दौलतनगर दि.25:- पाटण
मतदारसंघातील अनेक युवक नोकरी कामधंदयानिमित्त जसे मुंबईमध्ये आहेत तसेच मोठया
प्रमाणात पुण्यात देखील आहेत.मुंबईप्रमाणे पुणे-पिपंरी चिचंवड येथे
मोठया संख्येने असणाऱ्या युवकांनी गांवाकडे आल्यानंतर पुण्यातील रहिवाशी सर्व युवकांना
एका छताखाली आणणेकरीता आमचा एखादा युवक मेळावा घ्यावा अशी अपेक्षा
अनेकदा व्यक्त केली. युवकांच्या आग्रहास्तव या शहरात दोनदा युवकांचे मेळावे पार
पडले आपल्या गांवाकडे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपल्या
गांवाकरीता,वाडीवस्तीकरीता नेमके काय करतात हे जाणून घेणेकरीता सर्वांनाच उत्सुकता
असते तशीच उत्सुकता येथील युवकांच्या मध्ये आहे.येथील युवकांना गावाकडच्या
विकासाची आस आहे हे पाहून आनंद झाला गावाकडच्या विकासाकरीता युवकांची असणारी एकजुट
ही कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
पाटण विधानसभा मतदारसंघात आमदार शंभूराज देसाई
यांचेमार्फत मोठया प्रमाणात सुरु असलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जाणून घेणेकरीता
पाटण तालुका पुणे-पिपंरी चिचंवड रहिवाशी युवकांनी आकुर्डी येथे
युवक मेळाव्याचे आयोजन केले होते.यावेळी आ.शंभूराज देसाई बोलत होते.युवक मेळाव्यात
आ.देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षात केलेल्या विविध
विकासकामांचा लेखाजोखाच पुणे-पिपंरी चिचंवडमधील रहिवाशी युवकांच्या समोर
मांडला.आपल्या मतदारसंघाच्या आमदारांनी केलेल्या विकासकांमाची माहिती दिल्याने येथील युवकांच्या मध्ये मोठा
उत्साह पाहण्यास मिळाला.यावेळी मेळाव्यास आप्पासो उदुगडे,सुधीर कदम,संतोष देसाई,जुबेर
चिखलकर,अशोक पाटील,संदीप देसाई,उमेश पाटील,हणमंत शेजवळ,महेश शेंडे,शंकर गालवे,राजेंद्र
साळुंखे,अजित पाटील,अभिजीत पाटील,शशिकांत कानडे,अमोल मांडवेकर,जितेंद्र
निळुगडे,विजयराव मोरे या प्रमुख
पदाधिकाऱ्यांसह युवा कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार
देसाई म्हणाले,आपला पाटण तालुका डोंगराळ व दुर्गम तालुका असल्याने
तालुक्यातील युवक हे उच्च शिक्षण घेवून नोकरी कामधंदयानिमित्त मुंबई तसेच पुणे या मोठमोठया
शहरात वास्तव्यास आहेत.घार हिंडे आकाशी,चित्त तिचे पिलापाशी या म्हणीप्रमाणे आपण
नोकरी,कामधंदयानिमित्त बाहेरगांवी असलो तरी आपल्या गांवामध्ये,वाडीवस्तीमध्ये
गावाकडच्या लोकांना त्यांच्या मुलभूत सुविधा मिळतात का नाही? याकडे आपले कायम लक्ष
असते.अनेकदा मुंबई मधील युवक विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात मला भेटून त्यांच्या
गांवाकडे प्रलंबीत राहिलेल्या कामांच्या संदर्भात मागणी करुन त्यांची ही मागणी
पुर्णत्वाकडे कशी जाईल यासाठी पाठपुरावा करतात.आपण मोठया विश्वासाने निवडून
दिलेल्या लोकप्रतिनिधींने आपल्या गांवाचा विकास करावा एवढीच माफक अपेक्षा त्यांची
असते.मला सांगायला आनंद वाटेल ज्या विश्वासाने पाटण मतदारसंघातील मतदारांनी मला
आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करण्याचा मी गेल्या साडेचार
वर्षात प्रयत्न केला.सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून काम करताना जनतेच्या ज्या
ज्या अपेक्षा आहेत त्या त्या अपेक्षा पुर्ण करण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला.आज
पाटण मतदारसंघात सातारा जिल्हयात एक नंबरची विकासकांमे सुरु आहेत 2014 च्या निवडणूकीत मी जनतेला दिलेल्या विविध
आश्वासनांपैकी 85 ते 90 टक्के आश्वासने पुर्ण करण्याचे काम मी केले आहे हे आपण
पहात आहात.एक हजार कोटी रुपयांचा निधीचा टप्पा आपण पाच वर्षात पुर्ण करीत आहोत
याचा मला आनंद वाटतो मतदारसंघाचा चौफेर विकास झाला पाहिजे एवढे एकच उदिष्ट ठेवून
मी काम करीत आहे.येणाऱ्या विधानसभा निवडणूकीला जनतेच्या दारात मते मागायला जाताना
आपण केलेला विकास जनतेसमोर घेवूनच मते मागायला जाणार आहे.आपण केलेला
हाच चौफेर विकास मतदारसंघाला प्रगतीच्या मार्गाने नेण्यास मदत करीत
आहे.मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात आतापर्यंत न झालेली विकासकामे मार्गी लावण्यात मला
यश मिळाले मग यामध्ये गावांना पोहोच किवां गांवे जोडणारे बारमाही रस्ते असू
दया,पिण्याच्या पाण्याच्या योजना असू दया या मुलभूत गरजा प्राधान्याने पुर्ण
करण्याचे काम आपण केले याकरीता मतदार संघातील जनतेबरोबर मुंबई,पुणे-पिपंरी चिचंवड तसेच मतदारसंघाच्या बाहेरगांवी रहिवाशी असणाऱ्या आपणांसारख्या युवकांची साथ
मिळाली असे सांगून ते म्हणाले या मेळाव्यामध्ये मी कुणाचे माप काढायला आलो नाही तर
मी गत साडेचार वर्षात तुमच्या सर्वाच्या गांवामध्ये,वाडीवस्तीवर कोणकोणती न होणारी
व न झालेली विविध विकासकांमे कशाप्रकारे मार्गी लावली हे सांगण्याकरीता आलो आहे.मी
पाटण मतदारसंघातील गांवामध्ये केलेला विकास हा सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट आहे. आपल्या
विरोधकांना तोच पचणी पडेना झाला आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली
आहे. विकासाची कास धरुन चालण्याची व विकास करणाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची
आपल्या पाटण मतदारसंघाला परंपरा आहे तीच परंपरा पुणे-पिपंरी
चिचंवड रहिवाशी युवकांनी कायम ठेवावी असे आवाहन करुन तुमच्या गांवाच्या
विकासाकरीता आमदार म्हणून माझे कायम पाठबळ आपल्याला राहील केव्हाही व कुठेही हाक
मारा आमदार म्हणून मी आपल्या पाठीशी उभा राहीन असेही ते शेवठी
बोलताना म्हणाले.
चौकट :- मतदारसंघातील युवकांनी इतिहास रचण्याचे काम केले.-
आ.देसाई.
2004 ची किंवा 2014 ची विधानसभा
निवडणूक असो या दोन्ही निवडणूकांमध्ये पाटण मतदारसंघातील युवकांनी इतिहास रचण्याचे
काम केले त्यामुळेच सातारा जिल्हयात सर्वाधिक मते मला मिळाली युवकाच्या या ॠणातून
उतराई होणे शक्य नाही.निवडणूकीचा हंगाम आता सुरु होत आहे कधीही आपल्या सुखदु:खात
सहभागी न झालेले मतापुरते आता आपल्याकडे येतील. त्यांना सांगा मते मागताय पण,
गेल्या पाच वर्षात आमच्या गांवाकरीता तुम्ही काय केले एवढा एकच प्रश्न विचारा. ते
नक्कीच निरुत्तर होतील यात शंका नाही असेही आ.देसाई म्हणाले.
साहेब कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत आपल्या कामापुढे
ReplyDelete👌👌
ReplyDeleteछान
ReplyDelete