Thursday, 27 June 2019

लोकसभा निवडणूकीदिवशी तारळयात पदाधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटीलवर अधिवेशन संपण्याच्या आत कारवाई करा. शासनाचे विधानसभेत आदेश. आमदार शंभूराज देसाईंनी मांडला औचित्याच्या मुद्या.



    

       
दौलतनगर दि.२७ :- लोकसभा निवडणूकीदिवशी पाटण विधानसभा मतदारसंघात तारळे येथील १२५, जाधवआळी मतदान केंद्रावर आपल्या पदाचा गैरवापर करुन दादागिरी करीत मतदान केंद्रप्रतिनिधी असणाऱ्या तारळे येथील शंभूराज युवा संघटनेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यास विनाकारण मारहाण करणाऱ्या जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटीलवर पावसाळी अधिवेशन संपण्यापुर्वी कडक कारवाई करा असे आदेश शासनाने आज विधानसभागृहात दिले आहे. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी या घटनेचा मुद्दा औचित्याच्या मुद्दाव्दारे आज विधानसभेत मांडला.आमदार शंभूराज देसाईंनी मांडलेला औचित्याचा मुद्दा दोन्ही बाजुच्या विधानसभा सदस्यांनी चांगलाच लावून धरल्याने विधानसभा सभागृहात बराच काळ गोंधळ निर्माण झाला होता.अधिवेशन संपण्यापुर्वी शासनाच्यावतीने कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याने विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरु झाले.
           पाटण विधानसभा मतदारसंघात दि.२३ एप्रिल,२०१९ ला लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी तारळे येथील १२५,जाधवआळी मतदान केंद्रावरील मतदान केंद्रप्रतिनिधी असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना उर्मट भाषा वापरत त्यातील सामाजीक कार्यात कार्यरत असणाऱ्या जबाबदार पदाधिकाऱ्यास सातारा जिल्हा अतिरिक्त पोलीस अधिक्षक यांचे पथकाने व स्वत: अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी कोणतेही कारण न देता किंवा पदाधिकाऱ्यांने कोणताही गुन्हा केला नसताना याठिकाणी उपस्थित मतदारांपुढे तसेच समाजापुढे अमानुषपणे मारहाण केली व या पदाधिकाऱ्यांना चार तास पोलीस स्टेशनला विनाकारण बसवून ठेवले यासर्व प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेवर तसेच या विभागातील मतदानावर याचा मोठया प्रमाणांत दुष्परीणाम झाला व समाजामध्ये चांगली प्रतिमा असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची जाणिवपुर्वक प्रतिमा मलीन करण्याचा अतिरिक्त पोलीस अधीक्षक,सातारा यांनी व त्यांच्या पथकाकडून प्रयत्न करण्यात आला असून या प्रकारामुळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचे विरुध्द येथील समाजामध्ये तीव्र स्वरुपाचा उद्रेक,भावना व असंतोष निर्माण झाल्याने त्यांचे विरोधात आंदोलने करण्याची भूमिका या विभागातील जनतेकडून घेण्यात आली होती परंतू लोकसभेची निवडणूक असल्याने येथील नागरिकांनी व महिलावर्गाने असा कोणताही पवित्रा घेतला नाही दरम्यान आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्या जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षकाने केलेल्या या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करुन त्याचेवर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी या विभागातील सर्वसामान्य जनता व पदाधिकारी यांचेवतीने राज्याचे गृहराज्यमंत्री,राज्याचे पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी सातारा व जिल्हा पोलीस अधीक्षक,सातारा यांचेकडे मी स्वत: तातडीने दि.२४.०४.२०१९ रोजीचे पत्राव्दारे करुनही वरीष्ठांकडून यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची घटना आमदार शंभूराज देसाई यांनी औचित्याच्या मुद्दाव्दारे विधानसभा सभागृहात मांडली व पदाधिकाऱ्यास अमानुषपणे मारहाण करुन याठिकाणी मतदान केंद्रप्रतिनिधी असणाऱ्या इतर तिघांनाही आरोपीसारखे उलट पोलीसांनीच चौकशीस बोलविले व त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला ही बाब पुर्णत: चुकीची असून कायदयाला धरुन नाही मीच आमच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला मारहाण होवूनही पोलीसांनी चौकशीला बोलवायला आपण कोणताही गुन्हा केलेला नाही,आपण काही आरोपी नाही.अतिरिक्त पोलीस अधीक्षकाची दादागिरी दोनच दिवसात विधानसभा सभागृहात मांडून संबधित पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी मोडीत काढणार असल्याचे सांगितले होते.अतिरिक्त पोलीस अधीक्षकाच्या या वर्तणुकीचा आणि दादागिरीचा मुद्दा सविस्तरपणे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा मुद्दा उचलून धरत दोन्ही बाजुच्या विधानसभा सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत आमदार शंभूराज देसाईंच्या मुद्दयाला पाठींबा दिल्याने बराच वेळ सभागृहात गोधंळाचे वातावरण निर्माण  झाले होते. दरम्यान पावसाळी अधिवेशन संपण्याच्या पुर्वी संबधित अतिरिक्त पोलीस अधीक्षकावर कडक कारवाई केली जाईल असे शासनाच्या वतीने आदेश देण्यात आल्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरु झाले.          

Wednesday, 26 June 2019

पाटण मतदारसंघातील डोंगरी विद्यूत विकास आराखडयाला विशेष बाब म्हणून ११.२२ कोटींचा निधी मंजुर. आमदार शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या मागणीला यश. ऊर्जा मंत्र्यांच्या आदेशावरुन महाऊर्जाचे लेखी आदेश पारित.


     

       
दौलतनगर दि.२६ :- महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीकडून राज्यातील डोंगरी तालुक्यांकरीता विद्यूतची प्रंलबीत कांमे करण्याकरीता डोंगरी विकास आराखडा तयार करावा असे धोरण राज्याचे ऊर्जामंत्री यांनी आखले होते. त्यानुसार पाटण मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार शंभूराज देसाईंनी त्यांचे पाटण या १०० टक्के डोंगरी तालुक्यातील विद्यूत विकासाची प्रलंबीत कांमे करण्याकरीता महावितरणच्या सातारा मंडळाच्या अधीक्षक अभियंतामार्फत तयार केलेल्या डोंगंरी विद्यूत विकास आराखडयास आवश्यक ११ कोटी २२ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन दयावा याकरीता राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे तसेच विधानसभा सभागृहात लक्षवेदी सुचना व ताराकींत प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने पाटण तालुक्यातील डोंगरी विद्यूत विकास आराखडयाला राज्याचे ऊर्जामंत्री ना.बावनकुळे यांनी विशेष बाब म्हणून मान्यता देवून ११ कोटी २२ लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे.आमदार शंभूराज देसाईंनी मागणी केल्याप्रमाणे सर्वच्या सर्व रक्कम ऊर्जामंत्री यांनी मंजुर केली असून निधी मंजुरीचे लेखी आदेश महाऊर्जा विभागामार्फत दि.२५.०६.२०१९ रोजी पारित करण्यात आले आहे.
                    आमदार शंभूराज देसाईंनी या मंजुर निधीसंदर्भात म्हंटले आहे की, राज्यातील डोंगरी तालुक्यांकरीता विद्यूतची प्रंलबीत कांमे करण्याकरीता महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीकडून सर्व्हे करुन डोंगरी विकास आराखडा तयार करावा असे धोरण राज्याचे ऊर्जामंत्री यांचे होते.त्यानुसार पाटण या १०० टक्के डोंगरी तालुक्यातील विद्यूत विकासाची बरेच वर्षापासून प्रलंबीत असणारी विविध कामे करण्याकरीता राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या धोरणानुसार मी महावितरणच्या सातारा मंडळाच्या अधीक्षक अभियंतामार्फत पाटण डोंगरी विद्यूत विकास आराखडा तयार केला असून या आराखडयातील कामांकरीता एकूण ११ कोटी २२ लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. हा निधी ऊर्जामंत्री यांनी तात्काळ उपलब्ध करुन दयावा याकरीता सातत्याने त्यांचेकडे व शासनाकडे पाठपुरावा केला.यासंदर्भात महाराष्ट्र विधानसभेतही ऊर्जामंत्र्यांचे व शासनाचे लक्ष वेधण्याकरीता लक्षवेदी सुचना तसेच तारांकीत प्रश्नही मांडले.मी दि.०८.१२.२०१६ व दि.३१.०७.२०१७ रोजी मांडलेल्या तारांकीत प्रश्नावर पाटणच्या डोंगरी विद्यूत विकासाचा आराखडा शासनास प्राप्त झाला असून यास निधी मंजुर करुन देणार असल्याचे आश्वासन ऊर्जामंत्री यांनी मला दिले होते.ऊर्जामंत्री यांच्या आश्वासनानुसार दि.०८.०३.२०१८ रोजी लेखी पत्राव्दारे या निधीची मागणी केल्यानंतर ऊर्जामंत्री लवकरच हा निधी मंजुर करुन दिला जाईल असे सांगितले.
                        त्यानुसार राज्याचे ऊर्जामंत्री यांचे आदेशावरुन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) महाराष्ट्र शासनाचे प्र.अतिरिक्त महासंचालक यांनी दि.२५.०६.२०१९ रोजी पारित केलेल्या लेखी आदेशामध्ये विधानसभा सदस्य आमदार शंभूराज देसाई यांनी विधानसभा सभागृहात मांडलेल्या लक्षवेदी सुचनेच्या अनुषंगाने ऊर्जामंत्री यांनी डोंगरी आराखडया अतंर्गत विद्यूत विषयक कामे करणेकरीता निधी उपलब्ध करणेबाबत मान्य केले होते त्यास अनुसरुन आमदार शंभूराज देसाई यांचेकडील दि.०८.०३.२०१८ रोजीच्या पत्रान्वये डोगंरी विकास आराखडा अंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघात विद्यूत विषयक कामांना ११ कोटी २२ लाख रुपयांचा निधी देण्यास मान्यता मिळाली आहे. डोंगरी विकास आराखडयातंर्गत उच्चदाब व लघूदाब वाहिनीचे गंजलेले पोल बदलणे,मागणी असणाऱ्या ठिकाणी नवीन उच्चदाबाचे रोहित्रे बसविणे, लुज गाळे ओढणे,गंजलेले कंन्डक्टर बदलणे,केबल बदलणे,लघूदाब वाहिनीला स्पेअरर्स बसविणे,ताण देणे,वितरण रोहित्राला पुर्नआर्थिंग करणे,वितरण रोहित्राची केबल बदलणे, गंजलेले डिस्ट्रीब्युशन बॉक्स बदलणे,बंद पडलेले कप्यॉसिटर बदलणे, उपकेंद्रामधील ३३ केव्ही, २२ केव्ही, ११ केव्ही बेकर्स बदलणे, आयसोलेटर बदलणे, करंट ट्रान्सफॉर्मर व भारित रोहित्र बॅटरी सेट,बॅटरी चार्जर बदलणे,विशेष वितरण रोहित्राला पुर्नआर्थिंग करणे,कंन्ट्रोल पॅनलची दुरुस्ती करणे इत्यादी कामांचा यामध्ये समावेश आहे.पाटण तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात पवनऊर्जा क्षेत्र असल्यामुळे डोंगरी विकास आराखडयातंर्गत पाटण तालुक्यातील विद्यूत विषयक कामे पुर्ण करण्याकरीता “विशेष बाब” म्हणून महाऊर्जाकडे जमा असलेल्या मुलभूत सुविधा निधीमधून रु ११ कोटी २२ लाख इतका निधी महावितरणला देण्यात येणार आहे. या निधी मधील कामे ही पुढील तीन वर्षामध्ये पुर्ण करावयाची आहेत.असे या लेखी आदेशामध्ये म्हंटले असून सदरचे लेखी आदेश अधिक्षक अभियंता,सातारा मंडळ,महावितरण यांना दि.२५.०६.२०१९ रोजी पाठविण्यात आले असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले असून लवकरच अधिक्षक अभियंता,सातारा मंडळ,महावितरण यांची बैठक घेवून या आराखडयातील गंजलेले पोल बदलणे, नवीन पोल बसविणे,नवीन रोहित्रे बसविणे,पाणी पुरवठा संस्थाना १६ तास वीज देणे ही प्राधान्याने करावयाच्या कामांना सुरुवात करण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
चौकट:- उच्चदाब जलसिंचन योजनेतंर्गत पाणी पुरवठा संस्थाना १६ तास वीजपुरवठा करता येणार. आ.देसाई
             डोंगरी विद्यूत विकास आराखडयातंर्गत पाणी पुरवठा संस्थाना १६ तास वीजपुरवठा करण्याच्या कामांचाही यामध्ये समावेश करावा असे अधिक्षक अभियंता, महावितरण यांना सुचित केले होते त्यानुसार या डोंगरी आराखडयातून उच्चदाब जलसिंचन योजनेतंर्गत पाणी पुरवठा संस्थाना १६ तास वीजपुरवठा करणे आता सुलभ होणार असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.

Tuesday, 25 June 2019

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकाचे दुसरे टप्प्याकरीता १५ कोटी रुपयांचा निधी मंजुर. वित्तमंत्री ना.सुधीर मुनंगटीवार यांची विधानसभेत आज घोषणा. आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीला यश.



दौलतनगर दि.२५ :- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे “महाराष्ट्र दौलत”  या शताब्दी स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे १० कोटी रुपयांचे काम पुर्ण झाले असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याकरीता यंदाच्या वर्षी १५ कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे वित्तमंत्री ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या मागणीला या घोषणेमुळे यश मिळाले आहे.
                            मुंबई येथे राज्य शासनाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात सन २०१९-२० च्या अतिरिक्त अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू पाटणचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईंनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे “महाराष्ट्र दौलत” या शताब्दी स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे कामाकरीता युतीच्या शासनाने १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारक दिमाखात त्यांचे कर्मभूमित उभे आहे. राज्यातील एक देखणे असे स्मारक म्हणून हे स्मारक नावारुपास येत असून याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व वित्त मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार तसेच युतीच्या शासनाचे जाहीर आभार मानतो.“महाराष्ट्र दौलत” या शताब्दी स्मारकाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर केला जाईल दुसरे टप्प्याच्याही कामाला लवकरच सुरुवात करा असे जाहीर आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलेप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकाचे दुसऱ्या टप्प्याचे कामांकरीता यंदाच्या वर्षी आवश्यक असणारा १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दयावा अशी आग्रही मागणी केली होती.
                       आज दि.२५ जुन रोजी अतिरिक्त अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना राज्याचे वित्तमंत्री ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीवरुन युतीच्या शासनाने स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे “महाराष्ट्र दौलत” शताब्दी स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम करणेकरीता १० कोटी रुपयांचा निधी यापुर्वीच उपलब्ध करुन दिला आहे.स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांकरीताही यंदाच्या वर्षी १५ कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यात येईल अशी विधानसभेत घोषणा केली. वित्तमंत्री ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज या निधीची घोषणा केल्यानंतर आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्यक्ष भेटून पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या व लोकनेतेप्रेमी जनतेच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले.

प्रादेशिक पाणी योजना सुरु करा अन्यथा त्याअंतर्गत छोटया गांवाना स्वतंत्र्य पाणी योजना करायला निधी दया. तालिका अध्यक्ष आमदार शंभूराज देसाईंचे शासनाला निर्देश. उपाययोजना करण्याचे पाणी पुरवठा मंत्र्यांचे आश्वासन.



दौलतनगर दि.२५:- राज्यातील बहूतांशी भागामध्ये सुमारे सात ते आठ गांवाना उपयुक्त अशा प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना करण्यात आल्या आहेत परंतू यातील बऱ्याच अंशी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना सध्या बंद अवस्थेत असल्यामुळे या योजनातंर्गत समाविष्ठ गांवाना पाणी मिळत नाही.राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याकडून या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करावी. योजनांची दुरुस्ती करणे शक्य नसेल तर या योजनेतंर्गत समाविष्ठ असणाऱ्या छोटया छोटया गांवाना राज्य शासनाने स्वत:च्या स्वतंत्र्य नळ पाणी पुरवठा योजना करणेकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर करुन तो उपलब्ध करुन दयावा असे निर्देश तालिका अध्यक्ष आमदार शंभूराज देसाईंनी शासनाला देत राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर यांना तालिका अध्यक्ष पदावरुन सुचित केले.यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी या योजनांच्या संदर्भात उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
 सन २०१९-२० च्या अतिरिक्त अर्थस्ंकल्पावरील चर्चेला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर हे सभागृहात उत्तर देत असताना तालिका अध्यक्ष म्हणून आमदार शंभूराज देसाईंनी राज्यातील बंद अवस्थेत असणाऱ्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांची बाब मंत्री ना.लोणीकर यांच्या निदर्शनास आणून देत त्यांना वरीलप्रमाणे तालिका अध्यक्ष आमदार शंभूराज देसाईंनी सुचित केले.
 विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरुन तालिका अध्यक्ष म्हणून आमदार शंभूराज देसाईंनी अतिरिक्त अर्थस्ंकल्पा वरील चर्चेचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांचे उत्तर सुरु असताना,पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रीमहोदय राज्यातील बहूतांशी भागामध्ये प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना या बऱ्याच अंशी सध्या बंद अवस्थेत आहेत या योजनांतंर्गत सुमारे सात ते आठ छोटया छोटया गांवाचा समावेश आहे.एकत्रित सात ते आठ छोटया छोटया गांवाना या योजनेचा लाभ मिळावा याकरीता ही योजना शासनाने राबविली आहे.परंतू बहूतांशी योजना या जीर्ण आणि नादुरुस्त झाल्या असल्यामुळे समाविष्ठ असणाऱ्या छोटया छोटया अनेक गांवाना या योजनेचे पाणी मिळणे बंद झाले आहे.प्रादेशिक पाणी योजनेचे पाणी मिळत नसल्याने अनेक छोटया छोटया गांवाच्या पिण्याच्या पाण्याची मोठया प्रमाणात गैरसोय होत असून शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याकडून या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करावी. योजनांची दुरुस्ती करणे विभागाला शक्य नसेल तर या योजनेतंर्गत समाविष्ठ असणाऱ्या छोटया छोटया गांवाना राज्य शासनाने स्वत:च्या स्वतंत्र्य नळ पाणी पुरवठा योजना करणेकरीताचा सर्व्हे करुन अहवाल शासनास सादर करावा व शासनाने अशा छोटया छोटया गांवाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना करणेकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर करुन तो उपलब्ध करुन दयावा असे शासनाला व पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांना निर्देश दिले. यावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी अतिरिक्त अर्थस्ंकल्पावरील चर्चेवर उत्तर देताना अशा योजनांच्या संदर्भात उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.


आश्वासन पुर्तीच्या दिशेने युती शासनाची वाटचाल- आमदार शंभूराज देसाई. राज्याचा समतोल विकास साधणारा व आश्वासन पुर्तीचा हा अतिरिक्त अर्थसंकल्प.



दौलतनगर दि.२५:- राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री यांचे मार्गदर्शनाखाली ०४ लाख ०३ हजार २०७ कोटींचा अर्थसंकल्प राज्याचे वित्तमंत्री यांनी दि.२७ फेब्रुवारी,२०१९ सादर केला होता.नवीन बाबीव्दारे दि.१९ जुन रोजी या अर्थस्ंकल्पामध्ये ०१ हजार ५८६ कोटींची अतिरिक्त वाढ करुन या अधिवेशनात हा अर्थसंकल्प  ०४ लाख ०४ हजार ७९३ कोटींचा सादर करण्यात आला.या अर्थस्ंकल्पातून सबका साथ,सबका विकास व सबका विश्वास या धोरणानुसार राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी हा केंद्रबिंदू मानून मांडलेला हा अर्थसंकल्प आहे.आश्वासन पुर्तीच्या दिशेने युती शासनाची वाटचाल असून राज्याचा समतोल विकास साधणारा आणि २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत जी जी आश्वासने दिली होती त्याची पुर्तता करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी विधानसभेत केले.
                    शिवसेना पक्षाच्या वतीने प्रथमत: आमदार शंभूराज देसाईंना सन २०१९-२० च्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर बोलण्याची संधी देण्यात आली होती.त्यावेळी युती शासनाने गत साडेचार वर्षात महाराष्ट्र राज्यात केलेल्या विविध जनहितार्थ विकासकामांना स्पर्श करीत त्यांनी  अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये युतीच्या शासनाने जनतेच्या मुलभूत सुविधा पुर्ण करण्याकरीता केलेल्या विविध खात्यांच्या अर्थसंकल्पावरील तरतूदीचे कौतुक केले. राज्याच्या ग्रामीण भागामध्ये राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू मानून युतीच्या शासनाने राज्यामध्ये कृषी, सिंचन,तीर्थक्षेत्र विकास,विद्यूत विकास, ग्रामीण विकास,ग्रामीण शिक्षण,कला,आरोग्य तसेच दर्जेदार रस्त्यांच्या बांधकामांकरीता  बांधकाम विभाग या सर्व विभागांना केलेली तरतूद ही प्रगतीच्या दिशेने नेणारी आहे.प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून सिंचन क्षेत्र वाढविण्याकरीता युती शासनाचे धोरण या अर्थसंकल्पातून स्पष्ट दिसून येत आहे. आणि सगळयात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यातील शेतकऱ्यांना दिलेली शेतकरी सन्मान योजना. २०१४ च्या निवडणूकीनंतर सत्तेवर येताना युती शासनाने जी जी आश्वासने महाराष्ट्र राज्यातील जनतेला दिली होती ती ती आश्वासने पुर्ण करण्याचा गत साडेचार वर्षात कसोशीने प्रयत्न केला आहे. युती शासनाचा एक घटक म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे. आज आम्ही युतीचे सर्व आमदार ठामपणे आपआपल्या मतदारसंघातील जनतेला सांगु शकतो की, आम्ही जे बोललो ते करुन दाखविले ते केवळ आणि केवळ युती शासनाने आम्हाला दिलेल्या पाठबळामुळेच असे सांगून आमदार शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील काही प्रलंबीत प्रश्नाकडेही शासनाचे व शासनाच्या विविध खात्यांच्या मंत्रीमहोदयांचे लक्ष वेधले.
      पाटण मतदारसंघातील प्रश्नाविषयी बोलताना आमदार देसाई म्हणाले,जलसंपदा विभागाला १२ हजार ५९७ कोटी रुपयांची तर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेकरीता २७२० कोटी रुपयांची शासनाने तरतूद केली आहे. पाटण मतदारसंघातील मोरणा धरण प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या वाढीव क्षेत्राला इरिगेशनच्या माध्यमातून पाणी देणेकरीता वाढीव निधीची अजुनही गरज असून कोयना नदीकाठच्या गांवाना संरक्षण देणेकरीता तीन गांवाच्या घाटांचा निधी अद्याप मिळाला नाही तो लवकरात लवकर उपलब्ध करुन दयावा. मतदारसंघातील १५ अवर्गीकृत ग्रामीण मार्ग/ इजिमा रस्त्यांचा प्रजिमा मध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात आली असून याचा प्रस्ताव तात्काळ मागवावा. तसेच राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या काशीळ ते पाल-तारळे-जळव- निवकणे-मणदुरे-केरळ- सुरुल ते पाटण या ३८ किमी रस्त्याला विशेष बाब म्हणून राज्य मार्गाचा दर्जा दयावा असे सांगत त्यांनी पाटण न्यायालयाच्या इमारतीचे काम पुर्णत्वाकडे गेले असून याकरीता आवश्यक असणाऱ्या फर्नीचरच्या कामांना निधी आवश्यक आहे याचा प्रस्ताव शासनाकडे आला असून या निधी मंजुर करावा. मल्हारपेठला पोलीस औटपोस्ट असून या औटपोस्टला पोलीस स्टेशनचा दर्जा देवून पोलीस स्टेशन बांधणेकरीता निधी दयावा.मल्हारपेठ, ढेबेवाडी येथील पोलीसांच्या वसाहतींची दुरावस्था झाली असून या वसाहतींच्या बांधकामांना निधी दयावा तर अवकाळी पावसामुळे नुकसान होणाऱ्यांना नुकसानभरपाई देताना सन १९८८ साली ६५ मिमी ची अट घालण्यात आली आहे अवकाळी पाऊस काही सांगून येत नाही त्यामुळे ही अट शिथील करावी व नुकसानग्रस्तांना मदत करावी.कोयना पर्यटनातील काही कामांना निधी मंजुर झाला आहे उर्वरीत कामांना यंदाच्या वर्षी निधी मंजुर करावा यामध्ये वन्यजीव विभागाकडीलही अनेक कामे आहेत यासंदर्भातील मागणी वनमंत्री यांचेकडे केली आहे.पाटणच्या ग्रामीण रुग्णलयाला श्रेणीवर्धन देण्याचा प्रस्ताव शासनाकडे बरेच वर्षे प्रलंबीत आहे यासही मान्यता दयावी.मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे आमचे पाटण शेजारच्या तामकडे एमआयडीसीमध्ये दोन चार उद्योग सोडले तर बाकीचे सर्व प्लॉट पडून आहेत.एमआयडीसीमधील प्लॉट विकसीत करुन ज्यांना उद्योगाकरीता गरजेचे आहेत त्यांना ते देण्यात यावेत असे सांगून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांनी आम्ही जे मागितले त्या त्या कामांना आवश्यक निधी मंजुर केला जी काही कामे राहिली आहेत त्यासही निधी दयावा असे सांगत मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांचे कार्याचे कौतुक करुन त्यांचे आभार व्यक्त केले.
चौकट:- पाटणच्या प्रशासकीय इमारतीकरीता निधी मंजुर करा. - आमदार शंभूराज देसाई.
पाटण हा मतदारसंघ डोंगंराळ असून पाटण हे तालुक्याचे ठिकाण आहे. तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालये ही वेगवेगळया ठिकाणी असून ही सर्व कार्यालये एका छताखाली आणणेकरीता प्रशासकीय इमारत उभी करणे गरजेचे आहे. या प्रशासकीय कार्यालयास विशेष बाब म्हणून निधी मंजुर करावा असा आग्रह आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांना अर्थसंकल्पावरील चर्चेवर बोलताना केला.

Monday, 24 June 2019

मुख्यमंत्र्यांच्या योग्य नियोजनामुळे राज्यातील दुष्काळ,पाणीटंचाई परिस्थितीवर उपाययोजना होवू शकल्या. आमदार शंभूराज देसाईंचे २९३ अन्यवे चर्चेवर विधानसभेत प्रतिपादन.


                

दौलतनगर दि.२5:- राज्यावर आलेले पाणीटंचाईचे संकट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या योग्य नियोजनामुळे दुर होण्यास मदत झाली.राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील डोंगरी व दुर्गम भागात जाणवणाऱ्या दुष्काळासंदर्भात तसेच पाणीटंचाई संदर्भात आवश्यक असणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनांना,पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीच्या कामांना,पाण्याच्या विहीरी खोल करणे,नवीन विंधन विहीरी घेणे,गाळ काढणे,विधंन विहीरींची विशेष दुरुस्ती करणे, टँकरची आवश्यकता असणाऱ्या गांवाना तहसिलदारांमार्फत तात्काळ टँकर मंजुर करुन देणे, तसेच आवश्यक ठिकाणी चारा छावण्या उभारुन चारा छावणीतील जनावरांना खाद्य पुरवठा करणे,शेतीच्या पंपाची वीज खंडीत न करणे इत्यादी कामांचे विविध खात्यांमार्फत नियोजन करुन निधी उपलब्ध करुन दिल्यानेच त्यांच्या योग्य नियोजनामुळेच राज्य शासनाने आवश्यक त्या उपाययोजना  करुन युतीच्या शासनाने दुष्काळावर व पाणीटंचाई परिस्थितीवर मात केली असून सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात देण्यात आलेली कर्जमाफी हे युती शासनाचे मोठे यश असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी विधानसभेत केले.
                    महाराष्ट्र विधानसभेच्या मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दि.२१ जुन रोजी सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या मविस २९३ अन्वये चर्चेवर आमदार शंभूराज देसाईंनी आपली भूमिका मांडली.या चर्चेवर बोलताना त्यांनी सत्ताधारी पक्षाने राज्यातील दुष्काळी परिस्थिती निवारणार्थ व पाणीटंचाईच्या संदर्भात  राज्य शासनाने राज्याचे मुख्यमंत्री यांनी योग्य नियोजन करुन शासनाच्या विविध खात्यांच्या माध्यमातून उपरोक्त उपाययोजना केल्यामुळेच राज्यावरील दुष्काळाचे आणि पाणीटंचाईचे संकट दुर होवू शकले असल्याचे प्रतिपादन केले.याप्रसंगी त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील यासंदर्भातील विविध विषयांवर आपले मत मांडताना युतीच्या शासनाने पाटण मतदारसंघात पाण्याच्या संदर्भात दिलेल्या विविध पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या कामांना दिलेल्या निधीच्या संदर्भात शासनाचे व विशेषत: मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. पाटण विधानसभा मतदारसंघात ४ महसूल मंडलामध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.या चार मंडलामध्ये पाणीटंचाई जाणवू नये याकरीता उपरोक्त आवश्यक त्या उपाययोजना शासनाच्या मदतीने आम्हास करता आल्या. प्राधान्याने या मंडलातील गांवामध्ये जिथे पाण्याची टंचाई जाणवणार होती त्या ठिकाणच्या गांवामध्ये नळ पाणी पुरवठा योजनां,पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्ती, पाण्याच्या विहीरी खोल करणे,नवीन विंधन विहीरी घेणे,गाळ काढणे,विधंन विहीरींची विशेष दुरुस्ती करणे,टँकर पुरविणे या कामांना आवश्यक तो निधी वेळेत मिळू शकला तसेच शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रवास शुल्कात माफी,कृषीपंपाच्या चालु वीज बिलात मोठया प्रमाणात सुट देणे, वीज बिलामुळे बंद करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा तसेच शेतीच्या पाण्याच्या योजना पुन्हा सुरु करणे ही कामे शासनाच्या योग्यवेळी घेतलेल्या निर्णयामुळे होवू शकली असे सांगून त्यांनी काही उपाययोजनाही शासनास सुचविल्या यामध्ये पाटण मतदारसंघातील तारळी धरण प्रकल्पाकरीता शासनाने ५० मीटरवरील जमीनीस पाणी मिळवून देणेकरीता १६१०.३२ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे ५५३ कोटी रुपयांचा वाढीवचा निधी मिळाला असून मुख्यमंत्री यांच्या हस्ते या योजनांचे ई भूमिपुजनही करण्यात आले आहे.तारळी प्रकल्पातील ५० मीटरच्या वरील जमिन क्षेत्राला पाणी देणेसंदर्भात कामास जलसंपदा विभागाकडून गती देणे अत्यंत गरजेचे आहे. लवकरात लवकर या विभागातील ५० मीटरच्या वरील कामे पुर्णत्वाकडे गेल्यानंतर या विभागातील १७ गांवातील २७२५ एकर जादाचे क्षेत्र यामुळे ओलिताखाली येण्यास मदत होणार असून जलसंपदा विभागाकडून सदरची कामे लवकर मार्गी लावण्याच्या सक्त सुचना कराव्यात अशी मागणी आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी केली. तसेच युती शासनाच्या माध्यमातून पाटण मतदारसंघात शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल, कोयना भूकंप निधी,जलस्वराज्य प्रकल्प,विशेष घटक योजना या विविध लेखाशिर्षातून एकूण ७६ नळ पाणी पुरवठा योजनांना आवश्यक असणारा निधी मंजुर झाला आहे. एका वर्षात ७६ नळ पाणी पुरवठा योजनांना निधी मंजुर होणे ही पाटण मतदारसंघातील सर्वांत महत्वाची बाब मानली जाते.नळ पाणी पुरवठयाच्या विभागाचे काम हे संत गतीने सुरु आहे. त्या कामांनाही चालना देवून ही पाणी पुरवठा योजनांची कामे लवकरात लवकर पुर्ण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
चौकट:- कोयना धरणातील ४ टीएमसी पाणी कर्नाटकला न दिल्याने मुख्यमंत्र्याचे आभार.
              पाटण मतदारसंघातील  कोयना धरणात यंदाच्या वर्षी कमी पाणीसाठा असून धरणातील ४ टीएमसी पाणी कर्नाटकला देवू नये अशी मागणी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्याकडे केली होती. आमची मागणी मान्य केल्याने मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांचा मी आभारी आहे. सदरचे ४ टीएमसी पाणी न दिल्यानेच धरणात आज बऱ्यापैकी पाणीसाठा असून यापुढे कोयना धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करावे अशीही मागणी आमदार शंभूराज देसाईंनी केली.

Sunday, 23 June 2019

बँक ऑफ महाराष्ट्रच्या तारळे ता.पाटण शाखेतील गैरव्यवहाराची चौकशी करुन दोषींवर कडक कार्यवाही करा.तालिका अध्यक्ष आमदार शंभूराज देसाईंचे शासनाला निर्देश.



                      
दौलतनगर दि.२3:- पाटण तालुक्यातील तारळे येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या शाखेत शाखेचा शाखाप्रमुख यांने या विभागातील एका राजकीय पुढाऱ्याला हाताशी धरुन शाखेत कर्जवाटपामध्ये तसेच अनेक बाबतीत आर्थिक गैरव्यवहार केले असल्याने शाखेतून या विभागातील स्थानिकांना कर्जवाटप करणे थांबविण्यात आले असल्याची बाब निदर्शनास आली असून शाखाप्रमुख व राजकीय पुढारी या दोन व्यक्तींच्यामुळे स्थानिक उद्योजक, व्यापारी तसेच नागरिक हे वेटीस धरले जात असल्याने या बँकेच्या शाखेतील सर्व गैरव्यवहाराची जिल्हाधिकारी यांचेमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी व दोषींवर कडक कार्यवाही करुन बँकेतुन कर्जपुरवठा सुरळीत सुरु करावा असे निर्देश तालिका अध्यक्ष आमदार शंभूराज देसाईंनी शासनाला दिले.
                          तारळे ता. पाटण येथे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची शाखा असून या शाखेमध्ये शाखेचा संबधित शाखाधिकारी याने तारळे विभागातील एका राजकीय पुढाऱ्याला हाताशी धरुन बँकेच्या शाखेत कर्जवाटपामध्ये तसेच इतरही आर्थिक बाबींमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार केला असल्याचे उघडपणे या विभागातील स्थानिक उद्योजक, व्यापारी तसेच नागरिकांकडून सांगण्यात येत असून या दोन व्यक्तींच्यामुळे शाखेतून उद्योजक,व्यापारी तसेच नागरिकांना आवश्यक असणारा कर्जपुरवठा पुर्णत: बंद करण्यात आला आहे.स्थानिक उद्योजक,व्यापारी तसेच नागरिकांना तारळे शाखेकडून वेठीस धरण्यात येत असून शाखेतून कर्जपुरवठा बंद होण्यास हे दोन व्यक्तीच जबाबदार असल्याचे सांगण्यात येत असून या सर्व प्रकारामुळे स्थानिक उद्योजक,व्यापारी तसेच नागरिकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र तारळे शाखेच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.या शाखेतील गैरव्यवहाराची पुर्णपणे जिल्हाधिकारी,सातारा यांच्यामार्फत चौकशी करुन दोषींवर कडक कार्यवाही करावी व शाखेतील कर्जपुरवठा सुरळीतपणे सुरु करावा अशी मागणी स्थानिक उद्योजक,व्यापारी तसेच नागरिकांकडून करण्यात येत असल्याने तात्काळ बँक ऑफ महाराष्ट्रच्या तारळे शाखेतील कर्जवाटपामध्ये तसेच अनेक बाबतीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची जिल्हाधिकारी, सातारा यांच्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येवून दोषींवर कडक कार्यवाही करावी व  स्थानिक उद्योजक, व्यापारी तसेच नागरिकांच्या मागणीवरुन या शाखेतून सुरळीत असा कर्जपुरवठा सुरु करण्यात यावा असे निर्देश आमदार शंभूराज देसाईंनी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरुन तालिका अध्यक्ष म्हणून शासनाला दिले.
चौकट:- जिल्हास्तरीय वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी विधानसभेत मांडून कडक कारवाई करण्यास           
              शासनास भाग पाडणार- आमदार शंभूराज देसाई.
              लोकसभा निवडणूकीदिवशी पाटण विधानसभा मतदारसंघात दादागिरी व आपल्या पदाचा गैरवापर करुन मतदारसंघातील जबाबदार पदाधिकाऱ्यास विनाकारण मारहाण करणाऱ्या जिल्हास्तरीय वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने केलेली दादागिरी वरीष्ठाच्या कानावर घालूनही याकडे वरीष्ठांनी केलेल्या दुर्लक्षामुळे हे दादागिरीचे प्रकरण दोनच दिवसात सुरु असलेल्या अधिवेशनात विधानसभेत मांडून संबधित पोलीस अधिकाऱ्यावर शासनामार्फत कडक कारवाई करण्यास शासनास भाग पाडणार असून पोलीसांची दादागिरी मोडीत काढणार असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.