दौलतनगर दि.2२:- पाटण
मतदारसंघातील निवडणूकांना आपले विरोधक रती महारतींना आणून विरोधात प्रचार करतात.
2014 च्या निवडणूकीतही रती महारती विरोधकांच्या प्रचाराला पाटणला आले होते. या
मतदारसंघाला लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व. शिवाजीराव देसाई यांच्या विचारांची
परंपरा आहे. लोकनेते यांच्या पश्चात वाडयात गेलेली तालुक्याची आमदारकी आपल्या
प्रामाणीक व निष्ठावान कार्यकर्त्यांनी मोठया हिकमतीने वाडयातून खेचून आणली
होती.त्याच्याही पुढे जावून 2014 च्या निवडणूकीत याच कार्यकर्त्यांनी अहोरात्र
कष्ट घेवून 18824 च्या मताधिक्क्याने जिल्हयात सर्वात जास्त मतदान मला मिळवून दिले आहे याची जाणिव मला आहे.ज्या विश्वासाने जनतेने मला
आमदार केले आहे त्या विश्वासाने मतदारसंघातील जनतेच्या हिताकरीता मी गेली साडेचार
वर्षे मतदारसंघात काम करीत असून मतदारसंघाचा चौफेर विकास कसा करायचा हे आपण दाखवून
दिले आहे याच विकासाच्या माध्यमातून 2019 च्या निवडणूकीत पाटण मतदारसंघाचा आमदार
कोण असणार ?
हे जनतेने ठरविले असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी दिले आहे.
मारुलहवेली
ता.पाटण याठिकाणी आमदार शंभूराज देसाईंचे विशेष प्रयत्नातून राज्याच्या
अर्थसंकल्पातून सोनाईचीवाडी ते मारुलहवेली व राज्य शासनाच्या 2515 योजनेतंर्गत
मारुलहवेली अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे अशा विविध कामांचा भुमीपूजन कार्यक्रम आमदार शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत आयोजीत
करण्यात आला होता याप्रसंगी ते
बोलत होते.या
दोन्ही कामांसाठी त्यांनी सुमारे १ कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिलेला
आहे. यावेळी युवा नेते यशराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन
अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव
शेलार,शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील, पंचायत समिती माजी उपसभापती डी.आर.पाटील,जिल्हा
परीषद सदस्य विजय पवार,सदस्या सौ.सुग्रा खोंदु,पंचायत समिती गटनेते पंजाबराव
देसाई,सदस्य संतोष गिरी,सुरेश पानस्कर,माजी सदस्य जालंदर पाटील,बशीर खोंदू,ॲड.
डी.पी.जाधव,ॲड.मारुती नांगरे,प्रकाशराव जाधव,कारखाना व्हाईस चेअरमन राजाराम
पाटील,संचालक बबनराव भिसे, पांडुरंग नलवडे,जयवंतराव पाटील पापर्डेकर,पी.एन.माने,रामभाऊ पाटील,दादासो जाधव,राजाराम मोहिते
या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह येथील
प्रमुख कार्यकर्ते तसेच नागरिक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार देसाई म्हणाले,पाटण मतदारसंघाला लोकनेते बाळासाहेब
देसाई,स्व.शिवाजीराव देसाई यांनी एक दिशा ठरवून दिली आहे.लोकनेत्यांचे विचार
पाटणच्या तळागाळापर्यंत पोहचले आहेत.पाटण तालुका उभा करण्याचे काम लोकनेत्यांनी
केली.विकासाचा डोंगर त्यांनी उभा केला परंतू त्यांच्या पश्चात पाटण तालुक्याची
काय परिस्थीती होती हे मी
नव्याने सांगायला नको, आज याठिकाणी उघडपणे मी पाटण तालुक्यातील डोंगरकपारीतील पाच
पन्नास गांवाची नावे दाव्याने सांगेन ज्या गांवाना माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर
हे राज्याचे सार्वजनीक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री असताना रस्त्याच्या
कामांकरीता निधी देवू शकले नाहीत राज्याचे बांधकाम मंत्री असताना त्यांच्या हातात
बांधकाम विभागाला वर्षाकाठी दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा अधिकार
होता.या हजारो कोटीतील केवळ शे-दोनशे कोटी रुपये त्यांनी तालुक्यात आणले असते तरी
तालुक्यातील डोंगरकपारीतील गांवामध्ये बारमाही रस्ते पोहचले असते.परंतू ते त्यांना
जमले नाही असे सांगून ते म्हणाले, माजी आमदार पाटणकर यांना बांधकाम खात्याचे
मंत्री असताना पाटण मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांकरीता जेवढा निधी मंत्री
म्हणून आणता आला नाही त्यापेक्षा जादाचा निधी मी केवळ सत्ताधारी पक्षाचा आमदार
म्हणून पाटण मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षात आणला आहे. हे मंत्री असताना कराड
चिपळूण या मुख्य रस्त्यावरील कराड ते नवारस्ता हा २० ते २५ कोटी रुपयांचा रस्ता
केला तालुक्यातील जनतेला वाटले दादांनी मोठे काम केले परंतू ज्यावेळी हा रस्ता
वाहतूकीला सुरु झाला तेव्हा जनतेच्या लक्षात आले की आरे दादांनी तर आपल्याच
खिशातील पैशाने हा रस्ता केला आहे दररोज पन्नास शंभर रुपयांचा टोल भरा आणि
रस्त्यावरुन वाहतूक करा. ही बाब आता जनतेच्या लक्षात आली आहे. मी केवळ आमदार
म्हणून केंद्रातून केद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांची एकदाच भेट
घेतली व कराड पासून चिपळूणकडे जाणाऱ्या आपल्या मतदारसंघातील घाटमाथ्या पर्यंतच्या
रस्त्याला ४१० कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला. तोही विना टोलचा. हे जर
आमदारांना जमत असेल तर बांधकाम खात्याच्या मंत्र्याना काय अवघड आहे. परंतू
विकासाची दुरदृष्टी नसलेले नेतृत्व आपल्या पाटण तालुक्याला २१ वर्षे मिळाले
त्यामुळे आपला तालुका अनेक वर्षे विकासाच्या बाबतीत मागे पडला असा आरोप आमदार
शंभूराज देसाईंनी केला असून विकासाचे कोणतेही काम न करता निवडणूकीत कोणते
ब्रम्हाअस्त्र काढायचे हे आपल्या विरोधकांना चांगलेच माहिती आहे. याला कुणी बळी
पडू नका.मतदारसंघातील जनतेच्या पाठींबावर आज एवढया मोठया प्रमाणात विकासाचे काम
करण्याची ताकत मला मिळाली आहे ती ताकत जनतेने अशीच कायम माझे पाठीशी ठेवावी आणि ती
जनता ठेवेल अशी मला खात्री आहे. नेमका मतदारसंघाचा विकास कोण करतोय हे जनतेने
ओळखल्यामुळेच २०१९ च्या निवडणूकीत या मतदारसंघाचा आमदार कोण असेल हेही जनतेने
ठरविले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.उपस्थितांचे
स्वागत ॲड.मारुती नांगरे व
प्रास्ताविक चेअरमन अशोकराव पाटील यांनी केले.यावेळी युवा नेते यशराज देसाई,डॉ.दिलीपराव
चव्हाण, जयवंतराव
शेलार यांची भाषणे झाली.
No comments:
Post a Comment