Wednesday 11 April 2018

जलयुक्त शिवार योजनेतंर्गत ओढेनाले जोड प्रकल्प हाती घ्यावा. आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवारची बैठक संपन्न.


   जलयुक्त शिवार योजनेतंर्गत डोंगरपठारावरील टंचाईग्रस्त गांवाच्या निवडी करुन या गांवामध्ये तसेच वाडयावस्त्यांमध्ये या योजनेतून करावयाच्या कामांची प्रत्यक्ष पहाणी करुन या कामांचे प्रस्ताव हे मंजुरीकरीता लवकर लवकर सादर करावेत तसेच याच योजनेतंर्गत डोंगर पठारावरुन पावसाळयामध्ये मोठया प्रमाणात वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्याकरीता ओढे नाले जोडणे हा प्रकल्प संबधित यंत्रणानी प्रत्यक्ष स्थळपहाणी करुन हाती घ्यावा अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी जलयुक्त शिवार योजनेशी संबधित असणा-या तालुकास्तरीय अधिका-यांना दिल्या.
    आमदार अध्यक्ष असलेल्या जलयुक्त शिवार योजना समितीची आढावा बैठक आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालय पाटण याठिकाणी आयोजीत केली होती. यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी वरीलप्रमाणे सुचना केल्या. या समितीमध्ये विशेष आमंत्रित असणारे विधानपरिषद आमदार नरेंद्र पाटील तसेच पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर, तहसिलदार रामहरी भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी पाटील, पाटण वनसंरक्षक विलास काळे, पाणी पुरवठा उपअभियंता आर व्ही पाटील यांच्यासह या योजनेतंर्गत काम करणारे सर्व अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
    याप्रसंगी सुरवातीस अध्यक्ष आमदार शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघात सन २०१६-१७, २०१७-१८ या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार योजनेतंर्गत कृषी,लघू पाटबंधारे विभाग,पाणी पुरवठा विभाग, वनविभाग या विभागामार्फत करण्यात आलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच सन २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार योजनेतंर्गत समाविष्ठ करावयाच्या डोंगरपठारावरील गांवाचा, वाडयावस्त्यांच्या निवडी करण्यात आल्या. सन २०१८-१९ करीता जलयुक्त शिवार योजनेतंर्गत वनकुसवडे, बामणेवाडी (भांबे),पाठवडे, चव्हाणवाडी (नानेगांव),धसगांव- जंगमवाडी, शिद्रुकवाडी कोरीवळे, माईगंडेवाडी जिंती, आंब्रुकरवाडी भोसगांव, गायमुखवाडी बांबवडे, धडामवाडी केरळ, कडवे बु//, कडवे खुर्द, जळव,तामिणे, मस्करवाडी काळगांव, राहूडे  या सोळा गांवाचा व वाडयावस्त्यांच्या निवडी करण्यात आल्या असून सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात या गांवामध्ये व वाडयावस्त्यांमध्ये जलयुक्तमधून कामे करण्यात येणार आहेत. दरम्यान सन २०१६-१७, २०१७-१८ या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार योजनेतंर्गत कृषी,लघू पाटबंधारे विभाग,पाणी पुरवठा विभाग, वनविभागाने कोणकोणती कामे केली या कामांच्या माध्यमातून किती प्रमाणात पाण्याची निर्माण होणारी टंचाई दुर झाली तसेच या कामांच्या माध्यमातून किती टीसीएम ने पाण्याच्या क्षमतेत वाढ झाली याचा सविसतर आढावा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, गतवर्षी डोंगरपठारवरील गावांमध्ये तसेच वाडयावस्त्यांमध्ये पावसाळयाचे डोंगरपठारावरुन वाहून जाणारे पाणी अडविणेकरीता जलयुक्त शिवार योजनेतंर्गत कामे हाती घेण्यात यावीत याकरीता माझा सातत्याने शासनाकडे आग्रह होता त्यानुसार गतवर्षी आपण पाटण तालुक्यातील डोंगरपठारावरील एकूण १९ गांवे व वाडयावस्त्यांमध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे केली या कामांमुळे डोंगरपठारावरील पावसाचे वाहून जाणारे पाणी डोंगरपठारावरच साठवून ठेवण्यास आपल्याला यश मिळाले यामुळे आज या उन्हाळयात डोंगरपठारावरील केवळ देान ते तीनच गांवाना पाण्याचा टँकर दयावा लागणार आहे. अशाप्रकारे आपल्े तालुक्यातील डोंगरपठारावरुन पावसाळयात ओढे नाले याच्यातून मुख्य नदयांना वाहून जाणारे पाणी आडवून ठेवणेकरीता ओढे नाले जोड प्रकल्प या योजनेच्या माध्यमातून हाती घ्यावा याकरीता संबधित यंत्रणांनी अशा ठिकाणांची प्रत्यक्ष जावून पहाणी करावी व याठिकाणी आडवे पाट सिमेंट बंधारे बांधणे अशा प्रकारची कामे करावित जेणेकरुन पावसाळयातील पाणी या ओढेनाले जोडप्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला अडवून ठेवता येईल अशाही सुचना त्यांनी यावेळी बोलताना अधिका-यांना दिल्या.
चौकट:- बैठकीकरीता उपस्थितांचीच चर्चा जास्त
  जलयुक्त शिवार योजना समितीच्या अध्यक्षपदी तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार शंभूराज देसाई हे असून ते स्वत: त्यांच्यासोबत या समितीकरीता विशेष आमंत्रित म्हणून राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य आमदार नरेंद्र पाटील आणि या बैठकीला मलाही बोलवा असे सांगणारे पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर हे तिघे तहसिल कार्यालयात एकत्र आल्याने या बैठकीकरीता उपस्थित असणा-या या मान्यवरांचीच चर्चा जास्त पहावयास मिळाली.


No comments:

Post a Comment