Tuesday 26 February 2019

पाटण मतदारसंघातील शिल्लक राहिलेल्या मागण्यांसंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्या. आ. शंभूराज देसाईंची सन २०१८-१९ च्या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत मागणी.



दौलतनगर दि.2६:- पाटण विधानसभा मतदारसंघात गृह,नगरविकास,सार्वजनींक बांधकाम व सार्वजनीक आरोग्य विभागाकडील असणाऱ्या आमच्या काही मागण्या राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयाअभावी शिल्लक राहिल्या आहेत या शिल्लक राहिलेल्या मागण्यांसंदर्भात राज्य शासनाने लवकरात लवकर धोरणात्मक असे निर्णय घ्यावेत व या मागण्या पुर्ण कराव्यात तसेच आवश्यक असणाऱ्या कामांना निधी मंजुर करुन दयावा अशी आग्रही मागणी आमदार शंभूराज देसाईंनी आज विधानसभेत केली.
                         महाराष्ट्र विधानसभेत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील पुरवणी मागण्यावर आज गृह,महसूल व वन, नगरविकास,सार्वजनींक बांधकाम व सार्वजनीक आरोग्य  व कौशल्य विकास या मागण्यांवर चर्चा होती.यावेळी आ.शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघातील गृह,नगरविकास,सार्वजनींक बांधकाम व आरोग्य विभागाकडील शिल्लक राहिलेल्या मागण्यांवर शासनाचे लक्ष वेधून या मागण्या लवकरात लवकर पुर्ण कराव्यात असा आग्रह धरला.
                         याप्रसंगी मागण्या करताना आ.शंभूराज देसाई म्हणाले,आमचे पाटण मतदारसंघात मल्हारपेठ हे बाजारपेठेचे गांव असून याठिकाणी असणारे मल्हारपेठचे पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन येथे पोलीस स्टेशन करण्यास मान्यता दयावी अशी आमची बरेच वर्षाची मागणी आहे. यासंदर्भातील प्रस्तावही गृह विभागाकडे सादर करण्यात आला आहे. गृहराज्यमंत्री यांनी यासंदर्भात बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन देखील दिले आहे. ती बैठक लवकरात लवकर घेवून मंत्री यांनी तो निर्णय घ्यावा तसेच  पाटण पोलीस स्टेशन,मल्हारपेठ,ढेबेवाडी व कोयनानगर येथील पोलीस औटपोस्टमध्ये मनुष्य बळ कमी आहे.कायदा व सुव्यवस्था राखणेकरीता येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावर ताण येत आहे याठिकाणी आवश्यक असणारे मनुष्यबळ लवकर या पोलीस स्टेशनना दयावे.असे सांगून त्यांनी नगरविकास विभागावर बोलताना पाटण या तालुक्याच्या ठिकाणी नव्यानेच नगरपंचायतीची स्थापना करण्यात आली आहे.नगरपंचायतीला आवश्यक असणारे अधिकारी व कर्मचारी यांची संख्या याठिकाणी कमी आहे.मुख्याधिकारी देण्यात आला आहे त्यासही चार्ज देण्यात आला आहे.नगरपंचायतीतंर्गत असणारे रस्ते,गटर इत्यादी सार्वजनीक बांधकाम विभागाकडील असणारी कामे करुन घेणेकरीता नगरपंचायतीकडे तज्ञ असे अधिकारी व कर्मचारी नाहीत त्यामुळे नगरपंचायतीकडील बांधकामांची सर्व कामे ही येथील सार्वजनीक बांधकाम उपविभागांच्या अधिकाऱ्यांकडून करुन घ्यावीत.
                             असे सांगत बांधकाम विभागावर बोलताना ते म्हणाले,पाटण मतदारसंघात ग्रामीण मार्गांची संख्या जास्त आहे.इतर जिल्हा मार्गांची संख्या १३ ते १४ इतकी आहे. दुर्गम आणि डोंगराळ विभागातील ग्रामीण व इतर जिल्हा मार्गांना प्रमुख जिल्हा मार्ग असा दर्जा देणेकरीता एक वर्षापुर्वी पाटण मतदारसंघातील सुमारे २० रस्त्यांची कामे मी शासनाकडे प्रस्तावित केली आहेत यावर अद्यापही कसालाही निर्णय झाला नाही तो निर्णय शासनाने लवकरात लवकर घ्यावा.तर काशीळ-पाल-तारळे-जळव-मणदुरे-पाटण या प्रमुख जिल्हा मार्गावर महाराष्ट्रातील प्रसिध्द अशी तीन देवस्थाने आहेत यामध्ये पालीचा खंडोबा, जळवचा जोतिबा व मणदुरे येथील निवकणे येथे जानाई देवी अशी प्रसिध्द देवस्थाने आहेत या प्रमुख जिल्हा मार्गास राज्य मार्ग असा दर्जा देवून या रस्त्याचे रुंदीकरणासह काम पुर्ण करणेकरीता भरघोस असा निधी दयावा अशी माझी अनेक वर्षाची मागणी आहे. वरील दोन्ही विषयासंदर्भात राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री यांचेकडे मी आग्रह धरला होता या दोन्ही विषयांचे प्रस्ताव सादर करावेत अशा सुचनाही त्यांनी दिल्या होत्या त्यानुसार प्रस्ताव सादर केले आहेत मात्र कार्यवाही झाली नाही यावरही शासनाने निर्णय घ्यावा. तसेच नाडे ढेबेवाडी हाही प्रमुख जिल्हा मार्ग असून याठिकाणी नाडे पासून १ किमी अंतरावर असणारा सांगवड येथील मोठया पुलावर नेहमी वाहतूकीची कोंडी होती. हा पुल जुना झाला असून त्याठिकाणी पश्चिमेच्या बाजुस दुसरा मोठा पुल उभारण्यास वाव आहे.तर सार्वजनीक बांधकाम विभागाने नाबार्ड योजनेंतर्गत सांगवड येथील सध्या अस्तित्वात असणाऱ्या पुलांच्या उंचीचाच पश्चिमेच्या बाजुस नवीन मोठा पुल उभारण्यास आवश्यक असणारा निधी विशेष बाब म्हणून मंजुर करुन दयावा अशी मागणी केली.सार्वजनीक आरोग्य विभागावर मागणी करताना आ.देसाई म्हणाले, पाटण ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय असा दर्जा देणेकरीताचा श्रेणीवर्धन प्रस्ताव शासनाच्या आरोग्य विभागाकडे सन २०१६ साली सादर केला आहे.तर पाटण आणि ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्यविषयक सोई सुविधा मिळवून देणेकरीता आरोग्य साहित्यांची कमतरता आहे व याठिकाणी मोठया प्रमाणात आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत या तिन्ही विषयासंदर्भात आमचे पक्षाचे ना.एकनाथ शिंदे हे आरोग्य मंत्री आहेत त्यांनी याच अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक घ्यावी अशी त्यांचेकडे मागणी केली आहे तीही बैठक त्यांनी लवकर घेवून आरोग्य विभागातील तीन प्रश्नांसंदर्भात धोरणात्मक असा निर्णय घ्यावा असाही आग्रह आमदार शंभूराज देसाईंनी या पुरवणी मागण्यांवर बोलताना धरला.
चौकट :- पाटण नगरपंचायतीचा आडमुठेपणा विधानसभेत पोहचला.
             नगरविकास विभागाच्या मागण्यावंर आ.देसाईंनी पाटण नगरपंचायत ही राजकीय दृष्टीकोनातून आमदार फंड, जिल्हा वार्षिक योजनेतील नगरोथ्यान निधीमधून सुचविलेल्या विकासकामांना नगरपंचायतीचे आवश्यक असणारे ठराव, कागदपत्रे मागणी करुनही सहा- सहा महिने देत नाही.नगरपंचायतीच्या आडमुठेपणामुळे विकासकामांना खीळ बसत असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.पाटणची नगरपंचायत राजकीय दृष्टीकोनातून ठराव देत नसेल तर याठिकाणी सुचविण्यात आलेल्या विविध विकासकामांना नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्याच्या सहीने १५ दिवसाच्या आत आवश्यक असणारी समंतीपत्र देवून ही कामे मार्गी लावावीत अशा सक्त सुचना नगरविकास मंत्र्यांनी संबधितांना दयाव्यात अशीही त्यांनी मागणी केली.

3 comments: