Friday, 1 March 2019

पावसाळयात छत्र्या उगवतात तसे निवडणूकीत उगवणाऱ्यांना बाजुलाच ठेवा. आमदार शंभूराज देसाईंचे जनतेला आवाहन.






दौलतनगर दि.०2:- 2009 च्या विधानसभा निवडणूकीत 580 मतांनी पराभूत झालो तरी याचा दोष मी माझ्या कार्यकर्त्यांना किंवा मतदारांना दिला नाही माझ्या नशिबात 2009 ला आमदारकी नव्हती असे समजून पराभवाच्या दुसऱ्या दिवशी मला मते दिलेल्या व न दिलेल्यांही मतदारांचे आभार मानायला तालुकाभर फिरत होतो.सलग पाच वर्षे जनतेच्या सुखदु:खात सहभागी होत होतो अवस,पुणवेला मतदारांना दिसलो नाही तर कायम जनतेत राहिलो म्हणूनच जनतेने मला 2014 ला पुन्हा आमदार केले. 2009 ची चुक जनतेच्या लक्षात आली.2014 ला पराभूत झालेले माजी आमदारपुत्र आले का तुमचे आभार मानायला,नसतीलच आले.आता निवडणूक आलीय त्यामुळे येतील कदाचित परंतू पाटण मतदारसंघातील जनतेला मला आवाहन करायचे आहे पावसाळयात छत्र्या उगवतात तसे निवडणूकीत केवळ मतापुरते उगवणाऱ्यांना जनतेने जसे आपण त्या छत्र्यांकडे दुर्लक्ष करतो तसेच यांच्याकडेही दुर्लक्ष करुन बाजूलाच ठेवावे असे आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी केले.             
               उधवणे ता.पाटण येथे पोहोच रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आ.शंभूराज देसाईंच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते या विभागातील सळवे,सदुवर्पेवाडी,बनपुरी येथील रस्त्यांच्या कामांचेही भूमिपुजन करण्यात आले या चार कामांकरीता आ.देसाईंनी १ कोटी ५२ लाख ५० हजारांचा निधी मंजुर करुन दिला आहे.याप्रंसगी लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, पंचायत समितीचे माजी उपसभापती डी.आर.पाटील,पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,सदस्या सौ.सीमा मोरे,मोरणा शिक्षण संस्थेचे सदस्य दिलीपराव जानुगडे, रामभाऊ साळुंखे,नारायण कारंडे,टी.डी.जाधव,शिवाजीराव शेवाळे,रणजित पाटील,अंकुश महाडिक, नानासो साबळे,मनोज मोहिते,कारखान्याचे संचालक वसंतराव कदम,विकास गिरी गोसावी,शिवसेना तालुकाप्रमुख सचिन जाधव,ज्योतिराज काळे,पांडुरंग साळुंखे,संतोष साळुंखे,संजय पाटील,बाबा मोकाशी,शंकर कुंभार,कैलास साळुंखे,शिवाजी पवार,नानासो पाटील,एकनाथ जाधव,दगडू सुतार,मनोहर निकम,अंकुश साळुंखे,दिनकर साळुंखे,या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्ते तसेच नागरिक व महिला यांची प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी आ.देसाई म्हणाले,पाटण मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून साडेचार वर्षात शासनाची अशी एकही योजना शिल्लक राहिली नाही ज्या योजनेतून पाटण मतदारसंघात विकासाचे काम आणले नाही.केद्रांपासून राज्य शासन व जिल्हास्तर ते तालुकास्तर येथे राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेतून मतदारसंघातील विकासाच्या कामांकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर करुन आणायचे काम केले.मतदारसंघातील जनतेला माजी आमदारांच्या काळात यातील बऱ्याचशा योजना माहितीही नव्हत्या त्या योजनांमधून आपण मतदारसंघातील रस्त्यांच्या,पुलांच्या, छोटया पुलांच्या,पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या, जनतेच्या हिताच्या सार्वजनीक कामांच्याकरीता भरघोस असा निधी मंजुर करुन आणला.उधवणे गांवाचेच उदाहरण घ्या या गांवातील रस्त्याकरीता दोन दोन योजनेतून निधी मंजुर करुन ‍ दिला अशी अनेक उदाहरणे मतदारसंघातील प्रत्येक गांवात तुम्हाला या साडेचार वर्षात पहावयास मिळतील. कोटयावधी रुपयांचा निधी तालुक्यात आणून आपला कार्यकर्ता  विकासकामांच्या संदर्भात आपण इतका सक्षम केला आहे की,कार्यकर्ताचा आता सांगू लागला आहे आमच्या गावचे काम हे या योजनेतून बसवा हा पारदर्शीपणा या अगोदरच्या माजी आमदारांनी मतदारसंघातील जतनेमध्ये कधी आणू  दिला होता का ? विकासाची दृष्टी असेल तर सर्व काही शक्य होते परंतू आपल्या माजी आमदारांना विकासाच्या कामांमध्ये सक्षमपणा कधीच आणता आला नाही त्यामुळेच त्यांच्या काळात तालुक्यातील अनेक गांवे ही शासनाच्या विविध योजनांमध्ये बसत असूनही त्यांना विकासाचे काम दयायला माजी आमदार निष्क्रीय ठरले.मतदारसंघाचा आमदार होण्यापुर्वी मला आमदार होण्याची संधी दया मतदारसंघातील प्रत्येक गांवामध्ये  विकासाचे काम करेन,जनतेच्या हिताचे निर्णय घेईन असे आश्वासन मी मतदारांना दिले होते त्यानुसार 100 टक्के नाही परंतू 85 ते 90 टक्के गांवामध्ये मी या साडेचार वर्षात कोणत्या ना कोणत्या योजनेतून विकासाचे काम देवून या गांवाचा सर्वांगीण  विकास साधण्याचा प्रयत्न केला. एक हजार कोटींपेक्षा जादा  निधी मतदारसंघात आणेन असे माझे वचन होते ते पुर्ण करण्याकरीता आपली अहोरात्र धडपड सुरु आहे. आमदार नव्हतो तेव्हाही जनतेमध्ये होतो व आमदार असतानाही जनतेमध्ये आहे.एका एका गांवामध्ये विविध विकासकामे करण्याकरीता माझ्या किती तरी फेऱ्या होत आहेत याचे मोजमाप जनताच विरोधकांना सांगेल.याउलट 2014 च्या निवडणूकीत पराभूत झालेले माजी आमदार पुत्र नुसत्याच वाडयात बसून गप्पा हाणत असतात ते पराभवानंतर किती वेळा तुमच्या गांवात आले, या विभागात आले. मतांचा सौदा करायला येतील त्यामुळे जनतेने सावध रहा कारण 2009 चा आपला पराभव हा विरोधकांनी मतांचा बाजार मांडल्यामुळेच झाला होता हे कायम ध्यानात ठेवा असेही आवाहन त्यांनी शेवठी बोलताना केले. उपस्थितांचे स्वागत एकनाथ जाधव यांनी केले व आभार पांडुरंग साळुंखे यांनी मानले. 
चौकट :- 18824 जनतेने विश्वासाने दिलेले मताधिक्क्य.- आ.देसाई.
             18824 एवढे मताधिक्क्य हे जनतेने आपले काम बघून दिलेले मतदान आहे.निवडून येणारा आमदार आपले प्रश्न तडफेने शासन दरबारी मांडून ते सोडवून घेवू शकतो हा विश्वास पाटण मतदारसंघातील जनतेमध्ये असल्यानेच 18824 इतके मताधिक्क्य मला मिळाले मिळालेले मताधिक्कय हे जनतेने विश्वासाने दिलेले मताधिक्क्य आहे असेही आ.शंभूराज देसाई यावेळी म्हणाले.

पाटण मतदारसंघाचा विकास साधायला पाटणकर माझेपेक्षा कमीच पडले. आमदार शंभूराज देसाईंचा पाटणकरांना टोला.






दौलतनगर दि.०२:- मी केवळ आमदार आहे, तालुक्याचे यापुर्वीचे आमदार हे सलग 21 वर्षे आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री होते.कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना जेवढा निधी पाटण मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांकरीता आणता आला नाही त्याहून कितीतरी पटीने अधिकचा निधी मी आमदार म्हणून मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांकरीता चार वर्षात मंजुर करुन आणला. माझा उघडपणे दावा आहे की,पाटणकरांना मंत्री असताना मतदारसंघातील जे जे रस्ते करता आले नाहीत ते ते सर्व रस्ते मी आमदार म्हणून पुर्णत्वाकडे नेले याचा मला आनंद वाटतो. स्पष्टच सांगायचे झाल्यास पाटण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधायला तसेच त्यांच्या बालेकिल्ल्यातील मुलभूत गरजांची कामे करायला माजी आ.विक्रमसिंह पाटणकर माझेपेक्षा कमीच पडले असल्याचा टोला आमदार शंभूराज देसाईंनी माजी आ.विक्रमसिंह पाटणकरांना लगाविला आहे.
             निगडे ता.पाटण येथे राज्य शासनाच्या हरीत ऊर्जा योजनेतंर्गत कसणी-निगडे-माईंगडेवाडी या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन व जाधववाडी मेंढ येथील पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे व  निगडे येथील सार्वजनीक सभागृहाचे उद्घाटन आ.शंभूराज देसाईंच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.कसणी-निगडे-माईंगडेवाडी या ८ किमी रस्त्यांच्या कामांकरीता त्यांनी ३ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,सदस्या सौ.सीमा मोरे,शिवसेना तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण,नारायण कारंडे, अंकुश महाडिक,नानासो साबळे,मनोज मोहिते,विकास गिरीगोसावी,दत्तात्रय पाटील,बजरंग डिसले,सरपंच नैना कदम,विलास गोंडाबे,कसणी सरपंच मिनल मस्कर, खाशाबा डिसले,ज्ञानदेव कदम,जिंती सरपंच दामाजी कदम,शंकर पवार,आत्माराम पुजारी,सुरेश पाटील या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह,कार्यकर्ते तसेच नागरिक व महिला यांची प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी आ.देसाई म्हणाले,माईंगडेवाडी या विभागाचे शेवठचे टोक आहे.पवारवाडी कुठरेपासून या विभागात येताना पवारवाडी,पागेवाडी-कुठरे,जाधववाडी,मत्रेवाडी,निवी,कसणी,कसणीच्या सर्व वाडया,वरचे घोटील,निगडे व शेवठचे माईंगडेवाडी यातील एकही असे गांव किंवा वाडी नाही ज्यामध्ये गत चार वर्षात एकही विकासाचे काम आपण दिले नाही. प्रत्येक गांवामध्ये व वाडीवस्तीमध्ये साडेचार वर्षात एकापेक्षा जास्त कामे देण्याचा प्रयत्न आपण केला आहे. तालुक्याच्या माजी आमदारांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात या मी सांगितलेल्या गांवाना किती रुपयांचा निधी मंजुर करुन दिला.त्यांच्या हातात निधी देण्याचे असताना ते आपल्याला काही देवू शकले नाहीत ते आता हातात काही नसताना आपल्याला काय देणार आहेत. 20१४ च्या निवडणूकीपासून ते या विभागात आले देखील नसतील याची मला खात्री आहे.मग कोणतेही विकासाचे काम न देणाऱ्यांना आपण मते देवून आपल्या पदरात काय पाडून घेणार आहे याचा विचार या विभागातील जनतेने करावा. माईंगडेवाडी रस्ता पाटणकरांना मंत्री असताना का करता आला नाही? माईंगडेवाडी गांव आपल्या तालुक्यात नाही का?  बांधकाम मंत्री असताना त्यांच्या खात्यातील थोडीफार रक्कम जरी या रस्त्याच्या कामांकरीता दिली असती तरी डोंगरकपारीत वसलेल्या या गांवाला रस्ता मिळू शकला असता परंतू पाटणकरांना तेवढेही करता आले नाही एवढया लांबचे राहू दया ज्या पाटण विभागाला ते स्वत:चा बालेकिल्ला म्हणतात त्या बालेकिल्ल्यातील अनेक गांवाना व वाडयावस्त्यांना बारमाही रस्ता करणे त्यांना शक्य झाले नाही.आमदार म्हणून मी मांईंगडेवाडी गांवाला एकदा नाही दोनदा निधी मंजुर करुन दिला आता तर कसणी पासून निगडे व ‍ निगडयापासून मांईंगडेवाडी पर्यंत रस्ता करण्याकरीता आपण शासनाच्या तिजोरीतून ३ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.गांव तिथे रस्ता आणि वाडी तिथे काम देण्याचे उदीष्ट आपण पुर्ण करीत आहोत.‍ निवडणूकीच्या प्रचाराला माईंगडेवाडी मध्ये आलो तेव्हाच तुमचा रस्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये पुर्ण करुन देणार असा शब्द मी माईंगडेवाडीकरांना दिला होता तो शब्द मी आज पुर्ण करुन दाखविला आहे.निवी पासून कसणी पर्यंतच्या एक कोटी रुपयांच्या रस्त्याचे आपण काही दिवसापुर्वीच भूमिपुजन केले आता निवी ते कसणी ते माईंगडेवाडी इथपर्यंत गुळगुळीत रस्ता आपण करीत आहोत.दिलेला शब्द पाळणाऱ्या नेतृत्वाला पांठीबा दयायचा का केवळ निवडणूकीपुरते मते मागायला येणाऱ्यांना पाठींबा दयायचा याचाही सारासार विचार या विभागाने करायचा आहे.निगडे गांव कायमस्वरुपी आपल्या पाठीशी असणारे गांव आहे या गांवाचा आदर्श या विभागातील गांवानी घ्यावा असेही ते शेवठी बोलताना म्हणाले. स्वागत प्रास्ताविक दिपक कदम यांनी केले व आभार बापूराव डिसले यांनी मानले.
चौकट :- चौफेर  विकासाचे उदाहरण याहून काय वेगळे असू शकते.- आ.देसाई.
             पवारवाडी पासून पागेवाडी-कुठरे,जाधववाडी,मत्रेवाडी,निवी,कसणी,कसणीच्या सर्व वाडया,वरचे घोटील,निगडे व शेवठचे माईंगडेवाडी असा मार्ग असणाऱ्या प्रत्येक गांवामध्ये साडेचार वर्षात केलेली कांमे ही आपण केलेल्या विकासाची साक्षीदार आहेत.प्रत्येक गांवात विकासाचे काम असेल तर चौफेर विकासाचे उदाहरण याहून काय वेगळे असू शकते असेही आ. शंभूराज देसाई यावेळी म्हणाले.


Wednesday, 27 February 2019

सडादाढोली युवकांकडून युवा नेते यशराज देसाईंचे जंगी स्वागत. आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुर केलेल्या सडादाढेाली रस्त्याचे दिमाखात भूमिपुजन.




             दौलतनगर दि. २7 :- गेली २६ वर्षे डोंगरपठारावरील गांवानी आणि वाडयावस्त्यांनी विरोधकांना पोत्याने भर-भरुन मते दिली त्याच विरोधकांनी डोंगरपठारावरील गावांमध्ये किती विकास केला? असा सवाल करीत गेली साडेचार वर्षे या तालुक्यात आमदार शंभूराज देसाईंनी कोटयावधी रुपयांची विकासकामे करुन दाखविली आहेत. डोंगरपठारावरील गांवामध्ये कधीही न होणारी विविध विकासकामे मंजुर करुन आणण्याचे आणि ती पुर्ण करुन घेण्याचे व्रत आमदार साहेबांनी स्विकारले आहे त्यामुळेच मतदारसंघाच्या सर्वच डोंगरपठारावर चौफेर असा विकास पहावयास मिळत आहे. या डोंगरपठारासह आपल्या चाफळ विभागात त्यांनी गांवे व वाडयांवस्त्यांना विविध विकासकामांकरीता भरघोस असा निधी उपलब्ध करुन दिला आहे. विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघ सुजलाम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी डोंगरपठारावरील व मतदारसंघातील जनतेने ठाम उभे रहावे असे आवाहन युवा नेते यशराज देसाईंनी केले.
                   आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत मंजुर करुन आणलेल्या महाबळवाडी ते सडादाढोली या गावपोहोच रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन व कामांचा शुभारंभ युवानेते यशराज देसाईंच्या हस्ते सडादाढोली येथे करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते,या रस्त्याच्या कामांकरीता आमदार देसाईंनी १ कोटी ५४ लाख ३२ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.यावेळी कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे व्हा.चेअरमन राजाराम पाटील, मा.संचालक प्रकाश नेवगे,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे,शिवदौलत बॅंकेचे संचालक चंद्रकांत पाटील,स्कॉलर्स ॲकॅडमीचे प्रमुख शंकरराव देसाई,शंकर मोरे,सडादाढोलीचे वसंत झोरे,जयराम झोरे,राम झोरे,प्रकाश झोरे,तुकाराम झोरे,निवृत्ती झोरे,बाबुराव झोरे,सखाराम झोरे,धोंडीबा काळे,मारुती झोरे,चंद्रकांत शेळके,शिवाजी झोरे,तानाजी झोरे, सावळाराम झोरे,सचिन झोरे,दिनकर झोरे,गंगाराम झोरे,लक्ष्मण झोरे,पांडूरंग झोरे,धाऊजी यमकर,मोरेश्वर झोरे,बबन झोरे, वैभव झोरे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सडादाढोली गांवातील कार्यकर्ते व मुंबई मित्रमंडळातील युवक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
                    याप्रसंगी बोलताना यशराज देसाई  म्हणाले, आमदार शंभूराज देसाई साहेबांनी आमदारकीच्या आपल्या पहिल्या टर्ममध्ये विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील पाटण मतदारसंघात 217 कोटी रुपयांची विकासकामे केली होती आणि आत्तातर सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. आपल्या सत्ताधारी पक्षाचा आमदार असण्याचा पुरेपुर वापर ते मतदारसंघातील जनतेकरीता करीत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत राहिलेल्या विविध विकासकामांकरीता पाटण मतदारसंघात त्यांनी गत साडेचार वर्षात चौपट वेगाने शासनाच्या विविध योजनांमधून निधी आणून मतदारसंघातील कधीही न होणारी विकासकामे मार्गी लावली आहेत.गतवर्षी रामघळ येथील पारायण सोहळ्यास आमदारसाहेब यांनी भेट दिली होती त्या भेटीदरम्यान आपण सर्व ग्रामस्थांनी संघटीत होवून आपले गाव पोहोच रस्त्याची मागणी केली होती.आपण केलेल्या मागणीचा विचार करुन आमदारसाहेबांनी एक वर्षाच्या आत महाबळवाडी ते सडादाढोली या रस्त्याच्या कामाकरीता ग्रामविकास मंत्रालयाकडील मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत १ कोटी ५४ लाख ३२ हजार रुपये एवढा भरघोस असा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या रस्त्याच्या कामामुळे आपली अनेक वर्षांची रस्त्याची गैरसोय दुर होणार आहे.गत तीस वर्षापासून आपल्या गावाला विरोधकांनी फक्त झुलविण्याचेच काम केले आहे,रस्ता या मुलभूत गरजेची पुर्तता ही विरोधक पुर्ण करु शकले नाहीत.ही दुर्दैवाची बाब आहे.परंतु देसाईसाहेबांनी आपल्याला दिलेला शब्द एक वर्षाच्या आत पुर्ण करुन दाखविला.आता निवडणूकीच्या अगोदर विरोधक आपल्या गावात मते मागण्यासाठी येथील त्यांना आता आपण जाब विचारला पाहिजे या चार वर्षात आमच्यासाठी काय केले याचा.फक्त निवडणूक आली की मते मागायची आणि नंतर जनतेला विकास कामांपासून वंचित ठेवायचे हे कामच विरोधकांनी आजपर्यंत केले आहे.गत साडेचार वर्षात पाटण मतदारसंघात विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे होत आहेत.त्या विकासकामांच्या माध्यामातून पाटण मतदारसंघाचा चेहरा बदलत आहे,त्यामुळे आता होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत आपण आमदारसाहेबांच्याच पाठीशी भक्कमपणे उभे राहून आमदारसाहेबांना भरघोस अशा मतांनी पुन्हा विधानसभेत पाठवायचे आहे. असेही आवाहन त्यांनी शेवठी बोलताना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत सचिन झोरे यांनी केले व उपस्थितांचे आभार  पांडूरंग झोरे यांनी मानले.
चौकट:- सडादाढोली पठार भगव्या फेटयांनी नटले.
            आमदार शंभूराज देसाई हे महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनात असलेमुळे आ. शंभूराज देसाईंनी मंजुर केलेल्या आमच्या रस्त्याचे भूमिपुजन व कामाचा शुभारंभ युवा नेते यशराज देसाईंनी करावा असा आग्रह सडादाढोली ग्रामस्थांनी धरला होता.सडादाढोली गांवामध्ये युवानेते यशराज देसाई येत आहेत हे पाहून सडादाढोली येथील युवकांच्यात एकप्रकारचा उत्साह पहावयास मिळाला.मोठया उत्साहाने या युवकांनी यशराज देसाईंचे भगवे फेटे परिधान करुन व यशराज देसाईंनाही भगवा फेटा बांधून जल्लोषात स्वागत केले.भगव्या फेटयांनी सडादाढोली पठार नटल्याचे या कार्यक्रमात दिसून आले.

Tuesday, 26 February 2019

महाराष्ट्र विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी आमदार शंभूराज देसाई यांची तिसऱ्यांदा नियुक्ती.




दौलतनगर दि.2६:-महाराष्ट्र विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित झालेले शिवसेना पक्षाचे विधिमंडळ पक्षप्रतोद पाटणचे लोकप्रिय व विधानसभेतील अभ्यासू आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमदार शंभूराज देसाई यांची महाराष्ट्र विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी या पंचवार्षिकमध्ये तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे.सध्या सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये आमदार शंभूराज देसाईंची तालिकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे यांनी दि.२५ फेब्रुवारी,२०१९ रोजी विधानसभा सभागृहात केली आहे.
                                    महाराष्ट्र विधानसभा हे लोकशाहीचे महामंदीर असून राज्यातील सर्वोच्च असे सभागृह आहे. या सभागृहात अधिवेशन काळात विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हे महाराष्ट्र विधानसभा नियम ८ अन्वये विधानसभेच्या सदस्यांमधून सभाध्यक्ष तालिकेवर विविध पक्षाच्या विधानसभा सदस्यांची नियुक्ती करण्यात येते.शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेतील आमदार उत्कृष्ट संसदपटु शंभूराज देसाई यांचे विधानसभेतील कामकाज पाहून त्यांची महाराष्ट्र विधानमंडळाने सन २०१४ ते २०१९ या पंचवार्षिक मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या तालिकाध्यक्षपदी तिसऱ्यांदा नियुक्ती केली आहे.सन २०१६  चे पावसाळी अधिवेशन, २०१८ ला अर्थसंकल्पीय अधिवेशन व सध्या सुरु असलेले फेब्रुवारीचे अधिवेशन अशा तीन अधिवेशनात आमदार शंभूराज देसाईंना तालिकाध्यक्ष म्हणून बसण्याचा बहूमान मिळाला आहे. आमदार शंभूराज देसाई यांना तिसऱ्यांदा तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
                                 महाराष्ट्र विधानमंडळाला देशामध्ये आगळी वेगळी प्रतिष्ठा लाभली आहे. अनेकविध क्षेत्रात देशपातळीवर तसेच राज्यपातळीवर नेतृत्व करणारे नेते या विधानमंडळाने घडविले आहेत.आमदार शंभूराज देसाई हे पाटणसारख्या डोंगरी आणि दुर्गम तालुक्यातून आमदार म्हणून निवडून आले असून आमदारकीचा कोणताही पुर्वानुभव नसताना सन २००४ ला आमदार म्हणून विधानसभेची पायरी चढल्यानंतर संसदीय कामकाजाचा खडान्‌खडा अभ्यास करुन त्यांनी आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये आपल्या हुशारीचे कर्तृत्व सिध्द करुन दाखविले आहे. त्यांच्या हुशारीचे मुल्यमापन महाराष्ट्राचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या विधानसभेने करुन त्यांना पहिल्याच टर्ममध्ये विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. आमदार शंभूराज देसाई यांची ही दुसरी टर्म असून विधानसभेतील कामकाजाचा व्यासंग त्यांनी इतका वाढविला आहे की विधानसभेतील त्यांच्या उत्कृष्ट ज्ञानामुळे त्यांच्यावर शिवसेना पक्षाच्या वतीने विधानसभेतील उत्कृष्ट जबाबदाऱ्याही सोपविण्यात आल्या आहेत व येत आहेत. पक्षाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पेलल्याही आहेत.विधानसभेतील शिवसेनेचा बलस्थान चेहरा म्हणून त्यांच्यावर शिवसेना पक्षाचे विधिमंडळ पक्षप्रतोद म्हणून जबाबदारी सोपविली असतानाच राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे महाराष्ट्राचे कार्यकारीणीवरही त्यांची निवड करण्यात आली आहे. विधानसभेचा तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेचे संपुर्ण कामकाज पाहताना निपक्ष:पातीपणे सभागृहाचे कामकाज चालवितात त्यामुळे आमदार शंभूराज देसाईंना तालिकाध्यक्ष म्हणून सर्वच पक्षाच्या वतीने नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे व मिळत आहे. सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये विधानसभेचे अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे यांनी सभाध्यक्ष तालिकेवर त्यांची नियुक्ती केलेनंतर त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
चौकटः- राजे, तुम्हाला पाहून स्व.बाळासाहेब देसाई यांची आठवण येते.
           तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर सभागृहात उपस्थित असणाऱ्या विविध पक्षाचे विधानसभा सदस्य अभिमानाने सांगतात. राजे, तुम्ही विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेले पाहून महाराष्ट्राला दिशा देणारे तुमचे आजोबा स्व.बाळासाहेब देसाई यांची काहीकाळ आम्हाला आठवण येते.यामध्ये सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षातीलही विधानसभा सदस्यांचा समावेश असतो.ही अभिमानास्पद बाब आहे.

पाटण मतदारसंघातील शिल्लक राहिलेल्या मागण्यांसंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्या. आ. शंभूराज देसाईंची सन २०१८-१९ च्या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत मागणी.



दौलतनगर दि.2६:- पाटण विधानसभा मतदारसंघात गृह,नगरविकास,सार्वजनींक बांधकाम व सार्वजनीक आरोग्य विभागाकडील असणाऱ्या आमच्या काही मागण्या राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयाअभावी शिल्लक राहिल्या आहेत या शिल्लक राहिलेल्या मागण्यांसंदर्भात राज्य शासनाने लवकरात लवकर धोरणात्मक असे निर्णय घ्यावेत व या मागण्या पुर्ण कराव्यात तसेच आवश्यक असणाऱ्या कामांना निधी मंजुर करुन दयावा अशी आग्रही मागणी आमदार शंभूराज देसाईंनी आज विधानसभेत केली.
                         महाराष्ट्र विधानसभेत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील पुरवणी मागण्यावर आज गृह,महसूल व वन, नगरविकास,सार्वजनींक बांधकाम व सार्वजनीक आरोग्य  व कौशल्य विकास या मागण्यांवर चर्चा होती.यावेळी आ.शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघातील गृह,नगरविकास,सार्वजनींक बांधकाम व आरोग्य विभागाकडील शिल्लक राहिलेल्या मागण्यांवर शासनाचे लक्ष वेधून या मागण्या लवकरात लवकर पुर्ण कराव्यात असा आग्रह धरला.
                         याप्रसंगी मागण्या करताना आ.शंभूराज देसाई म्हणाले,आमचे पाटण मतदारसंघात मल्हारपेठ हे बाजारपेठेचे गांव असून याठिकाणी असणारे मल्हारपेठचे पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन येथे पोलीस स्टेशन करण्यास मान्यता दयावी अशी आमची बरेच वर्षाची मागणी आहे. यासंदर्भातील प्रस्तावही गृह विभागाकडे सादर करण्यात आला आहे. गृहराज्यमंत्री यांनी यासंदर्भात बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन देखील दिले आहे. ती बैठक लवकरात लवकर घेवून मंत्री यांनी तो निर्णय घ्यावा तसेच  पाटण पोलीस स्टेशन,मल्हारपेठ,ढेबेवाडी व कोयनानगर येथील पोलीस औटपोस्टमध्ये मनुष्य बळ कमी आहे.कायदा व सुव्यवस्था राखणेकरीता येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावर ताण येत आहे याठिकाणी आवश्यक असणारे मनुष्यबळ लवकर या पोलीस स्टेशनना दयावे.असे सांगून त्यांनी नगरविकास विभागावर बोलताना पाटण या तालुक्याच्या ठिकाणी नव्यानेच नगरपंचायतीची स्थापना करण्यात आली आहे.नगरपंचायतीला आवश्यक असणारे अधिकारी व कर्मचारी यांची संख्या याठिकाणी कमी आहे.मुख्याधिकारी देण्यात आला आहे त्यासही चार्ज देण्यात आला आहे.नगरपंचायतीतंर्गत असणारे रस्ते,गटर इत्यादी सार्वजनीक बांधकाम विभागाकडील असणारी कामे करुन घेणेकरीता नगरपंचायतीकडे तज्ञ असे अधिकारी व कर्मचारी नाहीत त्यामुळे नगरपंचायतीकडील बांधकामांची सर्व कामे ही येथील सार्वजनीक बांधकाम उपविभागांच्या अधिकाऱ्यांकडून करुन घ्यावीत.
                             असे सांगत बांधकाम विभागावर बोलताना ते म्हणाले,पाटण मतदारसंघात ग्रामीण मार्गांची संख्या जास्त आहे.इतर जिल्हा मार्गांची संख्या १३ ते १४ इतकी आहे. दुर्गम आणि डोंगराळ विभागातील ग्रामीण व इतर जिल्हा मार्गांना प्रमुख जिल्हा मार्ग असा दर्जा देणेकरीता एक वर्षापुर्वी पाटण मतदारसंघातील सुमारे २० रस्त्यांची कामे मी शासनाकडे प्रस्तावित केली आहेत यावर अद्यापही कसालाही निर्णय झाला नाही तो निर्णय शासनाने लवकरात लवकर घ्यावा.तर काशीळ-पाल-तारळे-जळव-मणदुरे-पाटण या प्रमुख जिल्हा मार्गावर महाराष्ट्रातील प्रसिध्द अशी तीन देवस्थाने आहेत यामध्ये पालीचा खंडोबा, जळवचा जोतिबा व मणदुरे येथील निवकणे येथे जानाई देवी अशी प्रसिध्द देवस्थाने आहेत या प्रमुख जिल्हा मार्गास राज्य मार्ग असा दर्जा देवून या रस्त्याचे रुंदीकरणासह काम पुर्ण करणेकरीता भरघोस असा निधी दयावा अशी माझी अनेक वर्षाची मागणी आहे. वरील दोन्ही विषयासंदर्भात राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री यांचेकडे मी आग्रह धरला होता या दोन्ही विषयांचे प्रस्ताव सादर करावेत अशा सुचनाही त्यांनी दिल्या होत्या त्यानुसार प्रस्ताव सादर केले आहेत मात्र कार्यवाही झाली नाही यावरही शासनाने निर्णय घ्यावा. तसेच नाडे ढेबेवाडी हाही प्रमुख जिल्हा मार्ग असून याठिकाणी नाडे पासून १ किमी अंतरावर असणारा सांगवड येथील मोठया पुलावर नेहमी वाहतूकीची कोंडी होती. हा पुल जुना झाला असून त्याठिकाणी पश्चिमेच्या बाजुस दुसरा मोठा पुल उभारण्यास वाव आहे.तर सार्वजनीक बांधकाम विभागाने नाबार्ड योजनेंतर्गत सांगवड येथील सध्या अस्तित्वात असणाऱ्या पुलांच्या उंचीचाच पश्चिमेच्या बाजुस नवीन मोठा पुल उभारण्यास आवश्यक असणारा निधी विशेष बाब म्हणून मंजुर करुन दयावा अशी मागणी केली.सार्वजनीक आरोग्य विभागावर मागणी करताना आ.देसाई म्हणाले, पाटण ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय असा दर्जा देणेकरीताचा श्रेणीवर्धन प्रस्ताव शासनाच्या आरोग्य विभागाकडे सन २०१६ साली सादर केला आहे.तर पाटण आणि ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्यविषयक सोई सुविधा मिळवून देणेकरीता आरोग्य साहित्यांची कमतरता आहे व याठिकाणी मोठया प्रमाणात आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत या तिन्ही विषयासंदर्भात आमचे पक्षाचे ना.एकनाथ शिंदे हे आरोग्य मंत्री आहेत त्यांनी याच अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक घ्यावी अशी त्यांचेकडे मागणी केली आहे तीही बैठक त्यांनी लवकर घेवून आरोग्य विभागातील तीन प्रश्नांसंदर्भात धोरणात्मक असा निर्णय घ्यावा असाही आग्रह आमदार शंभूराज देसाईंनी या पुरवणी मागण्यांवर बोलताना धरला.
चौकट :- पाटण नगरपंचायतीचा आडमुठेपणा विधानसभेत पोहचला.
             नगरविकास विभागाच्या मागण्यावंर आ.देसाईंनी पाटण नगरपंचायत ही राजकीय दृष्टीकोनातून आमदार फंड, जिल्हा वार्षिक योजनेतील नगरोथ्यान निधीमधून सुचविलेल्या विकासकामांना नगरपंचायतीचे आवश्यक असणारे ठराव, कागदपत्रे मागणी करुनही सहा- सहा महिने देत नाही.नगरपंचायतीच्या आडमुठेपणामुळे विकासकामांना खीळ बसत असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.पाटणची नगरपंचायत राजकीय दृष्टीकोनातून ठराव देत नसेल तर याठिकाणी सुचविण्यात आलेल्या विविध विकासकामांना नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्याच्या सहीने १५ दिवसाच्या आत आवश्यक असणारी समंतीपत्र देवून ही कामे मार्गी लावावीत अशा सक्त सुचना नगरविकास मंत्र्यांनी संबधितांना दयाव्यात अशीही त्यांनी मागणी केली.

Sunday, 24 February 2019

पाटण तालुका पुणे - पिपंरी चिचंवड रहिवाशी युवकांची एकजुट कौतुकास्पद. आमदार शंभूराज देसाईंचे प्रतिपादन. आमदार शंभूराज देसाईंनी मांडला पुण्यात विकासकामांचा लेखाजोखा.





दौलतनगर दि.25:- पाटण मतदारसंघातील अनेक युवक नोकरी कामधंदयानिमित्त जसे मुंबईमध्ये आहेत तसेच मोठया प्रमाणात पुण्यात देखील आहेत.मुंबईप्रमाणे पुणे-पिपंरी चिचंवड येथे मोठया संख्येने असणाऱ्या युवकांनी गांवाकडे आल्यानंतर पुण्यातील रहिवाशी सर्व युवकांना एका छताखाली आणणेकरीता आमचा एखादा युवक मेळावा घ्यावा अशी अपेक्षा अनेकदा व्यक्त केली. युवकांच्या आग्रहास्तव या शहरात दोनदा युवकांचे मेळावे पार पडले आपल्या गांवाकडे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपल्या गांवाकरीता,वाडीवस्तीकरीता नेमके काय करतात हे जाणून घेणेकरीता सर्वांनाच उत्सुकता असते तशीच उत्सुकता येथील युवकांच्या मध्ये आहे.येथील युवकांना गावाकडच्या विकासाची आस आहे हे पाहून आनंद झाला गावाकडच्या विकासाकरीता युवकांची असणारी एकजुट ही कौतुकास्‍पद असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
              पाटण विधानसभा मतदारसंघात आमदार शंभूराज देसाई यांचेमार्फत मोठया प्रमाणात सुरु असलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जाणून घेणेकरीता पाटण तालुका पुणे-पिपंरी चिचंवड रहिवाशी युवकांनी आकुर्डी येथे युवक मेळाव्याचे आयोजन केले होते.यावेळी आ.शंभूराज देसाई बोलत होते.युवक मेळाव्यात आ.देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखाच पुणे-पिपंरी चिचंवडमधील रहिवाशी युवकांच्या समोर मांडला.आपल्या मतदारसंघाच्या आमदारांनी केलेल्या विकासकांमाची  माहिती दिल्याने येथील युवकांच्या मध्ये मोठा उत्साह पाहण्यास मिळाला.यावेळी मेळाव्यास आप्पासो उदुगडे,सुधीर कदम,संतोष देसाई,जुबेर चिखलकर,अशोक पाटील,संदीप देसाई,उमेश पाटील,हणमंत शेजवळ,महेश शेंडे,शंकर गालवे,राजेंद्र साळुंखे,अजित पाटील,अभिजीत पाटील,शशिकांत कानडे,अमोल मांडवेकर,जितेंद्र निळुगडे,विजयराव मोरे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह युवा कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी आमदार देसाई म्हणाले,आपला पाटण तालुका डोंगराळ व दुर्गम तालुका असल्याने तालुक्यातील युवक हे उच्च शिक्षण घेवून नोकरी कामधंदयानिमित्त मुंबई तसेच पुणे या मोठमोठया शहरात वास्तव्यास आहेत.घार हिंडे आकाशी,चित्त तिचे पिलापाशी या म्हणीप्रमाणे आपण नोकरी,कामधंदयानिमित्त बाहेरगांवी असलो तरी आपल्या गांवामध्ये,वाडीवस्तीमध्ये गावाकडच्या लोकांना त्यांच्या मुलभूत सुविधा मिळतात का नाही? याकडे आपले कायम लक्ष असते.अनेकदा मुंबई मधील युवक विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात मला भेटून त्यांच्या गांवाकडे प्रलंबीत राहिलेल्या कामांच्या संदर्भात मागणी करुन त्यांची ही मागणी पुर्णत्वाकडे कशी जाईल यासाठी पाठपुरावा करतात.आपण मोठया विश्वासाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींने आपल्या गांवाचा विकास करावा एवढीच माफक अपेक्षा त्यांची असते.मला सांगायला आनंद वाटेल ज्या विश्वासाने पाटण मतदारसंघातील मतदारांनी मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करण्याचा मी गेल्या साडेचार वर्षात प्रयत्न केला.सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून काम करताना जनतेच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या त्या अपेक्षा पुर्ण करण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला.आज पाटण मतदारसंघात सातारा जिल्हयात एक नंबरची विकासकांमे सुरु आहेत  2014 च्या निवडणूकीत मी जनतेला दिलेल्या विविध आश्वासनांपैकी 85 ते 90 टक्के आश्वासने पुर्ण करण्याचे काम मी केले आहे हे आपण पहात आहात.एक हजार कोटी रुपयांचा निधीचा टप्पा आपण पाच वर्षात पुर्ण करीत आहोत याचा मला आनंद वाटतो मतदारसंघाचा चौफेर विकास झाला पाहिजे एवढे एकच उदिष्ट ठेवून मी काम करीत आहे.येणाऱ्या विधानसभा निवडणूकीला जनतेच्या दारात मते मागायला जाताना आपण केलेला विकास जनतेसमोर घेवूनच मते मागायला जाणार आहे.आपण केलेला हाच चौफेर विकास मतदारसंघाला प्रगतीच्या मार्गाने नेण्यास मदत करीत आहे.मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात आतापर्यंत न झालेली विकासकामे मार्गी लावण्यात मला यश मिळाले मग यामध्ये गावांना पोहोच किवां गांवे जोडणारे बारमाही रस्ते असू दया,पिण्याच्या पाण्याच्या योजना असू दया या मुलभूत गरजा प्राधान्याने पुर्ण करण्याचे काम आपण केले याकरीता मतदार संघातील जनतेबरोबर मुंबई,पुणे-पिपंरी चिचंवड तसेच मतदारसंघाच्या बाहेरगांवी रहिवाशी असणाऱ्या आपणांसारख्या युवकांची साथ मिळाली असे सांगून ते म्हणाले या मेळाव्यामध्ये मी कुणाचे माप काढायला आलो नाही तर मी गत साडेचार वर्षात तुमच्या सर्वाच्या गांवामध्ये,वाडीवस्तीवर कोणकोणती न होणारी व न झालेली विविध विकासकांमे कशाप्रकारे मार्गी लावली हे सांगण्याकरीता आलो आहे.मी पाटण मतदारसंघातील गांवामध्ये केलेला विकास हा सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट आहे. आपल्या विरोधकांना तोच पचणी पडेना झाला आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. विकासाची कास धरुन चालण्याची व विकास करणाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची आपल्या पाटण मतदारसंघाला परंपरा आहे तीच परंपरा पुणे-पिपंरी चिचंवड रहिवाशी युवकांनी कायम ठेवावी असे आवाहन करुन तुमच्या गांवाच्या विकासाकरीता आमदार म्हणून माझे कायम पाठबळ आपल्याला राहील केव्हाही व कुठेही हाक मारा आमदार म्हणून मी आपल्या पाठीशी उभा राहीन असेही ते शेवठी बोलताना म्हणाले.  
चौकट :- मतदारसंघातील युवकांनी इतिहास रचण्याचे काम केले.- आ.देसाई.
               2004 ची किंवा 2014 ची विधानसभा निवडणूक असो या दोन्ही निवडणूकांमध्ये पाटण मतदारसंघातील युवकांनी इतिहास रचण्याचे काम केले त्यामुळेच सातारा जिल्हयात सर्वाधिक मते मला मिळाली युवकाच्या या ॠणातून उतराई होणे शक्य नाही.निवडणूकीचा हंगाम आता सुरु होत आहे कधीही आपल्या सुखदु:खात सहभागी न झालेले मतापुरते आता आपल्याकडे येतील. त्यांना सांगा मते मागताय पण, गेल्या पाच वर्षात आमच्या गांवाकरीता तुम्ही काय केले एवढा एकच प्रश्न विचारा. ते नक्कीच निरुत्तर होतील यात शंका नाही असेही आ.देसाई म्हणाले.

Friday, 22 February 2019

2019 ला पाटणचा आमदार कोण ? हे पाटण मतदारसंघातील जनतेने ठरविले आहे. आमदार शंभूराज देसाईंचे प्रतिपादन.



दौलतनगर दि.2२:- पाटण मतदारसंघातील निवडणूकांना आपले विरोधक रती महारतींना आणून विरोधात प्रचार करतात. 2014 च्या निवडणूकीतही रती महारती विरोधकांच्या प्रचाराला पाटणला आले होते. या मतदारसंघाला लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व. शिवाजीराव देसाई यांच्या विचारांची परंपरा आहे. लोकनेते यांच्या पश्चात वाडयात गेलेली तालुक्याची आमदारकी आपल्या प्रामाणीक व निष्ठावान कार्यकर्त्यांनी मोठया हिकमतीने वाडयातून खेचून आणली होती.त्याच्याही पुढे जावून 2014 च्या निवडणूकीत याच कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घेवून 18824 च्या मताधिक्क्याने जिल्हयात सर्वात जास्त मतदान मला मिळवून दिले आहे याची जाणिव मला आहे.ज्या विश्वासाने जनतेने मला आमदार केले आहे त्या विश्वासाने मतदारसंघातील जनतेच्या हिताकरीता मी गेली साडेचार वर्षे मतदारसंघात काम करीत असून मतदारसंघाचा चौफेर विकास कसा करायचा हे आपण दाखवून दिले आहे याच विकासाच्या माध्यमातून 2019 च्या निवडणूकीत पाटण मतदारसंघाचा आमदार कोण असणार ?  हे जनतेने ठरविले असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी दिले आहे.
                मारुलहवेली ता.पाटण याठिकाणी आमदार शंभूराज देसाईंचे विशेष प्रयत्नातून राज्याच्या अर्थसंकल्पातून सोनाईचीवाडी ते मारुलहवेली व राज्य शासनाच्या 2515 योजनेतंर्गत मारुलहवेली अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे अशा विविध कामांचा भुमीपूजन कार्यक्रम आमदार शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.या दोन्ही कामांसाठी त्यांनी सुमारे १ कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिलेला आहे. यावेळी युवा नेते यशराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील, पंचायत समिती माजी उपसभापती डी.आर.पाटील,जिल्हा परीषद सदस्य विजय पवार,सदस्या सौ.सुग्रा खोंदु,पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,सदस्य संतोष गिरी,सुरेश पानस्कर,माजी सदस्य जालंदर पाटील,बशीर खोंदू,ॲड. डी.पी.जाधव,ॲड.मारुती नांगरे,प्रकाशराव जाधव,कारखाना व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,संचालक बबनराव भिसे, पांडुरंग नलवडे,जयवंतराव पाटील पापर्डेकर,पी.एन.माने,रामभाऊ पाटील,दादासो जाधव,राजाराम मोहिते या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह येथील प्रमुख कार्यकर्ते तसेच नागरिक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी बोलताना आमदार देसाई म्हणाले,पाटण मतदारसंघाला लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व.शिवाजीराव देसाई यांनी एक दिशा ठरवून दिली आहे.लोकनेत्यांचे विचार पाटणच्या तळागाळापर्यंत पोहचले आहेत.पाटण तालुका उभा करण्याचे काम लोकनेत्यांनी केली.विकासाचा डोंगर त्यांनी उभा केला परंतू त्यांच्या पश्चात पाटण तालुक्याची काय परिस्थीती होती हे मी नव्याने सांगायला नको, आज याठिकाणी उघडपणे मी पाटण तालुक्यातील डोंगरकपारीतील पाच पन्नास गांवाची नावे दाव्याने सांगेन ज्या गांवाना माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर हे राज्याचे सार्वजनीक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री असताना रस्त्याच्या कामांकरीता निधी देवू शकले नाहीत राज्याचे बांधकाम मंत्री असताना त्यांच्या हातात बांधकाम विभागाला वर्षाकाठी दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा अधिकार होता.या हजारो कोटीतील केवळ शे-दोनशे कोटी रुपये त्यांनी तालुक्यात आणले असते तरी तालुक्यातील डोंगरकपारीतील गांवामध्ये बारमाही रस्ते पोहचले असते.परंतू ते त्यांना जमले नाही असे सांगून ते म्हणाले, माजी आमदार पाटणकर यांना बांधकाम खात्याचे मंत्री असताना पाटण मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांकरीता जेवढा निधी मंत्री म्हणून आणता आला नाही त्यापेक्षा जादाचा निधी मी केवळ सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून पाटण मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षात आणला आहे. हे मंत्री असताना कराड चिपळूण या मुख्य रस्त्यावरील कराड ते नवारस्ता हा २० ते २५ कोटी रुपयांचा रस्ता केला तालुक्यातील जनतेला वाटले दादांनी मोठे काम केले परंतू ज्यावेळी हा रस्ता वाहतूकीला सुरु झाला तेव्हा जनतेच्या लक्षात आले की आरे दादांनी तर आपल्याच खिशातील पैशाने हा रस्ता केला आहे दररोज पन्नास शंभर रुपयांचा टोल भरा आणि रस्त्यावरुन वाहतूक करा. ही बाब आता जनतेच्या लक्षात आली आहे. मी केवळ आमदार म्हणून केंद्रातून केद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांची एकदाच भेट घेतली व कराड पासून चिपळूणकडे जाणाऱ्या आपल्या मतदारसंघातील घाटमाथ्या पर्यंतच्या रस्त्याला ४१० कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला. तोही विना टोलचा. हे जर आमदारांना जमत असेल तर बांधकाम खात्याच्या मंत्र्याना काय अवघड आहे. परंतू विकासाची दुरदृष्टी नसलेले नेतृत्व आपल्या पाटण तालुक्याला २१ वर्षे मिळाले त्यामुळे आपला तालुका अनेक वर्षे विकासाच्या बाबतीत मागे पडला असा आरोप आमदार शंभूराज देसाईंनी केला असून विकासाचे कोणतेही काम न करता निवडणूकीत कोणते ब्रम्हाअस्त्र काढायचे हे आपल्या विरोधकांना चांगलेच माहिती आहे. याला कुणी बळी पडू नका.मतदारसंघातील जनतेच्या पाठींबावर आज एवढया मोठया प्रमाणात विकासाचे काम करण्याची ताकत मला मिळाली आहे ती ताकत जनतेने अशीच कायम माझे पाठीशी ठेवावी आणि ती जनता ठेवेल अशी मला खात्री आहे. नेमका मतदारसंघाचा विकास कोण करतोय हे जनतेने ओळखल्यामुळेच २०१९ च्या निवडणूकीत या मतदारसंघाचा आमदार कोण असेल हेही जनतेने ठरविले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.उपस्थितांचे स्वागत ॲड.मारुती नांगरे व प्रास्ताविक चेअरमन अशोकराव पाटील यांनी केले.यावेळी युवा नेते यशराज देसाई,डॉ.दिलीपराव चव्हाण, जयवंतराव शेलार यांची भाषणे झाली.