Friday 1 March 2019

पावसाळयात छत्र्या उगवतात तसे निवडणूकीत उगवणाऱ्यांना बाजुलाच ठेवा. आमदार शंभूराज देसाईंचे जनतेला आवाहन.






दौलतनगर दि.०2:- 2009 च्या विधानसभा निवडणूकीत 580 मतांनी पराभूत झालो तरी याचा दोष मी माझ्या कार्यकर्त्यांना किंवा मतदारांना दिला नाही माझ्या नशिबात 2009 ला आमदारकी नव्हती असे समजून पराभवाच्या दुसऱ्या दिवशी मला मते दिलेल्या व न दिलेल्यांही मतदारांचे आभार मानायला तालुकाभर फिरत होतो.सलग पाच वर्षे जनतेच्या सुखदु:खात सहभागी होत होतो अवस,पुणवेला मतदारांना दिसलो नाही तर कायम जनतेत राहिलो म्हणूनच जनतेने मला 2014 ला पुन्हा आमदार केले. 2009 ची चुक जनतेच्या लक्षात आली.2014 ला पराभूत झालेले माजी आमदारपुत्र आले का तुमचे आभार मानायला,नसतीलच आले.आता निवडणूक आलीय त्यामुळे येतील कदाचित परंतू पाटण मतदारसंघातील जनतेला मला आवाहन करायचे आहे पावसाळयात छत्र्या उगवतात तसे निवडणूकीत केवळ मतापुरते उगवणाऱ्यांना जनतेने जसे आपण त्या छत्र्यांकडे दुर्लक्ष करतो तसेच यांच्याकडेही दुर्लक्ष करुन बाजूलाच ठेवावे असे आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी केले.             
               उधवणे ता.पाटण येथे पोहोच रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आ.शंभूराज देसाईंच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते या विभागातील सळवे,सदुवर्पेवाडी,बनपुरी येथील रस्त्यांच्या कामांचेही भूमिपुजन करण्यात आले या चार कामांकरीता आ.देसाईंनी १ कोटी ५२ लाख ५० हजारांचा निधी मंजुर करुन दिला आहे.याप्रंसगी लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, पंचायत समितीचे माजी उपसभापती डी.आर.पाटील,पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,सदस्या सौ.सीमा मोरे,मोरणा शिक्षण संस्थेचे सदस्य दिलीपराव जानुगडे, रामभाऊ साळुंखे,नारायण कारंडे,टी.डी.जाधव,शिवाजीराव शेवाळे,रणजित पाटील,अंकुश महाडिक, नानासो साबळे,मनोज मोहिते,कारखान्याचे संचालक वसंतराव कदम,विकास गिरी गोसावी,शिवसेना तालुकाप्रमुख सचिन जाधव,ज्योतिराज काळे,पांडुरंग साळुंखे,संतोष साळुंखे,संजय पाटील,बाबा मोकाशी,शंकर कुंभार,कैलास साळुंखे,शिवाजी पवार,नानासो पाटील,एकनाथ जाधव,दगडू सुतार,मनोहर निकम,अंकुश साळुंखे,दिनकर साळुंखे,या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्ते तसेच नागरिक व महिला यांची प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी आ.देसाई म्हणाले,पाटण मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून साडेचार वर्षात शासनाची अशी एकही योजना शिल्लक राहिली नाही ज्या योजनेतून पाटण मतदारसंघात विकासाचे काम आले नाही.केद्रांपासून राज्य शासन व जिल्हास्तर ते तालुकास्तर येथे राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेतून मतदारसंघातील विकासाच्या कामांकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर करुन आणायचे काम केले.मतदारसंघातील जनतेला माजी आमदारांच्या काळात यातील बऱ्याचशा योजना माहितीही नव्हत्या त्या योजनांमधून आपण मतदारसंघातील रस्त्यांच्या,पुलांच्या, छोटया पुलांच्या,पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या, जनतेच्या हिताच्या सार्वजनीक कामांच्याकरीता भरघोस असा निधी मंजुर करुन आणला.उधवणे गांवाचेच उदाहरण घ्या या गांवातील रस्त्याकरीता दोन दोन योजनेतून निधी मंजुर करुन ‍ दिला अशी अनेक उदाहरणे मतदारसंघातील प्रत्येक गांवात तुम्हाला या साडेचार वर्षात पहावयास मिळतील. कोटयावधी रुपयांचा निधी तालुक्यात आणून आपला कार्यकर्ता  विकासकामांच्या संदर्भात आपण इतका सक्षम केला आहे की,कार्यकर्ताचा आता सांगू लागला आहे आमच्या गावचे काम हे या योजनेतून बसवा हा पारदर्शीपणा या अगोदरच्या माजी आमदारांनी मतदारसंघातील जतनेमध्ये कधी आणू  दिला होता का ? विकासाची दृष्टी असेल तर सर्व काही शक्य होते परंतू आपल्या माजी आमदारांना विकासाच्या कामांमध्ये सक्षमपणा कधीच आणता आला नाही त्यामुळेच त्यांच्या काळात तालुक्यातील अनेक गांवे ही शासनाच्या विविध योजनांमध्ये बसत असूनही त्यांना विकासाचे काम दयायला माजी आमदार निष्क्रीय ठरले.मतदारसंघाचा आमदार होण्यापुर्वी मला आमदार होण्याची संधी दया मतदारसंघातील प्रत्येक गांवामध्ये  विकासाचे काम करेन,जनतेच्या हिताचे निर्णय घेईन असे आश्वासन मी मतदारांना दिले होते त्यानुसार 100 टक्के नाही परंतू 85 ते 90 टक्के गांवामध्ये मी या साडेचार वर्षात कोणत्या ना कोणत्या योजनेतून विकासाचे काम देवून या गांवाचा सर्वांगीण  विकास साधण्याचा प्रयत्न केला. एक हजार कोटींपेक्षा जादा  निधी मतदारसंघात आणेन असे माझे वचन होते ते पुर्ण करण्याकरीता आपली अहोरात्र धडपड सुरु आहे. आमदार नव्हतो तेव्हाही जनतेमध्ये होतो व आमदार असतानाही जनतेमध्ये आहे.एका एका गांवामध्ये विविध विकासकामे करण्याकरीता माझ्या किती तरी फेऱ्या होत आहेत याचे मोजमाप जनताच विरोधकांना सांगेल.याउलट 2014 च्या निवडणूकीत पराभूत झालेले माजी आमदार पुत्र नुसत्याच वाडयात बसून गप्पा हाणत असतात ते पराभवानंतर किती वेळा तुमच्या गांवात आले, या विभागात आले. मतांचा सौदा करायला येतील त्यामुळे जनतेने सावध रहा कारण 2009 चा आपला पराभव हा विरोधकांनी मतांचा बाजार मांडल्यामुळेच झाला होता हे कायम ध्यानात ठेवा असेही आवाहन त्यांनी शेवठी बोलताना केले. उपस्थितांचे स्वागत एकनाथ जाधव यांनी केले व आभार पांडुरंग साळुंखे यांनी मानले. 
चौकट :- 18824 जनतेने विश्वासाने दिलेले मताधिक्क्य.- आ.देसाई.
             18824 एवढे मताधिक्क्य हे जनतेने आपले काम बघून दिलेले मतदान आहे.निवडून येणारा आमदार आपले प्रश्न तडफेने शासन दरबारी मांडून ते सोडवून घेवू शकतो हा विश्वास पाटण मतदारसंघातील जनतेमध्ये असल्यानेच 18824 इतके मताधिक्क्य मला मिळाले मिळालेले मताधिक्कय हे जनतेने विश्वासाने दिलेले मताधिक्क्य आहे असेही आ.शंभूराज देसाई यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment