दौलतनगर दि.2६:-महाराष्ट्र विधानसभेत
पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून देशाच्या
राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित झालेले शिवसेना पक्षाचे विधिमंडळ पक्षप्रतोद
पाटणचे लोकप्रिय व विधानसभेतील अभ्यासू आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमदार
शंभूराज देसाई यांची महाराष्ट्र विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी या
पंचवार्षिकमध्ये तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे.सध्या सुरु असलेल्या
अधिवेशनामध्ये आमदार शंभूराज देसाईंची तालिकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली
असल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे यांनी दि.२५ फेब्रुवारी,२०१९
रोजी विधानसभा सभागृहात केली आहे.
महाराष्ट्र
विधानसभा हे लोकशाहीचे महामंदीर असून राज्यातील सर्वोच्च असे सभागृह आहे. या
सभागृहात अधिवेशन काळात विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत
सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हे महाराष्ट्र विधानसभा नियम ८
अन्वये विधानसभेच्या सदस्यांमधून सभाध्यक्ष तालिकेवर विविध पक्षाच्या विधानसभा
सदस्यांची नियुक्ती करण्यात येते.शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेतील आमदार
उत्कृष्ट संसदपटु शंभूराज देसाई यांचे विधानसभेतील कामकाज पाहून त्यांची
महाराष्ट्र विधानमंडळाने सन २०१४ ते २०१९ या पंचवार्षिक मध्ये महाराष्ट्र
विधानसभेच्या तालिकाध्यक्षपदी तिसऱ्यांदा नियुक्ती केली आहे.सन २०१६ चे पावसाळी अधिवेशन, २०१८ ला अर्थसंकल्पीय
अधिवेशन व सध्या सुरु असलेले फेब्रुवारीचे अधिवेशन अशा तीन अधिवेशनात आमदार
शंभूराज देसाईंना तालिकाध्यक्ष म्हणून बसण्याचा बहूमान मिळाला आहे. आमदार शंभूराज
देसाई यांना तिसऱ्यांदा तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची
संधी मिळाली त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र विधानमंडळाला
देशामध्ये आगळी वेगळी प्रतिष्ठा लाभली आहे. अनेकविध क्षेत्रात देशपातळीवर तसेच
राज्यपातळीवर नेतृत्व करणारे नेते या विधानमंडळाने घडविले आहेत.आमदार शंभूराज
देसाई हे पाटणसारख्या डोंगरी आणि दुर्गम तालुक्यातून आमदार म्हणून निवडून आले असून
आमदारकीचा कोणताही पुर्वानुभव नसताना सन २००४ ला आमदार म्हणून विधानसभेची पायरी
चढल्यानंतर संसदीय कामकाजाचा खडान्खडा अभ्यास करुन त्यांनी आमदारकीच्या पहिल्याच
टर्ममध्ये आपल्या हुशारीचे कर्तृत्व सिध्द करुन दाखविले आहे. त्यांच्या हुशारीचे
मुल्यमापन महाराष्ट्राचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या विधानसभेने करुन त्यांना
पहिल्याच टर्ममध्ये विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून सन्मानित करण्यात
आले आहे. आमदार शंभूराज देसाई यांची ही दुसरी टर्म असून विधानसभेतील कामकाजाचा
व्यासंग त्यांनी इतका वाढविला आहे की विधानसभेतील त्यांच्या उत्कृष्ट ज्ञानामुळे
त्यांच्यावर शिवसेना पक्षाच्या वतीने विधानसभेतील उत्कृष्ट जबाबदाऱ्याही
सोपविण्यात आल्या आहेत व येत आहेत. पक्षाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी लिलया
पेलल्याही आहेत.विधानसभेतील शिवसेनेचा बलस्थान चेहरा म्हणून त्यांच्यावर शिवसेना
पक्षाचे विधिमंडळ पक्षप्रतोद म्हणून जबाबदारी सोपविली असतानाच राष्ट्रकुल संसदीय
मंडळाचे महाराष्ट्राचे कार्यकारीणीवरही त्यांची निवड करण्यात आली आहे. विधानसभेचा
तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेचे संपुर्ण कामकाज पाहताना निपक्ष:पातीपणे सभागृहाचे
कामकाज चालवितात त्यामुळे आमदार शंभूराज देसाईंना तालिकाध्यक्ष म्हणून सर्वच
पक्षाच्या वतीने नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे व मिळत आहे. सुरु असलेल्या
अधिवेशनामध्ये विधानसभेचे अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे यांनी सभाध्यक्ष तालिकेवर
त्यांची नियुक्ती केलेनंतर त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
चौकटः-
राजे, तुम्हाला पाहून स्व.बाळासाहेब देसाई यांची आठवण येते.
तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेच्या
अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर सभागृहात उपस्थित असणाऱ्या विविध पक्षाचे
विधानसभा सदस्य अभिमानाने सांगतात. राजे, तुम्ही विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या
खुर्चीवर बसलेले पाहून महाराष्ट्राला दिशा देणारे तुमचे आजोबा स्व.बाळासाहेब देसाई
यांची काहीकाळ आम्हाला आठवण येते.यामध्ये सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षातीलही
विधानसभा सदस्यांचा समावेश असतो.ही अभिमानास्पद बाब आहे.
congratulations for hattrick
ReplyDeleteAbhinandan saheb
ReplyDeleteAbhinandan saheb
ReplyDeleteDada apale manapasun abhinandan. Asech mothe vha V Loknetyanche V Desai gharanyache nav ajaramar kara. Apanas pudhil vatchalisathi majhya V majhya kutumbiyanchya V Patan talukyatil janatechya koti koti Shubhechhya.
ReplyDeleteCongrats 💐💐
ReplyDeleteमनःपूर्वक अभिनंदन
ReplyDelete