योजना करणे १० लक्ष,सुपुगडेवाडी येथे पिण्याच्या पाण्याची योजना करणे १०
लक्ष,तोंडोशी ता. पाटण येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे १० लक्ष,तोंडोशी ता. पाटण
येथे रामघळ रस्ता डांबरीकरण व स्मशानभूमी रस्ता सुधारणा १५.०० लक्ष, गमेवाडी ता.
कराड अंतर्गत रस्ता गटर व काँक्रीटीकरण करणे १० लक्ष, गमेवाडी ता. कराड सभामंडप
बांधणे ०५.०० लाख व गमेवाडी ता. कराड स्मशानभूमी संरक्षक भिंत व सुशोभिकरण करणे
०५.०० लाख या विकासकामांचा समावेश असून या कामांना एकूण २ कोटी ३५ लक्ष रुपयांचा
निधी मंजूर झाला असून सन २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये २५१५ योजनेअंतर्गत मंजूर
झालेल्या या विकास कामांची सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद पाणी पुरवठा
विभाग यांचेकडून निविदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने या विविध विकास कामांना
सुरुवात होणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment