Wednesday 27 February 2019

सडादाढोली युवकांकडून युवा नेते यशराज देसाईंचे जंगी स्वागत. आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुर केलेल्या सडादाढेाली रस्त्याचे दिमाखात भूमिपुजन.




             दौलतनगर दि. २7 :- गेली २६ वर्षे डोंगरपठारावरील गांवानी आणि वाडयावस्त्यांनी विरोधकांना पोत्याने भर-भरुन मते दिली त्याच विरोधकांनी डोंगरपठारावरील गावांमध्ये किती विकास केला? असा सवाल करीत गेली साडेचार वर्षे या तालुक्यात आमदार शंभूराज देसाईंनी कोटयावधी रुपयांची विकासकामे करुन दाखविली आहेत. डोंगरपठारावरील गांवामध्ये कधीही न होणारी विविध विकासकामे मंजुर करुन आणण्याचे आणि ती पुर्ण करुन घेण्याचे व्रत आमदार साहेबांनी स्विकारले आहे त्यामुळेच मतदारसंघाच्या सर्वच डोंगरपठारावर चौफेर असा विकास पहावयास मिळत आहे. या डोंगरपठारासह आपल्या चाफळ विभागात त्यांनी गांवे व वाडयांवस्त्यांना विविध विकासकामांकरीता भरघोस असा निधी उपलब्ध करुन दिला आहे. विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघ सुजलाम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी डोंगरपठारावरील व मतदारसंघातील जनतेने ठाम उभे रहावे असे आवाहन युवा नेते यशराज देसाईंनी केले.
                   आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत मंजुर करुन आणलेल्या महाबळवाडी ते सडादाढोली या गावपोहोच रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन व कामांचा शुभारंभ युवानेते यशराज देसाईंच्या हस्ते सडादाढोली येथे करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते,या रस्त्याच्या कामांकरीता आमदार देसाईंनी १ कोटी ५४ लाख ३२ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.यावेळी कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे व्हा.चेअरमन राजाराम पाटील, मा.संचालक प्रकाश नेवगे,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे,शिवदौलत बॅंकेचे संचालक चंद्रकांत पाटील,स्कॉलर्स ॲकॅडमीचे प्रमुख शंकरराव देसाई,शंकर मोरे,सडादाढोलीचे वसंत झोरे,जयराम झोरे,राम झोरे,प्रकाश झोरे,तुकाराम झोरे,निवृत्ती झोरे,बाबुराव झोरे,सखाराम झोरे,धोंडीबा काळे,मारुती झोरे,चंद्रकांत शेळके,शिवाजी झोरे,तानाजी झोरे, सावळाराम झोरे,सचिन झोरे,दिनकर झोरे,गंगाराम झोरे,लक्ष्मण झोरे,पांडूरंग झोरे,धाऊजी यमकर,मोरेश्वर झोरे,बबन झोरे, वैभव झोरे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सडादाढोली गांवातील कार्यकर्ते व मुंबई मित्रमंडळातील युवक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
                    याप्रसंगी बोलताना यशराज देसाई  म्हणाले, आमदार शंभूराज देसाई साहेबांनी आमदारकीच्या आपल्या पहिल्या टर्ममध्ये विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील पाटण मतदारसंघात 217 कोटी रुपयांची विकासकामे केली होती आणि आत्तातर सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. आपल्या सत्ताधारी पक्षाचा आमदार असण्याचा पुरेपुर वापर ते मतदारसंघातील जनतेकरीता करीत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत राहिलेल्या विविध विकासकामांकरीता पाटण मतदारसंघात त्यांनी गत साडेचार वर्षात चौपट वेगाने शासनाच्या विविध योजनांमधून निधी आणून मतदारसंघातील कधीही न होणारी विकासकामे मार्गी लावली आहेत.गतवर्षी रामघळ येथील पारायण सोहळ्यास आमदारसाहेब यांनी भेट दिली होती त्या भेटीदरम्यान आपण सर्व ग्रामस्थांनी संघटीत होवून आपले गाव पोहोच रस्त्याची मागणी केली होती.आपण केलेल्या मागणीचा विचार करुन आमदारसाहेबांनी एक वर्षाच्या आत महाबळवाडी ते सडादाढोली या रस्त्याच्या कामाकरीता ग्रामविकास मंत्रालयाकडील मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत १ कोटी ५४ लाख ३२ हजार रुपये एवढा भरघोस असा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या रस्त्याच्या कामामुळे आपली अनेक वर्षांची रस्त्याची गैरसोय दुर होणार आहे.गत तीस वर्षापासून आपल्या गावाला विरोधकांनी फक्त झुलविण्याचेच काम केले आहे,रस्ता या मुलभूत गरजेची पुर्तता ही विरोधक पुर्ण करु शकले नाहीत.ही दुर्दैवाची बाब आहे.परंतु देसाईसाहेबांनी आपल्याला दिलेला शब्द एक वर्षाच्या आत पुर्ण करुन दाखविला.आता निवडणूकीच्या अगोदर विरोधक आपल्या गावात मते मागण्यासाठी येथील त्यांना आता आपण जाब विचारला पाहिजे या चार वर्षात आमच्यासाठी काय केले याचा.फक्त निवडणूक आली की मते मागायची आणि नंतर जनतेला विकास कामांपासून वंचित ठेवायचे हे कामच विरोधकांनी आजपर्यंत केले आहे.गत साडेचार वर्षात पाटण मतदारसंघात विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे होत आहेत.त्या विकासकामांच्या माध्यामातून पाटण मतदारसंघाचा चेहरा बदलत आहे,त्यामुळे आता होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत आपण आमदारसाहेबांच्याच पाठीशी भक्कमपणे उभे राहून आमदारसाहेबांना भरघोस अशा मतांनी पुन्हा विधानसभेत पाठवायचे आहे. असेही आवाहन त्यांनी शेवठी बोलताना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत सचिन झोरे यांनी केले व उपस्थितांचे आभार  पांडूरंग झोरे यांनी मानले.
चौकट:- सडादाढोली पठार भगव्या फेटयांनी नटले.
            आमदार शंभूराज देसाई हे महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनात असलेमुळे आ. शंभूराज देसाईंनी मंजुर केलेल्या आमच्या रस्त्याचे भूमिपुजन व कामाचा शुभारंभ युवा नेते यशराज देसाईंनी करावा असा आग्रह सडादाढोली ग्रामस्थांनी धरला होता.सडादाढोली गांवामध्ये युवानेते यशराज देसाई येत आहेत हे पाहून सडादाढोली येथील युवकांच्यात एकप्रकारचा उत्साह पहावयास मिळाला.मोठया उत्साहाने या युवकांनी यशराज देसाईंचे भगवे फेटे परिधान करुन व यशराज देसाईंनाही भगवा फेटा बांधून जल्लोषात स्वागत केले.भगव्या फेटयांनी सडादाढोली पठार नटल्याचे या कार्यक्रमात दिसून आले.

No comments:

Post a Comment