दौलतनगर दि.०२:- मी केवळ आमदार आहे, तालुक्याचे यापुर्वीचे आमदार हे
सलग 21 वर्षे आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री होते.कॅबिनेट मंत्री म्हणून
त्यांना जेवढा निधी पाटण मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांकरीता आणता आला नाही
त्याहून कितीतरी पटीने अधिकचा निधी मी आमदार म्हणून मतदारसंघातील रस्त्यांच्या
कामांकरीता चार वर्षात मंजुर करुन आणला. माझा उघडपणे दावा आहे की,पाटणकरांना
मंत्री असताना मतदारसंघातील जे जे रस्ते करता आले नाहीत ते ते सर्व रस्ते मी आमदार
म्हणून पुर्णत्वाकडे नेले याचा मला आनंद वाटतो. स्पष्टच सांगायचे झाल्यास पाटण
मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधायला तसेच त्यांच्या बालेकिल्ल्यातील मुलभूत
गरजांची कामे करायला माजी आ.विक्रमसिंह पाटणकर माझेपेक्षा कमीच पडले असल्याचा टोला
आमदार शंभूराज देसाईंनी माजी आ.विक्रमसिंह पाटणकरांना लगाविला आहे.
निगडे ता.पाटण येथे राज्य शासनाच्या
हरीत ऊर्जा योजनेतंर्गत कसणी-निगडे-माईंगडेवाडी या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन
व जाधववाडी मेंढ येथील पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे व निगडे येथील सार्वजनीक सभागृहाचे उद्घाटन
आ.शंभूराज देसाईंच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.कसणी-निगडे-माईंगडेवाडी
या ८ किमी रस्त्यांच्या कामांकरीता त्यांनी ३ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजुर
करुन आणला आहे.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी
चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,सदस्या सौ.सीमा मोरे,शिवसेना तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण,नारायण
कारंडे, अंकुश महाडिक,नानासो साबळे,मनोज मोहिते,विकास गिरीगोसावी,दत्तात्रय पाटील,बजरंग डिसले,सरपंच
नैना कदम,विलास गोंडाबे,कसणी सरपंच मिनल मस्कर, खाशाबा डिसले,ज्ञानदेव कदम,जिंती सरपंच
दामाजी कदम,शंकर पवार,आत्माराम पुजारी,सुरेश पाटील या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह,कार्यकर्ते
तसेच नागरिक व महिला यांची प्रमुख
उपस्थिती होती.
यावेळी
आ.देसाई म्हणाले,माईंगडेवाडी
या विभागाचे शेवठचे टोक आहे.पवारवाडी कुठरेपासून या विभागात येताना पवारवाडी,पागेवाडी-कुठरे,जाधववाडी,मत्रेवाडी,निवी,कसणी,कसणीच्या सर्व वाडया,वरचे
घोटील,निगडे व शेवठचे माईंगडेवाडी यातील एकही असे गांव किंवा वाडी नाही ज्यामध्ये
गत चार वर्षात एकही विकासाचे काम आपण दिले नाही. प्रत्येक गांवामध्ये व
वाडीवस्तीमध्ये साडेचार वर्षात एकापेक्षा जास्त कामे देण्याचा प्रयत्न आपण केला
आहे. तालुक्याच्या माजी आमदारांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात या मी सांगितलेल्या
गांवाना किती रुपयांचा निधी मंजुर करुन दिला.त्यांच्या हातात निधी देण्याचे असताना
ते आपल्याला काही देवू शकले नाहीत ते आता हातात काही नसताना आपल्याला काय देणार
आहेत. 20१४ च्या निवडणूकीपासून ते या विभागात आले देखील
नसतील याची मला खात्री आहे.मग कोणतेही विकासाचे काम न देणाऱ्यांना आपण मते देवून
आपल्या पदरात काय पाडून घेणार आहे याचा विचार या विभागातील जनतेने करावा.
माईंगडेवाडी रस्ता पाटणकरांना मंत्री असताना का करता आला नाही? माईंगडेवाडी गांव आपल्या तालुक्यात नाही का? बांधकाम मंत्री असताना त्यांच्या
खात्यातील थोडीफार रक्कम जरी या रस्त्याच्या कामांकरीता दिली असती तरी डोंगरकपारीत
वसलेल्या या गांवाला रस्ता मिळू शकला असता परंतू पाटणकरांना तेवढेही करता आले नाही
एवढया लांबचे राहू दया ज्या पाटण विभागाला ते स्वत:चा बालेकिल्ला म्हणतात त्या
बालेकिल्ल्यातील अनेक गांवाना व वाडयावस्त्यांना बारमाही रस्ता करणे त्यांना शक्य
झाले नाही.आमदार म्हणून मी मांईंगडेवाडी गांवाला एकदा नाही दोनदा निधी मंजुर करुन
दिला आता तर कसणी पासून निगडे व निगडयापासून मांईंगडेवाडी पर्यंत रस्ता
करण्याकरीता आपण शासनाच्या तिजोरीतून ३
कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.गांव तिथे रस्ता आणि वाडी
तिथे काम देण्याचे उदीष्ट आपण पुर्ण करीत आहोत. निवडणूकीच्या प्रचाराला
माईंगडेवाडी मध्ये आलो तेव्हाच तुमचा रस्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये पुर्ण करुन
देणार असा शब्द मी माईंगडेवाडीकरांना दिला होता तो शब्द मी आज पुर्ण करुन दाखविला
आहे.निवी पासून कसणी पर्यंतच्या एक कोटी रुपयांच्या रस्त्याचे आपण काही
दिवसापुर्वीच भूमिपुजन केले आता निवी ते कसणी ते माईंगडेवाडी
इथपर्यंत गुळगुळीत रस्ता आपण करीत आहोत.दिलेला शब्द
पाळणाऱ्या नेतृत्वाला पांठीबा दयायचा का केवळ निवडणूकीपुरते मते
मागायला येणाऱ्यांना पाठींबा दयायचा याचाही सारासार विचार या विभागाने करायचा
आहे.निगडे गांव कायमस्वरुपी आपल्या पाठीशी असणारे गांव आहे या गांवाचा आदर्श या
विभागातील गांवानी घ्यावा असेही ते शेवठी बोलताना म्हणाले. स्वागत प्रास्ताविक दिपक
कदम यांनी केले व आभार बापूराव डिसले यांनी मानले.
चौकट
:- चौफेर विकासाचे उदाहरण याहून काय वेगळे
असू शकते.- आ.देसाई.
पवारवाडी पासून पागेवाडी-कुठरे,जाधववाडी,मत्रेवाडी,निवी,कसणी,कसणीच्या सर्व
वाडया,वरचे घोटील,निगडे व शेवठचे माईंगडेवाडी असा मार्ग असणाऱ्या प्रत्येक
गांवामध्ये साडेचार वर्षात केलेली कांमे ही आपण केलेल्या विकासाची साक्षीदार
आहेत.प्रत्येक गांवात विकासाचे काम असेल तर चौफेर विकासाचे उदाहरण याहून काय वेगळे
असू शकते असेही आ. शंभूराज देसाई यावेळी म्हणाले.
No comments:
Post a Comment